Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू गेलीस तेव्हा...

आ — आनंदमयी, गुरुवार, 05/29/2014 - 13:29
तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो.. सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो.. तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो.. गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो.. © अदिती शरद जोशी

प्रतिक्रिया द्या
1979 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चाणक्य गुरुवार, 05/29/2014 - 14:03 नवीन
छान रचना. आवडली
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 05/29/2014 - 14:08 नवीन
तो माझी लोचने मीटो यावी, च्या धर्तीवर.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/29/2014 - 14:57 नवीन
वाह्ह!!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/29/2014 - 16:54 नवीन
हि कविता तुमच्या आधीच्या कवितांच्या लेव्हलला नाही वाटत. कदाचित मलाच समजली नसेल नीट, पण उगाच अस वाटलं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2014 - 17:00 नवीन
गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. एकदम ख़ास !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 05/30/2014 - 10:47 नवीन
लिखाण आवडले. - धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शेखर बी. Fri, 05/30/2014 - 12:33 नवीन
वाह्ह!!!मस्त..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा