मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य.
श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल.
उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी.
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते.
राजकारणी आणि सिनेकलावंत लोकांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते आणि झपाट्याने ते दुरही होत जाते. सुदैवाने मनमोहनसिंहाना याचा अनूभव आला नसावा. भारतासारख्या खंडप्राय देशाचे प्रमूख पद १० वर्षासाठी मिळणे ही साधीसुधी घटना नव्हे, कदाचित इतरांना त्यांचा हेवाही वाटत असेल.
असो, १४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो हीच माझी सदिच्छा.
💬 प्रतिसाद
(55)
ह
हरकाम्या
Fri, 05/16/2014 - 22:22
नवीन
पवारांचा पक्ष सध्या मरु घातलाय. तिथ कशाला जाताय?
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 08:05
नवीन
मला वाटतंय मनमोहन सिंगा नी बॉलिवुड मधे नशिब आजमावावं.
अनुराग बासु ला सांगुन " बर्फी २ " काढायला लावावा अन त्यात लीड रोल करावा. :)
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Fri, 05/16/2014 - 15:29
नवीन
एखाद्या माणसाचे लग्न उर्वशी किवा मेनके बरोबर लावावे पण त्याला "त्याची" बंदी घालावी. म्हणजे त्याला कसे वाटेल ? तसे या मुकमोहनचे झाले होते. आपल्या हातानेच त्याने हे करून घेतले.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sun, 05/18/2014 - 09:29
नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/35269041.cms
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/18/2014 - 12:48
नवीन
मस्त दुवा आहे. काही खास गुद्दे...
'कोई देख्ख लेगा तो बस्स, बोलेगा के हर बार मैणू कोई औरत जातही कुर्सीविच बिठाणे आन्दी है.'
'हां हां..जोभी दिल करदा..अब्ब तूस्सी आझाद हो.'
'अब्ब कुछ बरस तो कोयलाणू हात्तभी नही लगाऊंगा मैं. कोयला बेचेगा तू और हात्तविच कालिख लगेगी मेरे.'
दुव्यासाठी धन्स !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2