Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू मला वगळून उरणे शक्य नाही

D — drsunilahirrao, Sat, 05/24/2014 - 12:54
तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही तू सुखाच्या सोबतीने चाल राणी मी दगा दुःखास देणे शक्य नाही हे तुझे आंगण तुला लखलाभ आता ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही जीवना, हा छान बंदीवास आहे जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही .. तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या तू मला वगळून उरणे शक्य नाही डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1407 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2014 - 06:41 नवीन
मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही वरच्या चार ओळी आवडल्या. खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sat, 05/31/2014 - 09:49 नवीन
धन्यवाद सर.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/31/2014 - 10:12 नवीन
@तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही ..>>>>>>>> आ हाहाहाहाहाहाहाहाहाहा!!!!!!!!!! काय वार बसालाय राव! सपाssssssssssssssssssssssक!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा