कलादालन

सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १

Primary tabs

सिंहगड व्हॅलीमध्ये मी खुप वेळा गेलोय. पण ते फक्त सिंहगडवर जाण्यासाठी. परंतू व्हॅलीमध्ये पक्षी पहाण्यासाठी म्हणून गेलो ते माझ्या एका मित्रासोबत. तेव्हा ठरवले की पुन्हा वेळ काढून नक्की जायचे. ’चॊकटराजे’ ना विचारले, ते तयार झाले.

शक्यतो फक्त फोटोग्राफीसाठी एवढा खटाटोप कशाला असे बरेच जणांचे म्हणणे असते. परंतू राजेसाहेब याला अपवाद आहेत.

शेवटी ०९ मे ला जायचे ठरले.

०९ मे ला सकाळी ५ वाजता चिंचवड वरून प्रस्थान केले. सकाळी लवकर बाहेर पडण्याचा फायदा हा की रस्त्यावर अजिबात वर्दळ नसते आणि आपण नियोजित स्थळी नियोजित वेळी पोचू शकतो. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मिळतात. तसेच नॅचरल लाईट असल्याने कॅमेराशी जास्त खेळावे लागत नाही.

असो, वाटेत खडकवासला येथे थांबून ’महाराजाचा’ फोटो घेतला. तो खाली पहावा.
प्रत्येक फोटोखालीच EXIF डेटा लिहला आहे. जेणेकरून फोटोची टेकनिकल माहिती मिळेल.

’महाराजाचा’ फोटो
Maharaja
EXIF Data -
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/1000 sec.
Aperture - F/6.3
ISO - 100

तिथेच एका Indian Pond Heron किंवा भुऱ्या बगळ्या ने छान दर्शन दिले . . .
Indian Pond Heron
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/40 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

तिथेच शेजारी उगवलेल्या कमळाचा फोटो. वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..
Lotus
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/80 sec.
Aperture - F/5.6
ISO - 100

त्यांनतर सिंहगड व्हॅलीकडे प्रस्थान केले. शक्यतो ७ पुर्वी सिंहगड व्हॅलीमध्ये जावे जेणेकरून नॅचरल लाईट जास्त मिळेल.

सिंहगड व्हॅलीमध्ये ६.१८ वाजता पोचलो. चिंचवडवरून सिंहगड व्हॅलीमध्ये पोहोचायला साधारण १ तास २० मिनिटे लागतात.

सिंहगड पायथ्याला असलेल्या एका हॉटेल मध्ये चहा व पोहे खुप छान मिळतात...तेथे पोहे व चहा घेऊन पुढे वाटचाल सुरू केली.

पायथ्यापासून सिंहगडची वाट चालू लागल्यावर एक मंदीर लागते तिथून डाव्या हाताला गेल्यावर सिंहगड व्हॅली सुरू होते... आणि सरळ वर गेल्यावर सिंहगड ट्रेक सुरु होतो.

व्हॅलीमध्ये उतरल्यावर लगेचच एक Green Bee-eater किंवा रानपोपट दिसला त्याचा हा फोटो.
Green Bee Eater
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/250 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

थोडे पुढे गेल्यावर "मल्ल्या कंपनी" चा सिंबॉल White-throated Kingfisher किंवा खंड्या दिसला.
त्याची मस्त पोटपुजा चालू होती.
त्याचा फोटो.
KingFisher
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/50 sec.
Aperture - F/6.5
ISO - 160

तिथून थोडे पुढे गेल्यावर दुर झाडावर थोडी हालचाल झाली.
तिथे होती Black-shouldered Kite किंवा कापशी घार. तिचा फोटो
Kite
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/405 sec.
Aperture - F/6.5
ISO - 200

तेथे एका विहीरीजवळ बसलेल्या Spotted Dove किंवा ठिपकेदार होला चा फोटो
Spotted Dove
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/500 sec.
Aperture - F/5.6
ISO - 400

झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या Common Sparrow किंवा चिमणी चा फोटो.
Common Sparrow
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/50 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

ज्याची शेपटी बसल्यावर 'V' आकाराची दिसते त्या Black Drongo किंवा कोतवाल चा फोटो.
Black Drongo
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/100 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

निघता निघता काढलेला एका Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो.
Brahminy Myna
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/160 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

त्या दिवशी बरेच फोटो मिळाले. व्हॅलीमधून साधारण १०.०० वाजता पुन्हा एकदा हॉटेलमध्ये चहा घेऊन पुन्हा नक्की यायचे असे ठरवून सिंहगड व्हॅलीमधून चिंचवडकडे प्रयाण केले.

...समाप्त...

कंजूस

अफलातून आहेत फोटो .४००एमेम आहे का लेन्स ?चांगले आहे .किंगफिशर छानच .पक्षांचा डोळा फार महत्त्वाचा तो होल्याचा छान आला आहे .थोडीशी लकब पकडण्याचा ,पिसे साफ करताना ,वाकडी मान करतांना ,पंख उघडून आळस देताना शटर दाबून फोटो मिळवा ते या तुमच्या लेन्सने शक्य आहे .
पाचगणी ,सज्जनगड ,बनेश्वर इथे काही खात्रीने पक्षी मिळतात आणि बुजरे नाहीत .सिन्नरपासून वीस किमी वरचे नांदूर माध्यमेश्वरही भेट देण्यासारखे आहे .थंडीत स्थलांतरीत बदके येतात .एरवीपण छान आहे .कामशेतहून वीस किमी जांभिवली /कोंडेश्वर/ढाकचे रान आहे .पक्षी शोधावे लागतात .लोणावळा अॅंबिवैली पेठ शहापूर रस्त्याला भरपूर पक्षी आहेत .फ्लायकैचरसचे रान आहे

फ्लेमिंगौ आणि पाणपक्षांचे फोटे पाहून आता कंटाळा आला .रानपक्षी छान .आवडले .

लेन्स 24 - 1200 mm एम-एम आहे. मी पक्ष्यांचे वेगवेगळ्या लकबींमधले फोटो काढले आहे. पुढील धाग्यांमध्ये पहावयास मिळतील. @कंजूस आपण दिलेली ठिकाणे माझ्या फोटोग्राफी places च्या List मध्ये ADD केली आहेत.

कंजूस

चांगले टेलिफोटो लेन्स (४००एमेम अधीक १.३X )नसल्यामुळे बऱ्याच जणांना केवळ दुर्बिणीतून पक्षी पाहण्यावर समाधान मानावं लागतं . पुढील फोटोंची वाट पाहतो .

खरय बुवा. शेवटी एम एम किती आहे यावर तर फोटोचं नशीब असता ना !

चौकटराजा

या सगळ्या खटाटोपाला मी साक्षीदार होतो. लहान पक्षी फारच चंचल असतात. ते कोठून कोठे भुर्रकन उडून जातील नेम नाही.बाकी ती पहाट सकाळ फारच रम्य होती. त्या परिसरात रात्री थोडा पाउस पडून गेला होता. @ कंजूसश्री, आपण दिलेल्या
ठिकाणांची नोंद घेतलीय. त्या बद्द्द्ल धन्स !

कंजूस

भिमाशंकराच्या जवळच्या झाडीतले पक्षी सापडत नाहीत फक्त ऐकू येतात .खाली गणपती घाटात जी झाडी आहे त्यांतमात्र ते सहज दिसतात .फोटो काढा अन आम्हाला दाखवा .बाकी तुमचे NDA ,तानसा वैतरणाच्या तुळशी तलावाकडच्या संरक्षित भागात आणि ठाण्यातल्या येऊरच्या एरफॉर्सच्या रानात जो जाईल तो खरा नशिबवान .श्रीवर्धनचे कुसुमावती ,गणपतीपुळेजवळ मालगुंड आपली वाट पाहत आहे .

प्रचेतस

भीमाशंकरच्या जंगलात स्वर्गीय नर्तक अथवा नंदननाचण खूपदा पाहिलाय.

कंजूस

बरोबर .हा जो पक्षी आहे तो खरं म्हणजे फ्लायकैचर प्रकारातला आहे .बारीक उडणारी चिलटं पकडतो .(तसे मोठाले नाकतोडे पण अख्खे गिळतो )उंबरं आणि अळू (चिकूसारखे असतात ते) खाली पडून सडायला लागली की त्यावरची येणारी चिलटं पकडायला हवेत कसरती करतो पांढरी लांबलचक शेपूट फिरवत .तेव्हा ती जागा सोडायला तो तयार नसतो .पण बाकीचे हरेवा ,कांचन सारखे पक्षी झाडांचे शेंडे सोडत नाहीत आणि दिसत नाहीत .

फोटो मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त निघालेत! *i-m_so_happy*

अवांतरः- @वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. =))

ब़जरबट्टू

@वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..
असेच सपस्टीकरन तुम्ही महाराजाचा फटू काढतांना...
वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हा सुर्य दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे..
दिलेला नसल्यामुळे निषेढ...... :))

बाकी फोटो जबरदस्त .. अजुन येऊ द्या.....

एस

*unknw* मला शेवटचे दोनच फोटो दिसत आहेत.

एस

ही कोणती लेन्स आहे? लेन्स चा दुवा देऊ शकाल का? कॅमेरा कोणता होता?

प्रचेतस

माझ्या मते कॅनन PowerShot SX50 HS असावा. पॉइन्ट अ‍ॅण्ड शूट.

एस

मलाही तीच शंका आली होती.

वल्ली साहेब तोच कॅमेरा आहे. कॅनन PowerShot SX50 HS. Point & Shoot परंतु काही features SLR चे दिले आहेत यांत समाधान ! तसही SLR ची तोड Point & Shoot कॅमेरांना येत नाही. पण Picture Quality च्या बाबतीत. थोडं फार जवळपास जाता येतं !

अतिशय सुंदर काढली आहेत छायाचित्र.
पक्षांची छायाचित्र काढताना तिक्ष्ण नजर आणि काटेकोर फोकसिंग ह्यांचा समन्वय पाहिजे. तो प्रत्येक छायाचित्रात जाणवतो आहे.

अभिनंदन.

बॅटमॅन

खूप सुंदर छायाचित्रे. लै आवडली. अजून येऊद्यात.

प्यारे१

खूप देखणे आलेत फोटो!

पु छाचि/प्रचि शु ;)

शिद

मस्त फोटो आले आहेत सगळे...खासकरुन कापशी घारीचा. ते लालबुंद डोळे कुठलं तरी सावज हेरताहेत असं वाटतंय.

विकास

मस्तच काढले आहेत फोटो! प्रतिमेवरून प्रत्यक्षाच्या देखणेपणाची कल्पना येत आहे. इंग्रजी शब्दांबरोबरच या पक्षांची मराठी नावे दिली त्याबद्दल धन्यवाद!

अजून येउंदेत! :)

सूड

एक होलो आणि चिमण्येचो तेवडोच फोटो दिसतांय माका, बाकीचे खंय असत?

प्रचेतस

माझेही दोन पैसे.

देवगिरी किल्ल्यावर टिपलेला बहिरी ससाणा (Common Kestrel)
a

अजिंठ्यात टिपलेला लालबुड्या बुलबुल (Red Vented Bulbul)

a

भर समुद्रात टिपलेला सीगल
a

कंजूस

वल्लींचे आठ पैसे .हे पण जमतंय तुम्हाला .

चौकटराजा

मधला लय मस्ताड आलाया ! कोन्ची लेन्स ?
( आरं, फटूग्राफरला काई म्हत्व द्येताल की नाय ? )

कंजूस

अन् तिकाटणं धरून बसतुया त्याला बी महत्त्व द्या की .

प्रचेतस

धन्यवाद.
हे फोटू तिकाटणं न वापरताच काढलेले आहेत. साधे रैंडम क्लिक्स आहेत.

इतक्ये झ्याक फोटू काडायला क्यामेर्‍यामागचा मानुसबी तसाच कलाकार आसावा लागतुया नव्हं? :)

प्रचेतस

कसचं कसचं. ;)
तसा प्राणी पक्ष्यांचे फोटू काढायचा अजिबात छंद नाही. दगडांचे फोटो काढायला मात्र आवडतात.

विकास

वल्ली, तुम्ही काढलेले फोटो पण मस्तच आहेत!

Like

वल्लीनी काढलेल्यातला तिसरा उडत्या पक्ष्याचा फोटो घारापुरीहून परतताना लाँचितून घेतलेला फोटू हाय! त्या दिवशी ती लाँचिच्या मागे चालेल्ली उडत्या पक्ष्यांची साखळी आणि त्यांचं मासे टिपणं, हे पहाण्यासाठी आणि व्हिडो शुट'ण्यासाठी परत जायला हवं..लै मंजे लै भारी परकार हाय त्यो! माझा घेतलेला व्हिडो कुटं गायबला कार्डात काय कळ्ळच नाय! :(

बुलबुल आणि सीगल चा फोटो आवडला. सीगल चा फोटो तर अप्रतिम आलाय. Common Kestrel चा आवडला पण त्यात त्याचा डोळा दिसला असता तर अजुन भारी वाटला असता. अर्थात बहिरी ससाण्याचा एव्हडा सुरेख फोटो मिळणं मुश्कील असता. पण छान आलाय. बहुतेक क्लिक करताना त्याने मान फिरवली असावी. फोटो एकदम झकास आलेत. सीगल च्या फोटोचा EXIF कळेल का??

प्रचेतस

सीगलच्या फोटोचा EXIF

Canon EOS 550D
Lens Canon EF-S55-250mm f/4-5.6 IS II
Focal Length 65 mm
Exposure 1/320
F Number f/7.1
ISO 100
Camera make Canon

एस

तुम्हांला जर पक्षीछायाचित्रण वा वन्यजीवछायाचित्रणात रस असेल तर फेसबुकवर Indian Birds नावाचे पेज आहे. त्यावर टाकली जाणारी पक्ष्यांची छायाचित्रे बघा. त्याचबरोबर सुधीर शिवराम, बैजू पाटील, राधिका रामासामी, कल्याण वर्मा वगैरे नावाजलेल्या वन्यजीवछायाचित्रकारांचे कार्य पहा. खूप शिकायला मिळेल.

@स्वॅप्स. पेज पाहीले. खुप छान आहे. खुप मदत होईल पुढील फोटोग्राफीमध्ये. माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.

नूतन

फोटो आवडले .रानपोपट मस्त.पण कमळाचा इतक सुंदर फोटो बघता बघता नाहीस झाला

चौकटराजा

एखादा फोटो चांगला आला की EXIF DATA मागण्याची एक पद्धत झाली आहे. माझ्या मते याचा फारसा काही फायदा नाही.
एकतर प्रत्येक लेन्सने मिळणारा, प्रत्येक सेन्सर वर जाणारा व प्रत्येक वेळी च्या प्रकाशाचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. एवढेच काय पाचेक मिनिटापूर्वी आदशे वाटणार्‍या सेटींगचा हिस्टोग्राम आता आदर्श असेलच असे नाही. शेवटी ज्यानी त्याने आपल्या व्हू फाईंडर व मॅन्योअल मोड वा कुशलतेने वापर करीत आदर्श प्रतिमेपर्यंत पोहोचावे. ( आपल्या कॅमेर्याच्या मर्यादेत अर्थात )

यशोधरा

फोटो आवडला.

मूळ धाग्यावरील व वल्ली, तुम्ही काढलेले फोटोही छान.

सुधीर

सुंदर छायाचित्रे! (वल्लींची सुद्धा). पावसाळा चालू झाला की लालबुड्या बुलबुल आणि बोटभर लांबीचे बाकदार चोचीचे पक्षी (सनबर्ड कदाचित) मुंबईत दिसू लागतात. (निदान खिडकीच्या जवळपास दिसतात)

यशोधरा

एकच फोटो दिसत आहे, स्वर्गीय नर्तकाचा पिल्लासोबत. नॅशनल जिऑग्राफिकमध्ये निवडला आहे का हा फोटो?

सुंदर. काल या फोटोग्राफर ला भेटण्याचा योग आला.
एकदम मस्त माणूस, मजा आली. कंजूस ना धन्यवाद.
कालच्या फोटोंची वाट पाहतोय.