Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया !

प
पगला गजोधर
गुरुवार, 05/22/2014 - 07:16
🗣 31 प्रतिसाद
आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया ! मित्रांनो, आपल्या इकडे त्याग केला कि तिकडची लोकं 'नौटंकी साला' असं जरी आपल्याला म्हणाली, तरी भव्य सोहोळ्या मध्ये बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामहाने, अर्जुनाच्या कृपेने आपणास हि सुखनैव शय्या मिळाल्याचे म्हणताच, अर्जुनच्या डोळ्यात गंगा जमुना अवतरतात हे पाहून, आपन त्यांना 'नौटंकी साला' असं नाही बोलायचं, आपन थंड राहायचं. कसाईखाण्यातून निवृत्त होताना, कसाई इमोसनाल होऊन, जर म्हणाला कि माझ्या हातून प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कोणी दुखावलं गेलं असेल, तर मला माफ करा, तर ते पाहून आपन त्यांना 'ड्रामा साला' असं नाही बोलायचं, आपन थंड राहायचं. हातात कोणताही दगड, काठी न घेता शान्तपने धरन धरलं असता, १४४ रखवालदारांनी जरी फरफरट खेचून नेलं, रखवालदारांना केसाचाही धक्का न लावता आपन सर्व सहन केलं, तरी आपण अराजकवादी असं जरी तिकडची लोकं आपल्याला म्हणाली, तरी आपन त्यांची 'क'मालिका पाहतच राहायचं ('क'मालिका या साठी कि त्या हिट्ट असतात न, तिकडे तुलसी पण खूप उगवलीय ना ), आपन मात्र थंड राहायचं. आपन थंड का राहायचं कारण, सगळे पूजनीय वंदनीय आदरणीय व्यक्तिमत्वे हि तिकडेच आहेत, भारतमातेचे खरे सुपुत्र तिकडेच आहेत , खरे देशभक्त तिकडेच आहेत, भारत हि Landlocked भूमी आहे, व तिच्या सर्व बाजूने पाकिस्तान नामक देश पृथ्वी व्यापून राहिला आहे - असे भूगोलाचे अगाध ज्ञान असलेली मंडळी तिकडेच आहे, आणि एखाद्याला त्यांची मत पटत नसतील तर ती मंडळी त्यांना भारताबाहेर जायला सांगतात (भारताबाहेर म्हणजेच पाकिस्तानात, असे ह्यांचे समानार्थी शब्द आहेत), कारण मत न पटनार्याना ते भारताबाहेरच टिकेट घरपोच आणून देतात. भारताबाहेर म्हणजे अमेरिका नाही, कारण विसा प्रोब्लेम (सध्या नाही). त्रिखंडात हि ऐसी बुद्धिमान लोकं कुठेच नाही , हा विश्वास तिकडचाच आहे. आपन मात्र अडाणी (अदानी नाही ), आपण शतकानुशतके फक्त म्हणत राहूयात , 'आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा'

प्रतिक्रिया द्या
15263 वाचन

💬 प्रतिसाद (31)
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/22/2014 - 08:07 नवीन
नाटकाचा पहिला अंकचालु झालाय. आपण निवडून दिलेला हा गुज्जुभाई भलताच नाटक्या आहे.अडवाणींच्या नाटकीपणाबद्दल कधीच संशय नव्हता.गुजरातची नवी मुख्यमंत्री आनंदीबेन, तिनेही डोळ्यात पाणी काढले. अरे बाबांनो तुम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलेय ते ह्यासाठी नाही. असो.बघुया पुढच्या सहा महिन्यांत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/22/2014 - 09:43 नवीन
माईसाहेब, डोळ्यातून पाणी आले म्हणजे नाटके केली असाच अर्थ होतो असे नाही. माझे स्वतः चे लष्करात कमिशनिंग झाले( लेफ्टनंट) म्हणून तेंव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून माझ्या हि डोळ्यात पाणी उभे राहिले. शेवटी तुम्हाला एक फार मोठा सन्मान प्राप्त झाला तर तुमच्या डोळ्यात पाणी उभे राहिले तर त्यात नाटकच असेल असे म्हणणे बरोबर नाही. इथे मी एक यकश्चित लेफ्टनंट झालो होतो. तेथे श्री. नरेंद्र मोदी यांना १२५ कोटी जनतेने निर्विवाद बहुमताने निवडून दिले आणी देशाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसवले तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले यात नाटकच असेल असे नाही.केवळ एखादा माणूस राजकारणी असला म्हणजे संवेदना बोथातच झाल्या पाहिजेत असे नाही म्हणून तो नाटकीच असतो असे नाही. पंडित नेहरूंच्या डोळ्यात ए मेरे बतन के लोगो ऐकून पाणी आले तर ते नाटक आहे असे कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. ( आजही ते गाणे ऐकले कि मला माझे काही साथीदार लश्करात सेवा करताना हुतात्मा झाले त्यांची आठवण येऊन डोळ्याच्या कडा ओलावतात) असो ज्या रंगाचा चष्मा लावावा तसेच जग दिसते हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
आ
आनन्दा गुरुवार, 05/22/2014 - 11:22 नवीन
अहो कोणाच्या तोंडाला लागताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/22/2014 - 11:32 नवीन
मिपाचे व्यसन, एकदा लागले की सुटत नाही. आणि लाळघोटेपणा एकदा अंगात भिनला की भले भले गहनविचारी पण सारासार विचार बाजुला टाकतात आणि नाना उपायाने परत परत येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आत्मशून्य Fri, 05/23/2014 - 05:17 नवीन
बेडकी कितीही फुगली तरी गाय बनू शकत नाही या न्यायाने तिने गयी बद्दल अवाक्षर देखील काढू नये हेच उत्तम. तिने मस्त चिखलात मुक्त विहार करावा अथवा इनो घेउन गप बसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Fri, 05/23/2014 - 08:37 नवीन
मिपावरच्या कंपुबाजीचे उदाहरण??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
द
दादा कोंडके गुरुवार, 05/22/2014 - 18:46 नवीन
अहो कोणाच्या तोंडाला लागताय?
सहमत! ;) - (चुझी) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
V
vikramaditya गुरुवार, 05/22/2014 - 12:51 नवीन
खरे साहेब पूर्ण पणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 05/22/2014 - 08:16 नवीन
भारत हि Landlocked भूमी आहे, व तिच्या सर्व बाजूने पाकिस्तान नामक देश पृथ्वी व्यापून राहिला आहे हे मात्र सहीये, पाकिस्तानशी असलेल्या आपल्या पारंपारीक शत्रूत्वाचे नेहमीच आणि बरेच राजकारण केले जाते एवढे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 05/22/2014 - 08:39 नवीन
फुगलेला बेडूकरूपी पाकिस्ताननामक बागुलबोवावरचा पंच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
न
निनाद मुक्काम … Fri, 05/23/2014 - 09:52 नवीन
वाजपेयी काळात चीन भारताचा खरा शत्रू म्हणून सांगितले गेले , व आज चीन जगभारत आपले आर्थिक व सामरिक सामर्थ्यांचा डंका मिरवत भारताची नाकेबंदी करत आहे , चीनला बेडकी म्हणणे मूर्खपणाचे ठरेल , जगातील पहिल्या तीनात येणाऱ्या आय एस आय व अमेरिकेला न जुमानणारे जमाते उद्दावा सारख्या संघटना ज्यामुळे जागतिक दहातादाची विद्यापीठ , नंदनवन असलेला पाकिस्तान व त्यात त्याच्याकडे असणारी १०० हून जास्त अण्वस्त्र पाहता पाकिस्तानला बेडकी म्हणणे योग्य ठरणार नाही , त्यांचे असलेले तालिबानशी लागेबांधे अमेरिका त्यांना पैशाची ,शस्त्रांची मदत देऊन सुद्धा तोडू शकले नाही , ह्याउलट पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतलेले तालिबान ह्यांच्यापुढे अमेरिकेने नांगी टाकून २०१४ परत जात आहेत. अफगाणी अध्यक्ष मोदींच्या समारंभाला येणार म्हणून भारतीय दुतावासावर हल्ला करणारे हात अफगाणी असले तरी त्यामागील मेंदू हा पाकिस्तानी आहे, जगभर पाकिस्तानातून प्रशिक्षित झालेले दहशतवादी थैमान घालत असतांना पाकिस्तान जगभर ह्या ना त्या रूपाने पोहोचलेला दिसतो. मागच्या दशकापासून भारतीय संरक्षण शमत चीनच्या दृष्टीकोनातून विकसित होत आहे. व ह्यापुढे सुद्धा होत राहणार , चीनशी व्यापारी संबंध ठेवणारे मोदी ह्यांच्या विषयी चीनचे चांगले मत आहे , तेव्हा मोदी चीन व भारत अशी आर्थिक आघाडी ब्रिक मार्फत मजबूत करतात की वेस्टन वल्ड बरोबर युती करतात का ह्या दोन्ही आघाड्यांवर समतोल सहकार्य करतात हे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
व
विटेकर गुरुवार, 05/22/2014 - 08:32 नवीन
भावना पोहोचल्या.. तसे ही आम्ही थंडच असतो .. नेहमी करता.... लाखो कोटींचा भ्रष्टाचार झाला तरीही ....तसे ही आम्ही थंडच असतो ! आमच्या सैनिकांचीशिरे कापून नेली तरीही ...तसे ही आम्ही थंडच असतो ! युवराजांना पद्धतशीर राज्याभिषेक केला तरीही ...तसे ही आम्ही थंडच असतो ! गल्लो गल्ली भूछत्रांसारखे स्वयंघोषित नेते (?)उगवले तरीही ..तसे ही आम्ही थंडच असतो ... . . . जाऊ द्या .. काय काय लिहायचे ? तुमच्या भावनांना फक्त पोच दिली. लोभ असू द्यावा .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/22/2014 - 08:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 05/22/2014 - 10:26 नवीन
आपणांस अजून ५ वर्षे थंड राहायचा जनादेश आहे. तुम्ही होऊन तो निर्णय घेतला आहे असा श्रेयअव्हेर नका करू. आणि शेवटी तुम्ही -२७३.१६ डीग्री केल्विनला जाणार आहात. दम धरा.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 05/24/2014 - 20:38 नवीन
आवो कलनार नाय त्येस्नी क्येल्वीन बिल्वीन. कसाला दगडावर डोस्कं हापटतायं. सालेत अब्यास केला हस्ता तर माईती असतंव ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/22/2014 - 10:54 नवीन
निवडणुकीचा निकाल पाहून आता मिपावर अनेक शैलीतल्या विनोदी लेख, कविता आणि प्रतिक्रियांचा दुष्काळ पडेल अशी भिती वाटत होती. पण अश्या काळातही मोठ्या धैर्याने आपली विनोदबुद्धी कायम ठेवणारे मिपाकर आहेत हे बधुन भरून आलं... किंवा मिपाभाषेत म्हणायचं तर डॉळे पाणाव्ले ;) चला, आता कॉर्न्फ्लेक्स व थंड्पेयांचे केलेले साठ्यांचं काय करायचं आणि मोकळा वेळ वेळात करमणूक कशी होणार हे प्रश्ण सुटल्यासारखे वाटत आहेत =))... हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श !!!! आंदो, आंदो और :) *dance4*
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/22/2014 - 11:22 नवीन
ते एवढे कळवळून लिहितायत आणि तुम्हाला पॉपकॉर्न्स आठवले? आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. त्यांचे खराटेवाले साहेब लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जेलात गेले. निदान गांधीजींबरोबर तरी त्यांची तुलना करायची होती म्हणते मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/22/2014 - 12:13 नवीन
नाय्हो, तुम्चा काय्त्री गैर्सम्ज होतोय ! लोकशाहीत विरोधी पक्ष फार महत्वाचा असतो. तो नसणे ही फार काळजीची गोष्ट असते. त्यामुळे, विरोधी पक्ष आहे आणि इतक्या कठीण काळातही त्याची विनोदबुद्धी शाबूत आहे, अशी "डप्पल बेनेफीट" स्कीम मिळाल्याने आम्चे मन कसे अग्दी भ्रभ्रून आले, यात काय वाईट्ट आहे? *unknw* आता "इतक्या कौतूकाने केलेल्या आमच्या खाण्यापिण्याच्या साठ्याचे काय करायचे?" हा प्रश्ण सुटून आमच्याकरीता ही "ट्रीप्पल बेनेफीट" स्कीम झाली यामुळे अधिकच भर्भरुन आले, हे सहाजीक नाय्काय? *ok* राहिता राहिली आप'ल्या केवळ एकमेव महाम्हीन, कलंकहीन आणि अगदी कायद्याच्याही वर असणार्‍या नेत्याची तुल्ना म गांधींबरोबर करण्याचे... आतापर्यंत विरोधकांनी, पाठीराख्यांनी आणि स्युडो-पाठीराख्यांनी काय कमी अवहेलना केली आहे गांधींची? आता आम्हाला कशाला अजून त्यात भर टाकायला सांगता? असली विनोदी पापं करण्याचा आम्चा स्वभाव नाही, हे आम्च्या नेह्मिच्याच खुप्खुप विनयाने न्मूद क्रून ठेव्तो *dirol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 05/22/2014 - 11:19 नवीन
Image removed. बरं वाटेल..
  • Log in or register to post comments
र
रिम झिम गुरुवार, 05/22/2014 - 12:10 नवीन
फक्त इनो घ्या एवढेच म्हणले तर.....
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 05/22/2014 - 17:19 नवीन
फोटु टाकत चला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/22/2014 - 17:26 नवीन
>>> आणि एखाद्याला त्यांची मत पटत नसतील तर ती मंडळी त्यांना भारताबाहेर जायला सांगतात (भारताबाहेर म्हणजेच पाकिस्तानात, असे ह्यांचे समानार्थी शब्द आहेत), कारण मत न पटनार्याना ते भारताबाहेरच टिकेट घरपोच आणून देतात. मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडू असे अनंतमूर्तींनी स्वतःहून जाहीर केले होते. त्यांनी देश सोडा असे त्यांनी त्याआधी कोणीही सांगितले नव्हते. आपल्यावरील खटले लढविण्यापेक्षा एम एफ हुसेन हा स्वतःहून भारताबाहेर पळाला होता. त्याला देश सोड असे कोणीही सांगितले नव्हते. मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडू असे कमाल खान नावाचा अभिनेता स्वतःहून म्हटला होता व निकाल लागल्यानंतर लगेच तो पाकिस्तानला स्वतःहून पळाला. देश सोड किंवा देश सोडायचा असल्यास इतर कोणत्याही देशात जायच्या ऐवजी पाकिस्तानात जा असे त्याला कोणीही सांगितले नव्हते.
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी गुरुवार, 05/22/2014 - 21:45 नवीन
आपल्यावरील खटले लढविण्यापेक्षा एम एफ हुसेन हा स्वतःहून भारताबाहेर पळाला होता
जबरदस्त टीका.. अजून येउ द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नानासाहेब नेफळे Sun, 05/25/2014 - 05:48 नवीन
भाजपचा गिरीराज सिंग भाजपविरोधींना पाकीस्तानात पाठवणार होता ,पोलिस केस झाल्यावर त्यांने शिखंडी अवतार धारण केला व पळूण गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/23/2014 - 08:47 नवीन
श्रीगुरुजी, कमालखान भारतात परततोय. त्याला बिजेपीनेच बोलावले आहे असे तो म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
स्वलेकर Fri, 05/23/2014 - 09:01 नवीन
ते फुकन काय पन बोलत
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/23/2014 - 09:03 नवीन
>>> कमालखान भारतात परततोय. त्याला बिजेपीनेच बोलावले आहे असे तो म्हणतो आहे. तो आता काय वाटेल त्या थापा मारेल. भाजपने त्याला जा म्हणून सांगितले नव्हते आणि परत ये असे आमंत्रणही दिले नव्हते. त्याच्यासारखे स्वयंघोषित निधर्मांध वाट्टेल त्या प्रतिज्ञा जाहीरपणे घेतात आणि वेळ आली सोयिस्कररित्या विसरून जातात. आता अनंतमूर्तींची दातखिळ का बसली आहे ते सहज समजण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 05/23/2014 - 09:16 नवीन
आणि त्या चोर अमर्त्य सेन ची पण दातखिळी बसली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/23/2014 - 11:07 नवीन
आपलं मत विरंगुळा म्हणूनच लिहीलंय ना? असो! बाकी आजोबांनी यॉर्कर टाकायच्या प्रयत्नाला मामांनी सिक्सर हाणून आपलं 'कैलिबर' नि 'क्लास' दाखवून दिला होता असंच दिसतंय! आजोबांचं भूत 'नंतर' मानगुटीवर बसणारच ह्यात वाद नाही. (इच्छा पूर्ण न झालेल्या व्यक्तीचं भूत होतं म्हणतात. खरं खोटं भुतांनाच माहिती. :) )
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Fri, 05/23/2014 - 19:48 नवीन
सं क्षी ?????
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Tue, 05/27/2014 - 16:21 नवीन
May 25, 2014, 11.34 PM IST Maharashtra cabinet approves funds for mill approve Rs 58.65 crore for a spinning mill whose chief promoter is cabinet minister Nitin Raut. The spinning mill's promoter is expected to provide just 5% of investment
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा