सेहेवागी पोवाडा
जय हो..
जय हो..
जय हो..
(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...! (गद्य) मृत्युच्या छायेत असतांना..मृत्युच्या छायेत असतांना.. मरणाची धुंदी चढावी..आणि बेधुंssssद मस्ती करावी..हा या शिलेदाराचा जन्मजात स्वभाव..खास बाणा!पेटली पुन्हा ती आग...
हो sssssssss ओ..ओ..ओ...ओ..ओsssssssss
पेटली पुन्हा ती आग,मृत्युची बाग तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा सांगे सेहेवाग कथा आत्मा... हो जी..जी..जी..! ॥धृ॥ धन्य धन्य उपरी कट,मारी तो खट.. तसा कोणाही नाही जमला...तसा कोणाही नाही जमला ऐसा खतरा हा वीर मामला...हो..जी..जी..जी..॥१॥ तडतडा फोडे तो चेंडू, झोडे जसा झेंडू चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात..चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात बॉलरं लावी कपाळा हात...जी..जी..जी..॥२॥ बाऊंड्य्रा आणि सिक्सरं,मारी अक्सरं जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल,जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल किती पाजी-बॉलरा..हा...ल हलाहल जी..जी..जी॥३॥ किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत.. तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास! जरी वाटली तुम्हा बकवाsssस..जी..जी..जी..॥४॥ ऐश्या या धडाकेबाजा,म्हणीन मी राजा रनांचा गडी पॉssवर..बाज,रनांचा गडी पॉssवर..बाज राssखिली कैकदा लाज..हो..जी..जी..जी॥५॥ तेंडल्या ढाणा होता वाघ,तरी ही बाग आपुल्या परि तिथे फुलली..आपुल्या परि तिथे फुलली.. आता तारीफ मनी उरली..हो जी..जी..जी॥६॥ चला घेतो अता आंम्ही रजा,पाहुनी मजा आत्मा हा खूssषं लै झाला..आत्मा हा खूssषं लै झाला.. पssवाडा लिवन्या योग-पहिला __/\__ हो जी..जी..जी॥७॥ ================================ सदर पोवाड्यावर आजच्या मॅचची(किंग्ज पंजाब वि. चैन्नई सु.किंग्ज) गडद छाया असली..तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल! :) या अगोदरचे शीर्षकः आग...आग...सेहेवाग!!! :D - एक आत्मि'क ;) पोवाडा!
💬 प्रतिसाद
(63)
प
प्रचेतस
Fri, 05/30/2014 - 20:30
नवीन
जबरदस्त.
लै मजा आली वाचून.
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 05/31/2014 - 05:23
नवीन
आग.... आग....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.जिलबी!!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 05/31/2014 - 05:52
नवीन
हलकट पांडू
-घे डोसक्यात दांडू!
..........
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 06/04/2014 - 11:19
नवीन
स्पांडू आणि दांडूचे अनिवार सान्निध्य हा एक रोचक विषय आहे. हो की नै लोक्स ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 06/04/2014 - 11:51
नवीन
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 05/31/2014 - 05:34
नवीन
आम्ही तेंडल्या-सेहवाघ्-द्रवीड अशी बिनडोक तुलना करणार्या "जित्राबांना"(बुवा तुम्ही कुठेही तुलना केली नाही तेव्हा सबब ही उपमा तुम्हाला नाहीच्)माफ करतो.
पंचपक्वानाच्या थाळीत हरेक पदार्थाने (त्याच्या स्वादाने) परिपूर्णता येते तसे या त्रिमूर्तीचे आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 05/31/2014 - 05:53
नवीन
झक्कास..
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Sat, 05/31/2014 - 05:56
नवीन
:-)
ब-याच काळाने "वीरू" दिसला!!
- Log in or register to post comments
र
रमताराम
Sat, 05/31/2014 - 07:48
नवीन
आत्मूस, ररा पण खुष झाला.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/31/2014 - 09:33
नवीन
लै भारी !
वीरूने मारला शॉट, चेंडू उडाला भन्नाट
जाई कुंपणापार... जाई कुंपणापार
अआच्या वीरूप्रेमाला येई पूर...हो..जी..जी..जी..॥
- Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक
Sat, 05/31/2014 - 10:53
नवीन
पोवाड्याचे रसग्रहण मला करता येत नाही पण सेहवाग आपला खास. तो खेळपट्टीवर असेपर्यंत एंटरटेनमेंट चालतच राहणार याची फुल्ल ग्यारंटी आणि तोपर्यंत आपण टीव्हीसमोरून काही हलत नाही. नवीन चेंडू फोडणारा त्यासम तोच .
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 11:26
नवीन
सल्युट तुमा, सय्वाग अन सचिनला बी
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/31/2014 - 11:27
नवीन
२०१५ मधील विश्वचषकासाठी सेहवाग संघात पाहिजेच. त्याच्याशिवाय मजा नाही.
- Log in or register to post comments
ध
धन्या
Mon, 06/02/2014 - 14:12
नवीन
बुवा मस्त हो... ऑडीओ आहे का याचा?
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 06/02/2014 - 21:48
नवीन
फटॅक शॉट एकदम
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/03/2014 - 13:20
नवीन
डोंगराला आग लागली पळा पळा !!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 06/03/2014 - 16:30
नवीन
या कुज कट शास्त्रींचा अवळा गळा!!! =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 06/03/2014 - 16:31
नवीन
या कुज कट शास्त्रींचा अवळा गळा!!! =)) :p
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 06/03/2014 - 18:15
नवीन
कोणता खेळ म्हणे हा?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 10/21/2015 - 15:39
नवीन
अफाट फलंदाज.
वीरूच्या निवृत्तीच्या निमित्ताने हा पोवाडा आठवला.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 10/21/2015 - 19:32
नवीन
थेंकु आगोबा! :)
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 10/21/2015 - 16:15
नवीन
पुन्हा एकदा आत्मूस राॅक्स!
आत्मूकाकांचा पंखा!
-मांत्रिक
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 10/21/2015 - 16:57
नवीन
साॅरी!!!
पुन्हा एकदा अत्मूस राॅक्स!
अत्मूकाकांचा पंखा!
-मंत्रिक
असं असायला पहिजे!!!
- Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज
Wed, 10/21/2015 - 16:23
नवीन
किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत..
तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास!
हे खासच.. आवड्यास ना भौ...
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 10/21/2015 - 16:27
नवीन
कविता आवडली. सहवागचा खेळ पाहताना निश्चित मजा यायची. पण शेवटी कालाय तस्मे नम: ....
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 10/21/2015 - 21:33
नवीन
आवडला पोवाडा!
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
गुरुवार, 10/22/2015 - 00:03
नवीन
लै भारी!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 10/22/2015 - 06:48
नवीन
बुवा आता पुढच्या भेटीत मी हाच पोवाडा खड्या आवाजात गाउन ऐकवणार ! जबरी !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/22/2015 - 12:22
नवीन
अरे ...जरूर!!!
हम दूसरी छोर से साथ करेंगे :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 10/22/2015 - 12:29
नवीन
मी "जी रं जी " करायला आहे तयार. :)
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 10/23/2015 - 05:00
नवीन
झांजा फक्त आणि फक्त मीच्ज वाजवणार बुवांना फेटा बांधायची जिम्मेदारी चिमण कडे आहे याची नोंद घेणे.
अवांतर पोवाड्यावरील अभिप्राय दि ३१ मे लाच नोंदवला आहे सबब पुन्हा नको.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 10/22/2015 - 13:40
नवीन
छान आहे पोवाडा..
स्वाती
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 10/22/2015 - 13:56
नवीन
तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा
सांगे सेहेवाग कथा आत्मा... >>>>>>>>>>>
इथेच फुटलो:-D:-D:-D
पुढचं काय वाचताच आलं न्हाय.
कहर!!!!!!!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/22/2015 - 16:15
नवीन
एकदम आवेशपूर्ण लिहिलाय.
याचं गायन करा, रेकॉर्डिंग करुन द्या सेहवागला पाठवून! सिरीअसली!! :)
-विरुरंग
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/22/2015 - 17:00
नवीन
रेकॉर्डिंग तैय्यार !
http://www.mediafire.com/watch/i5lrmme6ayuny6e/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE.m4a

- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 10/22/2015 - 17:36
नवीन
बुवा ऐकला हो पवाडा तुम्हच्या पहाडी आवाजात.
नंबरी काम झालय एकदम. डफावरची थाप जरा घुमायला हवी होती पण उपलब्ध सामुग्रीने तुम्ही माहोल उभा केलाय.
ह्या व्रीरश्रयुक्त पोवाड्याच्या गायनप्रसंगी तुम्ही कीती बेभान झाला होता त्याची ही छबी.
या अद्वितीय कामगीरीबद्द;ल तुम्हाला मिपाशाहीर हा किताब देण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/22/2015 - 18:30
नवीन
अगागागागागा _/\_
हे थोरच आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/22/2015 - 18:31
नवीन
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 10/23/2015 - 09:06
नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
कहर!
मिपा म्यूझिक सहर्ष सादर करित आहे
मिपाशाहीरांचे पव्वाडे !
एकच शाहीर - बाकी सगळे बाहीर
अलबम्म काढा.
आणि हो; हा सहवागला पाठवाच :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 10/23/2015 - 11:20
नवीन
अगागागागागागागागा =)) =)) =)) =)) =))
काय ते ध्याण =)) =)) =)) _/\_
पवाडाबी येकच नंब्र, अवडला.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 10/23/2015 - 15:19
नवीन
वारलोच ! =))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/22/2015 - 18:06
नवीन
रेकॉर्डिंग करताना माईक बराचं हलवलेला दिसतोय इकडुन तिकडे. आवाज मधुनचं कमी जास्तं होतोय. बाकी मस्तं जमलाय हा गुर्जी. :)!!!!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 10/22/2015 - 19:56
नवीन
आम्ही लगेच प्रसीध्दही केला.
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Fri, 10/23/2015 - 06:13
नवीन
पवाडा जोरदार झालाय !
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 10/23/2015 - 06:24
नवीन
समोर प्रेक्षकात वल्ली आहेत का तुम्ही रोखून बघताञ म्हणून विचारले !!!!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 10/23/2015 - 06:29
नवीन
कदाचित तुम्हीच असाल णाखुण का...का.......
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 10/23/2015 - 06:33
नवीन
कोणतर एक नाकेला, गोरेला, काटकुळा पण छाती पुढे काढून फोटो काढत होता. ;)
बुवांना त्याने अर्धे आपट्याचे पान सोने म्हणून दिले आणि परत घेतले म्हणे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 10/23/2015 - 08:12
नवीन
मिपाचा रूशी पकूर???? का शारुक्खान?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 10/23/2015 - 08:12
नवीन
कोण हो कोण?
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 10/23/2015 - 08:27
नवीन
पन्नाशी निमीत्त बुवांचा एक फेटा (डोक्याबरहुकुम) डोळ्यावर न येणारा (बुवांच्या), एक पानाची चंची (पुडी आणि डबी बसेल असी) आणि खेळण्यातली आवाज करणारी (त्याच वेळेला लाईट लागणारी) इथे प्रात्य्क्षीक पहा देऊन करण्यात येत आहे.
भेटवस्तूंसाठी बुवांचे हितचिंतक श्री सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे.
शुभेच्छूक "सत्कारच सत्कार चोहिकडे गेला जे पी कुणीकडे "मंडळ आणि चिमण हटेला गँग.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »