Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चांदोबाचा दिवा- (बालकविता)

व — विदेश, Fri, 06/20/2014 - 20:12
' आई ग आई , चांदोबाचा दिवा किती चांगला - उंच उंच आकाशात कुणी टांगला .. आई ग आई , चांदण्यांच्या पणत्या किती चांगल्या - उंच उंच आकाशात कुणी लावल्या .. आई ग आई , दे ग शिडी मला उंच उंच चढून - चांदोबा-चांदण्या आणीन मी काढून .. आई ग आई , चांदोबा-चांदण्या ठेऊन अंगणात - रात्री छान खेळेन त्यांच्या प्रकाशात .. .

प्रतिक्रिया द्या
3583 वाचन

💬 प्रतिसाद (11)
क
कानडाऊ योगेशु Fri, 06/20/2014 - 20:45 नवीन
छान,सुंदर,निरागस बालकविता.आवडेश!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 06/20/2014 - 21:15 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/21/2014 - 05:00 नवीन
+१ मस्स्स्स्त! *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
ए
एस Sat, 06/21/2014 - 07:38 नवीन
निरागसतेचा चांदोबा आजच्या काळात हरवत चाललाय, नाही?
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 06/21/2014 - 08:21 नवीन
कानडाऊ योगेशु, लीमाउजेट, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स..... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 06/21/2014 - 08:26 नवीन
कविता आवडली. पण हल्ली लहान मुलेही आपल्याला "सोलर सिस्टम" वगैरे माहिती सांगतात. त्यामुळे या बालकविता आजच्या बालकांसाठी नसून वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत असं एक वाटत राहतं :-)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/21/2014 - 09:23 नवीन
दॅटस द पॉइंट! संदीप खरेचं म्हणणं असं की त्याच्या बालकविता (अग्गो बाई ढग्गो बाई) हा मोठ्यांनी `मूलं काय विचार करतील ' अशी कल्पना करुन केल्याला कविता नाहीत. तर मुलांच्या मनात शिरुन त्यांच्या नजरेतून दिसणारं जग बघायचा प्रयत्न आहे. थोडक्यात, बालकविता आणि बालिश कविता यात फरक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
व
विदेश Sat, 06/21/2014 - 11:22 नवीन
आतिवास, संजय क्षीरसागर .. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/21/2014 - 12:34 नवीन
संदीपचा दृष्टीकोन तुम्हाला निश्चित उपयोगी होईल आणि तुमच्या कविता दर्जेदार होतील अशी आशा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदेश
प
पैसा Sat, 06/21/2014 - 13:16 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments
म
म्हैस Mon, 06/23/2014 - 13:13 नवीन
twinkle twinkle little star चा मराठी version .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा