आई
आकाश उतरता खाली
अस्तित्व नष्ट कराया
मी हळूच पांघरून घेतो
आईची हळवी माया
ती पैलावरती माया
ऐलावर होते रात
ठेवता उशीवर डोके
केसातून फिरतो हात
का डोळ्यामध्ये आसू
का अंतर्मन व्याकूळ
गगनात भारली प्रतिमा
अस्पष्ट करतसे धूळ
झाकल्या पदराखाली
आयुष्याचे कोंदण
आईच्या हातावरती
एक पिंडीचे गोंदण
हातात चंद्र धरून
स्वप्नात भेटते आई
घेऊन कुशीत मजला
गाते अजूनही अंगाई
💬 प्रतिसाद
(9)
स
स्पंदना
गुरुवार, 05/15/2014 - 07:14
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 05/15/2014 - 07:36
नवीन
मस्त झालीये कविता...
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/15/2014 - 09:42
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 05/15/2014 - 10:48
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 05/15/2014 - 17:47
नवीन
मस्त !
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/15/2014 - 18:02
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/15/2014 - 20:56
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 05/16/2014 - 05:35
नवीन
सुंदर काव्य
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 05/16/2014 - 07:23
नवीन
कहर- सुंदर कविता :)
- Log in or register to post comments