कोर्न पालक राइस
Primary tabs
साहित्यः १ वाटी तांदुळ
२ वाट्या पालक पेस्ट
१ वाटी मक्याचे दाणे
१ चमचा धनेजिरे पूड
२ हिरव्या मिरच्या(आवडीप्रमाणे कमीजास्त)
२ लवंगा,३-४ काळे मिरे,१ तुकडा दालचिनी
१ तमालपत्र
१ चमचा साजूक तूप
मीठ चवीप्रमाणे
तेल
कृती: पालक धुवुन पाण्यात ५-७ मिनिटे उकळवून घ्यावा.या पालकाची हिरवीमिरची घालून पेस्ट करुन घ्यावी.
तेल गरम करुन मोहरी,जिरे,हळदीची फोडणी करावी.त्यात लवंगा,मिरे,तमालपत्र घालून
परतावे.
या फोडणीत धुतलेला तांदुळ घालून परतावा.पालक पेस्ट्,धनेजिरे पूड्,मक्याचे दाणे,मीठ घालून
परत एकदा परतून घ्यावे.
वरून चमचाभर साजूक तूप घालावे.
जरूरी प्रमाणे उकळते पाणी घालून भात शिजवून घ्यावा.
हा भात नूसताच,रायत्याबरोबर कसाही खाउ शकता.

झक्कास...
(मी पहिला.)
हो हो! तो हक्क आहे तुमचा. ;)
भात आवडला हो बल्लवा. (बल्लव चं स्त्री वर्जन )
आजकाल आमचे जीवन भाउ कुठे गायब झालेत, कुणास ठावूक?
मग म्हटले, सुदैवाने आमच्या प्रवेशाच्या वेळांतच लेख प्रसिद्ध झाला आहे.
तर टाकावा पहिला प्रतिसाद....
असे सारखे सारखे लिहीत जावे. बालपणीचे दिवस जागे होतात.
धन्यवाद....
तुम्ही असेच आम्हाला सल्ले देत जा.
तुमचे सल्ले मानलेच पाहिजेत असे थोडीच आहे?
सल्ला ? मी तर आपलं फक्त निरीक्षण नोंदवले आहे. फरक कलेल तो सुदीन म्हणायचा काय ?
अशा नक्की किती पोस्ट वर मी "मी पहिला." अशी प्रतिक्रिया दिली आहे?
नाही म्हटले, तुम्ही निरीक्षण नोंदवता. मग जरा संख्या दिलीत तर उत्तम.
सध्या इतकेच पुरेसे आहे.
ते तुम्हाला कळलेले नाही, ह्यात तर बरेच काही आहे...
बालपणीचे दिवस जागे होतात.
"मी पहिला" असे लिहीणारे बरेच आहेत.
अर्थात आपल्यासारख्या थोर आणि उच्च व्यक्तीला आम्हीच दिसलो, ह्यातच सगळे आले.
बालपणीचे दिवस जागे होतात.
आणि पाकृहि उत्तम. मला फार आवडतो असा कॉर्न-पालक राईस. ह्याच्या बरोबर काकडि-कांद्याचं दह्यातलं रायतं छान लागतं.
मस्त आहे फोटो! पाकृही सोपी आहे.
उद्या नेते करुन डब्यात! धन्यवाद! :)
मस्त वन डिश मील! आणि 'कुहूप' सोप्पा आहे!
कॉर्न-पालक काँबी मस्तं :)
म्हटलं पालक राइसचा हां कोण्ता परकार ?
छान व सोप्पी पण उत्तम आरोग्यदायी पाकृ!
धन्यवाद
हिट्ट रेश्पि. आज करुन आणली आहे ऑफिसमध्ये. आवडली सगळ्या सहकारी वर्गाला. धन्यवाद इशा.
झक्कास. फोटो पण मस्तच.
चकली ताईच्या ब्लॉगवर मेथी-कॉर्न राईस आहे, तो पण मस्त लागतो!
ग्रीन कलर राईस. अस रंगीत संगीत खाण्याचे प्रकार पाहून तोंडाला पाणी सुटत हो. अन मग वजन वाढते ते वेगळेच!!

मस्तच आहे. सही दिसतोय एकदम. १००/१०० मार्क पाकृला:)
आहाहा... :)
सर्व प्रतिसादकर्त्यांचे 'कुहूप' धन्यवाद!
@यशोधरा रेसेपी लगेच करुन बघितलीस आणि पोच दिलीस त्याबद्दल डबल धन्यवाद.
वाह! फोटू भारी आलाय.
ंम्मस्तचं
धन्यवाद रेवती आणि मनिमोउ...
धन्यवाद रेवती आणि मनिमोउ...