Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

प
प्रचेतस
Fri, 06/20/2014 - 18:37
🗣 85 प्रतिसाद
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता. ठिकाण: शनिवारवाडा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे. शनिवारवाडा पाहून वेळ मिळाल्यास जवळच मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर बघून नंतर खादाडी कुठे करायची हे ठरवता येईल. शनिवारवाडा संध्याकाळी ६.०० वाजता बंद होतो ह्याची नोंद घ्यावी. ज्यांना लवकर येणे जमणार नाही ते संध्याकाळच्या खादाडीसाठी भेटू शकतील. मी, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा येत आहोत. अधिक माहितीसाठी मला किंवा आत्मुबुवांना व्यनि करावा.

प्रतिक्रिया द्या
55970 वाचन

💬 प्रतिसाद (85)
प
पैसा Fri, 06/20/2014 - 18:43 नवीन
आमच्या चहाची सोय करायचं लक्षात आहे ना?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/20/2014 - 18:47 नवीन
आता चहा शनिवारवाड्यावरच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 06/20/2014 - 18:50 नवीन
पुणेरी उत्तर. आता स.पे. मधला एखादा यजमान शोधणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 06/20/2014 - 18:55 नवीन
वडगाव बुद्रुक मधला एखादा यजमान शोधत नाहीत हे नशीब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/20/2014 - 19:45 नवीन
ऑंsssss *shok* पैसा ताई पण पुण्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 06/20/2014 - 19:49 नवीन
वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Fri, 06/20/2014 - 19:56 नवीन
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय! त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय) तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी. -नुत्काच पुनेकर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Fri, 06/20/2014 - 19:58 नवीन
नाय ब्वा. चहा पाजण्याचा आमचा वादा कायम हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/20/2014 - 19:58 नवीन
ह्हूंssss :-/ हे पिंपरी-गोवा युतिचं दु... दु.... कारस्थान आहे! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 06/20/2014 - 20:14 नवीन
युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/21/2014 - 05:05 नवीन
आपल्या इचाराचा इचार केला जाइल! ;) कोर कमिटी पुडे सदर इचार ..विणिमयासाठी ठेवनेत येइल! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 05:12 नवीन
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
च
चौकटराजा Sat, 06/21/2014 - 08:39 नवीन
पिंचीकडे " वजनदार" माणसे आहेत.ती सुद्धा सातवाहन कालीन शर्ट घालणारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 09:02 नवीन
=)) हो, आणि एक इरसाल म्हातारं पण आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
इ
इरसाल Sat, 06/21/2014 - 09:17 नवीन
वल्ली मी अजुन थोडा "तरुण" आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
त्रिवेणी Sat, 06/21/2014 - 11:33 नवीन
चहा न पिणार्याy अनहितांसाठी दुसरी काही सोय केली आहे का *unknw*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 11:34 नवीन
अरे बापरे...... *shok*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
त
त्रिवेणी Sat, 06/21/2014 - 11:38 नवीन
घाबरू नका. जुस, आइसक्रीम असे काही *clapping*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 11:42 नवीन
*ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
भ
भाते Fri, 06/20/2014 - 18:58 नवीन
सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा. सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 06/20/2014 - 19:14 नवीन
वा वा! कट्ट्यास शुभेच्छा! ता.क. साखरभात खाऊ नये.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 06/20/2014 - 19:57 नवीन
गुरुवारी किंवा शुक्रवारी ठेवला असता तर, नक्की आलो असतो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/20/2014 - 20:00 नवीन
शुक्रवारी त्यांचे उसगावात प्रस्थान होणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
पैसा Fri, 06/20/2014 - 20:21 नवीन
धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/21/2014 - 12:07 नवीन
पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 06/21/2014 - 13:13 नवीन
धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 13:18 नवीन
अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 06/21/2014 - 13:34 नवीन
स्वॅप्स धरणे धरायला येणार आहे. अनाहिता नव्हे! आमचा बेशर्त पाठिंबा हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Sun, 06/22/2014 - 09:16 नवीन
खांदा मिळाला दंबुक चालवायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Tue, 06/24/2014 - 13:34 नवीन
पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्... असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Tue, 06/24/2014 - 21:25 नवीन
स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध! आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 06/25/2014 - 07:58 नवीन
मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले. यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रेवती Fri, 06/20/2014 - 21:25 नवीन
हे काय? पैतै, पंतांच्या पत्नीने अनाहितावर हे सांगितले नव्हते. बघा, आता काही होऊ शकतय का.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 06/21/2014 - 04:25 नवीन
:D मी पण येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पैसा Sat, 06/21/2014 - 06:47 नवीन
भेटू नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ
र
रेवती Sat, 06/21/2014 - 14:03 नवीन
हां, मग ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ
ख
खटपट्या Fri, 06/20/2014 - 23:12 नवीन
शुभेछा !!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/21/2014 - 04:32 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 06/21/2014 - 04:40 नवीन
पुणे कट्ट्याचा धागा, तो पण वल्लीकडून ? चक्कर येउन पडतो आहे. शुद्धीवर आलो की उर्वरित प्रतिक्रिया देईन.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 06/21/2014 - 04:57 नवीन
हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 05:10 नवीन
=)) जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ध
धन्या Sat, 06/21/2014 - 05:11 नवीन
बदलला आहे तो. हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
श
श्रीरंग_जोशी Sat, 06/21/2014 - 05:50 नवीन
या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार. मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-). माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 06/21/2014 - 07:09 नवीन
नक्की येत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 06/21/2014 - 07:16 नवीन
अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 07:25 नवीन
कसबा गणपतीपाशी किंवा खुद्द शनिवारवाड्याच्या प्रांगणातच पागेची व्यवस्था आहे. तिथं बांधा घोडं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बाबा पाटील Sat, 06/21/2014 - 07:59 नवीन
आणखी एक शंका उद्या पालखी कुठे असेल ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/21/2014 - 08:02 नवीन
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ज
जेनी... Sat, 06/21/2014 - 08:14 नवीन
:(
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 06/21/2014 - 08:29 नवीन
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा