पुष्पराज
त्रिभुवन सुंदर पुष्पराज पर्णावर होते विराजले
जणू माझ्या स्वागतासाठी आतुरलेले
मिटलेल्या नयनांनी हसणारे
सुगंध कुशीत ठेवणारे
सायंकाळी सुंदरतेचा मुखवटा उतरला
पुष्पराज सुगंधातुन दरवळत राहिला
सुंदरतेचे अस्तित्वही नामशेष जाहले
गुणरुपी सुगंधच स्मरणात राहिले
💬 प्रतिसाद
(2)
श
शब्दानुज
Tue, 05/06/2014 - 15:43
नवीन
साधी सरळ सोपी कविता
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 05/06/2014 - 16:23
नवीन
पुष्प *secret* राज
- Log in or register to post comments