श्रद्धा म्हणजे...
श्रद्धा म्हणजे आधी असतो
कल्पनांचा भास
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
त्यां'चाच पहिला श्वास
श्रद्धा म्हणजे आधी असतो
जाणिवांचा खेळ
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
फुकट जाणारा वेळ
श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी
दो वक्ताची रोटी
श्रद्धा म्हणजे काही तोंडी
सहज पडलेली बोटी!
श्रद्धा म्हणजे काहिंसाठी
pre plan जुगारी अड्डा
श्रद्धा म्हणजे कुणासाठी
स्वत:च पडायचा खड्डा
श्रद्धा म्हणजे कुणी करतात
ठरवून मोठ्ठी होळी
श्रद्धा म्हणजे कुणी मारतात
ठरवून छुपी अरोळी
श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं
बिन रंगाचं कापड
श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना
बंन्द करणारी झापड
श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो
क्रुतीवरचा विश्वास
क्रुतीच करणे हा श्रद्धेचा
एकच धर्म..खास!
श्रद्धा म्हणजे हेतू तिथला
इहलौकिकच हवा
नायतर होउन बसते..ती
फुग्यातली...नुसतीच हवा!
श्रद्धा म्हणजे... हेतू'तं हवे
नीतीचे अधिष्ठान
नाहितर ते जुनं आहे की...
हज्जारो वर्षांचे दुकान!
अता प्रश्न इतकाच की..
नवे कसे हे द्यावे?
का..जुन्या नावे..नव्याचे
हे ही दुकानच काढावे!?
अता कळते श्रद्धा म्हणजे
स्व...क्रुतीचा खेळ
बराच जड जातो की हो....
स्वत:वर येता वेळ!
जाउ दे ही कविताच समजा
म्हणजे "मी ही" ..सुटेन!
आलच परत डोक्यात 'वेड'
तर पुन्हा नक्की भेटेन!!!
================
💬 प्रतिसाद
(52)
प
पैसा
गुरुवार, 06/26/2014 - 19:37
नवीन
पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या.
तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!
- Log in or register to post comments
म
म्हैस
Fri, 06/27/2014 - 11:17
नवीन
महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2