राष्ट्रवाद- एक उन्माद !
राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत. काही वर्षांपुर्वी पाकीस्तान हा भारत या राष्ट्राचा भाग होता आज नाही व संपुर्ण पाकीस्तान चा हा भुभाग एक स्वतंत्र राष्ट्र बनविण्यात आलेला आहे. क्रीमीया आता यापुढील काळात रशिया या राष्ट्राचा भाग झालेला आहे. इस्त्रायल या राष्ट्राची संपुर्ण निर्मीती ही तर अगदी अलीकडच्या काळाचीच आहे. व कोण जाणे पॅलेस्टाइन हे आज अस्तित्वात असलेले राष्ट्र उद्या असेल कींवा नसेल. रशिया या एका मोठ्या राष्ट्राचे अनेक तुकडे होउन डझनभर स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली ही देखील अलीकडच्या काळातीलच घटना आहे. So Nationalism is an absolutely man-made-phenomena and nothing sacred about it ! आणि आता ही राष्ट्र व्यवस्था अवघ्या मानवजातीच्याच मुळावरच उठली असेल तर तीला नष्ट करणे हे आपले एक मानव म्हणुन आद्य कर्तव्य च आहे.
राष्ट्रवादाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणाच अतिशय नकारात्मक आहेत. प्रामुख्याने धर्मश्रेष्ठत्व वा वंश-वर्ण श्रेष्ठत्व वा संस्कृतीश्रेष्ठत्व या मुलत: अहंकाराधिष्ठीत सत्ताकांक्षी महत्वाकांक्षी नकारात्मक प्रेरणांतुनच निरनिराळ्या राष्ट्रांची निर्मीती होत असते. Xenophobia म्हणजे आपल्याहुन परक्या वा अनोळखी व्यक्तींविषयी वाटणारी भीती आणि द्वेष ही ही एक आणखी नकारात्मक प्रेरणा राष्ट्र निर्मीतीस उत्तेजन देते. माणुस मग आपल्या सारख्या वर्ण संस्कृती असलेल्यां बरोबर राहण पसंत करतो. एकदा राष्ट्र निर्मीती झाल्यानंतर मग इतर अनेक आनुषंगिक एव्हील्स ची निर्मीती होणे ओघानेच आले. उदा. आपल्या राष्ट्राचा विस्तार करणे , त्यासाठी युद्ध/ शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु करणे या अखेरीस संपुर्ण मानवजातीच्या च विनाशास कारणीभुत होणारया गोष्टींची सुरुवात होते. विवीध राष्ट्रे जो सैन्य निर्मीती व सांभाळ तसेच शस्त्र निर्मीती यासाठी जी अब्जावधी रुपयांची व त्याहुन मोलाच्या अशा ह्युमन अवर्स ची एनर्जी ची गुंतवणुक करतात ती थांबवली तर ही अनमोल अतिप्रचंड गुंतवणुक माणसाचे जीवन सुंदर समृद्ध बनविणारया अनेक महत्वाच्या मुलभुत गोष्टींमध्ये करता येइल. शिक्षण/ आरोग्य/ विकास अशा अनेक क्षेत्रांकडे हे मानवी बळ सकारात्मकरीत्या वळविता येउ शकते. चायना/अमेरीका यांच डीफ़ेन्स बजेट आणि भारत पाकीस्तान सारख्या ज्यांना विकासाची अत्यंत आवश्यकता आहे ते आपल्या एकुण बजेटच्या कीती टक्की रक्कम डीफ़ेन्स वर खर्च करतात हे आकडे बघितले तरी वास्तुस्थीतीची कल्पना येउ शकते.
राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात. त्यांच्या मरण्या मारण्याचे सोहळे घडविले जातात. ग्रेलिंग अत्यंत समर्पक शब्दात हा वेडेपणा मांडतो तो म्हणतो
“Disguised as patriotism and love of one's country, it trades on the unreason of mass psychology to make a variety of horrors seem acceptable, even honorable. For example: if someone said to you, "I am going to send your son to kill the boy next door" you would hotly protest. But only let him seduce you with "Queen and Country!" "The Fatherland!" "My country right or wrong!" and you would find yourself permitting him to send all our sons to kill not just the sons of other people, but other people indiscriminately – which is what bombs and bullets do.” सैनिकाला स्व-विवेक वापरण्यापासुन कायम परावृत्त केले जाते सैनिंकांकडुन एकच अपेक्षा असते आदेशाचे पालन! सैनिक एरवी मुंगी मारणार नाही पण राष्ट्रभक्तीची अफ़ु खाल्यावर तो अनेक अनोळखी माणसांना कुठल्याही अपराधगंड न बाळगता आपण राष्ट्रासाठी अत्यंत सात्वीक कार्य करत आहोत अशा भावनेतुन मारु शकतो. बर्टान्ड्र रसेल यांचा हा अप्रतिम लेख जरुर वाचावा
http://fair-use.org/international-journal-of-ethics/1915/01/the-ethics-of-war
सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते.
विवीध संस्कृती अस्तीत्वात असणे ही साहजीक नैसर्गिक बाब आहे. व एकसमान संस्कृतीच्या लोकांना एकमेकासोबत रहावेसे वाटणे हे तर अत्यंत नैसर्गिकच आहे परंतु राष्ट्र या संकल्पनेत आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या संस्कृती जोपासणारयांना एक शत्रु म्हणुन बघणे त्यावर वर्चस्व असणे आवश्यक आहे असे मानणे आपलीच संस्कृती व पर्यायाने मग राष्ट्र हेही श्रेष्ठ व म्हणुन पर्यायाने ठराविक भुभागावर व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आमचाच हक्क असावा या सर्व वेड्या अट्टाहासी मागण्या या राष्ट्रवादातुन च निर्माण होतात ( वसुधैव कुटुंबकम ) त्यासाठी मग साम दाम दंड भेद आदि सर्व नीतींचा अवलंब राष्ट्रवादाच्या व विस्तारवादाच्या संदर्भात केला जातो. हा अतिशय चुकीचा आहे.
परत ग्रेलींग च्या च शब्दात
Nationalists take certain unexceptionable desires and muddle them with unacceptable ones. We individually wish to run our own affairs; that is unexceptionable. Most of us value the culture which shaped our development and gave us our sense of personal and group identity; that too is unexceptionable. But the nationalist persuades us that the existence of other groups and cultures somehow puts these things at risk, and that the only way to protect them is to see ourselves as members of a distinct collective, defined by ethnicity, geography, or sameness of language or religion, and to build a wall around ourselves to keep out "foreigners". It is not enough that the others are other; we have to see them as a threat at very least to "our way of life", perhaps to our jobs, even to our daughters.
राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे. अनेक मौल्यवान मानवी क्षमता युद्धाच्या नावाखाली वाया घालविलेल्या आहेत. राष्ट्रवाद माणसाला मी एक माणुस आहे या पुरेशा न्याय्य योग्य अशा ओळखीवर थांबु देत नाही. तो त्याला कुठल्यातरी राष्ट्राचा नागरीक बनवुन इतर राष्ट्रांतील माणसांशी तोडतो वेगळा पाडतो आयसोलेट करतो. मग अशी परस्परांपासुन वेगळी पाडलेली माणसं एकमेकांच्या विरोधात उभी राहुन परस्पर संघर्षातच आपली बहुमुल्य मानवी क्षमता वाया घालवितात. राष्ट्रवादाने काही राष्ट्रे इतर राष्ट्रावंर अनेक प्रकारे वर्चस्व गाजवितांना दिसतात श्रीमंत राष्ट्रे गरीब राष्ट्रांची अनेक प्रकारे पिळवणुक करतांना दिसतात.
काही महान तत्वज्ञ राष्ट्र्वादा संदर्भात काय म्हणतात हे बघण अतिशय इंटरेस्टींग आहे खालील प्रत्येक कोट वैशिष्ट्यपुर्ण अशी टीप्पणी राष्ट्रवादा संदर्भात करते.
१
The feeling of patriotism - It is an immoral feeling because, instead of confessing himself a son of God . . . or even a free man guided by his own reason, each man under the influence of patriotism confesses himself the son of his fatherland and the slave of his government, and commits actions contrary to his reason and conscience.”
Leo Tolstoy, Patriotism and Government
२
“One of the great attractions of patriotism—it fulfills our worst wishes. In the person of our nation we are able, vicariously, to bully and cheat. Bully and cheat, what’s more, with a feeling that we are profoundly virtuous.”
Aldous Huxley
३
“To abolish war it is necessary to abolish patriotism, and to abolish patriotism it is necessary first to understand that it is an evil. Tell people that patriotism is bad and most will reply, ‘Yes, bad patriotism is bad, but mine is good patriotism.’”
Leo Tolstoy
४
“Patriots always talk of dying for their country and never of killing for their country.”
Bertrand Russell
५
I do not believe in nations. I believe that humanity is suffering because of nations. Nations should be destroyed. Too many national anthems have been sung, too many flags have been flown, too many idiocies have happened on this earth. Accept the unity of mankind now. Now, one world and and one mankind... These national governments must go. And until they go man's problems cannot be solved, because man's problems are bigger than nations.
Osho
To love anything beautiful in a country is normal and natural, but when that love is used by exploiters in their own interest it is called nationalism. Nationalism is fanned into imperialism, and then the stronger people divide and exploit the weaker, with the Bible in one hand and a bayonet in the other. The world is dominated by the spirit of cunning, ruthless exploitation, from which war must ensue. This spirit of nationalism is the greatest stupidity. Every individual should be free to live fully, completely. As long as one tries to liberate one's own particular country and not man, there must be racial hatreds, the divisions of people and classes. The problems of man must be solved as a whole, not as confined to countries or peoples.
जे.कृष्णमुर्ती
राष्ट्रवादातुन निर्माण होणारया युद्धाच्या निरर्थकतेवर हिप्पी चळवळीने ही फ़ार जोरदार आक्षेप घेतला होता. हिप्पी हे राष्ट्र्वाद आणि युद्धाच्या विरोधात होते. अमेरीका आक्रमक राष्ट्रवादाचे उत्तम प्रतीक च आहे. तर १९६५ नंतर अमेरीकेचे व्हीएतनाम विरोधात सुरु केलेले युद्ध अधिकाअधिक उग्र होत गेले यामध्ये व्हीएतनामींनी गनिमी काव्याने लढुन अमेरीकी सैनिकांना चांगलेच जेरीस आणले होते.मग यात अमेरीकेला अधिकाधिक सैनिकांची गरज भासु लागली व त्यासाठी आक्रमक भरती मोहीम राबवली जाउ लागली. अमेरीकेने व्हीएतनामवर नापाम व एजंट ऑरेंज सारख्या महाभयानक रासायनिक अस्त्रांचा मारा केला ज्याचा अप्रत्यक्ष आर्थिक फ़ायदा डाउ केमीकल्स सारख्या केमीकल कंपन्यांना होत होता. या व अनेक कारणांसाठी अमेरीकन तरुण वर्गाचा युद्धविरोध प्रचंड वाढला अमेरीकन तरुणांनी युद्धासाठीच्या ड्राफ़्ट कार्ड्स ची जाहीर होळी करण्याचा कार्यक्रम सुरु केला. या तरुणांना अनोळखी व्हीएतनामींशी ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता लढण्यात काहीही रस नव्हता. याच्याच विरोधात खालील एक सुंदर उपहासात्मक गीत जे सॅन फ़्रॆन्सीस्को च्या संगीतकार कंट्री ज्यो मॅक्डोनाल्ड ने लिहिले आहे ते फ़ार च सुंदर आहे ते अमरीकन स्वार्थी व निरर्थक राष्ट्रवाद व युद्धाची खील्ली उडविते.
Yeah, come on all of you, big strong men,
Uncle Sam needs your help again.
He's got himself in a terrible jam
Way down yonder in Vietnam
So put down your books and pick up a gun,
We're gonna have a whole lotta fun
And it's one, two, three,
What are we fighting for ?
Don't ask me, I don't give a damn,
Next stop is Vietnam;
And it's five, six, seven,
Open up the pearly gates,
Well there ain't no time to wonder why,
Whoopee! we're all gonna die.
Well, come on Wall Street, don't move
slow,
Why man, this is war au-go-go.
There's plenty good money to be made
By supplying the Army with the tools of
the trade,
Just hope and pray that if they drop
the bomb,
They drop it on the Viet Cong.
Well, come on generals, let's move
fast;
Your big chance has come at last.
Gotta go out and get those reds —
The only good commie is the one who's
dead
And you know that peace can only be won
When we've blown 'em all to kingdom
come.
Well, come on mothers throughout the land,
Pack your boys off to Vietnam.
Come on fathers, don't hesitate,
Send 'em off before it's too late.
Be the first one on your block
To have your boy come home in a box.
अखेरीस मानवजात राष्ट्रांशिवाय सुखात शांतीत अस्तित्वात राहुच शकत नाही असे मानणारया व राष्ट्रांच्या भिंती नसलेले जग हा एक युटोपिया मानणारयांसाठी मी जॉन लेनन यांच हे गाण देउन समारोप करतो.
"Imagine"
Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people
Living for today...
Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion too
Imagine all the people
Living life in peace...
You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will be as one
Imagine no possessions
I wonder if you can
No need for greed or hunger
A brotherhood of man
Imagine all the people
Sharing all the world...
You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will live as one.
प्रतिक्रिया