Welcome to misalpav.com
लेखक: nasatiuthathev | प्रसिद्ध:
पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ????? वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो . पहिला पाऊस म्हणजे प्रेम कवींचा हक्काचा विषय !!!! आणि त्या विषयावर प्रत्येक नव्या -जुन्या , उमलणाऱ्या ,विझाणाऱ्या कवीची एक तरी कविता !!!!!!!! पहिला पाऊस आणि विरह यांचे एक अतूट नात आहे. विचार करता करता एक Algorithm च तयार झाला .... एखादी व्यक्ती एकाद्याच्या जीवनात एक काहीतरी विशेष स्थान प्राप्त करते आणि मग .... त्याच्या जीवनातली ती एक अविभाज्य भाग होऊन जाते . मग दिवसातून ५० वेळा फोने , Msg , भेटायला जाण , ते हुरहूर लावण , मग ते रुठना... मनाना .. मग हळूच त्यात कुठतरी "Possesiveness " मग "Ego " मग भांडण ...मग Break उप आणि मग येतो तो विरह .....Emptiness Loneliness !!!!!!!! आणि मग होतो तो असंख्य विरह कवितांचा वर्षाव .....!!!!!!! माझ्या पाहण्यातले खूप जण यातून गेलेले आहेत . पण तो पहिला पाऊसच असतो जो त्यांना पुन्हा एका नवीन व्यक्तीच्या प्रेमात पडतो ..... ते प्रेम असते ??? कि आकर्षण ???? पण काही का असेना ते मागच्या उकाड्यातून (घुसमटीतून ) बाहेर तर पडतात आणि मग परत follow करतात Traditional Algorithm !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! काही लोक असतात जे याचा उपयोग नव आशा, नव चैतन्य ह्या अर्थाने करतात (मी पण ह्यातलाच एक!!!!!! ;)). कदाचित म्हणूनच शाळा कॉलेज जून (पावसाळ्यात ) सुरु होत असाव्यात . पावसानंतर एक आल्हाद दायक वातावरण तयार झालेलं असत........ काम करताना उत्साह येतो. मला तर ह्या वातावरणात भटकायला खूप आवडते पण त्यावेलेलाच कोणीतरी आपल बरोबर असावं असही वाटत ........... तो विचार पटकन झटकून देऊन मित्राच्या हाकेला ओ ऽ ऽ देऊन मी चहाचा आस्वाद घ्यायला कट्ट्यावर गेलो .........!!!!!!!!! :D मिसळ्पाववर लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न..... चुकभुल देणे घेणे ... ;)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

स्वागत आहे.... पावसा वरुन एक मस्त गाणं आठवल... जाता जाता :--- पावसा पावसा लवकर ये... उगा दुष्काळाचे भ्या दाखवु नको ! मागल्या वर्षी माझ्या राज्यातली जनता गटाराचे पाणी पिउन जगली रे ! त्यांची तहान आता तरी भागव...

लिखाणाचा पहिला प्रयत्नही बरेचदा पहिल्या पावसावरच आजमवावासा वाटतो, किंवा पहिला पाऊसच आपल्याला लिहायला भाग पाडतो. गेल्या पावसाळ्याने मलाही सुख म्हणजे काय असते ते लिहायला स्फुरले होते. पुढे त्याचे आणखीही भाग झाले ज्यात अधूनमधून पाउस डोकावत होताच. तुम्हालाही या पावसाळ्यात सुचत जाईल तसे लिहित जालच, शुभेच्छा :)