Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...!

व — वटवट, Tue, 06/17/2014 - 09:12
माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची... तुझ्या वेदनेला लागो ओढ माझ्या वेदनेची.... वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही.. सारे विसरून जाती , वेदना ते वर्म वाही.. डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे... साधू नाही, संत नाही, पाइक मी वेदनेचा... अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... १ तुझं.. माझं.. असं काही, असू नये वेदनेत.. तुझं जे माझंही तेच, सोसू बये वेदनेत.. अश्या सोसण्याने कमी, धार होते वेदनेची... धगसुद्धा कमी थोडी फार होते वेदनेची... तळहाती घ्यावे थोड्या, गार झाल्या वेदनेला... सांत्वनावरती राणी, स्वार झाल्या वेदनेला.. तुझ्या आसवांना मिळो, तोड माझ्या वेदनेची... २ सांजवेळी तळ्याकाठी, गाऊ गाणी वेदनेची.. दुनियेला ऐकवू गं, ही कहाणी वेदनेची.. भरभरून उधळू, दोघं साठा वेदनेचा... काट्यानं निघतो म्हणे, राणी काटा वेदनेचा.. काटेरी ह्या वाटेवर, खुलवू गं वेदनेला.. पंगू जरी झाली तरी, चालवू गं वेदनेला... आता अशा वेदनेला, तुझ्या माझ्या विना कोण?? वेदना तिथे नांदते जिथे नांदते गं मौन.. दोघे चाखूया गं फळं, गोड माझ्या वेदनेची... ३ - चेतन दीक्षित….!

प्रतिक्रिया द्या
2940 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अनुप ढेरे Tue, 06/17/2014 - 10:09 नवीन
मराठी कथालेखक हा तुम्चाच आयडी काय? त्या BDSM वाल्या कथेच्या कथेच्या पार्श्वभूमीवर ही वेदनेची कविता रोचक वाटली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 06/17/2014 - 10:12 नवीन
सुंदर लिहिलय. :) अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... या ओळी आवडल्या.
  • Log in or register to post comments
P
psajid Tue, 07/01/2014 - 07:38 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/01/2014 - 07:42 नवीन
तुझं.. माझं.. असं काही, असू नये वेदनेत.. तुझं जे माझंही तेच, सोसू बये वेदनेत
हे खासचं!
  • Log in or register to post comments
व
वटवट Wed, 05/13/2015 - 08:06 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/13/2015 - 09:56 नवीन
केवळ अप्रतिम ! डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे.. वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2015 - 10:02 नवीन
अप्रतिम .. वेदनेचे वेद ...
  • Log in or register to post comments
व
वटवट Tue, 06/16/2015 - 13:36 नवीन
सर्वांचे मनापासून आभार.. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 20:46 नवीन
अत्तिशय संपन्न !
  • Log in or register to post comments
व
वटवट गुरुवार, 06/25/2015 - 07:31 नवीन
आभारी आहे...
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 06/25/2015 - 08:55 नवीन
कल्पना खूप सुंदर! आणि लिहिलीही झकास!वेदना शब्द खुपच जास्त आलाय त्यामुळे अगदी जरा मीठ जास्त व्हाव तस झाल मला. आगौपना करून शेवटचे कडवे परत लिहू का? सांजवेळी तळ्याकाठी,गाऊ गाणी, दुनियेला ऐकवु ग,कहाणी वेदनेची. भरभरून उधळू,दोघं साठा प्रेमाचा, काट्यांन ग निघतो काटा वेदनेचा. काटेरी या वाटेवर,फुलवु ग रानफुले, पंगु जरी झाली तरी चालवू वेदनेला. ह्या वेदनेला सांग तुझ्या माझ्याविना कोण? मौनाच्या अंगणी सखे,वाढेल हे झाड, दोघं चाखुया ग गोड,फळं माझ्या वेदनेची. (तुम्ही लिहलेली कविता सुंदर आहेच. त्यामुळे हा प्रतिसाद खुप सिरियसली नका घेऊ. :) )
  • Log in or register to post comments
व
वटवट Fri, 06/26/2015 - 06:58 नवीन
रातराणीजी … खूप आभारी आहे… एक वेगळा प्रयत्न करून पाहिला होता… ही कविता मूलतः रंगमंचीय आहे… त्यामुळे सादर करताना प्रतिसाद छान मिळतो….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
व
वपाडाव Fri, 06/26/2015 - 10:13 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
व
वटवट Sat, 06/27/2015 - 07:07 नवीन
आभारी आहे.... :)
  • Log in or register to post comments
क
कौशिकी०२५ Sun, 06/28/2015 - 13:46 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा