Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

ड — डॉ. दत्ता फाटक, गुरुवार, 06/12/2014 - 17:18
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 ----- आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले , माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले , माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 -------- तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 -------- काही करू पहाता विपरीत होत आहे , माझे मला न उमगे का हे असेच होते माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------- 4 -------- माझ्या मनात आता सल एक वाहताहे , प्राषुन दु:ख सारे अंमृत वर्षताहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------5 -------- माझाच पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ---- 1 ------ डॉ . दत्ता फाटक .

प्रतिक्रिया द्या
1738 वाचन

💬 प्रतिसाद (6)
झ
झंम्प्या Tue, 06/17/2014 - 03:21 नवीन
कविता वाचून बुवांच्या एका गाण्याची आठवण झाली. "काटा रुते कुणाला...."
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Tue, 06/17/2014 - 03:22 नवीन
मला गझल म्हणायच होतं. काही कडवी वाचताना त्या गाण्याची आठवण झाली अस म्हणायचं होतं मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंम्प्या
म
मूकवाचक Fri, 06/20/2014 - 15:16 नवीन
आप, अरविंद केजरीवाल आणि आप समर्थकांच्या सद्य परिस्थितीबद्दल चपखल भाष्य करणारी गझल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंम्प्या
क
कवितानागेश Tue, 06/17/2014 - 08:36 नवीन
त्यात 'आयुष्य ओघळोनि मी रिक्त-हस्त आहे' अशी ओळ आहे.
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या गुरुवार, 06/19/2014 - 09:26 नवीन
"काही करू पहाता विपरीत होत आहे" मला ही ओळ वाचुन खालील कडव्याची आठवण झालेली. काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे || २ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
म
मदनबाण Wed, 06/18/2014 - 03:41 नवीन
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा