पाककृती

मासे ३९ ) इंग्लिश मासा

Primary tabs

ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असेल असा गैरसमज करून घेउ नये. हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे.
हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.

साहित्य :

इंग्लिश मासे
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
आल, लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)

पाककृती
माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत. जर मासे मोठे असतील तर त्याच्या तुकड्या पाडाव्यात.

नंतर त्याला मिठ, हळद, मसाला, हवे असल्यास वाटण चोळून ठेवावे.

गॅसवर पॅन चांगला गरम करावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर पाच पाच मिनीटांनी उलथापालथ करून खरपूस तळून घ्याव्यात.

हे आहेत खरपूस तळलेले इंग्लिश मासे.

दाक्षिणात्यांच्या (मल्याळी) आहारात ह्या माशाला मानाचे स्थान आहे. ह्याला ते 'कारी मीन' (काळा मासा) म्हणतात. चविष्ट असतो.

ऋषिकेश

+१
कारीमीन पोल्लीचेट्टू नावाचा अतीसुंदर खाद्यप्रकार कुलाब्याला ललिथ रेस्टॉरन्टमध्ये खाता येईल. त्याचे वर्णन इथे

पांथस्थ

माफ करा पण हा करिमीन (Pearlspot) नाहिये! वर वर दिसायला सारखाच असला तरी नीट बघितल्यास लक्षात येउ शकेल - http://en.wikipedia.org/wiki/Green_chromide. करिमीन हा पसरट पंज्यासारखा आहे. बाकी करिमीन फ्राय खल्लास लागतो!

हा इंग्लिश मासा तिलापियाच्या जास्त जवळचा दिसतो आहे. अर्थात हे सगळे प्रकार सिकलीड (Cichlid) जातीचे असल्यामुळे साधर्म्य आहे!

pearlspot आणि Tilapia ह्या दोन्ही माशांना करीमीन म्हणूनच ओळख आहे. कदाचित चुलत भावंड असतील.

वेगवेगळ्या पाण्यात, प्रदेशात एकच माशाचे रुप किंचित बदलते. त्यामुळे एकाच नांवाचे, एकाच माशाचे दोन दोन प्रकार आढळतात.
Malabar leaf fish - Panna karimeen
Tilapia - karimeen
pearl spot - karimeen
king fish - suramai
seer fish - suramai

जागु

कपिलमुनी डोक्याचा काही भाग उडवलाय.
प्रभाकरजी धन्स नाव सांगितल्या बद्दल.

शिद

कधी खाल्लेला आठवत नाही पण तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही. पक्के मत्स-खवय्यांनाच ओळखता येईल हा फरक पटकन.

तुम्ही बनवलं आहे म्हणजे चवीला मस्तच असणार यात वादच नाही.

अवांतरः हा मासा खाडीचा आहे म्हणून आठवलं की आमच्या गावच्या खाडीत बोईसर एम.आय.डि.सी. तुन इतक्या प्रचंड प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येतं की त्यामुळे खाडीच्या पाण्याचा रंग दाट काळसर तपकीरी होवून सगळे मासे मृतप्राय झाले आहेत. :(

शिद,
>>>> तळून झाल्यानंतर हा मासा ईंग्लिश आहे की बागडा हे ओळखणं तेवढं सोपं नाही

असं वाटत नाही. बांगडा इतका इतका ओळखिचा आहे की, 'हा बांगडा नाही' एव्हढे तरी नक्कीच ओळखता येईल.

पिंगू

लहान असताना हा मासा खाल्लेला आहे. आता मात्र नो मत्स्याहार फक्त शाकाहार..

मांसाहारात मत्स्याहार कमी घातक आणि जास्त उपकारक आहे असे वाटते. विशेषतः, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसची गरज मत्स्याहारातून भागते. पूर्ण प्रथिनांचा पुरवठाही शरीराला उत्तम होतो. वृद्धपकाळातील अनेक आजारांना मध्यवयातच पायबंद घातला जातो. अर्थात, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या फायद्यांविषयी अजून ही संशोधन चालू आहे. पण हा एक आवश्यक घटक आहे आणि तो मत्स्याहारातून मिळतो ह्यावर एकमत आहे. रोजच्या चयापचय प्रक्रियेस (मेटॅबॉलीझम) मदत होते.

जागु

प्रभाकरची छान माहीती.

शिंद बांगडा लगेच ओळखता येतो.

तिलापिया नाव ऐकलय. कुठेतरी हे मासे फेमस आहेत.

सौंदाळा

ही तर काळुंद्री.
दोन-तीनदाच खाल्ली आहे. छान लागते.
मस्त पाक्रु

ऋषिकेश

एक विनंती आहे (तुमची ही इतकी छान 'पाक'माला आजच वाचतो आहे म्हणून इतक्या उशीराने ही सुचना. क्षमस्व!)

माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत

अशांसारख्या स्टेप्स मासे नहमी करून खाणार्‍यांना सवयीच्या व सोप्या असल्या तरी माझ्यासारख्या आजवर अगदी क्वचित (तेही दुसर्‍यांच्या घरी जाऊन) मासे बनवणार्‍याला सवयीच्या नसतात. तेव्हा या बहुतेक सर्व माशांसाठी कराव्या लागणार्‍या स्टेप्स कशा कराव्यात हे छायाचित्रासहित समजावता आले, तसेच खवले काढायला काय वापरावे? (विळी/सुरी/कोयता इत्यादी) नक्की कुठे छेद द्यावा, वगैरे गोष्टी सांगता आल्या तर शिकायला आवडेल.

घाई नाही पण लिहा नक्की!

प्यारे१

माशाची ऑटोप्सी दिसतेय! ;)

खा लेको डेड बाड्या खा. :-/

जागु

चालेल ऋषिकेश ह्यासाठी एक वेगळा धागाच काढेन. थोडा वेळ लागेल.

मोठे मासे असतील तर खवले काढायला काती चांगली. छोटे असतील तर विळीवर काढता येतात.

पिंगू

व्हिडियो टाक. त्यात चांगलेच समजावता येईल..

जागु

ठिक आहे व्हिडीओ आणि फोटो दोन्ही देण्याचा प्रयत्न करते.

बन्डु

हा मासा खाल्यानंतर धर्म बुडतो का? *lol*

बॅटमॅन

अहो विष्णूच्या प्रथमावतारास आपल्या उदरात स्थान देणे हा भक्तीचा अजून एक अ‍ॅडिशनल प्रकार मानला जावा खरे तर..नवविधा भक्ती म्हणतात तशी दशविधा भक्ती असावी...(या एका प्रकारासकट)..

म्हणा, गर्व से कहो....

चारु राऊत

हा जिताड मासा आहे हा फार छान लागतो हा आलिबग तालुक्यातसुद्धा मिळ्तो.