चोकलेट रोल
Primary tabs
उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी चार दिवस आईकडे रहायला गेले.बरोबर मुल होतीच.मग काय मुलांसाठी रोज
एक नविन पदार्थ करण्याची आई आणि मामीची लगबग सुरु झाली.त्यातले मुलांना खूप आवडले ते त्यांच्या
मामीने केलेले चोकलेट रोल. तिथे तर खाल्लेच पण घरी आल्यावर मागणी झालीच.झटपट होणारे आणि पटकन
संपणारे हेच ते चोकलेट रोल्स.

साहित्य: २ मारी बिस्किटाचे पुडे
२ चमचे कोको पावडर
१०० ग्रॅम ड्रिंकिंग चोकलेट
४ चमचे खोबर्याचा (सुक्या) खिस
पाऊण वाटि पिठीसाखर
दुध जरुरीप्रमाणे

कृती: बिस्किटाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक दळून घेणे(हवे असल्यास बारीक चाळणीतून चाळून
घ्यावे)
दळलेला बिस्किटाचा चुरा,पिठीसाखर्,कोको पावडर्,ड्रिंकिंग चोकलेट छान एकत्र मिसळणे.
या मिश्रणात हळूहळू लागेल तसे दुध घालून मळणे.तयार गोळा हाताला चिकटायला नको.
तयार गोळा प्लास्टिकच्या कागदावर थोडेसे तूप लावून लाटून घ्यावा.
त्यावर खोबर्याचा खिस पसरवावा.

आता त्याचा हळूह्ळू रोल करावा.

तयार रोल फ्रिजमधे २ तास ठेवावा.२तासांनी बाहेर काढून सुरीने रोल कापावेत.

टिपःखोबर्याच्या खिसाबरोबर आवडत असल्यास बारीक केलेला सुकामेवाही वापरू शकता.
तयार रोल (उरले तर) फ्रिजमधे च ठेवावेत नाहितर मउसर होण्याची शक्यता असते.
काय अप्रतिम रोल दिसत आहेत. शीवाय करायलाहो सोपे. तोंडात घातल्याक्षणीच विरघळतील. खोबर्याबरोबर सुका मेवाहि रोल मधे टाकल्यास अजुन रिचनेस येईल. बाकि ह्या निमित्ताने मुविनीं घारापुरी कट्ट्याला आणलेल्या चॉकलेट वड्या आठवल्या. त्या हि अश्याच अप्रतिम झाल्या होत्या.
लाजवाब...!!!
मस्त आहे एकदम!
फोटो पाहुनच गारगार वाटलं. पाकृ नंतर वाचतो.
रोल...रोल...रोल...
{डार्क चॉकलेट प्रेमी} :)
दिल गार्डन गार्डन आपलं चॉकोलेट चॉकोलेट हो गया. एकदम फर्मास.
अरे तेच तेच चॉकलेट काय परत परत खातोयेस?? ट्रे मधे बाकिची पण आहे ती एक तर खा तरी नाहितर आम्हाला तरी वाट
चॉकलेट रोल आवडले. फोटो पण भारी.
छान दिसतायत रोल्स.
ड्रिंकिंग चॉकलेट म्हणजे पावडर असते कि लिक्विड असतं?
ड्रिंकिंग चॉकलेट पावडर स्वरुपातच उपलब्ध आहे. कोणत्याहि सुपरमार्केट/मॉल मधे कॅडबरी ब्रँडची मिळेल. हि पावडर नुसत्या दुधात घालुनहि (अजीबात साखर न घालता) छान लागते आणि अगदि १/२ चमचा पुरते. रेडिमेड चॉकलेट मिल्क आणण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी मस्त. मुलं चटचट दुध संपवतात!
जबरी एकदम :)
सोपी आणि छान पाकक्रुती.
सोप्पे आणि मस्त.
धन्यवाद सगळ्यांचे...आणी ड्रिंकी़ंग चॉकलेटची अचूक माहीती दिपाली ला दिल्याबद्दल दिपक.कुवेत यांना डबल धन्यवाद.
दिपक म्हणजे हर्शीजचं चॉकलेट सिरप वापरलं तरी चालेल. धन्यवाद.
हम्म चालेल पण मग दुध घालायची गरज पडणार नाहि असं दिसतय पण ते घालुन त्याचा गोळा कितपत घट्ट होईल त्या बाबतीत जरा साशंक आहे. मिश्रण कदाचीत सैल राहण्याची शक्यता आहे.
अशीच शक्यता आहे.सिरप कधी वापरून बघितले नाहीये.गोळा चिकट झाला तर लाटला जाणार नाही.आणि सगळेच फसेल.
चोकलेट डे साठी राखून ठेवतो ;)
चॉकलेटच्य अळूवड्या ! झकास
सोपी आणि मस्तं पाककृती :)
मस्त फोटो!
मस्त ग!
लैच भारी...!
-दिलीप बिरुटे
मस्तच!
वा मस्तच... करुन बघायला हरकत नाही....
मी पण मारी चा cake केला होता.... *good* लवकरच share करेल..... *stop*