आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -
.
(चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-)
आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे
नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ...
घाव अंतरी बसतच होते
घर खरोखर सुखात होते
खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ...
उसनवारीचे द्रव्य जमविले
व्याजच होते भारी कसले
द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ...
उगाच माझी होती दैना
खाली पाकिट मार्ग सुचेना
वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ...
सदनि या जरी होती शांती
पाहुणे परंतु येता बोंब ती
आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ...
.
💬 प्रतिसाद
(7)
प
पैसा
Sun, 05/11/2014 - 17:15
नवीन
सासू-सासरे पाहुणे आल्यामुळे झालेली करूण अवस्था छान जमली आहे!
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sun, 05/11/2014 - 21:16
नवीन
असेच येऊ देत झटके... विडंबनाचे तुझ्यामुळे...
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 05/12/2014 - 05:44
नवीन
:ड :ड :ड
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 05/12/2014 - 06:52
नवीन
काही वेळा पाहुण्यांबरोबरच ढेकूणही घरात घुसतात तेव्हा एका ढेकूणजन्य पाव्हण्याला उद्देशून प्रसवलेली ही जिलबी.
आज ढेकणे घरात घुसली, तुझ्यामुळे
फटीतूनी बघ हळूच शिरली, तुझ्यामुळे..
रात्री येती ते बाहेरी
रक्तपिपासू लपती भितरी
चाव्यांनी त्या हैराण झालो, तुझ्यामुळे..
रात्रीची ती झोप मोडिली
हुळूहुळूनी ती त्वचाच गेली
लालेलाल ती त्वरे जाहली, तुझ्यामुळे...
उगाच माझी होती दैना
सुटकेचा परि मार्ग सुचेना
दुकानातूनी मग औषध आणिले, तुझ्यामुळे .......
सदनि या जरी होती शांती
ढेकूण येता झाली बोंब ती
औषध तरि मी आज मारिले, तुझ्याचमुळे ...
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 05/12/2014 - 08:10
नवीन
*biggrin*
या "तुझ्यामुळे" आणखी बरंच काही सुचू शकेल!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 05/12/2014 - 17:38
नवीन
मस्त ! :)
- Log in or register to post comments
व
विदेश
Tue, 05/13/2014 - 09:33
नवीन
पैसा, शशिकांत ओक, वेल्लाभट, वल्ली, मदनबाण -
मनःपूर्वक आभार सर्वांचे !
- Log in or register to post comments