Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य.

क
कलंत्री
Mon, 05/12/2014 - 08:34
🗣 55 प्रतिसाद
श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल. उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी. मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते. राजकारणी आणि सिनेकलावंत लोकांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते आणि झपाट्याने ते दुरही होत जाते. सुदैवाने मनमोहनसिंहाना याचा अनूभव आला नसावा. भारतासारख्या खंडप्राय देशाचे प्रमूख पद १० वर्षासाठी मिळणे ही साधीसुधी घटना नव्हे, कदाचित इतरांना त्यांचा हेवाही वाटत असेल. असो, १४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो हीच माझी सदिच्छा.

प्रतिक्रिया द्या
29213 वाचन

💬 प्रतिसाद (55)
व
विनोद१८ Mon, 05/12/2014 - 08:46 नवीन
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करणारा, प्रामाणिक व कष्टाळु पंतप्रधान या देशाला पुन्हा पुन्हा लाभो. अशी माझी इच्छा.
१४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो अशीच माझीसुध्धा सदिच्छा.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 17:44 नवीन
*ROFL* *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
य
यसवायजी Mon, 05/12/2014 - 08:53 नवीन
काथ्याकुट?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/12/2014 - 09:01 नवीन
अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला. पुढचे आयुष्य त्याना समाधानाचे जावो हीच इच्छा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 17:08 नवीन
>>> अर्थशास्त्र जाणणारा,अनेक वर्षे नोकरशाहीत काम केलेला,कुठ्लाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला पंतप्रधान ह्या देशाला मिळाला हे आपले भाग्य.चित्र-विचित्र,विनोदी आरोप होवूनही सिंग काम करत राहिले व त्यांनी देशाला एक आदर्श घालून दिला. :yahoo: तुम्ही बाई भलतेच विनोदी बर्का नानासाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 17:45 नवीन
अर्थशास्त्र जाणणारा?????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 17:45 नवीन
अर्थशास्त्र जाणणारा?????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 09:11 नवीन
तसेही ते १९९६ पासून आजतगायत निवृत्ताचेच आयुष्य जगत होते. आता १६ मे नंतर काय वेगळे करणार आहेत?
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Mon, 05/12/2014 - 10:11 नवीन
नमोही संघाच्या कळसुत्री बाहुलीशिवाय वेगळ्या भूमिकेत राहणार नाहीत.नमो पीएम झाले तर मनमोहनसिंग यांची भूमिका ते घेणार, आदेश पाळायची ..व सोनियांच्या भूमिकेत संघ असणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 16:57 नवीन
मोदींनी गुजरातमध्ये संघाला व विहिंपला फारशी भीक घातली नव्हती. त्यांच्याकडे बरेचसे दुर्लक्षच केले होते त्यामुळे उलटे होईल. संघ मौनमोहनांच्या भूमिकेत असेल व मोदी सोनियांच्या. मोदी बोले मोह्न डोले असे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Mon, 05/12/2014 - 20:05 नवीन
तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट आहेत. गुजरातचा विकास, त्याची दणक्यात जाहिरात ,मग मोदींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा हे सगळे संघाचे प्लॅन होते, मोदी फक्त ते एक्झीक्युट करत होते . त्यामुळेच संघ मोदींच्या पाठीमागे उभा आहे. संघातून वर आलेले गडकरी महाजनादी प्रभृती संघालाच फाट्यावर मारत होते ,म्हणून भाजप दहा वर्षे घरी बसला होता .आता भाजपवर पुर्ण संघाचा ताबा आहे.'फोडीले भांडार धन्याचा माल,मी तो हमाल भारवाही 'या ऊक्तीप्रमाणे मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/13/2014 - 12:13 नवीन
चांगलंय. संघाचा देशहितकार अजेंडा राबवणारा चांगला माणूस मिळाला. तो पंतप्रधान झाला तरच देशाचे हित होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 17:02 नवीन
>>> मोदी इमानेइतबारे संघाचे अजेंडे राबवत राहतील. परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
पियू परी Mon, 05/19/2014 - 12:28 नवीन
परकीय महिलेचे इमानइतबारे अजेंडे राबवून देशाची वाट लावण्यापेक्षा संघासारख्या नि:स्वार्थी व देशभक्त संघटनेचे अजेंडे राबविणे हेच देशहिताचे ठरेल. >> अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चौकटराजा Mon, 05/12/2014 - 09:14 नवीन
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. त्यात आपण नसताना अशीच प्रगतीची वाटचाल चालू राहिली असती की नसती याचा तर्कशुद्ध उहापोह यानी करावा.तसेच झालेली प्रचंड महागाई जी नवश्रीमंत जनाच्या क्रयशक्ती मुळे? सहाव्या वित्त आयोगामुळे? पेट्रोलच्या आंतरराष्ट्रेय किमतीमुळे? शेतकर्‍याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? नक्की कोणता फॅक्टर किती कारणीभूत झाला ते कथन करावे .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/12/2014 - 09:30 नवीन
निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे.
भारतीय सर्वच निवृत्त लोकांनी खरच अस काम केल तर खूप फायदेशीर होऊ शकत. (त्यांना दिर्घायूष्याच्या शुभेच्छा देऊन) सर्वांबद्दलच म्हणावे वाटते, जिवंतपणी भेव वाटला तर मेल्यावर प्रकाशित करण्याची व्यवस्था करावी पण आपल्याला दिसल तेवढ सत्य प्रामाणिक पणे आत्मचरित्रातून प्रत्येकाने मांडाव, किमान वरजाण्यापुर्वी प्रामाणिकपणे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे बरोबरला झालेल्या दिसलेल्या चुकांना चूक म्हणावे म्हणजे पुढच्या पिढ्यांना काय बदल करावेत हे प्रामाणिक अनुभव कथनातून अधिक व्यवस्थीत कळू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
श्रीगुरुजी Mon, 05/12/2014 - 16:54 नवीन
>>> निवृत झाल्यावर त्यानी एक अत्यंत प्रामाणिक कथनात्मक पुस्तक लिहावे. निवृत्तीनंतर कृतज्ञता म्हणून त्यांनी सोनिया, पप्पू, रॉबर्ट व प्रियांकाचे चरित्र लिहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
न
नानासाहेब नेफळे Mon, 05/12/2014 - 20:16 नवीन
गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात?? चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/13/2014 - 17:05 नवीन
>>> गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची कशाला काळजी तूमी का करत आहात?? चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते.त्यात परत येदीयुरप्पा स्टाईल शुद्धीकरणाचे टॉप अप प्लॅन असतील तर मग काय..मज्जानू लाईफ... आम्ही कशाला इतरांच्या चरित्राची काळजी करू? आम्ही फक्त आदरणीय म.मो.सिंगांना एक सुयोग्य काम सुचवित आहोत. >>> चाल, चरित्र ,प्रखर राष्ट्रवाद, भाषाशुचीता याची लाईफटाईम व्हॅलीडीटी फक्त भाजपाकडे व आरेसी लोकांकडेच असते. हे मात्र बरीक खरं हो माईसाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 05/14/2014 - 11:31 नवीन
गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते? बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ?भाजपने नंबर पोर्टेबिलीटी प्रमाणे कॅरॅक्टर पोर्टबीलीटी सर्व्हिस सुरु केली असावी. :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/14/2014 - 17:08 नवीन
>>> गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप प्लॅनविषयीपण लिवा कि.नक्की हे शुद्धीकरण कसे केले जाते? बंगलोरच्या बाहेर हजारो एकर सरकारी जमीन खरेदी करुन तुंबड्या भरणारा आप्पा ,इलेक्शन लागले की लगेचच प्रखर राष्ट्रवादी कसा झाला ? लिहितो ना. पण आधी 'ग्रेटथुन्कर' चा 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' कसा झाला, नंतर 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' चा 'नानासाहेब नेफळे' कसा झाला आणि नंतर 'नानासाहेब नेफळे' चा लिंगबदल होऊन 'माईसाहेब फुरसुंगीकर' कसा झाला ते सांगा. ते एकदा सांगितले तुमच्या सर्व शंका-कुशंकाचे समाधान करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 05/14/2014 - 17:40 नवीन
बोखारीयाचे प्रकरण इतके शेकलं काय :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/15/2014 - 08:49 नवीन
कोण बोखारिया? माई, हा तुझा नवीन आयडी दिसतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ट
टवाळ कार्टा Wed, 05/14/2014 - 17:59 नवीन
उद्दाम आणि सचिन राहीले की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हरकाम्या Fri, 05/16/2014 - 22:37 नवीन
त्यांनी पुस्तक लिहायला सुरुवात केलीय अस कानावर आलय. तुम्ही जाना त्यांना मदत करायला तेवढेच एखादे फुटकळ पद तुमच्या पदरात पडेल......हा..हा..हा..हा..हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नितिन थत्ते Tue, 05/13/2014 - 06:37 नवीन
कै उपयोग नाही. कलामांनी काही लिहिलं तरी लोक सुब्बुस्वामीलाच खरं मानतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
व
विवेकपटाईत Tue, 05/13/2014 - 17:49 नवीन
शेतकर्‍याना वाढवून दिलेल्या भावामुळे ? २००४ च्या भावांची २०१३ शी तुलना करून बघा. शेतकर्यांना भाव कमी दिला कि जास्त आपसूक कळेल. शरद पवार नसते तर शेतकर्यांचे दिवाळे निघाले असते. शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव केंद्रीय मंत्री म्हंटले तर नवल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ह
हरकाम्या Fri, 05/16/2014 - 22:31 नवीन
एवधा भाव मिळुनही त्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत.आता मध्यमवर्ग आत्महत्या करायला लागु नये म्ह्णजे मिळवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
म
मृत्युन्जय Mon, 05/12/2014 - 09:29 नवीन
पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत महिन्यातुन की वर्षातुन? की प्रत्येक टर्ममध्ये मिळुन? बादवे पक्षप्रमुखांशी फोनवरुन बोलण्याचा आणि त्यांच्या घरी जाउन चर्चा करण्याचा काळही यातच धरला आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 05/12/2014 - 09:49 नवीन
>>>>१८ / १८ तास ते काम करित असत यु रियली मीन इट? >>>>फोनवरुन बोलण्याचा >>>>र्चा करण्याचा यु रियली मीन इट? बाकी प्रश्न मलाही पडलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 05/13/2014 - 12:15 नवीन
यु रियली मीन इट? म्हणजे काय? त्यांनी तेवढेही काम केलेले नाही असे तुमचे म्हणणे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 05/13/2014 - 12:28 नवीन
नक्की काय काम केलं? नि मुख्य म्हणजे बोलणं की ऐकणं? चर्चा करणं की चर्चा ऐकणं? :) पंतप्रधान म्हणून ते स्वतः मानसिकरित्या तयार होते का हा खरा प्रश्न आहे. चालणं, बोलणं, सभेसाठी गेल्यावरचं जनते साठीचं हात हलवणं ते बघून त्यांच्या मागं कुणीतरी एक त्यांना हे सगळं करायला भाग पाडतंय असं चित्र उभं राहत होतं. ही इज/वॉज नेव्हर नॅचरल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ध
धर्मराजमुटके Mon, 05/12/2014 - 09:29 नवीन
मनमोहन सिंग यांचे आणि सर्व भारतीय माणसांचे आयुष्य आता नक्कीच समाधानात जाईल अशी अपेक्षा बाळगतो.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 05/12/2014 - 09:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ह
हरकाम्या Fri, 05/16/2014 - 22:42 नवीन
मनमोहनसिंगांचे नीट जाईल हो पण हे हरलेले त्यांचे पक्षीय मोदींना नीट काम करु देतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
द
दुश्यन्त Mon, 05/12/2014 - 09:34 नवीन
डॉ मनमोहनसिंह हे अजून काही वर्षे तरी खासदार ( राज्यसभेचे सदस्य) असणार आहेत तेव्हा त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून आपले योगदान देत येईल. त्यांनी पुस्तक लिहावे आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाराची नवनवीन शिखरे गाठणारे घोटाळे होत असताना मनमोहनसिंह त्यापासून खरेच अनभिज्ञ होते कि हाय कमंडचा दबाव होता कि सगळ माहित असून त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले हे जनतेला समजले तर बरे होईल. त्यांच्या काळात भ्रष्टाराची प्रकरणे झाली ती न रोखण्याला, प्रचंड महागाई वाढण्याला पंतप्रधान म्हणून ते जबाबदार ठरतातच.पदावर असताना त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले. आता पद गेल्यावर तरी ते बोलतील/लिहतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 05/12/2014 - 09:54 नवीन
मनमोहन सिंग कधीच निवृत्त झाले होते. आता वेगळे ते काय?
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Mon, 05/12/2014 - 10:17 नवीन
दीवार मध्ये अमिताभ चा एक डायलॉग आहे... मेरा बाप मर तो पहले ही गया था, आज तो उसको सिर्फ जलाया है. त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की मनमोहनजी तो कबके रिटायर्ड हो चुके है, अब तो सिर्फ अपना पद छोडेंगे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 10:23 नवीन
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. हॅहॅहॅ... ह्यांच्या सहकार्‍यांच्या भ्रष्टाचाराला यांना वेसण घालता आली नाही, हाच का यांचा सुसंस्कृतपणा ? मग असो ते कमालीचे सुसंस्कृत, पण त्यांचा हा गुण देशाला भिकेला लावणारा ठरला नाही ? त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. हॅहॅहॅ... घोटाळे होत असताना त्यावर ब्र देखील न काढणे ही देशाची सेवा ? सैंनिकांची मुंडकी छाटली गेली तेव्हा सुद्धा मौन पाळणे ही सेवा ? पण बरोबर आहे "मर्यादा" पाळायला हवी ना ! एक वाचलेला विनोद आठवला तो इथे देतो. :- एकदा एका भुताने मनमोहन सिंग यांना झपाटले ! ३ दिवसांनी त्या भुतानेच एका मांत्रिकाला गाठले, व म्हणाला... अरे लवकर यांच्या शरीरातुन मला बाहेर काढ ! मांत्रिक :- अरे तुझे काम तर झपाटणे, मग तू बाहेर काढण्याची मागणी कशाला करतो आहेस ? भूत :- मला मौन व्रताची अ‍ॅलर्जी आहे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते. त्यात काय विशेष ?
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/12/2014 - 10:29 नवीन
मनमोहनसिंगाना शुभेच्छा! घराबद्दल वाचले. पण ही घरे सगळ्यांना देत नाहीत का? लालबहादूर शास्त्रीजींच्या कुटुंबियांना दिले नव्हते बहुतेक. कारण त्यांचे स्वतःचे घर कधीच झाले नाही असे काहीसे वाचलेले आठवत आहे.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 05/12/2014 - 17:13 नवीन
भारतीय लोक कुठल्याही दगडाला शेंदूर फासलेला दिसला की हात जोडतात. मनमोहनसिंग याहून वेगळे नव्हते. त्यांनी आपल्यावर पडलेली जबाबदारी मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. एखादा रंगहीन, गंधहीन, स्वादहीन वायू असतो तसे कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस व्यक्तिमत्त्व, रटाळ ह्या शब्दाची व्याख्या म्हणता येईल इतकी रटाळ वक्तृत्वकला. सगळा आनंद होता. त्यांच्या निवृत्त जीवनाकरता शुभेच्छा देण्याची गरज वाटत नाही.

संपादित.

  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 05/14/2014 - 14:03 नवीन
>>रटाळ ह्या शब्दाची व्याख्या म्हणता येईल इतकी रटाळ वक्तृत्वकला. सगळा आनंद होता. सहमत!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Wed, 05/14/2014 - 10:11 नवीन
मनमोहनसिंग निवृत्त झाल्यानंतर पुन्हा इतका अतीलायक (ओव्हरक्वालिफाईड) पंतप्रधान भारतीयांना लाभू नये अशा त्यांना शुभेच्छा देतो (कारण भारतीयांची इतका स्थितप्रज्ञ नेता पेलायची लायकीच नाही ना म्हणून!)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 05/14/2014 - 13:51 नवीन
विपश्यना केंद्रात पाठवायला हवे. उत्तम मार्गदर्शन करु शकतील.बाकी काल व आज त्यांचे टीव्हीवर दर्शन झाले त्यात ते प्रत्येकाचा निरोप घेताना खुप उत्साही दिसत होते. आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 05/15/2014 - 09:29 नवीन
आता निदान त्या उत्साहात त्यानी राहुल गांधीच्या पाया नाही पडले म्हणजे मिळवली.
आयला.. तुमच्या ह्या प्रतिसादची भिती वाटल्यानेच का काय, राहुलबाबा कालच्या निरोप सहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले नव्हते म्हणे.. ;-)
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 05/15/2014 - 11:52 नवीन
नरेंद्र मोदींना तर इतका उत्साह आला आहे की त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत व रडकी बाळं दिल्लीत गाल फूगवून बसली आहेत.कालाय तस्मै नमो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/15/2014 - 17:07 नवीन
>>> त्यांना भाजपचे कार्यालय थेट गांधीनगरलाच हलवले आहे म्हणजे २००४ ते आजतगायत पंतप्रधान कार्यालय १०, जनपथ इथे हलविले होते तसंच ना! >>>> व राजनाथपासून ते गडकरीपर्यंत सगळे तिकडे जाऊन लाळघोटेपणा करत आहेत म्हणजे पवार, मौनमोहन, सुशील, विलास वगैरे मंडळी १०, जनपथ ला जाऊन जे करत होते तेच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 05/15/2014 - 18:12 नवीन
पवारांचा स्वतःचा पक्ष आहे ,गडकरी स्वबळावर नागपूरच्या पालिकेत नगरसेवकही होऊ शकत नाही. :-P
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/15/2014 - 18:15 नवीन
आपल्या होऊ घातलेल्या माजी पंतप्रधानाना शुभेच्छा द्या! तुम्हाला मोदी आणि गडकरी इतके आवडतात की तुम्ही सगळीकडे त्याम्च्याबद्दल बोलल्याशिवाय राहूच शकत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Fri, 05/16/2014 - 07:06 नवीन
>>> पवारांचा स्वतःचा पक्ष आहे मग जा त्यांच्या पक्षात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा