मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???
अनेक दिवसांपुर्वी मराठी संस्थळावर एक धागा माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा विषय मला पडलेले प्रश्न अशा स्वरुपाचा होता. यात धागाकर्त्याने त्याला भेडसावणारे काही प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे ही अत्यंत अभ्यासपुर्ण अशी इतर सभासदांकडुन त्या धागाकर्त्याला मिळाली होती तेव्हापासुनच एक तीव्र इच्छा माझ्या ही मनात होती की आपण ही आपल्याला भेडसावणारे/पडणारे प्रश्न विचारुन बघावेत कदाचित आपल्याला ही आजतागायत माहीत नसलेली उत्तरे या निमीत्ताने सापडतील. अखेर आपला अनुभव माहीती ज्ञान हे इतक मर्यादीत आहे की त्यामुळे प्रश्नांना इतर ज्ञानी व्यक्तींसमोर मांडणे व उत्तर मिळतात का बघणे हा एक उत्तम पर्याय आहे. अर्थात मला पडलेले प्रश्न काहींना क्षुल्लक बिनमहत्वाचे वाटु शकतात पण माझ्यापुरते तरी मला त्यांची उत्तरे जाणुन घेण्याच कुतुहुल आहे. हे कुतुहल मिटवण्याच्या आकांक्षेने मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न आपणासमोर मांडतो. जाणकारांनी कृपया उत्तर देउन उलगडा कराव ही नम्र विनंती.
१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?
२-महाराष्ट्राच्या कले च्या इतिहासात लावणी तमाशा या लोककला दिसुन येतात मात्र भरतनाट्यम-कुचीपुडी सारख्या अभिजात शास्त्रीय (ज्यामध्ये सखोल नियमावली-ताल-संगीत-वेशभुषा-साधना-चिंतन अंतर्भुत असते) असे स्वरुप असलेली नृत्य कला महाराष्ट्रात का निर्माण वा विकसीत झाल्या नाहीत?यामागे कुठली मनोसामाजिक कारणे आहेत ?
३-अमेरीकेत एखाद्या कंपनीने लॉबींग करणे कायदेशीर आहे व वॉलमार्टने काही कोटी रुपये भारतात लॉबींग साठी खर्च केले अशी बातमी होती. राडीया टेप्स मधील नीरा ताइ या देखील लॉबींग करत होत्या. तर लॉबींग करता म्हणजे नेमक काय व कस करतात ? याची काही उदाहरणे मिळु शकतील काय ? की लॉबींग म्हणजे गावठी भाषेत संबधीत अधिकारी व्यक्तीचे हात ओले करुन काम फ़त्ते करणे इतकाच साधा असतो? व असे असल्यास तो अमेरीकेत कायदेशीर कसा मानला जातो? व भारतात या लॉबींग वरील खर्चाला मान्यता आहे का ? लॉबींग मध्ये काही चांगल्या अर्थाने ही इतर काही बाबी समाविष्ट असतात का ?
४- संपादित
५-नेसकॉफ़ी च्या व्हेंडीग मशीन मध्ये कॉफ़ी ज्यातुन पडते त्या नळीतुन सतत आत घुसुन साखरयुक्त पावडर खाण्यास चटावलेल्या मुंगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा ?
६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं?
७- हिंदी सिनेमात नायिकेने “ मै तुम्हारे बच्चे की मॉ बननेवाली हु “ असे उच्चारल्यावर नायक तिला नेहमी सच ? अस का विचारतो ? यात स्वनिर्मीती क्षमते बद्दलचा अविश्वास असतो की अजुन काय रहस्य असत ?
८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो?
९- मोटरसायकल मध्ये मागील व पुढील टायर मध्ये हवे चे प्रेशर वेगवेगळे मेंटेन करण्याची सुचना असते. असे वेगवेगळे प्रेशर ने हवा भरण्याच्या सुचनेमागे कोणते शास्त्रेय कारण असते ? याने काय साधले जात असते? दोन्ही टायर मध्ये समान प्रेशरने हवा भरल्याने काय व कशी हानी होउ शकते ?
10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते?
११- फ़ॅशन विक मध्ये एक ड्रेस डीझायनर कलेक्शन सादर करतो त्यानंतर त्याच्या कपड्यांची विक्री कशा पद्धतीने होत असते? म्हणजे हा बिझीनेस कसा चालतो नेमका ? एका कलेक्शन मध्ये समजा एक कुर्ता सादर करण्यात आला तर मग ऑर्डरनुसार त्याच्या अनेक कॉपीज विकण्यात येत असतात की काही वेळेस एखादा एकच पिस बनविण्यात आलेला असतो ? जे खरेदीदार असतात ते कोण असतात ? म्हणजे ते रेडीमेड गारमेंट विकणारया कंपनीचे प्रतिनीधी असतात की आणखी कोण ? व ते ती कंसेप्ट डिझाइन खरेदी करतात की आणखी काही? आणि या धंद्यात पेटंट कींवा कॉपीराइट असतो का ? नसल्यास कोणाचीही डीझाइन कोणीही कॉपी केली तर चालत का ?
१२- आय बी एम कंपनी ही सध्या जो धंदा करते तो नेमका कशाचा करते ? काय बनविते काय विकते काय सेवा पुरविते ? कारण या कंपनीच्या जाहीराती काही काळापुर्वी टीव्ही वर येत असत त्यांचा अर्थ काय होता तो आजपर्यंत फ़ार च कमी लोकांना कळलेला आहे अतिशय गुढ अशा जाहीराती आय बी एम कंपनीच्या होत्या.
१३- मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात येते म्हणजे एक टीम एका रुग्णाचे हार्ट ओपन करते मग दुसरी टीम दुसर काम करते अस काहीतरी .... हे मी केवळ ऐका ट्रेन मधल्या दोन जणांच्या संवादात अर्धवट अइकल होत. अस खरच होत का ? व नेमक कस होत असेल ? मला फ़ार उत्सुकता आहे जाणुन घेण्याची ही ऑपरेशन्स ची कशी पद्धत आहे व यात टीम्स च्या को ऑर्डीनेशन मध्ये चुक होत नसेल का ?
१४- मुंबई च्या सिनेजगतात आता पुरुषांचही लैंगिक शोषण होत आहे का ? व याचे प्रमाण वाढतय असा निष्कर्श आपण सोनु निगम च्या बातमी वरुन काढु शकतो का ? की ही फ़ारच अपवादात्मक अशी बातमी होती ?
१५- टुर डे फ़्रान्स व रेस अक्रॉस अमेरीका या सायकलींच्या रेसमध्ये सर्वश्रेष्ठ रेस कुठली आहे व कुठल्या कारणांमुळे ?
💬 प्रतिसाद
(84)
म
मारवा
Sat, 06/21/2014 - 18:18
नवीन
अरे चारागर म्हणजे उपचारक इलाज करणारा चारागिरी म्हणजे उपचार इलाज आता त्याला गुरेज होता म्हणुन तो उपचार करायलाच तयार नाहीये सोल्युशन प्रोव्हायडर इज रीलक्टंट टु प्रोव्हाइड सोल्युशन हीज अनविलिंगनेस टु ट्रीट इज पिनपॉइंटेड हीअर. वर्ना हमे जो गम थे वो लादवॉ न थे आमच्या ज्या वेदना दु:ख होती त्यावर इलाज नक्कीच उपलब्ध होता सोल्युशन ही होत आमची दु:ख ला-दवॉ म्हणजे ज्यावर इलाजच नाही अशी नव्हती प्रश्न उपचारकाच्या अनिच्छेचा होता.
आपण नाही म्हणत का की तु मनावर घेतल ना तर तुला नक्की शायरी चा आनंद घेता येइल,
हा शेर मी एफ टी आय आय पुणे च्या भिंतीवर लिहीलेला पाहीला होता फिल्म इन्स्टीट्युट ची पोर व्यवस्थापना वर काही कारणाने नाराज होती त्याच्या निषेधार्थ हा शेर भिंतीवर रंगविलेला होता.
असो. आता हा सोपा शेर घे चघळायला
कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता
मुलाकात का दिन बदलते बदलते.
असो
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 06/21/2014 - 20:15
नवीन
अगर कोई वादा खिलाफ़ी की हद है
हिसाब अपने दिलसे लगाकर तो देखो
कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता
मुलाक़ात का दिन बदलते बदलते.
मरीजे़ मुहोब्बत उन्हींका फ़साना
सुनाता रहा दम निकलते निकलते
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 06/21/2014 - 06:24
नवीन
उत्तर १३ )---- एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात तेंव्हा पहिला गट पहिल्या रुग्णाची छाती उघडतो त्याच वेळी त्या रुग्णाच्या डाव्या हातावर शल्यचिकीत्सकाचा दुसरा काम करीत असतो. डाव्या हाताची रक्त वाहिनी काढून त्याचे सर्व फाटे बंद केले जातात. त्याचा आतील पृष्ठ भाग साफ केला जातो आणि त्यातील रक्त प्रवाह सुरळीत आहे का ते पाहीले जाते.या वेळेपर्यंत पहिल्या गटाने छातीच्या त्वचेला छेद देऊन छातीचा पिंजरा करवतीने कापलेला असतो. छातीच्या फासळयाना रक्त पुरवठा करणारी रक्त वाहिनी( Internal Mammary Artery-LIMA / RIMA)वेगळी केलेली असते. हृदयाच्या आजूबाजूचे अवयव चिमट्यानी बाजूला केलेले असतात. या दोन्ही गोष्टी संपल्या कि डॉक्टर पांडा किंवा डॉक्टर प्रद्योत रथ हे येतात आणी LIMA/ RIMA आणी हाताची रक्त वाहिनी यांना हृदय चालू असताना हृदयाच्या रक्त वाहिनीला जोडतात. हे काम फार कौशल्याचे आहे आणी जगात फार थोडे शल्यचिकित्सक चालू हृदयावर काम करू शकतात ( जगभरात शंभर पेक्षा कमीच). त्यांचे हे काम चालू असे पर्यंत पहिला गट ज्याने हाताच्या रक्तवाहीनीवर काम केलेले आहे तो दुसर्या बाजूच्या शाल्य्क्रीयागृहामध्ये दुसर्या रुग्णाच्या हातावर काम सुरु करतो. आणी छाती उघडणारा गट त्याच्या छातीवर शल्यक्रिया चालू करतात. पहिल्या रुग्णाच्या रक्त वाहिन्या जोडण्याचे काम संपले कि डॉक्टर रथ किंवा डॉक्टर पांडा दुसर्या रुग्णावर रक्त वाहिन्या जोडण्याचे काम सुरु करतात. जर सर्व रुग्ण "चांगले" असतील. (चांगले --मधुमेह नाही, मूत्रपिंडाचा किंवा मेंदूचा विकार नाही वय त्यामानाने कमी-साठीच्या आतील ई ई )तर दोघे मिळून एक दिवसात आठ ते नऊ शल्यक्रिया सहज करतात. (सकाळी आठ ते रात्री आठ).
रुग्ण जर दुसर्या बायपासचा असेल( उदा. डॉ मनमोहन सिंग तर आधीच्या शल्यक्रीयेचे परिणाम ( हृदय किंवा रक्तवाहिन्या छातीच्या पिंजर्याला चिकटलेल्या असतात ते फार काळजीपूर्वक वेगळे करावे लागतात) तर दुपटीपेक्षा जास्त वेळ लागतो. हे म्हणजे जुन्या घराच्या फळ्या काढून साफ करून परत नवीन घरात वापरण्यासारखे जिकीरीचे असते.
वरील सर्व हकीकत चक्षुर्वाई सत्यं आहे कारण मी मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये दोन वर्षे क्षकिरण शास्त्राचा विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. आणी या सर्व रुग्णांना श्ल्याक्रीयेच्या आधी आणी नंतर पाहिलेले आहे दोन वर्षात साधारण ३,००० रुग्ण मी पाहीले आहेत. अर्थात गेल्या चार वर्षात यात काही अत्याधुनिक नवीन तंत्र आले असेल तर मला माहित नाही.(माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही)
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 06/21/2014 - 07:41
नवीन
सुबोध खरे आणि अदिती यांचे प्रतिसाद आवडले.
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Sun, 06/22/2014 - 09:04
नवीन
+१११
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 06/22/2014 - 11:54
नवीन
संपादनाचे एका अर्थाने स्वागत. काही आकडे घेऊन थोडा चिल्लरपणा सुरू झाला होता. पण यानिमित्ताने मिपावर वेगळा पुरुषविभाग व्हायला हवा का याबाबतीत थोडे जास्त गांभीर्याने आणि सकारात्मकपणे विचारमंथन व्हावे का असे वाटू लागले आहे.
नको असल्यास हा प्रतिसाद उडविण्यास माझी हरकत नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 06/23/2014 - 11:08
नवीन
अहो पुरुषविभागात थिल्लरपणा सोडून होणार काय नै का? शिवाय काही झालं तरी पुरुषांची थट्टा कुणी करत नाही. त्यामुळे पुरुषविभागाची मागणी ही बाय डेफिनिषण चुकीची आहे.
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 06/23/2014 - 16:30
नवीन
जर अनाहिता हे दालन इतक्या प्रगल्भपणे चालू शकते, तर पुरुषविभाग म्हणा किंवा जे म्हणायचेय ते म्हणा, तिथे मात्र फक्त कंबरेखालच्याच टवाळक्या, कुचाळक्या चालतील आणि संस्थळाच्या शूचिर्भूततेवर शिंतोडे उडतील असा पूर्वग्रहदेखील तितकाच चुकीचा आहे असे नमूद करतो. (अनाहिता कसे चालते हे माहीत नाही, उगाच तेवढ्या सुतावरून कुणी स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नये.)
आणि पुरुषविभागच का? इथे असेही प्रश्न येऊ शकतात ज्यात वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतरच्या सर्वच व्यक्तींचे हित असू शकते. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव होऊ शकण्याइतपत प्रगल्भपणा आणि समंजसपणा समाजात आला असेल तर मिपाने त्यापेक्षा अलिप्त भूमिका का घ्यावी असाही प्रश्न मनात आला आहे. पुन्हा एकदा, अशा ठिकाणी लैंगिक चर्चाच झडतील असेही ठसवणे अयोग्य आहे. वायफळाचे पीक उगवल्यास ते नखलून टाकण्यास संपादक मंडळ समर्थ आहेच.
म्हटलं तर तात्यांची 'रौशनी' किंवा रामदासांची 'पीसीजेसी' देखील सोज्वळतेच्या निकषांवर बसत नव्हत्या. पण तिथे कुचाळक्या किती झाल्या आणि लेखांचे स्वागत किती झाले हेही तपासून पहायला हरकत नाही. पुरुष म्हटला की तो थिल्लरपणाच करणार ह्या समजाला माझा विनम्र आक्षेप आहे.
असो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 06/23/2014 - 18:04
नवीन
+११११११११
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/24/2014 - 08:03
नवीन
काही असो. पुरुषविभागाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जातील. माझे म्हणणे खोटे ठरले तर त्यावेगळा दुसरा आनंद नाही.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 06/24/2014 - 08:27
नवीन
चक्क सहमत..!
पुरुष विभाग उघडला तर (उघडा..न उघडा.. मला काहीही फरक पडत नाही हे आधीच नम्रपणे नमुद करुन ठेवते..) तिथे केवळ आणि केवळ थिल्लरपणाच चालेल असं म्हणणं चुक ठरेल ह्याच्याशी सहमत..
इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.
तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 06/24/2014 - 09:21
नवीन
आणि
या दोन्ही मुद्द्यांशी सहमत. मलाही हेच म्हणायचं आहे. असो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/24/2014 - 10:47
नवीन
+११११११११११
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 06/24/2014 - 09:34
नवीन
चौथा प्रश्न का संपादित केला गेला हे कळायला मार्ग नाही .
मिपावर कामशास्त्राविषयी चौकशी करायला बंदी आहे का ? कामशास्त्र हा थिल्लर पणा आहे का ?
समजा उद्या मी वात्सायनाच्या कामसुत्रावर अभ्यासपुर्ण आणि सचित्र लेख लिहायचे ठरवले तर तोही संपादित केला जाणार का ?
अवांतर १: हिप्पोक्रसी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय आहे ?
अवांतर २: र.धो. कर्वे ह्यांचे साहित्य इन्टरनेटवर उपलब्द आहे काय ?
अवांतर ३: व्हजायना मोनोलोग चे मराठी (अपुणेरी) भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/24/2014 - 09:38
नवीन
अवांतर १: ढोंगीपणा.
अवांतर २: बहुतेक नाही.
अवांतर ३: बहुतेक तसे अजून कुणी केलेले नाही.
बाकी कामशास्त्र एट ऑल बद्दल सहमत आहे. त्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असावीत असेच वाटते एकूण होरा पाहता.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 06/24/2014 - 10:24
नवीन
तुमच्या त्या अकिलीसच्या पुढच्या भागाचे काय झाले ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/24/2014 - 10:27
नवीन
सध्या पुढील भागाचे अध्ययन सुरू आहे. माफ करा पण विषय फार मोठा आहे ओ. लिहायला वेळ लागतो त्याहीपेक्षा वाचायला वेळ लागतो. सध्या अगोदर ओडीसीपर्यंतची कथाच संपायला ४-५ भाग अजून लागतील. पुढचे तर अजून किती कायबाय आहे........
पण ओडिसीला या महिन्याअखेरीपर्यंत हात घालणार हे नक्की.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/24/2014 - 10:48
नवीन
वाट बघतोय :)
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 06/26/2014 - 10:55
नवीन
अवांतर ३ च्या उत्तराबाबत असहमत. मला वाटते 'योनीच्या मनीच्या गुज-गोष्टी' हे नाटक त्यावर बेतलेले आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/26/2014 - 11:13
नवीन
ते नाटकाचं नांव पेपरला नेहमी येतं हो, पण निदान या धाग्यावर तरी तो शब्द वर्ज्य दिसतोयं, म्हणून जरा सांकेतिक प्रतिसाद दिला होता *biggrin*
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 06/26/2014 - 13:35
नवीन
सॉरी शक्तिमान.. आमाला माहित नव्हते हो.. *biggrin*
( जल्ला मेला मिपावरच नव्हे या दुनियेतच हा लोचा आहे. कुठे काय वर्ज्य त्येचा कंफुजन होतंय सारखा.. ;) )
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/24/2014 - 10:56
नवीन
याचं मला ही कुतुहल आहे. या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला आणि चर्चा सुद्धा विधायक (पण रोमांचक) झाली. सो आय वंडर. प्रश्न पुनर्प्रकाशित होऊ शकतो का असा विचार मनात आला.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/24/2014 - 11:11
नवीन
>>या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला
पुलंनी म्हटलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व असतं. तसंच इथेही काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हा क्रायटेरिया असावा. तुम्ही नमूद केलेला धागा स्त्रीसदस्याने काढलेला असल्याने त्यात संबंधित मंडळींना निरागस भाव दिसला असावा. वरचा चौथा प्रश्न एका पुरुष आयडीने (पुरुष आयडी असल्याचं वाटतंय तरी) मांडला असल्याने तो थिल्लरपणा करण्यासाठीच काढला आहे असं वाटल्यास नवल नाही. ;)
तस्मात सम आर मोअर इक्वल हे एकदा लक्षात ठेवलंत की मिपावर वावरताना असले प्रश्न पडणार नाहीत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/24/2014 - 11:16
नवीन
सूडशी सहमत. सम आर मोर ईक्वल- नॉट ऑल गेट टु परेड देअर शॉव्हिनिझम अॅज़ "अनबायस्ड पोझिशन".
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/24/2014 - 12:33
नवीन
पोझिशन्स वरंच तर आक्षेप आहे!
तिथला हा प्रतिसाद पाहा :
आणि त्या खालचा हा उपप्रतिसाद !
चित्रगुप्तांनी तिथे फोटो पण एकदम भेदी टाकलेत. बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/24/2014 - 12:41
नवीन
अहो, एकदा का सम आर मोर ईक्वल हे ठरलं तर मग आमचा तो रोम्यांटिसिझम अन तुमचा तो पर्व्हर्ट बीभत्सिझम असंच होणार की. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही बोलता हे आणि हेच्च महत्त्वाचं असतं तिथे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/24/2014 - 12:58
नवीन
हे वाक्य, आणि तेही पिरानं म्हटलंय, म्हणजे प्रश्नोत्तरं सभ्यतेचे संकेत पाळून चालली असावीत असं वाटतं.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 06/24/2014 - 13:01
नवीन
काका तो तुमच्या साईडनीच बोल्तोय! आणि ह्या वेळेस चक्क मी पण..!!
सभ्यतेचे संकेत पाळले जात होते हे मान्य आहे! पण काही प्रतिसाद उडाले वगैरे असतील तर माहीत नाही..
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/24/2014 - 13:16
नवीन
लेखातूनच संपादित झाल्यानं तदनुषंगिक संपादन माझ्या आणि इतरांच्या प्रतिसादात झालंय.
बाकी पुणे कट्ट्याचे फोटो पाहता, मी काका कॅटेगरित (कोणत्याही अंगानं) बसत नाही!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 06/24/2014 - 13:18
नवीन
मी तुमच्या "अपीअरन्स" ला काका नाही म्हणाले..
असो...
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/24/2014 - 17:41
नवीन
*yes3*
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Tue, 06/24/2014 - 18:08
नवीन
हिप्पोक्रसी- दांभिकपणा. ढोंगीपणा म्हणजे pretentiousness.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/24/2014 - 18:31
नवीन
`सोनीच्या मनीच्या गोष्टी' नाटक पाहा.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 06/24/2014 - 12:53
नवीन
संक्षी आणि बॅटमॅनची कमाल आहे...जुगलबंदी जोरदार चाल्लेय
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2