Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राष्ट्रवाद- एक उन्माद !

म
मारवा
Wed, 05/07/2014 - 13:59
🗣 90 प्रतिसाद
राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत. काही वर्षांपुर्वी पाकीस्तान हा भारत या राष्ट्राचा भाग होता आज नाही व संपुर्ण पाकीस्तान चा हा भुभाग एक स्वतंत्र राष्ट्र बनविण्यात आलेला आहे. क्रीमीया आता यापुढील काळात रशिया या राष्ट्राचा भाग झालेला आहे. इस्त्रायल या राष्ट्राची संपुर्ण निर्मीती ही तर अगदी अलीकडच्या काळाचीच आहे. व कोण जाणे पॅलेस्टाइन हे आज अस्तित्वात असलेले राष्ट्र उद्या असेल कींवा नसेल. रशिया या एका मोठ्या राष्ट्राचे अनेक तुकडे होउन डझनभर स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली ही देखील अलीकडच्या काळातीलच घटना आहे. So Nationalism is an absolutely man-made-phenomena and nothing sacred about it ! आणि आता ही राष्ट्र व्यवस्था अवघ्या मानवजातीच्याच मुळावरच उठली असेल तर तीला नष्ट करणे हे आपले एक मानव म्हणुन आद्य कर्तव्य च आहे. राष्ट्रवादाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणाच अतिशय नकारात्मक आहेत. प्रामुख्याने धर्मश्रेष्ठत्व वा वंश-वर्ण श्रेष्ठत्व वा संस्कृतीश्रेष्ठत्व या मुलत: अहंकाराधिष्ठीत सत्ताकांक्षी महत्वाकांक्षी नकारात्मक प्रेरणांतुनच निरनिराळ्या राष्ट्रांची निर्मीती होत असते. Xenophobia म्हणजे आपल्याहुन परक्या वा अनोळखी व्यक्तींविषयी वाटणारी भीती आणि द्वेष ही ही एक आणखी नकारात्मक प्रेरणा राष्ट्र निर्मीतीस उत्तेजन देते. माणुस मग आपल्या सारख्या वर्ण संस्कृती असलेल्यां बरोबर राहण पसंत करतो. एकदा राष्ट्र निर्मीती झाल्यानंतर मग इतर अनेक आनुषंगिक एव्हील्स ची निर्मीती होणे ओघानेच आले. उदा. आपल्या राष्ट्राचा विस्तार करणे , त्यासाठी युद्ध/ शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु करणे या अखेरीस संपुर्ण मानवजातीच्या च विनाशास कारणीभुत होणारया गोष्टींची सुरुवात होते. विवीध राष्ट्रे जो सैन्य निर्मीती व सांभाळ तसेच शस्त्र निर्मीती यासाठी जी अब्जावधी रुपयांची व त्याहुन मोलाच्या अशा ह्युमन अवर्स ची एनर्जी ची गुंतवणुक करतात ती थांबवली तर ही अनमोल अतिप्रचंड गुंतवणुक माणसाचे जीवन सुंदर समृद्ध बनविणारया अनेक महत्वाच्या मुलभुत गोष्टींमध्ये करता येइल. शिक्षण/ आरोग्य/ विकास अशा अनेक क्षेत्रांकडे हे मानवी बळ सकारात्मकरीत्या वळविता येउ शकते. चायना/अमेरीका यांच डीफ़ेन्स बजेट आणि भारत पाकीस्तान सारख्या ज्यांना विकासाची अत्यंत आवश्यकता आहे ते आपल्या एकुण बजेटच्या कीती टक्की रक्कम डीफ़ेन्स वर खर्च करतात हे आकडे बघितले तरी वास्तुस्थीतीची कल्पना येउ शकते. राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात. त्यांच्या मरण्या मारण्याचे सोहळे घडविले जातात. ग्रेलिंग अत्यंत समर्पक शब्दात हा वेडेपणा मांडतो तो म्हणतो “Disguised as patriotism and love of one's country, it trades on the unreason of mass psychology to make a variety of horrors seem acceptable, even honorable. For example: if someone said to you, "I am going to send your son to kill the boy next door" you would hotly protest. But only let him seduce you with "Queen and Country!" "The Fatherland!" "My country right or wrong!" and you would find yourself permitting him to send all our sons to kill not just the sons of other people, but other people indiscriminately – which is what bombs and bullets do.” सैनिकाला स्व-विवेक वापरण्यापासुन कायम परावृत्त केले जाते सैनिंकांकडुन एकच अपेक्षा असते आदेशाचे पालन! सैनिक एरवी मुंगी मारणार नाही पण राष्ट्रभक्तीची अफ़ु खाल्यावर तो अनेक अनोळखी माणसांना कुठल्याही अपराधगंड न बाळगता आपण राष्ट्रासाठी अत्यंत सात्वीक कार्य करत आहोत अशा भावनेतुन मारु शकतो. बर्टान्ड्र रसेल यांचा हा अप्रतिम लेख जरुर वाचावा http://fair-use.org/international-journal-of-ethics/1915/01/the-ethics-of-war सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते. विवीध संस्कृती अस्तीत्वात असणे ही साहजीक नैसर्गिक बाब आहे. व एकसमान संस्कृतीच्या लोकांना एकमेकासोबत रहावेसे वाटणे हे तर अत्यंत नैसर्गिकच आहे परंतु राष्ट्र या संकल्पनेत आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या संस्कृती जोपासणारयांना एक शत्रु म्हणुन बघणे त्यावर वर्चस्व असणे आवश्यक आहे असे मानणे आपलीच संस्कृती व पर्यायाने मग राष्ट्र हेही श्रेष्ठ व म्हणुन पर्यायाने ठराविक भुभागावर व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आमचाच हक्क असावा या सर्व वेड्या अट्टाहासी मागण्या या राष्ट्रवादातुन च निर्माण होतात ( वसुधैव कुटुंबकम ) त्यासाठी मग साम दाम दंड भेद आदि सर्व नीतींचा अवलंब राष्ट्रवादाच्या व विस्तारवादाच्या संदर्भात केला जातो. हा अतिशय चुकीचा आहे. परत ग्रेलींग च्या च शब्दात Nationalists take certain unexceptionable desires and muddle them with unacceptable ones. We individually wish to run our own affairs; that is unexceptionable. Most of us value the culture which shaped our development and gave us our sense of personal and group identity; that too is unexceptionable. But the nationalist persuades us that the existence of other groups and cultures somehow puts these things at risk, and that the only way to protect them is to see ourselves as members of a distinct collective, defined by ethnicity, geography, or sameness of language or religion, and to build a wall around ourselves to keep out "foreigners". It is not enough that the others are other; we have to see them as a threat at very least to "our way of life", perhaps to our jobs, even to our daughters. राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे. अनेक मौल्यवान मानवी क्षमता युद्धाच्या नावाखाली वाया घालविलेल्या आहेत. राष्ट्रवाद माणसाला मी एक माणुस आहे या पुरेशा न्याय्य योग्य अशा ओळखीवर थांबु देत नाही. तो त्याला कुठल्यातरी राष्ट्राचा नागरीक बनवुन इतर राष्ट्रांतील माणसांशी तोडतो वेगळा पाडतो आयसोलेट करतो. मग अशी परस्परांपासुन वेगळी पाडलेली माणसं एकमेकांच्या विरोधात उभी राहुन परस्पर संघर्षातच आपली बहुमुल्य मानवी क्षमता वाया घालवितात. राष्ट्रवादाने काही राष्ट्रे इतर राष्ट्रावंर अनेक प्रकारे वर्चस्व गाजवितांना दिसतात श्रीमंत राष्ट्रे गरीब राष्ट्रांची अनेक प्रकारे पिळवणुक करतांना दिसतात. काही महान तत्वज्ञ राष्ट्र्वादा संदर्भात काय म्हणतात हे बघण अतिशय इंटरेस्टींग आहे खालील प्रत्येक कोट वैशिष्ट्यपुर्ण अशी टीप्पणी राष्ट्रवादा संदर्भात करते. १ The feeling of patriotism - It is an immoral feeling because, instead of confessing himself a son of God . . . or even a free man guided by his own reason, each man under the influence of patriotism confesses himself the son of his fatherland and the slave of his government, and commits actions contrary to his reason and conscience.” Leo Tolstoy, Patriotism and Government २ “One of the great attractions of patriotism—it fulfills our worst wishes. In the person of our nation we are able, vicariously, to bully and cheat. Bully and cheat, what’s more, with a feeling that we are profoundly virtuous.” Aldous Huxley ३ “To abolish war it is necessary to abolish patriotism, and to abolish patriotism it is necessary first to understand that it is an evil. Tell people that patriotism is bad and most will reply, ‘Yes, bad patriotism is bad, but mine is good patriotism.’” Leo Tolstoy ४ “Patriots always talk of dying for their country and never of killing for their country.” Bertrand Russell ५ I do not believe in nations. I believe that humanity is suffering because of nations. Nations should be destroyed. Too many national anthems have been sung, too many flags have been flown, too many idiocies have happened on this earth. Accept the unity of mankind now. Now, one world and and one mankind... These national governments must go. And until they go man's problems cannot be solved, because man's problems are bigger than nations. Osho To love anything beautiful in a country is normal and natural, but when that love is used by exploiters in their own interest it is called nationalism. Nationalism is fanned into imperialism, and then the stronger people divide and exploit the weaker, with the Bible in one hand and a bayonet in the other. The world is dominated by the spirit of cunning, ruthless exploitation, from which war must ensue. This spirit of nationalism is the greatest stupidity. Every individual should be free to live fully, completely. As long as one tries to liberate one's own particular country and not man, there must be racial hatreds, the divisions of people and classes. The problems of man must be solved as a whole, not as confined to countries or peoples. जे.कृष्णमुर्ती राष्ट्रवादातुन निर्माण होणारया युद्धाच्या निरर्थकतेवर हिप्पी चळवळीने ही फ़ार जोरदार आक्षेप घेतला होता. हिप्पी हे राष्ट्र्वाद आणि युद्धाच्या विरोधात होते. अमेरीका आक्रमक राष्ट्रवादाचे उत्तम प्रतीक च आहे. तर १९६५ नंतर अमेरीकेचे व्हीएतनाम विरोधात सुरु केलेले युद्ध अधिकाअधिक उग्र होत गेले यामध्ये व्हीएतनामींनी गनिमी काव्याने लढुन अमेरीकी सैनिकांना चांगलेच जेरीस आणले होते.मग यात अमेरीकेला अधिकाधिक सैनिकांची गरज भासु लागली व त्यासाठी आक्रमक भरती मोहीम राबवली जाउ लागली. अमेरीकेने व्हीएतनामवर नापाम व एजंट ऑरेंज सारख्या महाभयानक रासायनिक अस्त्रांचा मारा केला ज्याचा अप्रत्यक्ष आर्थिक फ़ायदा डाउ केमीकल्स सारख्या केमीकल कंपन्यांना होत होता. या व अनेक कारणांसाठी अमेरीकन तरुण वर्गाचा युद्धविरोध प्रचंड वाढला अमेरीकन तरुणांनी युद्धासाठीच्या ड्राफ़्ट कार्ड्स ची जाहीर होळी करण्याचा कार्यक्रम सुरु केला. या तरुणांना अनोळखी व्हीएतनामींशी ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता लढण्यात काहीही रस नव्हता. याच्याच विरोधात खालील एक सुंदर उपहासात्मक गीत जे सॅन फ़्रॆन्सीस्को च्या संगीतकार कंट्री ज्यो मॅक्डोनाल्ड ने लिहिले आहे ते फ़ार च सुंदर आहे ते अमरीकन स्वार्थी व निरर्थक राष्ट्रवाद व युद्धाची खील्ली उडविते. Yeah, come on all of you, big strong men, Uncle Sam needs your help again. He's got himself in a terrible jam Way down yonder in Vietnam So put down your books and pick up a gun, We're gonna have a whole lotta fun And it's one, two, three, What are we fighting for ? Don't ask me, I don't give a damn, Next stop is Vietnam; And it's five, six, seven, Open up the pearly gates, Well there ain't no time to wonder why, Whoopee! we're all gonna die. Well, come on Wall Street, don't move slow, Why man, this is war au-go-go. There's plenty good money to be made By supplying the Army with the tools of the trade, Just hope and pray that if they drop the bomb, They drop it on the Viet Cong. Well, come on generals, let's move fast; Your big chance has come at last. Gotta go out and get those reds — The only good commie is the one who's dead And you know that peace can only be won When we've blown 'em all to kingdom come. Well, come on mothers throughout the land, Pack your boys off to Vietnam. Come on fathers, don't hesitate, Send 'em off before it's too late. Be the first one on your block To have your boy come home in a box. अखेरीस मानवजात राष्ट्रांशिवाय सुखात शांतीत अस्तित्वात राहुच शकत नाही असे मानणारया व राष्ट्रांच्या भिंती नसलेले जग हा एक युटोपिया मानणारयांसाठी मी जॉन लेनन यांच हे गाण देउन समारोप करतो. "Imagine" Imagine there's no heaven It's easy if you try No hell below us Above us only sky Imagine all the people Living for today... Imagine there's no countries It isn't hard to do Nothing to kill or die for And no religion too Imagine all the people Living life in peace... You may say I'm a dreamer But I'm not the only one I hope someday you'll join us And the world will be as one Imagine no possessions I wonder if you can No need for greed or hunger A brotherhood of man Imagine all the people Sharing all the world... You may say I'm a dreamer But I'm not the only one I hope someday you'll join us And the world will live as one.

प्रतिक्रिया द्या
42965 वाचन

💬 प्रतिसाद (90)
ध
धन्या Wed, 05/07/2014 - 14:28 नवीन
एक वेगळाच विचार मांडला आहे तुम्ही. राष्ट्रवाद ही त्या मानाने खुपच व्यापक संकल्पना आहे. इथे तर प्रांतवादही नको ईतका फोफावला आहे. अस्मितेच्या नावाखाली आपल्याच "राष्ट्र"बांधवांना परप्रांतीय असे नामाभिधान चिकटवून त्यांना सळो की पळो केले जात आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 05/07/2014 - 14:31 नवीन
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 05/07/2014 - 15:15 नवीन
'विप्लवा ' या अरूण साधू यानी लिहिलेल्या कादंबरीची आठवण झाली. परग्रहावरची काही माणसे इथे येतात मोठ्या आशेने की त्याना त्यांच्या पेक्षा प्रगत मानसिकता दिसेल.पण येथील लढाया, शत्रूत्वे पाहून ते व्यथित होतात. राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 05/07/2014 - 15:20 नवीन
राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.
राष्ट्र काय किंवा धर्म काय, लोकसमुदाय एकवटण्याची साधने आहेत. ती जर नसली तर पशू आणि माणूस यात काहीच फरक नाही. आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सुबोध खरे Wed, 05/07/2014 - 16:23 नवीन
सकृतदर्शनी राष्ट्रवाद हा अतिरेकी वाटतो आणि वसुधैव कुटुंबकम हे छान वाटते. पण जेंव्हा परका माणूस तुमच्या स्वार्थावर घाला घालत असेल तर परमार्थ सुचेल कसा? जर मुंबईत येणारे बांगलादेशी घुसखोर तुमची सर्व व्यवस्था कोलमडून टाकणार असतील तर त्यांना अटकाव करणे हा रास्थ्र्वाद स्वार्थी असेल तरीही बरोबर आहे. तुम्हाला रोज पाण्य्साठी वणवण करायला लागली तर त्याच लोकांना तुम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणून या म्हणणार आहात काय? स्वार्थ हा संकुचित असला तरी तो प्राणीमात्राच्या जगण्याचे प्रयोजन आहे हि वस्तुस्थिती असते. मी, माझे कुटुंब, माझे आप्त, माझे जाती/धर्म बांधव , माझे राष्ट्र बांधव अशी वर्तुळे असतात यात केंद्रस्थानी स्वतः ठेवून माणूस जगात असतो. जोवर केंद्राला धक्का लागणार नाही तोवर वर्तुळ तो मोठे करू शकतो किंवा इच्छितो. पण जर केंद्राला धक्का लागणार असेल त्याचा तो जोरदार विरोध करू लागतो. राखीव जागात म्हणूनच दुसर्या जातीचा अंतर्भाव करायला त्यामुळेच मोठा विरोध उफाळून येतो. उच्च विचारसरणी हि शेवटी विचार्वांतानाच झेपणारी असते सर्वसामान्य माणसाना नाही. दोन ऐवजी चार वेळेस जेवून ढेकर दिल्यावर उच्च विचारसरणी ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चौकटराजा Wed, 05/07/2014 - 16:25 नवीन
लोक एकवटण्यासाठी कॉमन स्वार्थ हेच साधन असते. म्हणून युनो ची ही स्थापना झाली आहे, नाटोची आणि नामची सुद्धा ! या राष्ट या संकल्पनेपेक्षाही प्रगत संकल्यना आहेत .तरीही त्या मानवसंहार थांबवू शकलेल्या नाहीत. मग राष्ट्र या संकल्पनेची वा धर्म या संकल्पनेची काय कथा ? कुरघोडी हा पाशवी जगताचा स्थायीभाव आहे. मानव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 09:47 नवीन
नव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.
अपरंपार नरसंहार जरी झाला असला तरी ज्याला संस्कृती इ.इ. म्हणतो ती विकसित होण्यामागे या दोन खुळांचा बराच वाटा आहे. राष्ट्र म्ह. युरोपियन अर्थानेच पाहिजे असे नाही. राजकीय संघटनेचा कुठलाही आविष्कार असे समजू. जर तसा समाज एकवटायचा प्रयत्न कुणी केला नसता तर आजही आपण जंगलात अर्धनग्न अवस्थेत प्राण्यांपासून जगत फिरलो असतो. एक अवस्था दुसरीपेक्षा सर्वार्थाने चांगली नसली म्हणून तिचे महत्त्व आजिबात कमी होत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा गुरुवार, 05/08/2014 - 13:36 नवीन
आपण जंगलातून समाजात आलो याला धर्म व राष्ट्र कारणीभूत नाही झाले. आपण जंगलचाच कायदा वापरून राह्यला लागलो तर मोठी कठीण अवस्था होईल म्हणून काही नियम मानवी समाजाने घालून घेतले. धर्म व राष्ट्र या संकल्पना त्यावेळी टोळ्यांच्या टकुर्‍यातही नव्हत्या. संस्कृति चा पाहिला उदगार निघाला मग धर्माचा. हळूहळू काही प्रमाणात युरोपात " वसुधैव " चा प्रयोग होउ लागला आहे.वैज्ञानिक शोधाच्या उपयोगीतेचे वाटप व्हायला फार पूर्वीच सुरूवात झाली होती. ते काय राष्ट्र वा धर्म यानी घडवून आणलेले नाही. मानवी समाजाचेही एक मन असते.ते उत्क्रांत होत आहे. वेळ लागेल. काही शतकेही जातील पण जगाच्या इतिहासात धर्म व राष्ट्र या कल्पना उन्मळून पडतील. पण...... पण त्यापूर्वीच या दोन घातक कल्पनांनी मानवी जगाचा बळी घेतला तर ,,,?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 19:41 नवीन
धर्म अन राष्ट्र या संकल्पनांना लिटरली पाहू नका. पोलिटिकल संघटनेचा एक आविष्कार म्हणून राष्ट्राकडे पहा. ते नसतं तर समाज कुठे गेला असता? असो, परत कधीतरी बोलूच विस्ताराने या विषयावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/07/2014 - 17:51 नवीन
आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.
>>> आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 02:16 नवीन
या सुभाषितातला धर्म आणि हिंदू-मुसलमानादि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 09:48 नवीन
म्हणूनच तर कैकदा असं म्हटलंय - नेहमीच नै म्हटलेलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/07/2014 - 15:54 नवीन
सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते.
हे तर एकदम लोल आहे =)))) एकदा जरा न्याय-अन्याय, कर्म-अकर्म-विकर्म-कुकर्म, सत्य-असत्य , व्याख्या तपासुन घेतल्यात तर भगवद्गीता समजुन घेताना असले गैरसमज होणार नाहीत ! वाढीव अभ्यासासाठी शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 05/07/2014 - 16:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2014 - 07:18 नवीन
वर खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे विचारवंती वसुधावाद (राष्ट्रवादाच्या विरुद्ध टोक) ही ४ वेळा सुखाने जेऊन दिल्यावर द्यायची ढेकर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
प
पैसा Wed, 05/07/2014 - 16:24 नवीन
हे लिहिलेलं वाचताना छान वाटतंय. पण यावर विश्वास ठेवून उद्या जर का आपल्याला सैन्य नको असं कोणी म्हणाला तर हेच तत्त्वज्ञान पाकिस्तान्यांना कळणार का हा मोठ्ठा प्रश्न आहे. बाकी या लेखावरही हिब्रू आणि तमिळ भाषेतले बरेच संवाद वाचायला मिळतील याची खात्री आहे! *mail1*
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 05/07/2014 - 17:29 नवीन
तुमचं तब्रू अथवा हिमिळ का अ‍ॅड करताय त्यात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विकास Wed, 05/07/2014 - 17:37 नवीन
להס ஒப்புக்கொள்கிறேன் त्या कम्युनिस्टांनी देखील "जगातल्या कामगारांनो एक व्हा" म्हणून पाहीले. पण नाही जम्या! बाकी माझे म्हणणे तर अजून पुढचे आहे, सैन्य तर नकोच, पण कड्या-कुलपे देखील नकोत. विशेष करून बँकांना. किंवा पैसा (आयडी नाही) हा प्रकारच नको! कारण धर्मा इतकेच पैशामुळे वर्गीकरण होते. मिसळपाव मालकांना एक विनंती: या आदर्श (का अ‍ॅनार्कीस्ट?) जगण्याची सुरवात करण्यासाठी म्हणून मिसळपाव वरील आयडी ही संकल्पनाच रद्द करा. सगळे एकच. लेखक-प्रतिसादक-संपादक-सल्लागार आणि हो मालक देखील. *biggrin* *pleasantry*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/08/2014 - 13:49 नवीन
इथे तर आधीच अनाहिताची वेगळी चूल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 15:31 नवीन
इथे तर आधीच अनाहिताची वेगळी चूल आहे
ह्यावरुन एक कविता सुचत आहे >>> चाल : मी कात टाकली मी चुल मांडली ...मी चुल मांडली , मी वेगळ्या अनाहिताची बै चुल मांडली =)))) (अपुर्ण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 16:15 नवीन
>>>(अपुर्ण) हे आधी '(अपर्णा)' असं वाचलं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
होकाका Fri, 05/09/2014 - 10:31 नवीन
अरे काय चालू आहे हे? वास्तवाची दखल न घेता ढगात हरवून जाऊन लोकांना शहाणपणा शिकवणं हेच विचारवंतांचं खरं लक्षण असतं हे माहीत नाही का आपल्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यसवायजी Wed, 05/07/2014 - 17:49 नवीन
Imagine no possessions I wonder if you can No need for greed or hunger A brotherhood of man याला औषध नाही. अन्ड सो डू राष्ट्रवादाला. आणी मग दुसरा पर्याय काय?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/07/2014 - 18:25 नवीन
असाच पंचशीलचाही उदोउदो करत सैन्य मोडीत काढावे असा विचार चालला होता काही वर्षांपूर्वी आणि काय इतिहास घडला त्याची आठवण आली. सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करून असा एकांगी विचार सुचणे हे एखाद्या संरक्षित राष्ट्रात चार वेळ भरपेट खावून ढेकर देत देतच शक्य असते. शिवाय अश्या राष्ट्रात असे विचार करण्याचे स्वातंत्र्यही असतेच म्हणा ! तेव्हा चालू द्या !! (मला का उगाचच संशय येत आहे की हा लेख उपहासपूर्ण आहे?)
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/07/2014 - 19:27 नवीन
चिनी हल्ल्या आधीची गोष्ट आहे. तत्कालीन गांधीवादी आणि काँग्रेसनेते शंकरराव देव (ते देखील पंचा नेसायचे), हे देखील नेहरूंच्या मागे लागले होते की गांधीजींच्या भारताला सैन्याची गरज नाही. त्याचा परमार्ष घेताना अत्रे म्हणाले, की "सैन्य नको म्हणणे हे त्या महात्म्याला शोभले असेल, पण उद्या चीन्यांनी हल्ला केला तर त्यांचे सैन्य काय शंकररावांच्या पंच्यात गुंडाळायचे का? "*fool*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 19:22 नवीन
राष्ट्रवाद जर Xenophobia चं उत्क्रांत रूप असेल तर तो मानवनिर्मीत असुन देखील अटळ म्हणावा लागेल. इन फॅक्ट मानव 'निर्मीत' न म्हणता 'घटीत' म्हणावा लागेल. इथुन तिथुन प्रश्न एकच उरतो कि माणुस आपली बुद्धी विनाशकारी कृत्ये करण्यात का घालवतो. हि विध्वंसक वृत्ती बाजुला काढली तर राष्ट्रवाद देखील बहुविधतेचा अविष्कार  म्हणुन गोंजारल्या जाईल.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 05/07/2014 - 20:15 नवीन
अतिशय उत्तम मते. फक्त ती अंमलात कशी आणावी? अमेरिका यासाठी पुढाकार घेईल काय? ;)
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 05/07/2014 - 22:04 नवीन
तसे ते सरांचे तत्वज्ञान वाचुन वरचेवर अशी उघडझाप करतच असतात. हा लेखही आता त्यात अ‍ॅडवतो.
  • Log in or register to post comments
क
कल्पक गुरुवार, 05/08/2014 - 00:57 नवीन
विचार आदर्श आहे पण सगळे देश त्यासाठी तयार होईपर्यंत अवास्तव आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 02:20 नवीन
राष्ट्रवाद हा मोठ्याप्रमाणावरचा टोळीवाद आहे आणि टोळ्या करून राहणे हा माणसाचा सहजधर्म आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचे प्रमाण उपलब्ध ऊर्जा संसाधनांना झेपणार नाही तेव्हा आपोआप संपेल आणि विघटन होत होत पुन्हा छोट्या-छोट्या टोळ्या होतील. आपली सहजप्रवृत्ती सोडून माणूस आधीच राष्ट्रवाद सोडेल इतकी माणसाची माणूस म्हणून प्रगती झालेली नाही आणि होणारही नाही. पण लेख आवडला. पुलेशु.
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 06:35 नवीन
पाश्चात्य देशांतील विचारवंतांच्या दृष्टिकोनातून हे मांडलेले दिसते. हिटरलच्या काळात जर्मनीचे व सध्याच्या काळात पुतिन च्या रशियाचे उदाहरण बघता काही विचारवंतांना त्यात का धोका दिसतो हे ही समजण्यासारखे आहे. पण भारताचे याच्या विरूद्ध जाणारे ढळढळीत उदाहरण याबाबतीत का घेतले जात नाही? स्वातंत्र्यानंतर सुमारे ६५ वर्षांच्या इतिहासात भारताने राष्ट्रवाद प्रबळ असूनही इतर कोणत्याही देशावर हल्ला वगैरे केलेला नाही. किंबहुना पहिली १५ वर्षे हीच तत्त्वे अनुसरण्याचा प्रयत्न केलेला असताना चीनकडून झालेल्या विश्वासघातामुळे शस्त्रसज्ज होण्याशिवाय पर्याय राहिला नाही, नाहीतर आस्तित्वाचाच प्रश्न होता. पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत. तेव्हा निव्वळ राष्ट्रवाद धोकादायक नाही. मात्र एखादा देश स्वतःला सुपरपॉवर समजू लागतो तेव्हा मात्र जगातील परिस्थिती आपल्या इंटरेस्ट मधे असली पाहिजे या हट्टातून इतर ठिकाणी काड्या करणे चालू होते.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 06:39 नवीन
पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत.
हेच तर चुकलय ना.. बसा आता त्यां चिमुरड्यांना चिनला आसरा देताना बघत. धाक म्हणून नाही कुणाचा कशावर :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 07:51 नवीन
धाक म्हणून नाही कुणाचा कशावर
सत्यवचन :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/08/2014 - 06:54 नवीन
राष्ट्र, राज्य, प्रांत, जिल्हा, तालुका... अशी रचना प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा राष्ट्रवाद, प्रांतवाद हा असणारच. फक्त त्याचा अतिरेक नको. राज्य राष्ट्र विस्ताराची/ विघटनाची तीव्र लालसा ही अशाप्रकारच्या अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालते.. त्यातही धर्माधारीत राष्ट्ररचना असल्यास द्वेष आणखी वाढतो व सामंजस्याने तोडगा काढण्याची शक्यता फार कमी होते.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 07:01 नवीन
प्रांतवाद भाषावाद म्हणुन एक प्रश्न आहे... एका मराठी व्यक्तीला दुसरी मराठी व्यक्ती कधीच कुल/ओसम का वाटत नाही ? (पण इतर भाषक मात्र तसे वाटु शकतात ?)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास गुरुवार, 05/08/2014 - 07:04 नवीन
माणसांचा उन्माद कमी व्हायला हवा ही गोष्ट मान्य. राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंसा होते हेही मान्य. पण समाजातील विविध घटकांचा आपापसातील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रवादाचं नाणं राजकीय नेते वापरतात हे वारंवार दिसून येतं. आपण आपला समाज एकसंध कसा राखणार हा खरा प्रश्न आहे. आणि तो एकसंध राखताना एक गट वर्चस्ववादी बनून अन्य गटांचे शोषण करणार नाही याची खात्री कशी देणार हा प्रश्न आहे. समाजातल्या विविध घटकांचे हित एका वेळी साधता येते की ते एकमेकांच्या विरोधी असते हा खरा प्रश्न आहे .... असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्याची युक्ती आपल्याला कळली तर कदाचित उन्मादी राष्ट्रवादाची गरज आपल्याला राहणार नाही!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 05/08/2014 - 10:24 नवीन
लेख आणि मते भयंकर गंडलेली आहेत. हे असले तत्वज्ञान इथे येऊन लिहू नका.इथल्या कोणालाही भारत देशावर प्रेम म्हणजे इतरांचा द्वेष असा सिनॉनिमस अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही (आणि तसा असेल तर ते चुकीचे आहे).ही असली मते भारतातच कशी फोफावतात कोणाला माहिती. सगळे जग एकत्र यावे, देशांमधील सीमा हा प्रकार इतिहासजमा व्हावा इत्यादी सगळ्या गोष्टी झाल्या तर ते मलाही नक्कीच आवडेल पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? फार दूर नको जायला.अगदी आपल्या दिवट्या शेजार्‍याशी संबंध सुधारावे म्हणून आपण काय कमी प्रयत्न केले काय?तरीही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच.आपले पंतप्रधान बस घेऊन लाहोरला गेले तर तीच बस त्यांनी कारगीलला नेली.आग्रा शिखर परिषद झाल्यावर सहा महिन्यांच्या आत आपल्या संसदेवरच हल्ला झाला (आणि त्यातल्या मुख्य सुत्रधाराला फाशी दिल्यानंतर बिनडोक मानवाधिकारवाल्यांनी केलेले आकांडतांडव इतर कोणी विसरले असेल तरी मला तरी ते विसरणे अशक्य आहे).मागे ओर्कूटवर भारत-पाक फ्रेंडशीप क्लब म्हणून एक प्रकार होता. हल्ली ओर्कूट मागे पडल्यामुळे तो क्लब अजूनही अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही पण २००७ मध्ये मी जेव्हा ते वेबपेज बघितले होते त्यावेळी त्यातले ९०% पेक्षा जास्त सदस्य भारतीयच होते.तुम्ही स्वतःला लाख मानवतेचे पुजारी म्हणवत असाल पण जोपर्यंत आपल्या दिवट्या शेजारी देशात भारत देश हा 'काफिरांचा' म्हणून आपले अस्तित्वच खुपणारे लोक आहेत तोपर्यंत ते तुम्हाला भारतीय आणि काफिर म्हणूनच ओळखणार एवढी साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही हेच समजत नाही. तेव्हा हे असले दिवास्वप्नी तत्वज्ञान इथे पाजळू नका.आम्हाला कोणावरही विनाकारण हल्ला करायचा नाही.मैत्रीचे भरते पहिल्यांदा त्यांच्याकडून येऊ दे मग सुरवातीला भारत आणि पाकिस्तानमधली सीमा पुसू आणि तीच प्रक्रीया सगळ्या जगभर पुढे नेऊ.
राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात.
हे अगाध तत्वज्ञान नक्की कुठून शिकलात हो? तुमच्या भाषेत माणसं मारणारे सैनिक तिथे सीमेवर नसते तर तुम्ही घरी बसून आरामात असले लिहू शकलात का?
सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.
धन्य.
राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे.
आणि राष्ट्रवाद नाकारणार्‍या डाव्या विचारसरणीने त्याहूनही अधिक माणसांचा बळी घेतला आहे. असो. याविषयी अधिक चर्चा रंगल्यास निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच भाग घेईन. अगदीच राहवले नाही म्हणून आताच एवढे लिहिले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 12:14 नवीन
महात्मा गांधी अंहिसेचेच समर्थक होते पण सोबत राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यांचे उत्तर साधे सोपे होते. इतरांशी संवादाकरता माझ्या घराला खिडक्या दरवाजे असतील पण माझ्या घराला भिंतींची गरज आहे. आमच घर इतरांनी येऊन चालवण्या पेक्षा आम्ही आमच घर चालवतो. स्वतःच घर स्वतः चालवण यात दुसर्‍यांच्या द्वेषाचा संबंध नाही. बाकी सवडी नुसार लिहू (सध्या आमची जांभई आणि चुटकी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मारवा गुरुवार, 05/08/2014 - 15:45 नवीन
बर्ट्रांड रसेल ची लिंक वाचण्याची तसदी घेतली असती तरी मला वाटत माझा पॉइंट ऑफ़ व्ह्यु लक्षात यायला हरकत नव्हती. असो आता उदाहरणार्थ जॉर्ज ऑरवेल ला घेउया ( हा रसेल शी अनेक ठीकाणी डायगोनली अपोझीट आहे खास करुन कम्युनिझम संदर्भात ) तर दुरगामी खोलवर विचार करणारया विचारवंतांच्या विचारांची एक खासियत असते ती अशी की अनेक वर्षांनंतर ही त्यांचे विचार समकालीन स्थितीचा व मानसिकतेचा अचुक वेध घेतात. उदा. जॉर्ज ऑरवेल यांनी अनेक वर्षापुर्वी कीती विलक्षण अचुकतेने राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याचे नेमके वर्णन केलेले आहे. हा परीच्छेद राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते या संदर्भात क्लिंटन यांच्या प्रतिसादा च्या संदर्भात बघावा. क्लिंटन यांच्यावीषयी नितांत आदराची भावना माझ्या मनात आहे. त्यांच्या मानसिकतेचा उल्लेख अत्यंत नम्रपणे केवळ चिकीत्से साठी व ऑरवेल च्या राष्ट्रवादी व्यक्तीच्या मानसिकते संदर्भात च कृपया बघावा ही कळकळीची विनंती ! तर खालील परीच्छेद मुळ ऑरवेल चा व जेथे जेथे क्लिंटन यांचा निर्देश मराठी त केलेला आहे तो माझा. As nearly as possible, no nationalist (क्लिंटन) ever thinks, talks, or writes about anything except the superiority of his(क्लिंटनच्या) own power unit. It is difficult if not impossible for any nationalist (क्लिंटन) to conceal his (क्लिंटनच्या) allegiance. The smallest slur upon his (क्लिंटनच्या ) own unit, or any implied praise of a rival organization, fills him with uneasiness which he (क्लिंटन) can relieve only by making some sharp retort. If the chosen unit is an actual country, such as Ireland or India, he(क्लिंटन) will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. He(क्लिंटन) will show great sensitiveness about such things as the correct display of flags, relative size of headlines and the order in which different countries are named. All nationalists (क्लिंटन) consider it a duty to spread their own language to the detriment of rival languages, जॉर्ज ऑरवेल क्लिंटन यांचा प्रतिसाद अतिशय बोलका आणि उत्स्फ़ुर्त आहे. हा प्रतिसाद एका राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याची चिकीत्सा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. विशेषत: ऑरवेल जे म्हणतो स्मॉलेस्ट स्लर कींवा अगदी विरोधकाची इम्प्लाइड प्रेज जरी असली तरी राष्ट्रवादी व्यक्तीला ही स्तुती १- fills him with uneasiness ( क्लिंटन यांच्या प्रतिसादातील अस्वस्थता बघावी) २- can relieve only by making some sharp retort (क्लिंटन यांचा तीव्र रीटॉर्ट बघावा) वरील दोन अवलोकनार्थ होते इतर मुद्दे उदा. ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. इतर राष्ट्रवादी प्रतिसांदा मध्ये ही आढळुन येतात उदा. श्री. फ़ारएन्ड यांचा प्रतिसाद अभ्यासावा. तर जॉर्ज ऑरवेल यांनी अचुकतेने मांडलेली राष्ट्रवादी मानसिकता आपण आज इथे या प्रतिसांदा मध्ये ही अभ्यासु शकता. कृपया व्यक्तीगत घेउ नये माझ्या प्रतिसादाचा हेतु अभ्यासात्मक आहे व्यक्तीगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
फ
फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 18:15 नवीन
माझ्या ज्या प्रतिसादाचा उल्लेख केलाय त्यात वरची #३ ची लक्षणे कोठे आहेत? ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. >>> माझा प्रतिसाद व हा मुद्दा याची कशी सांगड घातलीत ते विचारतो आहे. माझा मुद्दा तुम्हाला मान्य आहे की नाही तेही कळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 11:21 नवीन
सर मोड़ ऑन खेळा पासून संभोगा पर्यंत सर्व मानवी जीवन उन्मादानेच व्यापीयले असा. पण मुळात उन्माद ही एक प्रक्रिया आहे, वस्थिस्थिति न्हवे याचे आकलन एकदा तुमच्या मनाला झाले की हां लेख टाकायचे प्रयोजन उरत नाही. सर मोड़ ऑफ
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/08/2014 - 11:30 नवीन
म्हणजे काय? आणि याचा उच्चार कसा करायचा? (राँर्बट याचा उच्चार आता मला करता येतो). *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 12:49 नवीन
असल्याने अधिक मार्गदर्शन फक्त खुद्द सर्च करू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कवितानागेश गुरुवार, 05/08/2014 - 12:34 नवीन
माझा जरा गोंधळ होतोय... 'राष्ट्र संकल्पना' वेगळे न मानणारे, एकाच देवाला मानणारे लोक्स, आणि त्याच 'तत्त्वज्ञाना'चा हिंसेच्या सहाय्यानी जगभर प्रचार करणारे, जगात फक्त आपण सर्व समान देवानी पाळलेले 'ठराविक प्रकारचे पाळीव पशू' किंवा देवाचे गुलाम वगरै समजणारे लोक्स जास्त उन्मादात असतात असं माझे आजपर्यंतचे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 05/10/2014 - 20:26 नवीन
अगो माय, साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद यामधे सगळा घोळ झालाय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. वर चौरा म्हणतात त्याप्रमाणे जंगलातून माणूस आला. त्यात उत्क्रांतीच्या अनेक पायर्‍या पार केल्यानंतर आत्ताची वेळ दिसते आहे. आता ही राष्ट्र संकल्पना काय लोकांनी गांजा पिऊन मांडली काय? दोन राष्ट्रांत युद्ध नको म्हणून राष्ट्र संकल्पनाच रद्द करून टाकली तर कित्ती छान? माझे घर अन् दुसर्‍याचे घर यामुळे सगळे वाद होतात.. घरेच पाडून टाकू.. वाद मिटला.. हाय काय अन् नाय काय?? अर्रे जरी वसुधैव कुटुंबकम् याचा अर्थ सगळे एक कुटुंब असा होतो.. तरी सध्या एकत्र कुटुंब हीच संकल्पना मोडीत निघते आहे त्याचे काय? बरं सोबत राहू म्हणजे एकाच घरात एकाच खोलीत सगळ्या कुटुंबानं राहायचं असं चालेल काय? सध्या जे असे राहतात त्यात तसे राहण्याची इच्छा असणारे किती अन् दुसरा पर्याय नसल्यानं तसे राहणारे किती?? आणि वसुधैव कुटुंबकम् याचा भावार्थ असा घेतला की सगळे एकमेकांचा आदर करत, एकमेकांना मदत करत आनंदानं राहू तर चुकलं कुठे? तो चाणक्य आज असता ना तर डोक्यात जाणारी नसती जळमटं काढून फेकल्याशिवाय शेंडीला गांठ मारणार नाही अशी काहीशी प्रतिज्ञा केली असती त्यानं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
असंका गुरुवार, 05/08/2014 - 15:22 नवीन
आपण एक विचार देत आहात की कसलातरी प्रचार करत आहात? कारण आपली भाषा नि:पक्षपाती वाटत नाही. विचार हा साकल्याने -साधक बाधक अशा दोन्ही अंगाने करायचा असतो. आणि हा विचार आपल्या वाचकाला केंद्रस्थानी ठेवून मांडला पाहिजे. आपण एकांगीपणे वरील विचार मांडला आहे, असे वाटते. एखादे मत आपण कसे तयार केले, हेही सांगणे योग्य आहे. उदा. कुठलाही संदर्भ न देता काही विशिष्ट विचारसरणीला आपण अनेकवेळा नकारात्मक वगैरे ठरवले आहे. ती नकारात्मक कशी, हे सांगणे भाग असूनही ते आपण सरळ गृहित धरले आहे, आणि वाचकानेही गृहित धरावे अशी अपेक्षा केली आहे. पराकोटीच्या अन्यायातून एखादा समाज उठू बघतो, अन्यायाला वाचा फोडतो, अगदी सशस्त्र प्रतिकार करतो, यात नकारात्मक काय आहे? आपला तर्क दिलात तर आपण माडलेल्या या विचारांवर विचार करण्यात अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 15:50 नवीन
मारवांजींच्या आधीच्या समतोल लेखनाच्या भरवशावर हा धागा उघडला होता. मारवाजींच्या नेहमीच्या समतोल लेखनशैलीला हा धागा लेख जरासा अपवाद वाटतोय. या वेळी प्रचाराकी हेतु आला आहे का किंवा असे अचानक काय झाले हे मारवाजीच सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Fri, 05/09/2014 - 08:36 नवीन
आम्हाला कधीतरी इतिहासाच्या तासाला "युरोपातील राष्ट्रवाद वाढीला लागला" (-कुठल्यातरी कालखंडात!) असे शिकवले गेले. राष्ट्रवाद या शब्दाशी तो माझा पहिला परीचय होता. राष्ट्रवाद म्हणजे काय हे तेव्हा कळले नाही. ते न कळण्याची कारणे काय ते जाऊ द्या. कदाचित मी पुरेसा अभ्यास केला नसेल, किंवा मला पुरेशी समज नसेल. पण ते मागे राहिलेले कधीतरी समजून घ्यायची इच्छा आहे. ते नीट सांगतील तर इथे ऐकायची तयारी आहे. विचार करायचीही तयारी आहे. माझं चुकतं कुठे हे कळलं तर चूक मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. पण ते ज्या पद्धतीने सांगत आहात ती पद्धत थोडी बदलली तर बरं होइल असं वाटतं. १. ते अनेक गोष्टी एकाच वेळी सांगत आहेत. क्रांतिकारी विचार थोडक्यात मांडायला हवा. नाहितर मग लक्ष कशावर केंद्रीत करायचं तेच लवकर कळत नाही. २. एका भाषेतून (मराठी) दुसर्‍या भाषेत(इंग्रजी) जात आहेत. खरे म्हणजे एकदाही असे केल्याने वाचण्यात अडथळा येतो. त्यांनी तर अनेक वेळा तसे केले आहे. ३. मध्येच कवितेच्या ओळी देत आहेत. हे काय भाषण आहे का? ४. मध्येच इतरांची मते देत आहेत. व इतरांनी तीही मुळापासून वाचावी अशी अपेक्षा ठेवत आहेत. विचार साहेब स्वतः मांडत आहेत. अभ्यास करून इथे ते थोडक्यात मांडणे त्यांचे काम आहे. इतरांनी का तसदी घ्यायची? वादात शेवटचा शब्दा माझा हवा इतकाच उद्देश असेल तर असे करणे ठिक आहे- तेव्हा या पद्धतीने वागता येते. कारण मग लोक वाद सोडून देतात - म्हणतात, कोण ती लिंक वाचत बसेल! त्यांची ही अपेक्षा असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मारवा गुरुवार, 05/08/2014 - 15:52 नवीन
INDIFFERENCE TO REALITY. All nationalists have the power of not seeing resemblances between similar sets of facts. A British Tory will defend self-determination in Europe and oppose it in India with no feeling of inconsistency. Actions are held to be good or bad, not on their own merits, but according to who does them, and there is almost no kind of outrage--torture, the use of hostages, forced labour, mass deportations, imprisonment without trial, forgery, assassination, the bombing of civilians--which does not change its moral colour when it is committed by 'our' side. The Liberal NEWS CHRONICLE published, as an example of shocking barbarity, photographs of Russians hanged by the Germans, and then a year or two later published with warm approval almost exactly similar photographs of Germans hanged by the Russians. It is the same with historical events. History is thought of largely in nationalist terms, and such things as the Inquisition, the tortures of the Star Chamber, the exploits of the English buccaneers (Sir Francis Drake, for instance, who was given to sinking Spanish prisoners alive), the Reign of Terror, the heroes of the Mutiny blowing hundreds of Indians from the guns, or Cromwell's soldiers slashing Irishwomen's faces with razors, become morally neutral or even meritorious when it is felt that they were done in the 'right' cause. If one looks back over the past quarter of a century, one finds that there was hardly a single year when atrocity stories were not being reported from some part of the world; and yet in not one single case were these atrocities--in Spain, Russia, China, Hungary, Mexico, Amritsar, Smyrna--believed in and disapproved of by the English intelligentsia as a whole. Whether such deeds were reprehensible, or even whether they happened, was always decided according to political predilection.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 16:04 नवीन
(मारवाजी माझ्याकरता जॉर्ज ऑर्वेल आणि हा विषय दोन्ही अंगांनी बर्‍या पैकी (यापुर्वी इतरत्र) चघळून झालाय. या विशीष्ट उन्हाळ्याच्यावेळी हा धागा विषय म्हणजे गार ताकही पाहीजे पिले तर खोकला होईल नाही पिलेतर गरमी , ताकाला(धाग्याला) जायचे पण बिचकत बिचकत भांडे लपवणे असा नाहीएना असला तर असू द्यात बापडे मी कोण सांगणारा. :) बाकी भारतीय लोकशाही चांगली प्रबळ आहे आपोआप समतोल साधते. खूप काळजीही करू नका जस्ट रिलॅक्स एवढेच म्हणू शकेन.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा