Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'आजचा भारत' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'

प
पगला गजोधर
गुरुवार, 05/22/2014 - 14:33
🗣 72 प्रतिसाद
इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्‍‌भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते” (संदर्भ: मराठी विश्वकोश) "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे. हे वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या गेल्या ५-६ वर्षात दिसून आलेल्या महागाई, भ्रष्टाचार, अराजकतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते, जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले. जर्मनीला वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली, सोबत जोसेफ गोबेल्सचा झंजावाती प्रचार होताच (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर हा नं २ चा नेता ), नंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर ती हिटलरची त्सुनामी होती असे आपण म्हणू), यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरी संघटनेची व संघटनेच्या स्वयंसेवकांची मदत मिळाली (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर...जाऊ दे, नाव नाही घेत ), यावरुन हे लक्षात यावे. हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा कोणत्या मुद्द्यावर तो निवडून आलेला होत ते पहा - लाखो लोकांची बेकारी (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर भारतात जवळजवळ १० टक्का) ) - जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील हास्यास्पद पत (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर १ डॉलर = ६५ रु (गेल्या काही महिन्यातील ) ) अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर तो हिटलरचा हिडन अजेंडा होता असे आपण म्हणू) हिटलर का ये इतिहास आज भी हमारे लिए बहुत अर्थ रखता है. इसलिए नहीं कि इतिहास हमेश कोई ना कोई सबक़ देता है बल्किन इसलिए क्योंकि इतिहास से हमें चेतावनी भी मिलती है. आर्थिक संकट में लाखों लोगों ने एक ऐसे व्यक्ति को अपना नेता मान लिया जो केवल इसलिए करिश्माई बन गया क्योंकि वो लोगों के डर, उनकी आशा और अपनी परेशानियों के लिए दूसरों को ज़िम्मेदार ठहराने की आदत का लाभ उठाना जानता था. लेकिन लाखों लोगों को इसके गंभीर परिणाम भुगतने पड़े.------( रेफ: आर्टिकल 'मामूली आदमी से तानाशाह तक हिटलर का सफर' लॉरेंस रीस (इतिहासकार))

प्रतिक्रिया द्या
26647 वाचन

💬 प्रतिसाद (72)
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 05/22/2014 - 18:39 नवीन
कल्पक लक्षवेधक दिलखेचक लेख !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/22/2014 - 19:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/22/2014 - 19:23 नवीन
"निकालानंतर सुपातले सगळेच जात्यात गेले", असे काहीसे म्हणायचे आहे का आपल्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
असंका गुरुवार, 05/22/2014 - 19:23 नवीन
पीठ निघायला धान्य आणि दगड यांच्यात घर्षण व्हायला हवे....इथे वरती नावाला तरी घर्षण आहे का? एक बाजू बोलत सुटली आहे...त्यांना एकाने तरी प्रत्युत्तर दिले आहे का? असं का असावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 05/22/2014 - 19:46 नवीन
आधीच निवडणुका म्हैनाभर चालू होत्या. मग निकाल लागले. आता पुढच्या निदान विधानसभा निवडणुका येईपर्यंत तरी दम खावा राव! पब्ळिक कट्टाळलय राजकारणाबद्दल ऐकून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
व
विकास गुरुवार, 05/22/2014 - 19:53 नवीन
कंटाळा आला हे खरे आहे हो. पण निकाल पचायला अवघड जात आहे. त्यामुळे पोटशूळ खूपच गंभीर आहे या वेळचा. त्यामुळे आजार पटकन बरा होईल असे समजू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 05/22/2014 - 21:04 नवीन
आल्याकी दिल्लीच्या निवडणुका झाडू वाल्यांच्या अंगात येईल आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आनन्दिता Fri, 05/23/2014 - 05:26 नवीन
अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम परफेक्ट शब्द वापरलात या झाडूवाल्यांना... नौटंकी, वगैरे शब्द अगदी थिटे पडत होते आजकालचं त्यांचं वागणं बघुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 05/23/2014 - 06:34 नवीन
टूडे ग्रुपच्या सो सॉरी मधला झाडू डान्स लई गाजला. पाहीला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 05/22/2014 - 21:02 नवीन
मला एक भीती वाटत आहे , समजा पगला गजोधर म्हणतात तसे भारतात झाले व कुणी त्यांच्या हितचिंतकाने त्याचे हे लिखाण संबंधीत यंत्रणेकडे नेले तर चेंबर मध्ये त्यांचा नंबर लागायचा. आता भारतात मुंबईत महानगर पालिकेच्या कृपेने जी उघडी गटारे असतात ती काही चेंबर हून कमी खतरनाक नसतात. म्हणा, संजय गांधी ह्यांनी उत्तर प्रदेश मध्ये नसबंदी असो किंवा अजून काही ज्या पद्धतीने योजना राबविल्या ते पाहता भस्मासुराचा उदय झाला अशी आवई उठे पर्यंत त्यांचा उदयास्त झाला. इदिरा इज इंडिया म्हणणारे व आणीबाणी लादणारे सुद्धा ह्याच देशात होऊन गेले ,
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/23/2014 - 03:38 नवीन
पगलाई गये हो का गजोधर भैय्या? कल भांग जादा पी ली का? हिटलर आणि अस्तंगत झालेल्या पार्टीची पण तुलना करु की आता मग. १. ज्यांच्या हातात आत्ता सत्ता आली आहे आणि ज्यांच्याकडुन जास्त चांगली कामं झाली आहेत ते हिटलर का वर्षानुवर्ष जाती-धर्मात सेक्यलरतेच्या नावाखाली संघर्ष घडवुन आणणारे हिटलर? २. हिटलरनी खुलेआम ज्युंची कत्तल केली आणि भारतीय हिटलरनी ६० एक वर्ष रक्त शोषलं भारतीय जनतेचं. काँग्रेस पेक्षा हिटलर लाख पटीनी चांगला होता काही बाबतीत. जसं की योजनाबद्ध नियोजन. ढिसाळपणाला अजिबात वाव नसणं ईत्यादी. ३. हिटलरचा देशाभिमान कुठे आणि ह्यांची देश विकुन खायची वृत्ती कुठे? हिटलरला स्विस जवळ असुन स्विस बँकेत काळा पैसा ठेवल्याचं ऐकीवात आहे का? नाहीतर आमच्याकडे लाखाचे हजारो कोटी करणारे जावई आहेतचं. "साधी राहणी हुच्च विचारसरणी" वाल्या हिप्पोक्रीट लोकांना कुठलही घटनात्मक पद नसताना खासगी वापरासाठी एअर फोर्सच्या विमानाची गरजं का पडते हो? जाल तिथे ह्या गां* लोकांच्या नावानी योजना, यंव गां* आवास योजना, त्यंव गां* रोजगार हमी योजना. बरं योजना आहेत म्हणाव तर तिथे येवढ्या कागदाच्या सुरऴ्या करायला लागतात की लाभार्थींना कागदाच्या सुरळ्यांसाठी वेगळं कर्ज काढायची वेळ यावी. कोणं बरा म्हणायचा मग? हिटलर का हे खादाडखाउ **खाव लोकं?** ४. आमच्या सैनिकांची शिरं कापली जातात मृतदेहांची विटंबना केली जाते ती पण आपल्या हद्दीत येऊन. आपल्या 'मुक'नायकानी निषेधाचे खलिते पाठवण्याशिवाय काय केलं? हिटलर त्याच्या सैन्याच्या हिताच्या द्रुष्टीनी निर्णय घ्यायचा. सैनिकांमधे त्यांच्यातलाच एक होऊन वावरायचा. आमच्याकडे संसदेवर हल्ला झाला तेव्हा मरणारे कोण होते? फक्त सैनिक शहिद झाले. "खाते" मंडळी आतमधे सुरक्षित होती. एकाच्याही अंगावर साधा ओरखडाही निघाला नाही. मुंबई हल्ल्यामधे मरणारे कोण होते हो? आर्मीमन, पोलिस आणि सामान्य नागरिक फक्त. "हमे उनकी कुर्बानी पे फक्र है" हे ईंग्लिश टेक्स्ट मधे हिंदीत वाचुन दाखवणार. कसला बोडक्याचा फक्र रे? काय केलं त्यांच्या घरच्यांसाठी? किरकोळ नुकसानभरपाई दिली असेल त्यातसुद्धा "कर्तबगार" प्रशासकीय लोकांनी हात मारला असेल ह्याची खात्री आहे. असो. ५. हिटलरनी उद्योग धंद्यांना प्रोत्साहन दिलं. आज जर्मनी मेकॅनिकल आणि एकुणच टेक्नॉलॉजी जायंट्स आहेत त्यामधे दुसर्‍या महायुद्धाचा आणि हिटलरचा मोलाचा वाटा आहे. आमच्याकडे वाटा तर सोडाच पण वाटमारी भरपुर आहे. ह्या हरामखोरांच्या काळात असलेल्या टॅक्सेस, किचकट नियम, सोयीसुविधांचे अभाव, चलता है वृत्ती, ह्यांच्या पक्षांच्या कामगार संघटना (सर्वपक्षिय लुटालुट) ह्यांनी उद्योजक आणि उद्योग दोन्ही डबघाईला आलयं. आपल्या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमधे का स्थलांतरीत होत आहेत? कुठलाही उद्योजक बिझनेस सिक्युअर्ड वातावरण असल्याशिवाय व्यवसाय नेईल का तिकडे? कोण स्वतःहुन सो कॉल्ड हिटलरच्या गुहेत जाईल? दुसर्‍या महायुद्धकाळापासुन जर्मनीमधे किती ईन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासुन किती इन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? जर्मनीत ईन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्थलांतरीत केलेल्या लोकांना स्थलांतरीत जागेवर नोकर्‍या, १००% भरपाई दिली गेली. आमच्या कडे धरणग्रस्तांच्या २ पिढ्या मरुन सुद्धा अजुन विस्थापितांना नुकसान भरपाई नाही. कोणाचा दोष आहे हा? कोण सत्तेत होतं एवढी वर्ष? शिवाय त्यांची धरणं फक्तं पाण्यानीच भरतात. आत्ता सत्तेवर आलेल्यांना किमान १० वर्ष सलग सत्ता मिळाली तर ते बदल घडवुन आणु शकतील तेही "हिटलर शाही" नं करता. त्याला गरज आहे तुमच्या सारख्या स्युडो सेक्युलर लोकांनी डोळ्यावर लावलेले पुर्वग्रहाचे चष्मे काढायची.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 05/23/2014 - 06:13 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ऋ
ऋषिकेश Fri, 05/23/2014 - 07:03 नवीन
दोन्हीत काही साम्यस्थळे आहे हे खरे, पण दोन्ही वेळच्य परिस्थितीत काही अंतरही आहे. बाकी लेखात काही माहिती तथ्याला सोडून आहे. (जसे ९९.९९%) हिटलरला एकट्याला बहुमतही मिळाले नव्हते. काही पक्षांचे खिचडी सरकार त्याला स्थापावे लागले होते.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 05/23/2014 - 21:29 नवीन
देवीतुल्य भारतसम्राज्ञी (बहुधा आता माजी) सोनियाजी गांधी ह्यांचे पिताश्री स्टेफ्यानो माइनो हे द्वितीय महायुद्धात हिटलरच्या वेअरमाख्टच्या बाजूने सोविएटच्या बाजूने लढले होते. ते स्वतःला मुसोलिनीच्या फाशिष्ट पार्टीचा निष्ठावान अनुयायी असे अभिमानाने मानत असत. मोदींच्या हिटलरशी असणार्‍या बादरायण साम्यापेक्षा हा थेट संबंध जास्त गंमतीचा आहे हो की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विकास Fri, 05/23/2014 - 22:05 नवीन
इंटरेस्टींग... मला हे माहीत नव्हते. पण असल्या गोष्टीवर (कुणावर अविश्वास दाखवायला म्हणून नाही पण) खात्री करण्यासाठी मला संदर्भ बघायला आवडतात. तेंव्हा आउटलूकचा हा संदर्भ दिसला. त्यातील खालील भाग इंटरेस्टींग आहे. त्यातून हिटलर समर्थकांबद्दल आउटलूकमधील (पक्षि: डाव्यांची) भुमिका देखील समजते... :)
Apart from the portrait, the other prominent feature of the dimly-lit front room of Maino's house was the collection of leather-bound speeches and writings of Benito Mussolini. I looked pointedly at them. Without batting an eyelid, Maino declared his unwavering loyalty to Mussolini and Italy's 'admirable' fascist past. The words streamed forth. The current Italian government was composed of a bunch of traitors who had betrayed Mussolini and the Fatherland. All the modern Italian political parties were hopeless, except the neo-fascist front. What Italians needed was compulsory sterilisation. Indira Gandhi smiled benignly out of the silver-frame. Nadia, Sonia's petite and pretty younger sister, sitting beside her father, looked decidedly embarrassed. That did not stop Stefano Maino's frank and forthright expression of his views on life and politics. After all, he had proudly fought against the Russian Reds alongside Hitler's Wehrmacht on the Eastern Front in World War II. The bold and direct manner of the soldier remained with him. I felt a tinge of sadness when this blunt and straightforward man died a few years ago. Perhaps, he is up there somewhere, directing his daughter to shed her self-imposed solitude and sophistry, and to launch a bold electoral blitzkrieg on the Indian people.
या माहितीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मृत्युन्जय Fri, 05/23/2014 - 10:13 नवीन
भारताचा हिटलर १९८४ सालीच मेला. रुडोल्फ हेस हिटलर बद्दल म्हटला होता "हिटलर इज जर्मनी, जर्मनी इज हिटलर" . बाईंबद्दलही त्यांच्या एका भक्ताने असेच उद्गार काढले होते " इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया". बाईंनी आणि त्यांच्या गुरुंनी दोघांनीही लोकशाहीचा बलात्कार केला. गुरुंनी विरोधकांना गॅस चेंबर्स मध्ये मारले तर बाई थोड्या दयाळु असल्याने त्यांनी फक्त सरसकट सगळ्यांना तुरुंगात कोंबले. भारतातल्या नाझी भस्मासुराचा उदयास्त तर कधीच झालाय हो. कशाला काळजी करताय?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद प्रसाद Fri, 05/23/2014 - 10:16 नवीन
लोकं प्रतिसाद देताहेत...... भलते निष्कर्ष लेखात काढून, काडी टाकून लेखक महाशय कुठे गेलेत कुणास ठाऊक......
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 05/23/2014 - 12:41 नवीन
इथे होतो I am here
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद प्रसाद
ह
होकाका Sun, 05/25/2014 - 13:43 नवीन
अहो पगला गजोधर, जर आपणांस क्रिटीकल थिंकींगची एवढी तळमळ होती, तर मग मोदींविरुद्ध २००२ ते २०१३-१४ या काळात मिडिया आणि सो कॉल्ड विचारवंत टिकेची आणि गलिच्छ शिव्यांची गरळ ओकत होते, तेव्हा आपण का नाही मोदींच्या बाजूने उभे राहिलात? तेंव्हा कुठे होती आपली टेन्थ मॅन स्टँडींग ची ड्यूटी? की तेंव्हा आपणांस माहीतच नव्हते की आपण "भारतमातेची ऐक संतान" आहात ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
_
_मनश्री_ Fri, 05/23/2014 - 12:09 नवीन
टूडे ग्रुपच्या सो सॉरी मधला झाडू डान्स लई गाजला. पाहीला आहे का? झाडू डान्स http://youtu.be/dmoRsoovWOA
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/23/2014 - 17:04 नवीन
पादर्याला पावट्याचे निमित्त http://yahooindiaelections.tumblr.com/post/86589478750/congress-blames-israels-mossad-for-poll-drubbing
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/23/2014 - 18:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा