पाककृती

कुssssफ्लिssssये

Primary tabs

काय मंडळी,

शीषर्कावरुन आरोळि/हाक ओळखीची वाटतेय का? मग दाहक उन्हाळा आणि थंडगार कुल्फि ह्यांच नातं आहेच तस घट्ट. आंब्याचा ऋतु असल्यामुळे आंबा घालुन कुल्फि तर केलीच पण ती सेट सुद्धा जssssरा वेगळ्या पद्धतीने सेट केली. कसं??? चला सांगतो बरं...

Kulfi 1

साहित्यः
१. तयार घट्ट आंबे - २
२. मिल्क पावडर - २ कप
३. काजु पावडर - १ कप
४. पिस्ता पावडर - १/२ कप
५. साखर - चवीप्रमाणे कमी/जास्त
६. आंब्याचा पल्प/रस - २ कप
७. कार्निशन ईव्हॅपोरेटेड मिल्क - १ टिन
८. नेस्ले फुल क्रिम - १ टिन
१०. चिमुटभर केशर - कोमट दुधात घालुन ठेवणे
९. सजावटिसाठि बदाम-पिस्त्याचे काप

कृती:
१. तयार आंब्याचं वरचं साल थोडं कापुन घ्या. आता सुरी चारहि बाजुन हळुवारपणे खुपसुन जागा करा. हलक्या हाताने आंबा पिळत आतील बाठ काढुन टाका......हाकानाका. सुरवातीला पहिला आंबा पोकळ करताना जरा जड गेलं पण हे दिसतं तेवढं कठिण नाहि :D पण त्यासाठि तयार आंबा कडक घ्या.

pokal ambe

२. आता एका मोठया बाउल/भांड्या मधे अनुक्रमे मिल्क पावडर, काजु / पिस्ता पावडर, साखर, केशरमिश्रित दुध, आंब्याचा पल्प, ईव्हॅपोरेटेड मिल्क आणि नेस्ले फुल क्रिम घालुन हलक्या हाताने मिक्स करा.

milk cream

३. तयार कुफ्लिचं मिश्रण पोकळ आंब्यात भरुन डिप फ्रिजर मधे सेट करण्यास ठेवा. उरलेलं मिश्रण आवडत्या मोल्ड/साच्यात घालुन मँगो कुल्फि सेट होण्यास ठेवा.

४. कुल्फि सेट झाली कि फ्रोझन आंबे सुरीने / सोलाण्याने सोलुन घ्या. आंबे प्रचंड गार असल्यामुळे सालं काढताना हात बधीर होतात. तेव्हा सोलताना टिश्यु पेपेर किंवा किचन टॉवेल घ्या. त्यातहि सुरीपेक्षा सोलाणं घ्या. आंबे कडक झाल्यामुळे सोलाण्याने सालं लवकर निघतात.

५. हव्या त्या आकारात कापुन (शक्यतो गोल) व वरुन बदाम/पिस्त्याचे काप घालुन ईनोव्हेटिव्ह कुल्फि पेश करा/ घरच्यांबरोबर लुफ्त घ्या.

Kulfi 2

टिपा:
१. कुल्फि नुसती आंब्यात सेट करायची झाल्यास साहित्याचं प्रमाण त्यानुसार ठरवा.
२. कुल्फि मिश्रणात जर बारीक चीरलेल्या चेरीज घातल्यात तर कलर कॉम्बीनेशनच्या दृष्टिने फायनल प्रॉडक्ट अधीक आकर्षक दिसेल.
३. कुल्फिचे गोल काप अश्यासाठि कि, १. कुल्फि भोवती आंब्याचं रिंगण फार मोहक वाटतं आणि २. पहिला घास घेताना आधी आंब्याची चव तोंडात येउन मग कुल्फिची येते अर्थात हे आपलं माझं मत झालं. तुम्हाला आवडतील तसे काप करा. पण आंबा गोडच बघा जरा जरी आंबट असला तरी पुढिल चव बिघडेल.

प्यारे१

*shok* *cray2*

मस्त

झक्कास...

तुम डोंबिवली को आव....

हम दोनो ये मस्त धंदा करेंगे...

माल नहीं बिका तो कट्टा करेंगे....

फोटो दिसत नाहीत.. आजवर तुमच्या तरी धाग्यावरचे फोटो नक्की दिसायचे.. आता ते ही नाही.. *cray2*

दिपक.कुवेत

हे खरचं आहे (कारण मला अजुन दिसत आहेत) का तुझा गणेशा झालाय?

अस्मी

व्वाह..एकदम्म झक्कास!!
वेगळीच आणि इनोवेटिव पद्धत; फोटो एकदम भारी!! :)

मृत्युन्जय

निर्वाण पावलो आहे. मिपावरच्या सर्वात खल्लास पाकृ पैकी एक.

++++++++++१११११११११११११ परिपूर्ण निर्वाणल्या गेलो आहे!
रामनाम सत्य है...अंबा कुल्फी मस्त है। =))

मनिष

भन्नाट! आयडीया फारच आवडली. सगळे साहित्य मिळाले तर ट्राय करतो! :)

सूड

वीकांतास दूध आटवून कुल्फी करायला ठेवली आणि कुणीतरी फ्रीझर मधून पातेलं खाली काढून ठेवलं. बासुंदी म्हणून सर्व्ह करावी लागली ऐनवेळी. ;)

स्पंदना

काय भन्नाट आयडीया आहे.
आंबे नाहीत मिलत पण या निमित्त्याने कुल्फी तरी मी खाउ शकते.
धन्यवाद्स!

मदनबाण

एक टिप :-
आंब्याला पिळण्या पेक्षा सुरीने सर्व बाजुनी काढुन टाका, मग त्याच्या स्लाइस करुन नंतर ग्राइंड करुन घ्या, नाहीतर पातेल्यात मोठ्या डावाने जोरात फिरवुन घ्या. आंब्याचा रस / गर अजिबात वाया जात नाही या पद्धतीने. मी गुजराती लोकांना अशाच पद्धतीने आंबा खाताना अनेकदा पाहिले आहे. :)

बाकी
तयार घट्ट आंबे - २
हे वाचुन क्षणभर मला माझ्या मनात उगाच अश्लिल अश्लिल असा ऐको ऐकु आला... ;)

{अंमळ चावट-गोड} ;)

इशा१२३

अगदि वेळेवर पाकृ टाकलीत.भरपूर आंबे असताना.फोटो पाहून मृत्युन्जया सारखीच निर्वाण अवस्था झाली.खल्लास.

कंजूस

श्रीयुत राजमान्य राजश्री डिजाईनर शेफ श्री श्री दिपक.कुवेत यांसी ,आपली कला पाहून आम्हास अत्यानंद झालेला आहे .आमची आणि इतरांची काही इंद्रिये मर्यादेबाहेर सुख अनुभवत आहेत .या पृथ्वीतलावरील आणखी काही अशाच रसदार भोजनकृती पाठवण्याची विनंती करीत आहे .आम्ही नुकतेच परशुरामभुमि पर्यटन करून आम्रफले घेऊन आलो आणि या ग्रिष्मकाळात योग्य पाककृती पाहून आनंद द्विगुणित झाला आहे .

सौंदाळा

मस्तच
इंप्रव्हाजेशन का काय म्हणतात ते हेच ;)

शिद

एकदम झक्कास्स अशी राजस पाकृ. *good*

फोटो पाहुन "जी ललचाये रहा ना जाये" अशी परिस्थिती झाली आहे.

पिंगू

कसली आयडिया आहे. बेष्ट एकदम.. आता आंब्याचा मोसम आहेच, तेव्हा कुल्फी बनवायचा प्रयत्न केला जाईल..

प्रचेतस

अरे मारतोस काय असल्या उन्हाळ्यात आम्हाला?
खल्लास आहे कुल्फी एकदम

भाते

हा धागा त्वरित उडवुन द्यावा आणि या माणसाला विकांताला सोडुन ऐरवी पाकृ विभागात काहिही लिखाण न करण्याची समज द्यावी ही नम्र विनंती.

दिपक,
इथे मुंबईत (मध्यवर्ती डोंबिवलीत) उकाडयाने अंगाची लाहीलाही होत असताना तु हे असला भयानक पदार्थ टाकुन आणखी डोळ्यांची, जिभेची लाहीलाही का करतोस रे बाबा?
वरची (फोटोसहित) पाकृ न वाचल्यामुळे अजिबात जळजळ झाली नाही आहे. :)

दिपक.कुवेत

अरे उन्हाळा ईकडेहि आहे. म्हणुन कुल्फि खाउन तो सगळ्यांसाठि सुसह्य व्हावा हिच सदिच्छा!

सस्नेह

यम यम्...यम्मी !
त्या दीपकला कुणीतरी कुवेतमधून किडनॅप करा हो !

सुब्बु

खूप छान दीपक दादा
रेसिपी खूप छान आहे, करून पाहू शकत नाही आता कारण मी सुधा इथे साल्मिया मध्ये राहते
हापूस आंबे नाही इसिली मिळत इथे.

दिपक.कुवेत

मी सुद्धा सालमीया मधेच राहतो आणि हि पाकॄ सुद्धा सालमीया मधुनच हापूस आंबे घेउन केली आहे.

एक दिवस तुम्ही डोंबिवलीला काय आलात? आणि कुवैतच्या माणसांसाठी माहितीचा स्त्रोत बनलांत....

उगाच नाही, आम्ही डोंबोलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत....

खत्रा आहे .. स्साले असले पदार्थ ना आपण घरी करू शकत ना आसपास कुठे हॉटेलात शोधून सापडत .. जाऊ दे, जो करेल त्याचा आंबा आंबट निघेल ..

आई शप्पथ मला कुणी फोटो नाही ना पाठवला तर मी कुवेत ला जाऊन दिपकचा जीव घेईन.. काय त्रास आहे.. सगळे मारे तारिफ के पुल बाधंत आहेत आणि मला साधा फोटो पण दिसु नये??? ओ दिपक राव.. तुम्ही चेपु वर असता काय?

प्यारे१

तुला कुल्फी पायजे का दिपकचा जीव?

आय थिंक दिपक चा जीव फार काही टेस्टी नसावा! ;)
तू कुल्फीच ट्राय कर. =))

सूड

>>तुम्ही चेपु वर असता काय?

माताय! चेपुवरुनही जीव घेता येतो? टेक्निक सांगा राव. ;)

लोक हो.. जीव घ्यायच्या आधी एक शेवटचा चान्स देतेय.. चेपुवर जीव घेता येत नसल तरी फोटो देता येतात न??!!

(दिपकराव.. घाबरु नका.. नाही करणार मी काही तुम्हाला.. मला फक्त एकदा ते फोटो दाखवाच..)

दिपक.कुवेत

ये चेपु चेपु क्या है??? आस्मादिक ईथेच पडिक असतात हो.....मायला त्या फेसबुकच्या अकाउंटला पण गंज चढायला लागलाय!

पियुशा

एकच वादा दीपक दादा ! कसली भन्नाट आहे रे ही कुल्फी मेले मेले मेले ___/|\____

ए फोटो दिसले!!!!!!! काय चमत्कार...!!

आणि एकदम वर्थ इट आहेत रे.. काय कातील कुल्फी आहे..

मानलं राव!!!

___/\___

दिपक.कुवेत

चला जीव वाचला म्हणायचा. तुमचा प्रतिसाद पाहुन काल झोपेतुन पण दचकुन उठत होतो!

आंबा, कुल्फी आणि माझा मधुमेह ह्या त्रयींचे एकमेकांशी अजिबात पटत नसल्याने आजपर्यंत ही पाककृती पाहण्याचेही धाडस होत नव्हते. आज न राहवून धागा उघडला आणि छायाचित्र पाहूनच रक्तशर्करा वर गेली आहे.

हार्दीक अभिनंदन. केलीच तर कुल्फिचा एक चतुर्थांश काप खाऊन समाधान मानावे लागेल, जे अशक्य आहे.