खरं तर हा डेटा बनवणं हे काही फार मोठे काम नव्हते. न्यू जोईनीज साठी एक इन्टर्नल प्रोजेक्ट असावा ज्यामुळे त्यांच्या अॅबीलीटीज एन्हान्स करता येतील या विचाराने हा प्रोजेक्ट घेतला होता. तो इन्टर्नल होताच पण त्याचबरोबर जमले तर कोणत्यातरी क्लायन्टच्या गळ्यात मारायला उपयोगी येणार होता. हे नेहमीचेच. न्यू जॉईनीज कडून विदाउट बिलींग प्रोजेक्ट करुन घ्यायचा आणि तो सेल करताना ऑप्टीमम रीसोर्सिंगच्या नावाखाली मोठे प्रॉफिट दाखवायचे आणि बी यू चा कागदी प्रॉफिट ग्राफ वर न्यायचा.
ही पॉलीसी खरे तर अब्राहमची. नवी पोरे कामाला वाघ असतात. डाटा एन्ट्रीचे कंटाळवाणे रटाळ ते सुरवातीला अगदी आनंदाने करतात. शिवाय त्यांच्या कडून चुका देखील कमी होतात. हा त्याचा अनुभव होता.
दगडावर छिन्नीने आकडे कोरणे हे काही फार स्कील चे काम नाही. मात्र ते करताना सतत डोके खाली घालून छिन्नीने टकटकट करत बसावे लागते.. एखादी देखील चूक झाली तर सगळा पूर्ण डेटा शीट चा दगड तोडून फेकून द्यावा लागतो.
नवी पोरे काम मिळतय म्हणून आनंदाने काम करतात.
स्पेलिंग मिश्टेक झाली तर सगळे डिफीकल्टच असते. गेल्या वेळेस ट्रू गॉड ने " फ्री दोज टेन डिरेक्षन्स " चा कोड लिहीला होता. तो डीबग करता करता सगळ्यांच्या छिन्न्या तुटल्या होत्या. लोक पुन्हा पुन्हा त्याचा रेफरन्स घेवून छिन्न्या तोडत होते. प्रोक्यरमेंट डीपार्टमेन्ट वर केवढा लोड आला होता. शिवाय टीम इलॅप्स झाला ते वेगळेच. गॉड सर्व्हन्ट अंकल नी तर तो डेटाशीटचा दगड त्याम्च्या केबीनमधेच डिस्प्लेला ठेवला होता. कितीही गाडायचा म्हंटला तरी तो कोणीनाकोणी समोर आणतोच. समोर आला की पुन्हा छिन्नी तोड सुरू होतेच. नेक्ष्ट टाईम बहुतेक " फ्री दीज टेन डिरेक्षन" डेटाशीटचा दगड कम्पनीच्या प्रोफाईल च्या कमानीवरच लावून घेवुयात. निदान कोणाच्या हेड वर पडला तर तेवढाच उपयोगी ठरेल. "फ्री दीज टेन डिरेक्षन" चा प्रोजेक्ट कायम प्रॉफीत देतो . पण डीकोडिंगमधे इतक्या छिन्न्या तुटल्या की त्या भीतीने ट्रू गॉड गो अॅब्स्काँड झाला तो कंपनी कडे रेलीव्हिंग लेटर सुद्धा मागायला आला नाही. असा प्रोजेक्ट कधीतरी थाउजंड मधे वन असाच येतो.
या फनी बॉय चा डेटाशीट कायम कॉफी ने कामय बरबटलेला असतो. क्लीन डेस्क पॉलीसी पुन्हा रीव्ह्यू करायला हवी.
यलो नॉटी तर कायम कुठे सूत्तलात उलथलेला असतो अधूनमधून कधीतरी प्रोजेक्ट च्या नव्या पोराना दम देवून जातो तो एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच दिसतो. बहुतेक त्याने पलीकडच्या जम्बू द्वीप बी यू मधली नवी ती प्रोजेक्ट मॅनेजर गटवलेली दिसतेय. चौकशी करायला हवी.भरीत भर फनी बॉय ने सुद्धा सुत्तलात काम करायला तयारी दाखवलीय. तिकडे कसला प्रोजेक्ट आहे कोण जाणे. जाउ देत त्याला ऑनसाईटचा अनुभव. निदान इथले डेटाशीट तरी स्वच्छ रहातील. मागच्या वेळेस तो तिकडे होता तेंव्हा तेंव्हा ऑफीस स्वच्छ होते. क्लीन डेस्क टॉप. त्याशिवाय नव्या पोराना घेवून उगाच गप्पा टप्पा सुद्धा होत नव्हते. प्रोजेक्ट वेळेत व्हायचे. पण काहीतरी मिस सुद्धा होत होते. हापिसात सगळे एकदम कामापुरतेच बोलायचे.
फनी बॉय नाही म्हणून लिटील डॉन मॉनीटर असूनसुद्धा फ्लोअरवर कमीच यायचा. नाही म्हणायला अधूनमधून सिनीयर लोकांपैकी क्युपीड अॅरो वगैरे लोक येवून काही भित्तीचित्रे रंगवून जायचे.
मनी पेनी मॅडम समूद्रकाठी गोव्यात आरम करत बसलीय्ये. पण ती फ्लोअवर डोकावून जाते. नव्या पोराना गाईड करते. हे एका अर्थाने बरे आहे. त्यामुळे निदान कंपनीतली एन्व्हायरमेंट आटोक्यात रहाते. गॉड सर्व्हन्ट अंकल इन्शुअरन्स च्या कामात इतके व्यस्त आहेत त्यांचे खूप प्रोजेक्ट अर्धेच रहातात. पण एक आहे ते जेंव्हा जेंव्हा येतात तेंव्हा फ्लोअर वर जान आणतात.
"लाईफ लाइक " चे प्रोजेक्ट सुद्धा चांगले असतात . कंटेंट थोडा असला तरी क्लायन्ट चा रीस्पॉन्स चांगला असतो.
आपल्याला काय ... कोडींग मधल्या नंबर ऑफ लाईन्स पेक्षा डिलीव्हरी महत्वाची. बग्ज फाइन्ड करणे हाच एक प्रोजेक्ट होतो. त्यामुळे पैसे भरपूर मिळाले तरी प्रॉफिटेबलीटी मेन्टेन करताना नाकी नाईन येतात
असो तर काय म्हणत होतो. परवा त्या कॅलेंडर प्रोजेक्ट मधल्या एका पोराने भन्नाट आयडीया लढवलीये. मदरस्वेअर त्याचे लॉजीक अनबिलीव्हेबल आहे. म्हणतो. एव्हरी ईयर ला नवे कॅलेन्डर करण्यापेक्षा टेम्प्लेट केले तर त्यांचे ब्लॉक्स थोडेसे इकडचे तिकडे करुन दरवर्षी नवे कॅलेंडर बनवता येईल. आपल्याला सुरवातीला पटले नाही पण त्याने जेंव्हा ब्लॉक डायग्राम दाखवून आणि गेल्या तीस वर्षांचे डेटाशीट चे दगड फील्ड अवर नेवून दाखवले तेंव्हा आपल्या डोक्यात एकदम फायर पेटली. सालं काय स्कल आहे. असलं स्कल असते तर आपण कधीच नवी कंपनी टाकली असती. कशाला उगाच या ओव्हरसिव्हीलाइज्ड लोकांच्यात कोडींग करत दगड फोडत राहिलो असतो.
त्या पोराची आयडीया थेट मॅनेजमेंट पुढे मांडली. इन्टरनल प्रोजेक्ट म्हणून घ्यायचा. पेटंट घ्यायचे. निदान पुढची एक दोन अडीच हजार वर्षे कंपनीला काहिही न करता प्रॉफिट मिळत राहील. याला म्हणायचे रेसीद्यूअल इन्कम. "वाह रे....स्टुडन्ट " लै नाईस. त्या डीटेल मधे प्रेझेन्टेशन करायला सांगितले. खुळ्याने मातीत , धुळीत वर्ड वापरून ड्राफ्ट प्रोफाईल केले. त्याला पक्की टेराकोट्टा प्रोफाईल कसे करायचे ते माहीतच नाही. बरे झाले त्याखाली मी झे ना टाकले. बाभळीच्या काडीने थोडे अॅस्थेटीक्स चेन्ज केले त्या मातीवर थोडे पाणी मारले. आणि बेक केले. माझ्या नावाने टेराकोट्टा फॉर्मॅट मधे प्रेझेंटेशन केले. आणि मॅनेजमेंट ला शो केले.
मॅनेजमेंट खूष. दोन हजार वर्षाची असाइनमेंट मिळाली म्हणून मला थेट डिलीव्हरी हेड केला.
या पोराला कायतरी दिले पायजे. संध्याकाळी रॉक बार मधे पाम ची फर्स्ट बॅचमधली फ्रेश एकदम हार्ड डोमेस्टीक पाजूया. अॅप्रेजल मधे चांगले रेटींग देवूया , तुझ्या प्रोजेक्ट मधे त्या नव्या आलेल्या " फेरी ऑफ रेन" तुझ्याच प्रोजेक्ट टीम मधे घेईन सांगुयात. पोरगं खूष.
चला प्रोजेक्ट सुरू झालाय....... मॅनेजमेंट ने एकदम फ्री हॅंड दिलाय.
काम खूप आहे. पोरं खुश आहेत. ........
-------------------------
अजून हवं तसं टेम्प्लेत मिळत नाहिय्ये. शिवाय ग्रेगोरीयन अन ज्यूलीयन ने रीक्वायरेमेंट चेन्ज केल्यात. सालं हे खरं तर प्रोजेक्ट स्कोप मधे नाहिय्ये. पण काय करणार इन्टर्नल प्रोजेक्ट मधे अस सांगता येत नाही.
मॅनेजमेंट ला रीझल्ट हवे आहेत. ते म्हणतात कॅलेम्डर टूल क्लायन्ट कसे वापरेल त्याच पद्धतीन आपण ते टेस्ट केले पाहिजे. क्लायन्ट ने चेंज मॅनेजमेंंट करायला नको का? स्टॅन्डर्ड प्रोसेसेस फॉलो करायला काय जातं यांचं?
असो . आपल्याला काय. पण डाटाशीटचे दगड कन्झ्यूम होतात त्याचं काय?
-----------------------------
ज्युलीयन ने केलेल्या बदलांमुळे सगळं कोडिंग परत करावं लागलं. यांच्या रीक्वायरमेंट्स चं लॉजीक लावणं म्हंणजे हेड एकक आहे. एका महिन्यात काय तर थर्टी दिवस तर एका महिन्यात थर्टी वन. एका महिन्यात तर काय फक्त ट्वेन्टी एट.
सगळ्यात कहर म्हणजे त्या महिन्यात काही वेगळ्या इयर मधे ट्वेन्टी नाईन दिवस. लॉजीक लावायचं तरी किती लेव्हल वर.
---------------------------------
डेटाशीटचे सगळे दगड कन्झ्युं झाले.....
----------------------------------
कॉस्ट कटींग च्या नावाखाली कंपनीने वल्कले द्यायचे बंद केलय.
----------------------------------
फर्दर कॉस्ट कटींग....... एक डेटाशीट चा दगड दोन्ही बाजूनी वापरायचा.
------------------------------------
कुणीतरी डेटाशीटचा दगड पर्सनल कामासठी वापरलेत.
-----------------------------------
छिन्न्न्या सम्पल्या....... जुन्या छिन्न्याना पुन्हा धार लावून वापरतोय.
-------------------------------
हाश.......... एकदाचा दोन हजार वर्षांची कॅलेंडर टीम्प्लेट्स रेडी झाली. मॅनेजमेंटला प्रेझेंट करायला हवं. एक मोठ्ठा माईल स्टोन अचीव्ह झाला.
--------------------------
टेम्प्लेट्स ची आयडीया सुचवणारा तो पोरगा हल्ली काहितरी वेगळेच बघतोय.... जरा वेगळा रंग वाटतोय. लक्ष्य ठेवायला हवं.
---------------------
दोनहजार शंभर कॅलेंडर टेम्प्लेट्स रेडी झालीत.
दोनहजार दहा पर्यन्त तयार आहेत. दोनहजार अकरा चाललय.
तो पोरगा प्रोजेक्ट ला रीपीट कोडिंग ला वैतागलाय. म्हणतो. कोडिंग करायचे ऑटोमेशन करुयात.
ही पोरं ना.... मॉर्निंग रुटीनचे सुद्धा ऑटोमेशन करुया म्हणतील. ...हरकत नाही. आजच प्रेझेन्टेशन बनवूयात. आयडीया मॅनेजमेंटला पटवता आली तर नवे फन्ड्स मिळतील. शिवाय एक इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट. टचिंग एव्हरीडे लाईफ........ झकास आयडीया.
-----------------------
कॅलेम्डर प्रोजेक्ट दोन हजार ट्वेल्व्ह टेन्थ मन्थ पर्यन्त आलाय.
---------------------------
मॉर्निंग रुटीन ऑटोमेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंटला पटलाय. कंडीशन टाकलीये मला व्हीपी केले आणि दम्डकारण्यात अख्ख्या फॅमिली साठी विथ फुल्ल एक्स्पेन्डिचर देत असाल तर एक्झीक्यूट करतो.
----------------------------------
कॅळ्लेम्डर प्रोजेक्ट "दोनहजार ट्वेल्व्ह ट्वेन्टी डेज" कम्प्लीट झालं
-------------------------------
मॅनेजमेंट म्हणतय व्हीपी बनवतो पण फक्त सात बायका आणि त्यांची प्रत्येकी तीन पोरे यानाच स्पॉन्सर करणार.
हा अन्याय आहे. प्रत्येक बायकोला आठ मुले हवीतच असा रूल असताना मेनेजमेंट असे वागतेय हे इन्ह्यूमन आहे.
बाकी पोरांचे करायचे काय
------------------------------
प्रोजेक्ट कॅलेंडर दोनहजार ट्वेल्थ मन्थ. ट्वेन्टी वन डेज कम्प्लीट.
------------------------------------------------------------------
खड्ड्यात जाउ देत कम्पनी........ खड्ड्यात जाऊ देत प्रोजेक्ट. मी चाललो.
नव्या कम्पनीत " टचिंग एव्हरी डे लाईफ" प्रोजेक्ट एकदम आवडलाय. ऑफर चांगली मिळाली. एकदम फोर्टी पर्सेंट हाईक. शिवाय नवी कोरी ऑक्स कार. विथ दोन दोन फुल्ल व्हाईट ऑक्स.
त्या प्रोजेक्ट कॅलेंड करणार्या पोराला आणि " फेरी ऑफ रेन" ला इकडेच जॉईन करुन घेतलं. बरं झालं त्याला या प्रोजेक्ट एक्झ्युकेशन ची रीस्पोन्सिबिलीटी देता येईल
----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
जुनी कम्पनी :- " प्रोजेक्ट कॅलेंडर " फायनाशियली डिझास्टरस. बरे झाले प्रोजेक्ट स्क्रॅप झाला. अगोदरच डोमेस्टिक मार्केट बरे नाही. शिवाय दंडकारण्यात, जम्बु द्वीपात ते लोक त्यांचे वेगळेच कॅलेंडर वापरतात. असे कळाले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकोणीसशे वर्शानंतर : मायन ही एक प्रगत संस्क्रुती होती. त्यानी कॅलेंडर नकाशे प्रर्थना मंदीरे अशा अनेक गोष्टी मागे सोडल्या आहेत. या अवशेषांवरून समजते की मायन संस्कृती किती पुढारलेली होती. त्याना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. सूर्यमाला, ग्रह तारे यांचे त्याना उत्तम ज्ञान होते. मायन ससंक्रुती च्या सापडलेल्या अवशेषांवरुन त्यांच्या संस्कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे.
याच मायन संस्क्रुती च्या अवाशेषांत आपल्या नव्या कॅलेंडरशी जुळणारे एक दगडी कॅलेम्डर देखील सापडले आहे.
मात्र हे कॅलेंडर मात्र एकवीस डिसेंबर बारा पर्यंतच ची तारीख दाखवते.
बहुतेक एकवीस डिसेंबर दोनहजार बारा ही जगातील शेवटची तारीख असणार आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तारीख :१८ डिसेंबर दोनहजार बारा: आयबीन लोकमत:-
निखील बगळे : तुमचं काय म्हणणं आहे आव्हाड साहेब. जावडेकर म्हणताहेत की मायन कॅलेंडर मधे एकवीस डिसेंबर दोनहजार बारा तारीख असण्यामागे घड्याळाचा मोठा हात आहे.....एक मिनीत एक मिनीट शेट्टी साहेब मी तुमच्या कडे थोड्यावेळाने येतोय. उसाचा भाव वढविता येणार नाही म्हणून मायन कॅलेंडरमध्ये अशी मुद्दामच तरतूद केली असावी या आरोपाबद्दल आपण बोलुयातच पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. पहात रहा आयबीन......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकवीस डिसेंबर दोनहजार बारा : आजच्या ठळक बातम्या:
दिलीत पुन्हा एकदा अत्याचार / पुणे महापालीकेत सेना आणि राष्ट्रवादी बी आर टी एस बद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा / रजनीकांतचा नवा चित्रपटाने चारशे कोटींचा गल्ला जमवला , मेळघाटातील कुपोषीत मुलांचा प्रश्न विधानसभेत ऐरणीवर./ बी एड होऊनही नोकरी नाही म्हणून तरुणाची आत्महत्या.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त लिहिलंत विजुभाऊ.
थोडं क्ण्टाळवाणे झाले पण
+७८६
लेख आवडला...
काय हो मुक्तविहारी ?
काही संदर्भयलो नॉटी = http:/
लेख छान आहे
मनी पेनी = http://www
मनी पेनी = http://www
जबरदस्त.
कथा समजल्यासारखी वाटतेय, पण
हेच म्हणतो...
हम्म , काही नीटसे कळले नाही
तुमचे कौतुक वाटते, विजुभाऊ.
सेम असंच झालं
हाहाहा!
आवडले
बिरुटे सरः
धन्स.
धन्यवाद.
गूढगर्भाचा प्रवास आवडला.
सोरी विजभाय
खर बोल्तो, काय बी समजला नाय.
प्रतीक
मिपाच्या व्यक्तीरेखा
कन्जूस भाय