Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कैफ़ियत..

V — vaibhav deshmukh, Tue, 06/24/2014 - 10:01
कैफ़ियत.. प्रिये तु विचारतेस.. तु आज अस्वस्थ कसा? तुझ्य़ा चेहरय़ावरचा भाव अस्थिर कसा? भिजलेल्या ओल्या पापण्य़ा मुद्रेवर विखुरलेल्या रेषा काळाच्या चक्रात कैद नजर आणि मनस्तापाने सोडलेला प्रचंड तप्त सुस्कारा या तुझ्य़ा सार्;य़ा मलुल जिंदगीचा या उन्मादाचा हा अर्थ कसा? प्रिये.. मी मान्य करतो माझा अस्वस्थपणा आणि स्वीकारतोही तुझ्य़ा तगमगत्या मनाची चिंतातुरता तुला हवे आहे माझ्य़ा मुद्रेवरच्या भल्यामोठ्या प्रश्नचिन्हाचे एक वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण म्ह्णुनच; काहीश्य़ा हाताशतेने तुझ्य़ासमोर मांडतो त्या प्रश्नचिन्हाची एक वस्तुनिष्ठ कैफ़ियत... "तुलाही कबुल असेल या जिंदगिवरची माझी अपेक्षा या अपेक्षेच्या पुर्तीसाठी पायदळी तुडविलेल्या दाही दिशा न तगमगता स्थिर राहुन विजयी पहाटॆच्या स्वागताची केलेली मी अखंड प्रतिक्षा देशोधडीच्या कित्येक कथा पुराणॆ ऎकुनही न उन्मळ्ता केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि गांधींमार्गावरुन कित्येक कार्यालयाचे ठोठावलेले दारे पण; त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणॆच मलाही डावलले प्रत्येकाने आणि स्वीकारले ज्यांच्या खिशातच केवळ गांधी निवासीत होते प्रिये.. तेव्हाच हारलो मी माझ्य़ाच प्रामाणिक तत्वज्ञानाने तेव्हा तु माझ्य़ा शॊकांतिकेवर ढाळलेले अक्ष्रु आजही मला भासतात माझ्य़ा देहावर टाकलेले तु अक्ष्रुफ़ुले... वैभव देशमुख २३८

प्रतिक्रिया द्या
1069 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/24/2014 - 10:05 नवीन
हे नक्की काय आहे? कविता/मुक्तक/लेख/धडा? आणि हे हिंदी आहे की मराठी?
  • Log in or register to post comments
V
vaibhav deshmukh Tue, 06/24/2014 - 10:36 नवीन
एक मुक्त कविता.. जिच्यात मला शब्दापेक्षा अनुभव, व्याकरणापेक्षा आशय आणि भाषेपेक्षा भावना महत्वाच्या वाटतात. धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
सस्नेह Tue, 06/24/2014 - 10:22 नवीन
हा मुक्त पद्य लेख असावा...
  • Log in or register to post comments
V
vaibhav deshmukh Tue, 06/24/2014 - 10:48 नवीन
कदाचित....पण कविता नक्की आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा