Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिनंदन!

र
राही
Fri, 05/16/2014 - 06:49
🗣 103 प्रतिसाद
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला. आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.

प्रतिक्रिया द्या
48074 वाचन

💬 प्रतिसाद (103)
च
चौकटराजा Fri, 05/16/2014 - 14:00 नवीन
मोरारजींचा अवसानघात करणारे मधु लिमये यांच्या सारखे समाजवादी त्यावेळी होते म्हणून जनसंघीयाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग त्या वेळी झाला. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी व कॉंग्रेस हाच एकमेकाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग करीत सत्ता खात होते. त्यावेळच्या जनता पक्षाला व आघाडीला मतदारानी धडा शिकवलाय. की सत्तेचा आयडियॉलॉजीचा माज करू नका. ३७० , राम बाजूला ठेवल्यावर काय घडू शकते हे दिसले आहे.आता काही काळ सुषमा स्वरात एल के काहीशी बोंब करतील पण त्याना गप्प केले जाईल. समाजवाद्यांइतके ते घातकी ( वैचारिक ) नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
त
तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 10:02 नवीन
सर्व भारतीयांचे अभिनंदन ! काँग्रेस हा पक्ष यातून संपून न जाता पुन्हा नव्या दमाने नव्या चेहर्‍याने उभा राहील अशी अपेक्षा, लोकशाहीत विरोधी पक्षाचा अंकुशही तितकाच गरजेचा.
  • Log in or register to post comments
क
कुसुमावती Fri, 05/16/2014 - 11:18 नवीन
नमोंच्या हातुन भारताचा विकास होवो. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 05/16/2014 - 11:36 नवीन
अभिनंदन अमोल केळकर
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/16/2014 - 13:34 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मोदींनी "हा भारताचा विजय आहे" असे म्हणून आणि नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आईचा आशिर्वाद घेऊन पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात कृतज्ञता आणि कृतर्थता दिसते... असेच आता या सत्ताधारी आघाडीचे पाय जमिनीवर राहोत आणि भारताला मोठे करण्यासाठी भारतीयांना संधी प्राप्त होतील असे कार्य घडोत ही शुभेच्छा! राजीव गांधींना याहून मोठा विजय मिळाला होता पण ती सहानभुतीची लाट होती. नाहीतर आठवते त्याप्रमाणे जर इंदीराजी हयात असत्या तरी कदाचीत त्या जिंकल्या असत्या पण इतक्या मताधिक्याने नाही. त्यामुळे हा विजय पोलरायझेशनचा विजय आहे असे वाटत नाही. तर खर्‍या अर्थाने त्रासलेल्या आणि केवळ सामान्य इतकीच ओळख असलेल्या बिनचेहर्‍याच्या जनतेने दिलेला एक आशावादी कौल आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 05/17/2014 - 22:01 नवीन
२००९ साली सुद्धा जनता ह्या सरकारला विटली होती पण त्यांच्यापुढे समर्थ पर्याय नव्हता, रथ यात्रा करणारे , तडफेने भाषण करणारे प्रत्यक्षात कृतीशून्य महाजन , वाजपेयी ,अडवाणी ह्यांचा पर्याय जनतेला मान्य नव्हता कारण शायनिंग इंडिया म्हणून काही होत नाही त्यासाठी तुमचा मतदारसंघ , तुमचे राज्य शायनिंग असले पाहिजे. मोदी ह्यांचे गुजरात मॉडेल उत्तर प्रदेशाला हवेसे वाटले .ह्यात जनतेचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , त्यांना भावनिक रीत्या च्यु बनवायचा हेतू नव्हता. मोदी हा तत्कालीन सरकार विरुद्ध समर्थ पर्याय होता मात्र बंगाल व तामिळनाडू मध्ये मोदी लाट चालली नाही कारण तेथे दोघी मा, अम्मा खमक्या होत्या. अकाली दलावर नाराज जनतेने आपला मत देणे अनपेक्षित होते ह्याच पार्श्वभूमीवर आप , राज ला पुरून उरणारा उद्धवचे कर्तुत्व मोठे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चौकटराजा Sun, 05/18/2014 - 05:20 नवीन
माझ्या मते त्या बाबा चव्हाण यांच्या पेक्षा चांगल्या मुख्यमंत्री आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
द
दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 15:52 नवीन
एक दुरुस्ती २००९ ला महाजन हयात नव्हते तर वाजपेयी आत्तासारखेच थकलेले होते त्यामुळे वाजपेयी प्रचारपासून दूर होते. आडवाणी तसेच जेटली, स्वराज वगैरे लोक तेव्हा भाजपची आघाडी सांभाळत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ब
बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 13:45 नवीन
हबिणंदण!!! मात्र लै मोठ्या जबाबदार्‍या आहेत मोदीवर. कसा पार पाडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. मोदी व समस्त सर्कारमधील घटकांना पुनरेकवार शुभेच्छा!! बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
संपत Fri, 05/16/2014 - 14:27 नवीन
बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.
पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
निनाद मुक्काम … Sat, 05/17/2014 - 22:02 नवीन
गेली आहेत ऑलरेडी स्वतंत्र भारतात जन्मलेला व एकसंघ जर्मनीत राहणारा निमुपोज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/16/2014 - 13:54 नवीन
विजय Image removed.
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 05/16/2014 - 14:26 नवीन
आजची सकाळ खरोखरीच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी होती. टीवीच्या पडद्यावर नाट्य उलगडत होते आणि ह्यूस्टन, न्यू जर्सी, पीट्स्बर्ग, लंडन्, सिडनी इथल्या निरोपांच्या देवाणघेवाणींनी कंप्यूटरचा पडदा भरून गेला होता. काळवेळ जणू थांबला होता. असा ऐतिहासिक क्षण या पूर्वीही एकदा अनुभवायला मिळाला होता. १९७७ साली. लहान वयामुळे त्या क्षणाचे ऐतिहासिक मूल्य तितके लक्षात आले नव्हते. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वातावरणातला जोश, उत्सुकता, थरार बघितला होता. शनिवारवाड्यावर, गायकवाड्यासमोर, सकाळ कचेरीसमोर जमलेला बेभान जमाव, निवडणूकपूर्व प्रचाराच्या मुंबईच्या लहान-लहान गल्ल्यातही रंगलेल्या सभा, सारे आठवतेय. पु.ल देशपांड्याची सभाही आठवतेय आणि त्याला मिळालेला तुडुंब प्रतिसादही. शब्द लक्षात नाहीत पण लोकांचा उत्साह आठवतोय. पण काही दिवसांतच हे सोनेरी स्वप्न भंगून गेले आणि लोकांचा पराकोटीचा हिरमोड झाला. आता तसे न होवो. ज्या बदलासाठी हा शांततामय कौल दिला गेला आहे, तो वास्तवात येवो. लोकाभिमुख सरकार आणि सुप्रशासन भारतात अवतरो. नागरी शिस्त आणि सार्वजनिक चारित्र्य भारतीयांमध्ये बाणो. एव्हढे तरी होवो. आमेन.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/16/2014 - 16:25 नवीन
वास्तवीक माझ्या मध्यरात्रीच एनडीटिव्हीवर प्रणव रॉय यांनी खात्रीने एनडीएला बहुमत मिळेल हे सांगितले. तरी झोपायला जावतच नव्हते. तसाच ३ पर्यंत बसलो आणि ऐतिहासीक क्षण अनुभवला. १९७७ ची मला देखील आठवण झाली. मृणाल गोरे, दुर्गा भागवत, सुब्रम्हण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडीस, आदींची भाषणे ऐकल्याचे आठवते. अर्थात मी तेंव्हा फारच लहान होतो. मृणाल गोरेंच्या भाषणाला आईने नेल्याचे आठवते! नंतर निवडणूक निकालाची रात्र आली आणि रेडीओवर अचानक मध्यरात्रीच्या आसपास, "जाने कहां गये वो दीन..." गाणे लागले. आमचे शेजारी, "इंदीरा गांधी पडल्या" म्हणतच घरात आले. विश्वास बसला नव्हता. नंतर घरावरून रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक जाताना पाहीली, त्यांनी काँग्रेसच्या पा.शि. देशमुखांना हरवले होते, "चंद्रभागेला आला लोंढा, पाणी आले ठाण्याला, इंदीरा म्हणते यशवंताला, पाशि माझा बुडाला" म्हणत जोरात मिरवणूक गेली... नंतर दुर्दैवाने म्हाळगी मला वाटते त्यांची टर्म संपायच्या आधीच कॅन्सरने गेले. दुसरीकडे "संजीव-राजीव वात्रट कार्टी निवडून आणा जनता पार्टी!" ला प्रचंड प्रतिसाद मिळून देखील जनतापार्टीने सत्ताधिशांपेक्षा विरोधीपक्षाचेच काम चालू ठेवले आणि अंतर्गत लाथाळ्यांमधे सोनेरी स्वप्न भंगून गेले. :( १९८४ साली कदाचीत परत विरोधकांना संधी असती पण सहानभूटीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. सारे देशमे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी असे ओरडत काँग्रेसचे पब्लीक फिरत होते. पण तरी देखील भाजप पक्ष म्हणून भंगला नाही. मतभेद नक्कीच झाले असतील, पण त्यातील प्रमुख नेत्यांनी कधी वेगळी चूल मांडली नाही. हे नक्कीच वैशिष्ठ्य वाटते. असो. असा निवडणूक निकालांचा अनुभव नंतर अमेरीकेत बुश विरुद्ध गोर च्या वेळेस रात्रभर जागून आणि नंतर सततच्या बातम्या ऐकून घेतला. ज्या दिवशी गोरने हार मान्य केली त्या दिवशीचे त्याचे भाषण ऐकताना सामान्यांना जाउंदेत काही प्रसिद्ध माध्यमातील प्रसिद्ध अँकरमन्सना देखील वाईट वाटल्याचे दिसत होते. ओबामाच्या पहील्या निवडणुकीच्या वेळेस इतिहास घडला. पण नंतर त्याचा आत्यंतिक द्वेष करून बदनामी करणारे विचारवंत आणि राजकारणी पाहीले (कदाचीत तेच मोदींच्या बाबतीत झाले). दुसर्‍या वेळेस त्याच्या विरोधात रॉमनी उभा होता. तेंव्हा असेच उत्कंठावर्धक होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
त
तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 20:06 नवीन
वाह, भावनिक पोस्ट, आवडली, तुमची आणि वरची राहींची देखील ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/16/2014 - 16:58 नवीन
नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन. आता इथुन पुढे १०-१५ वर्ष देशात भा.ज.पा. आणि मित्रपक्षांना पर्यायच उरला नाही पाहिजे. काँग्रेसच्या तोंडावर 'पंज्या'चा जोरदार फटका देऊन पराभव केल्याबद्दल समस्त मतदार बंधुं-भगिनींचे आभार. आता गेल्या १० वर्षात यु.पी.ए. १-२ नी केलेले झोल बाहेर काढुन जावै बापु, बिटियारानी, मम्मा, पप्पु, सगळे "माजुर्डेवादी" ई.ई. ना कृष्णजन्मस्थान यात्रा घडवावी हीचं ईच्छा. मनमोहनसिंग यांनी कृपया राजकारणातील घाणीतुन बाजुला व्हावे आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/16/2014 - 17:51 नवीन
आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मदनबाण Fri, 05/16/2014 - 19:10 नवीन
एक मुद्दा राहिलाच की... माझ्या आनंदाचे अजुन एक कारण म्हणजे...अमेरिकेची होणारी गंमत ! मोदींना व्हीसा नाकारणारा माजुरडा देश ! आता काय करतील ?
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/16/2014 - 20:17 नवीन
चमत्काराशिवाय नमस्कार होत नसतो, पण चमत्कार करून दाखवला की..

White House, U.S. Senate Congratulate Narendra Modi on His Win in India

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ह
हुप्प्या Sat, 05/17/2014 - 02:47 नवीन
खरोखरच चमत्कार म्हटला पाहिजे. एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही. ह्या भारताच्या सुपुत्राला माझा सलाम! कितीही मतभेद असले तरी ह्या माणसाने ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे ह्याविषयी शंका नसावी. आणि ही सगळी प्रक्रिया ९०% शांततेत पार पडली (अजून तरी!) हे एक मोठेच अप्रूप म्हटले पाहिजे.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 05/17/2014 - 06:09 नवीन
प्रक्रिया १०० % शांततेत पार पडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/17/2014 - 06:45 नवीन
एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.
ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/17/2014 - 19:27 नवीन
आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल. गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. मोदींचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ Sat, 05/17/2014 - 19:47 नवीन
क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या? चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला? मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की. जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...! राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला. चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/17/2014 - 20:12 नवीन
अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़. कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
आ
आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 20:19 नवीन
बघुन त्यांना विपश्यना टिचर बनवा अशी मागणी जोर धरु लागली आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/18/2014 - 09:22 नवीन
अहो विपश्यनेत पण एवढं शांत नसतं बसायचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/17/2014 - 06:13 नवीन
बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली. बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी. नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 05/17/2014 - 11:26 नवीन
तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे. म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 11:56 नवीन
लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 19:31 नवीन
त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
निनाद मुक्काम … Sat, 05/17/2014 - 22:11 नवीन
ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल अब की बार ..... अवांतर मायलेक राजीनामा देत आहेत हे वाचून जीव गलबलला त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे हास्यकवी संमेलन मम्मी तुसी ना जो रीयंका लावो , पार्टी बचाव प्रियंका इज इंडिया
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 05/18/2014 - 00:56 नवीन
निर्भेळ करमणूकच हवी असल्यास येथे पहा: http://whycongresslost.in/ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/18/2014 - 08:13 नवीन
मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !! राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कवितानागेश Tue, 05/20/2014 - 15:17 नवीन
भयंकर आहेत! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/18/2014 - 08:36 नवीन
नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन. भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 16:19 नवीन
महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 16:59 नवीन
विधानसभेत आघाडी सरकारचा पराभव झाला तरच त्यांचे डोळे उघडतील, नैतर आहेच पुन्हा धरण, लघवी आणि शाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
व
विनोद१८ Sun, 05/18/2014 - 18:43 नवीन
मला त्या दिव्य कुकेचे सांत्वन करायचे आहे ते कसे कुणी सांगु शकेल काय ?? मोदी व भाजपच्या या भव्यदिव्य यशाबद्दल.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 05/20/2014 - 14:07 नवीन
आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल. आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 05/20/2014 - 14:36 नवीन
काल एकाने पराभूत या शब्दाचा अर्थ असा सांगितला प पवार रा राणे भू भुजबळ त तटकरे मो दी चा अर्थ मो मोठ्या दि दिमाखात
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 05/20/2014 - 23:45 नवीन
खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 05/21/2014 - 04:52 नवीन
tosh noun Chiefly British Informal. nonsense; bosh. त्यावरून हे कॉश!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ह
हुप्प्या Wed, 05/21/2014 - 06:02 नवीन
मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू. काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मदनबाण Wed, 05/21/2014 - 03:15 नवीन
केतकरांचा तोल { कोणता ते समजलंच आहे म्हणा ! } केव्हाच ढासळला आहे !
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी Wed, 05/21/2014 - 03:59 नवीन
सुमार शेटकर अगदीच वाया गेलेत *dirol*
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/21/2014 - 04:13 नवीन
इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 05/21/2014 - 20:22 नवीन
क्लिप आवडली, बर्‍याच जणांशी शेअर केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
राही Wed, 05/21/2014 - 20:22 नवीन
क्लिप आवडली, बर्‍याच जणांशी शेअर केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
निनाद मुक्काम … Wed, 05/21/2014 - 09:53 नवीन
चेपू वर शेअर करण्यासारखे आहे. करत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा