Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिचे अभंग…।

व — वटवट, Tue, 06/03/2014 - 11:35
तिचे अभंग…। आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी, तिच्या आठवणी, खंडीभर..! तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी, स्पंदने उराशी, तिचीच रे..! कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..! उगाच एवढी, केली उठाठेव, तिच्या डोळी देव, दिसायचा..! काय काय सांगू, काय रे व्हायचे, मोर नाचायचे, ग्रीष्मातही..! ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ, पदरात जाळ, श्रावणाच्या..! इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..! ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली, झोळी हि भरली, आठवांनी..! अशात नेहमी, हवे ते ना घडे, अश्रुंचेच सडे, जागोजागी..! नको ते घडले, इथेही नेमके, चांदण-चटके, काळजाला..! शेवटची भेट, काळजाला पेट, वणव्याचा थेट, झाला घाव..! एकदाच तिने, यावे माझ्यासाठी, भरेन मी ओटी, कवितेनं..! मग जावे तिने, अगदी खुशाल, कवितेची शाल, माझ्या अंगा..! तिच्याशी जुळले, कवितेचे धागे, आता तिच्या मागे, कविताच..! तिला पडू नये, कशाची वानवा, तिचे सुख दवा, माझ्यासाठी..! एवढे मागणे, ऐक रे श्रीरंग, पडो हा अभंग, तिच्या पायी..! - © चेतन दीक्षित (अस्मादिक)

प्रतिक्रिया द्या
3498 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अनुप ढेरे Tue, 06/03/2014 - 11:44 नवीन
मस्तं !
कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..!
आणि
मग जावे तिने, अगदी खुशाल, कवितेची शाल, माझ्या अंगा..!
हे विशेष आवडलं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/03/2014 - 11:57 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 06/03/2014 - 14:10 नवीन
ओव्या फार आवडल्या. 'मिठाने चोळणे जखमांना' आणि 'पदरात जाळ श्रावणाच्या' हे खासच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/03/2014 - 20:41 नवीन
लै भारी!!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/05/2014 - 08:43 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 06/05/2014 - 09:28 नवीन
कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
व
वटवट Mon, 06/09/2014 - 11:07 नवीन
सर्वान्चे खूप आभार...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 07:01 नवीन
च्यामारी एकदम झकास ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 06/14/2014 - 13:12 नवीन
बहोत खूब… तिच्या पायाशी पडेलच हा अभंग कधीतरी पण आमच्या हृदयात मात्र आताच उतरलाय !!
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Tue, 06/16/2015 - 17:30 नवीन
<blockquote>तिला पडू नये, कशाची वानवा, तिचे सुख दवा, माझ्यासाठी..!</blockquote> मस्तच
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Tue, 06/16/2015 - 17:30 नवीन
<blockquote>तिला पडू नये, कशाची वानवा, तिचे सुख दवा, माझ्यासाठी..!</blockquote> मस्तच
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 06/16/2015 - 18:27 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
क
क्रेझी Wed, 06/17/2015 - 12:42 नवीन
व्वाह! अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
ध
धनावडे गुरुवार, 11/24/2016 - 15:48 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा