Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्ण

आ — आनंदमयी, Fri, 06/06/2014 - 20:47
रूप सावळे आतीव सुंदर भक्तिरसाचा मनात पाझर उठे शहारा अंगांगावर अंतरात वसतो मुरलीधर निळा गंध त्या निळसर देही मोहक इतुका तो निर्मोही वरवर सारे चंचल श्यामल आत गूढ अविचलसे काही चराचरांतून घुमे बासरी सप्तसूर सावळा मुरारी वाहे यमुना अमृत होवुन उठती आतुन अथांग लहरी प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे कृष्णातच समरसून जावे © डॉ.अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
3102 वाचन

💬 प्रतिसाद (20)
आ
आयुर्हित Sat, 06/07/2014 - 07:13 नवीन
वाचतांना एक वेगळीच अनुभुती मिळाली. कवयित्रीचे मन कसे विचार करत आहे, ते ही अगदी स्पष्ट दिसुन येते. "वरवर सारे चंचल श्यामल आत गूढ अविचलसे काही" काहीशी द्विधा मनस्थिती आहे असेही वाटते. यामूळे कवितेत दोन प्रवाह/लेयर्स दिसतात. "प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे" या वाक्यावरून वरवर शांत वाटणारे मन आतून अशांत आहे हेच खरे! मनातले विचार हवे तसे कवितेत उतरवणे ही पण एक कलाच आहे. कवयित्री त्यात १००% उत्तीर्ण झाली आहे. एकंदरीत फारच छान कविता आहे!
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 06/07/2014 - 07:44 नवीन
सुरेख!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/07/2014 - 09:47 नवीन
त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा नज़रिया म्हणजे कृष्ण. त्यामुळे भक्तीरसाशी या ओळी विसंगत आहेत :
प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे कृष्णातच समरसून जावे
जर संपूर्ण अस्तित्व कृष्णमय आहे तर त्याला दोन तीर कसे असतील? अस्तित्वाशी एकरुप (कृष्णमय) व्ह्यायचं असेल तर मनातली ही विसंगती दूर व्ह्यायला हवी.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 06/07/2014 - 16:06 नवीन
जर संपूर्ण अस्तित्व कृष्णमय आहे तर त्याला दोन तीर कसे असतील ?
कृष्णमयता ही स्थिती आहे व दोन तीर ही प्रोसेस... होप यु गॉट इट इन अ वे यु युज टु फ्रेज द वर्ड्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्यारे१ Sat, 06/07/2014 - 10:07 नवीन
कविता छान जमलीये!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/07/2014 - 13:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मूकवाचक Mon, 06/09/2014 - 14:45 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मूकवाचक Mon, 06/09/2014 - 14:45 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कवितानागेश Sat, 06/07/2014 - 15:47 नवीन
सुंदर कविता. दुसरं कडवं फार आवडलं.. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/09/2014 - 05:12 नवीन
मलाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
न
निलरंजन Mon, 06/09/2014 - 04:52 नवीन
जय हो माते आनंदमयी
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 06/09/2014 - 06:11 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
म
म्हैस Mon, 06/09/2014 - 08:10 नवीन
प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे
पैलतीरी जाण्याची आस दिसते ह्यातून .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/09/2014 - 15:08 नवीन
अजुन लिहा. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/12/2014 - 05:30 नवीन
सुंदर अभिव्यक्ती!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 06:49 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 06/13/2014 - 05:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/13/2014 - 17:59 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 06/14/2014 - 06:22 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 06/15/2014 - 13:24 नवीन
सुरेख कविता. आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा