Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ना केले

व — वैभवकुमारन, Sat, 06/21/2014 - 08:13
कीती पाप केले, कीती पुण्य केले कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले जरी जींकता मी हा डाव रडीचा कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले असा पोरका मी , जरी पोरका मी मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा तरी मुखी नाम मी 'राम' ना केले

प्रतिक्रिया द्या
2057 वाचन

💬 प्रतिसाद (9)
आ
आयुर्हित Sat, 06/21/2014 - 10:34 नवीन
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले आपली चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला. परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/21/2014 - 10:49 नवीन
परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sat, 06/21/2014 - 11:23 नवीन
आपले कोणतेही धर्मग्रंथ वाचलेत तर आपल्याला नक्किच कळेल की कुठे असतो हा परमेश्वर. फक्त त्यावर विचारमंथन करुन आपल्या दुसर्‍या प्रश्नाचेही उत्तर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 06/21/2014 - 12:59 नवीन
म्हणजे काय? अहो, इथे मी एकटाच तो प्रश्न विचारतो. धर्मग्रंथात तुम्हाला सापडला की कळवा पत्ता, जाऊ भेटायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sat, 06/21/2014 - 18:01 नवीन
ईश्वर (देव) म्हणजे काय? ईश्वर कसा पाहावा? ईश्वराचे पूजन कसे करावे? याबाबत सामान्यजनांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून अत्यंत सुंदरपणे दिलेली आहेत... जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।१।। तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।२।। मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।३।। ज्यासि अपंगिता नाही । त्यासी धरी जो -हदयी ।।४।। दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।५।। तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ।।६।। जे जीव दु:खाने रंजले-गांजले आहेत, त्यासी जो आपले म्हणतो, त्यांना आपल्या जवळ घेतो तोच साधू आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे मानावे. ज्याप्रमाणे लोणी आंतरबाह्य मृदु असते, त्याप्रमाणे सज्जनाचे चित्त असते. ज्याला कोणाचा आश्रय नाही, ज्याला कोणी जवळ करीत नाही, त्यांना तो आपल्या हृदयात धरतो, जवळ करतो. ज्याप्रमाणे तो आपल्या पुत्रावर प्रेम करतो तसेच प्रेम तो दास आणि दासीवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी किती म्हणून सांगू, ते साक्षात भगवंताची मूर्ती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 06/21/2014 - 20:21 नवीन
फक्त तुम्हाला असा भगवंत भेटला की कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sun, 06/22/2014 - 22:16 नवीन
धुंधला जायें जो मंझिले इक पल को तु नज़र झुका झुक जाये सर जहां वही मिलता है रब का रास्ता तेरी किस्मत तु बदल दे रख हिम्मत बस चल दे तेरे साथी मेरे कदमोंके है निशान तू ना जाने आसपास है खुदा साभार : तू ना जाने आसपास है खुदा Lyrics of Aas Pass Khuda Song
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 06/21/2014 - 10:43 नवीन
का फक्त कवितेचे मीटर गंडवले? *sad*
  • Log in or register to post comments
म
म्हैस Mon, 06/23/2014 - 12:51 नवीन
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले भावलं. चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?
ह्या प्रश्नाचं उत्तर मी पा वरच हजारदा देवून झालाय . पण आपली चूक असताना ती मान्य न करता उठसुठ परमेश्वराच्या नावाने कोकाल्नार्यांना काही लोकांच्या टाळक्यात ते शिरलं नाही किवा मग येडगाव घेवून पेडगाव ला जायची भारी हौस दिसतीये
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा