सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे......
कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे. तिकडे हलविण्यास काहीच हरकत नाही....
छायाचित्रांसोबत थोडीफार माहिती दिली असती, जसे छायाचित्रातील स्थळ कुठले आहे, तुमच्या राहत्या शहरापासून किती लांब आहे, जायला-यायला लागणारा वेळ, तसेच, छायाचित्रात दिसणार्या वास्तुबद्दल २ शब्द इ.इ. तर धागा अजून परिणामकारक होऊ शकतो. पुढच्या वेळी तसा प्रयत्न जरूर करावा ही विनंती.
फोटो थाउसंड आयलंड आणि नायगाराचे वाटताहेत.
थाऊसंड आयलंड ह्या जागी नावाप्रमाणेच हजाराहून जास्त छोटी छोटी बेटं आहेत. पाच महाकाय तलावांपैकी एक ओंटारीयो तलाव संपून तिथून अटलांटीक महासागराला मिळणारी नदी जिथे सुरू होते तिथे ही जागा आहे. अतिशय रम्य ठिकाण. लोकांनी बेटांवर घरं बांधून कार च्या गॅरॅजच्या ऐवजी बोट गॅरॅज बनवलेलं आहे. काही काही बेटं तर खूपच लहान आहे. त्यामुळे 'बेट' शब्दाची व्याख्या ज्यावर किमान एक मोठं झाड आहे ते बेट अशी केली आहे. शिवाय अमेरिका कॅनडाच्या सीमेवर असल्यामुळे काही लोकांचं घर अमेरीकेत आणि आणि अंगण कॅनडात अशी 'इंटरनॅशनल' घरं सुद्धा आहेत.
आवडले.
ते पहिल्या फोटोतले घर मस्त आहे.
अगदि उत्तम आलेत सगळे फोटोज...
फोटो आवडले. अमेरिकेतील कोणत्या भागातील हे फोटो आहेत?
छान छायाचित्रं आहेत.
छायाचित्रांसोबत थोडीफार माहिती दिली असती, जसे छायाचित्रातील स्थळ कुठले आहे, तुमच्या राहत्या शहरापासून किती लांब आहे, जायला-यायला लागणारा वेळ, तसेच, छायाचित्रात दिसणार्या वास्तुबद्दल २ शब्द इ.इ. तर धागा अजून परिणामकारक होऊ शकतो. पुढच्या वेळी तसा प्रयत्न जरूर करावा ही विनंती.
so so!!
जयंतराव, अमेरिकेत आहात तर अजून येऊं द्या. फोटोंखाली वर्णन मात्र हवं, पोस्ट अपडेट कराल तर अजून मजा येईल.
ठिक ठाक.
छान फोटो आहेत. नायगार्याचा तर सुरेखच.
मला वाटते तो नायाग्रा नसावा ! अमेरिकन वॉटर फॉल असावा !
पण खुप डार्क आलेत / केलेत का?
कुठले आणि कशाचे आहे प्रकाशचित्र याचा काही बोध होत नाही. थोडी माहिती लिहा त्याबद्दल जमल्यास अजूनही.
जबर्दस्त प्रकाशचित्रे.....डोळ्यान्चे पारणे फिटले.
फोटो थाउसंड आयलंड आणि नायगाराचे वाटताहेत.
थाऊसंड आयलंड ह्या जागी नावाप्रमाणेच हजाराहून जास्त छोटी छोटी बेटं आहेत. पाच महाकाय तलावांपैकी एक ओंटारीयो तलाव संपून तिथून अटलांटीक महासागराला मिळणारी नदी जिथे सुरू होते तिथे ही जागा आहे. अतिशय रम्य ठिकाण. लोकांनी बेटांवर घरं बांधून कार च्या गॅरॅजच्या ऐवजी बोट गॅरॅज बनवलेलं आहे. काही काही बेटं तर खूपच लहान आहे. त्यामुळे 'बेट' शब्दाची व्याख्या ज्यावर किमान एक मोठं झाड आहे ते बेट अशी केली आहे. शिवाय अमेरिका कॅनडाच्या सीमेवर असल्यामुळे काही लोकांचं घर अमेरीकेत आणि आणि अंगण कॅनडात अशी 'इंटरनॅशनल' घरं सुद्धा आहेत.
छान च आहेत फोटो .. सर्व मिळून एक वेगळाच ईफेक्ट साधत आहेत..
फोटो मलाच दिसत नाहीत वाटतं. मिडीयाफायर ऑफीसातुन बॅन केलेले असावे.
सर्व फोटो अप्रतिम !!!
छान आठवणी
सर्वच आवडले !
-दिलीप बिरुटे
बेष्ट आहेत फोटो...
(तरीही ते काही कलाकुसर /प्रोसेस केलेले फोटो नैसर्गिकतेला बाधा आणतात असं वैयक्तिक मत)
हेच म्हणतो की वो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
आवडले फोटो. एका फोटोत गेटवे ऑफ इंडियासारखी कोणती इमारत आहे ती?
चौथा फोटो मस्त आलाय.
मस्त आली आहेत सर्व छायाचित्रे.
त्यातल्या त्यात शेवटचे फारच आवडले.
भारी फोटो, मस्त फोटो ! तुमच्या निसर्गात रमलो.
नायगरा खलास आहे चाय्ला!