जेल मधी जाऊ या, दिल्लीची बिल्ली
जेल मधी जाऊ या
राजनीती खेळ खेळू या.
जेल मधी गेला नेहरू
गादी मिळाली देशाची.
जेल मधी गेला लालू
गादी मिळाली बिहारची
जेल मधी गेला केजरी
मिळेल का गादी दिल्लीची?
काशी मधी गेली
दिल्लीची बिल्ली.
वाघाला म्हणाली
मी तुझी मावशी
पड माझ्या पाया.
वाघाने दिला मिशी वर ताव
जोरात फोडली डरकाळी एक.
मावशी उडाली हवेत तशी
जाऊन बुडाली दिल्ली तळी.
💬 प्रतिसाद
(7)
प
पैसा
Sat, 05/24/2014 - 07:40
नवीन
बडबडगीत मस्त आहे!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/24/2014 - 11:49
नवीन
मस्त!
केजरीवाल आणि त्यांची नौटंकी हा लोकांच्या टिंगलीचा विषय झालेला आहे. जनतेने यांना निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन सुद्धा यांचे डोके ताळ्यावर येत नाहिय्ये.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sun, 05/25/2014 - 10:26
नवीन
तरसाची बिल्ली झाली का आता?
"श्रीमान योगी " या कादंबरीत जिजामातेच्या तोंडी एक वाक्य आहे. साधारणपणे या अर्थाचं- हरलेल्याला तुम्ही साप कोल्हे काय हवं ते म्हणू शकता....!!
किती योग्य आहे ना?
(गैरसमज नको म्हणून वर उल्लेख केलेल्या त्या वाक्याच्या पुढच्या वाक्याचा सारांश, जो इथे लागू नाही..- तेच त्याला वाघ सिंह म्हणालात तर? )
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 05/26/2014 - 04:00
नवीन
जेल मधी गेला लालू
गादी मिळाली बिहारची
अत्यंत चुकीचा कन्टेन्ट. इतिहासाचा विपर्यास करणारा. लालू प्रथम गादीवर आले मग त्यामुळेच जेलमधे गेले. आता आणिबाणीच्या काळात लालू जेलमधे गेले व त्यामुळे सत्तेवर आले असे आपल्याला म्हणायचे असेल तर अशा पन्नासेक लोकांची यादी देता येईल जे जेलमधे गेल्यानंतर सत्तेत आले . उदा जॉर्ज फर्नांडिस .
आता सर्वांसाठीच एक उदा. पेश करतो. मी नोकरीत असताना मला एकदा वैयक्तिक हेव्यादाव्यातून आमच्या गलथान
साहेबाने चार्जशीट दिले होते.हे माझ्यासाठी संकट होते. पण मी त्याची संधी केली. साहेबाचे सर्व पितळ माझ्या स्पष्टीकरणात उघड केले. व कंपनीला एक प्रकारे संदेश दिला की दोघांचीही चौकशी होउन द्या.कंपनीने ना माझी चौकशी केली ना साहेबाची. केजरीवाल गडकरीना प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यासाठी हा तथ्काकथित स्टंट करीत असण्याची दाट शक्यता आहे. माझी चौकशी झाली तर त्यातून गडकरी साहेबाला ही एक्पोज करता येईल ही माझ्या उदाहरणाप्रमाणेच
केजरीवालांची अटकळ असावी. माझ्या उदाहरणात सहा महिन्यानी साहेबाना कामावरून काढून टाकण्यात आले व मी त्यानंतर सुमारे अकरा वर्षानी कंपनीकडून पैसे वसूल करून व्ही आर एस घेतली. गडकरीना " आत" घातल्यावर कदाचित केजरीवाल ही राजकारणातून व्ही आर एस घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 05/26/2014 - 10:59
नवीन
शक्यता वाटत नाही. कारण आरोप देखील केजरीवल नेच केलेले आहेत. आता कसली चाजशीत आस्नि कसले काय? कोर्टाने त्यांना पुरावे द्या असे म्हणले आहे. ते पुरावे नाहीत म्हणूनच कोर्टात जायची वेळ आली आहे ना? आणि आता चोराच्या उलट्या बोंबा म्हणावे तसे मी पण मोदींवर केस टाकू का म्हणून धमकी देत आहेत.
थोडी जरी असेल, तर त्यांना कळेल की भ्रष्टाराचे आरोप करणे आणि परदेशी शक्तींचे एजंट असल्याचा आरोप करणे यात बरेच अंतर आहे, आणि मोदी श।आणे आहेत, त्यांनी केजरीवलांचे नाव न घेता आअरोप केला आहे. तेव्हा ती केस टिकणार नाही.
आसो, एव्हढी अक्कल जर असती, तर दिल्ली ची सत्त सोडलीच नसती.
जाता जाता, हल्ली ते केसरीवालांचे खंदे समर्थक फारसे दिसत नाहीत कुठे, मनोलय करून बसलेत की काय?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 05/26/2014 - 11:00
नवीन
कृपया हे असे वाचावे "ते पुरावे नाहीत म्हणूनच तुरुंगात जायची वेळ आली आहे ना?"
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 05/26/2014 - 05:29
नवीन
नाही वाचवत हे आता. कंटाळा आला राव याचा.
- Log in or register to post comments