Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नमो लाटेचे साईड ईफेक्ट

व
वॉल्टर व्हाईट
Sat, 05/17/2014 - 00:02
🗣 204 प्रतिसाद
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.

प्रतिक्रिया द्या
52053 वाचन

💬 प्रतिसाद (204)
ह
हुप्प्या Sat, 05/17/2014 - 00:32 नवीन
मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-) (किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)
  • Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट Sat, 05/17/2014 - 06:10 नवीन
विनोदी असला तरी साईड ईफेक्ट आहे खरा. नोटेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ख
खबो जाप Sat, 05/17/2014 - 07:33 नवीन
मला वाटते मोदिनी विसा दिला तरी नाकारून, उलट अमेरिकेला भारतात चर्चेसाठी येण्यास आमंत्रण द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/22/2014 - 18:40 नवीन
नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते. (नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
व
विकास गुरुवार, 05/22/2014 - 18:56 नवीन
नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे. नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. =)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/22/2014 - 19:39 नवीन
गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Fri, 05/23/2014 - 09:08 नवीन
वरील चित्रांचा/आकडेवारीचा आणि काँग्रेसचा काहीच संबंध नाही. India has progressed not because of Congress, but in spite of Congress.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सुबोध खरे Fri, 05/23/2014 - 11:37 नवीन
"If ‘con’ is the opposite of pro, then isn’t Congress the opposite of progress? - Jon Stewart
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बॅटमॅन Fri, 05/23/2014 - 11:47 नवीन
ते आणि हे काँग्रेस वायलं. तो कोट इथे ठेवून उगा लाईक मिळवण्यापलीकडे दुसरं कै होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
थ
थॉर माणूस Fri, 05/23/2014 - 11:53 नवीन
जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेपी Sat, 05/17/2014 - 03:58 नवीन
पासवान यांना बिहारमध्ये पुन्हा जिवदान मिळाले.
  • Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट Sat, 05/17/2014 - 06:20 नवीन
बरोबर. नोटेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
व
विनायक प्रभू Sat, 05/17/2014 - 06:16 नवीन
दिल्ली चे तिकीट मिळाय्चे वांधे... ट्रेन चे ....
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/17/2014 - 06:25 नवीन
भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!
  • Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट Sat, 05/17/2014 - 06:27 नवीन
नोटेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
संपत Sat, 05/17/2014 - 06:52 नवीन
आडवाणी कायमचे अडगळीत गेले हे सर्वात उत्तम झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/17/2014 - 11:11 नवीन
त्या अडवाणींच्याच खांद्यावर उभे राहून मोदींनी स्वत:चा राजकिय फायदा करून घेतलाय हे विसरता कामा नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Sat, 05/17/2014 - 11:33 नवीन
मान्य.पण अडवाणी हे माझे व्यक्तिगत सर्वात नावडते राजकारणी आहेत. त्यामुळे आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 09:48 नवीन
अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
स्पंदना Sat, 05/17/2014 - 13:02 नवीन
होय! नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वेताळ Sat, 05/17/2014 - 06:27 नवीन
त्या गायबच आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/17/2014 - 06:37 नवीन
मायावती कुठे आहेत हो? हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;) बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे ! जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
अ
अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 08:16 नवीन
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्‍यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्‍या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्‍या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 05/19/2014 - 03:52 नवीन
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ? लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ? मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला. शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती. कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 05/19/2014 - 07:02 नवीन
फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय... हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 05/19/2014 - 12:11 नवीन
ह्म्म... इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा ! सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :- "The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister," संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ ! बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;) संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्‍या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले. होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ? संदर्भ :- RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्‍या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्‍याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्‍या जगालाच पटेल नाही ? संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri' आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs! When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुबोध खरे Mon, 05/19/2014 - 15:35 नवीन
अरे अरे मदन बाणा तू तर त्यांच्या चडडीलाच हात घातलास. इथल्या कांग्रेस वाल्यांचे कसे होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/19/2014 - 19:01 नवीन
इतकं नाकारता न येणारं स्पष्ट खर्र खर्र बोलून का मेलेल्याला मारताय ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/17/2014 - 06:38 नवीन
मिपावरच्या सुडो सेक्युलर लोकांच्या मजेशीर कमेन्ट्स वाचायला मिलणार नाहीत आता :( #मौत्_का_सौदागर
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 05/17/2014 - 07:06 नवीन
गांधीशाहीपेक्षा महाभयंकर राणेशाही संपली! आता विधानसभेत ना. राणे आडवे झाले की काम तमाम!!
  • Log in or register to post comments
स
संपत Sat, 05/17/2014 - 07:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
स
संपत Sat, 05/17/2014 - 07:17 नवीन
अशोक चव्हाण ह्यांचे राजकीय पुनर्वसन झाले :)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/17/2014 - 07:31 नवीन
खटला चालु झाल्यावर ते पण राजीनामा देतील
  • Log in or register to post comments
ड
डॉ. भूषण काळुसकर Sat, 05/17/2014 - 07:46 नवीन
कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!! लालु चारा खायला मोकळा विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/17/2014 - 08:20 नवीन
पाकिस्तानची दातखीळ बसली.
  • Log in or register to post comments
म
मृणालिनी Sat, 05/17/2014 - 10:04 नवीन
करेक्ट!!! आणि आता बाकीचे देश आपल्या देशाला वचकुन राहतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
भ
भृशुंडी Tue, 05/20/2014 - 22:03 नवीन
अमेरिकादेखील माफी मागायला येतेच आहे. चीन मोदींना भिऊन दडी मारून बसलाय.. पाकिस्तान तर लपाछुपीच खेळतोय.. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृणालिनी
म
मदनबाण Wed, 05/21/2014 - 03:19 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
प
पैसा Wed, 05/21/2014 - 08:39 नवीन
ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/17/2014 - 08:24 नवीन
आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;) ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 08:28 नवीन
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 05/17/2014 - 13:07 नवीन
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
संपत Sat, 05/17/2014 - 16:08 नवीन
गांधी घराणे संपले आहे
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
निनाद मुक्काम … Sat, 05/17/2014 - 22:19 नवीन
प्रियांका लावो ,पार्टी बचाव प्रियांका इज इंडिया तिचा राजकारणातील अनुभव फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे. तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे तेव्हा त्यांना मते द्या तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे. एक म्यान मे दो तलवार ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
व
विकास Sun, 05/18/2014 - 02:34 नवीन
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे. दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. " संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. 'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Sun, 05/18/2014 - 06:44 नवीन
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिशी अबोली Sun, 05/18/2014 - 09:08 नवीन
बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं म्हणे हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 05/18/2014 - 09:17 नवीन
संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही. अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
स
संपत Sun, 05/18/2014 - 09:31 नवीन
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
संपत Sun, 05/18/2014 - 09:28 नवीन
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा