Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बस झाली निवडणुक....

ब
बाबा पाटील
Fri, 05/23/2014 - 16:25
🗣 14 प्रतिसाद
च्यामारी मागचे ४-५ महिने या इलेक्शनने नुसता वात आणलाय राव.चला जरा टाइमपास करु प्रत्येकाने लहानपणापासुनची स्वतःची टोपन नावे सांगा म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही कसे होता ते कळेल्,कारण टोपण नाव माणसाच्या बर्‍यापैकी व्यक्तीमत्वाची ओळख करु देत.(अस कोणत्या महाराजांनी नाही सांगितल हे माझे वैयक्तिक मत आहे.)कारण मागचे काही महिने आपण मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील. तरी माझी स्वतःची बरिच टोपण नावे होती ती पुढील प्रमाणे.- १)पिनु- जन्मापासुन जवळपासचे सगळे २)मम्हंबळ्या- आज्जी म्हणायची. ३)दादा- भावकीतले सगळे ४)पाटील- गावकरी मंडळी ५)पश्याभाउ/भाई/भाउ- मित्रमंडळी ६)सोन्या/पिल्ल्या/बाबु- गर्लफ्रेंड नं १ ७)बाबा - गर्लफ्रेंड नं २ ८)पप्पा - एकुलती एक बायको म्हणते ९)पपल्या - माझ्या दोन्ही लेकी १०)नेतृत्व/बागाइतदार्/पाटील बाबा - कॉलेजचे प्राचार्य ११)गुंडा पाटील्/बाबा पाटील - आत्ताची मित्रमंडळी

प्रतिक्रिया द्या
22722 वाचन

💬 प्रतिसाद (14)
त
तुषार काळभोर Fri, 05/23/2014 - 16:30 नवीन
तुमची ओळख चांगली झाली ;)
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 05/23/2014 - 16:30 नवीन
स्पा, स्पाउ, स्पाडु, स्पांडु,स्पाड्या, स्पावड्या, स्पावडी, स्पाउडुटली एन सो आँन...
  • Log in or register to post comments
स
समर्पक Fri, 05/23/2014 - 16:48 नवीन
मैत्रिण म्हणते का? *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ह
हाडक्या Fri, 05/23/2014 - 18:47 नवीन
नाई हो.. कुरसुंदीच्या माई म्हणत असतील.. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/23/2014 - 19:03 नवीन
@स्पाउडुटली एन सो आँन>>>:-/ दुष्ष्ष्ष्ट........ :-/ मी ठेवलेलं घेत्लच नै! :-/ पां डुब्बा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ज
जेपी Fri, 05/23/2014 - 17:23 नवीन
टिल्लु
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 05/23/2014 - 17:30 नवीन
लहानपणी: शिरू मित्र-मैत्रिणी: शिर्‍या जवळच्या मैत्रिणी: श्री
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/23/2014 - 19:08 नवीन
पल्ल्या... - आईची हाक *ok* भावड्या - बाबांची हाक *yes3* पर्‍या/दिव्या/बुटक्या- शाळेतील मित्रांच्या हाका *biggrin* देडफुट्या - एका खौट :-/ वर्गमित्राची हाक :-/
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/23/2014 - 20:52 नवीन
मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील.
हे भारी आहे! मला खर्‍या आयुष्यात कधी टोपणनावे नाही मिळाली. इथे मिपावर आल्यावर बडवे वगैरे काय काय मिळालीत बरीच! *ROFL*
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 05/24/2014 - 14:04 नवीन
पाध्ये नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
किसन शिंदे Fri, 05/23/2014 - 21:16 नवीन
किस्ना हे सर्वात जास्त वेळा मिळालेलं टोपणनाव आहे. घरातले नेहमी काळ्या म्हणायचे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/24/2014 - 11:02 नवीन
कधी फारशी (धागाकर्त्याच्या तुलनेत) टोपणनांवं मिळाली नाहीत. आई ची हाक 'प्राकSSSSSSर' अशीच ऐकू यायची. मित्रमंडळी 'पेठकर' आडनांवावरून 'पेठ्या' म्हणायचे. मिपाकर 'काका' म्हणतात. वर्गमैत्रीणी त्यांच्या मुलांना ओळख करुन देताना 'मामा' म्हणून करून देतात. *sad*
  • Log in or register to post comments
स
सुधीर जी Sat, 05/24/2014 - 11:56 नवीन
मला माझि बहिन सुधा म्हनुन हाक मारयचि एक मामि तर सुधिर ऐवजि बुद्रुक म्हनुन हाक मारायचि मित्र मला फक्त सु म्हनुन जोरात माझ्या घरासमोर ओरडत असे *fool*
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 05/24/2014 - 13:38 नवीन
आईने ठेवलेली: चमनगो बंडुनाना खंडुकडे खंडेराव केसुनाना बहिणींनी ठेवलेली: लेवाडा स्मिथ शेपूट लाडोबा मित्रांनी ठेवलेली: लॉर्ड फॉकलंड बाकु डब्बु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा