भारत वि. इंग्लंड क्रिकेट मालिका - २०१४
भारत व इंग्लंड यांच्यात इंग्लंड येथे २६ जून २०१४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
या मालिकेत भारत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने व एक २० षटकांचा सामना खेळेल. तसेच स्थानिक संघांविरूद्ध दोन ३-दिवसीय सामने व १ एकदिवसीय सामना आयोजित केलेला आहे.
भारत २६ जून पासून लिस्टरशायर विरूद्ध ३ दिवसांच्या सामन्याने मालिकेचा शुभारंभ करेल व ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याने मालिकेची सांगता होईल. एकूण ७४ दिवसांचा प्रदीर्घ दौरा आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी भारत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका १९९१-९२ मध्ये खेळला होता. त्यानंतर बहुतेक सर्व मालिका २, ३ किंवा जास्तीत जास्त ४ कसोटींच्या होत्या.
भारताचा कसोटी संघ असा आहे.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), वरूण एरॉन, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, गौतम गंभीर, रविंद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईश्वर पांडे, पंकज सिंग, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, मुरली विजय
दौर्याचे वेळापत्रक
सराव सामने
२६ जून - २८ जून वि. लिस्टरशायर
१ जुलै - ३ जुलै वि. डर्बीशायर
कसोटी सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होतील)
पहिला कसोटी सामना : ९ जुलै - १३ जुलै (स्थळ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
दुसरा कसोटी सामना : १७ जुलै - २१ जुलै (स्थळ - लॉर्ड्स, लंडन)
तिसरा कसोटी सामना : २७ जुलै - ३१ जुलै (स्थळ - रोझ बाऊल, सदम्पटन)
चौथा कसोटी सामना : ७ ऑगस्ट - ११ ऑगस्ट (स्थळ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
पाचवा कसोटी सामना : १५ ऑगस्ट - १९ ऑगस्ट (स्थळ - केनिंग्टन ओव्हल, लंडन)
एकदिवसीय सराव सामना
२२ ऑगस्ट - वि. मिडलसेक्स
५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होतील)
(१) २५ ऑगस्ट (ब्रिस्टल)
(२) २७ ऑगस्ट (कार्डिफ)
(३) ३० ऑगस्ट (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
(३) ०२ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
(३) ०५ सप्टेंबर (हेडिंग्ले, लीड्स)
आंतरराष्ट्रीय ट-२० सामना (भा.प्र.वे. नुसार संध्याकाळी ७:३० वाजता)
(१) ०७ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
भारतीय संघात एकूण ६ मध्यमगती गोलंदाज आहेत (वरूण एरॉन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, पंकज सिंग, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा). या व्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी हा देखील मध्यमगती गोलंदाजी टाकतो. अश्विन व जडेजा हे दोनच फिरकी गोलंदाज संघात आहेत. रोहीत शर्मा देखील कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करतो आणि विराट कोहलीच्या गोलंदाजीत काहीही दम नसला तरी धोनी त्याला प्रत्येक सामन्यात काही षटके तरी गोलंदाजी करायला लावतो. स्वतः धोनीसुद्धा रनअप् घेऊन गोलंदाजी टाकू शकतो.
संघात धोनीव्यतिरिक्त वृद्धिमान साहा व अजिंक्य रहाणे असे दोन यष्टीरक्षक आहेत. जडेजा व काही प्रमाणात अश्विन हे अष्टपैलू खेळाडू आहेत. उरलेले सर्व निखळ फलंदाज आहेत.
गौतम गंभीरचे पुनरागमन झाले आहे. परंतु मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी इ. ची निवड धक्कादायक आहे. मुरली विजय परदेशात फारसा यशस्वी ठरलेला नाही. रोहीत शर्मा देखील परदेशात फारसा यशस्वी नाही. ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. परंतु नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँड विरूद्धच्या मालिकेत त्याने परदेशात २ वेळा एका डावात ६ बळी मिळविल्याने त्याची वर्णी लागली असावी. महाराष्ट्राच्या केदार जाधवने रणजी स्पर्धेत धावांचा रतीब ओतला होता. पण त्याला कसोटी संघात न घेता नुकत्याच संपलेल्या बांगलादेश विरूद्ध झालेल्या एकदिवसीय संघात घेतले व एकही सामन्यात न खेळविता परत आणले. मुरली विजयऐवजी तो चालला असता. तसेच अजून एखादा फिरकी गोलंदाज हवा होता (अमित मिश्रा, हरभजन सिंग किंवा अक्षर पटेल). अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवरचा वाघ आहे. त्याने आतापर्यंत मिळविलेल्या बळींपैकी ८० टक्क्यांहून अधिक बळी भारतात मिळविलेले आहेत. परदेशात तो चालत नाही. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँडमधील मालिकेत ५ एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त २ बळी मिळविले होते. कसोटी सामन्यात देखील तो निष्प्रभ ठरला होता. एकंदरीत मुरली विजय, शिखर धवन, रोहीत शर्मा, अश्विन, जडेजा इ. मंडळी भारताबाहेर अनेकवेळा निष्प्रभ ठरलेली आहेत. मध्यमगती गोलंदाजात विनयकुमारला संधी हवी होती. पण त्याला, मोहीत शर्माला व उमेश यादवला संधी मिळालेली नाही. विनयकुमारने रणजी स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्याऐवजी तब्बल ५ महिने क्रिकेट न खेळलेल्या ईशांत शर्माला घेऊन निवडसमितीने काय मिळविले खुदा जाने.
कसोटीत साधारणपणे खालील संघ असेल असे वाटते.
गंभीर, धवन/मुरली विजय, पुजारा, कोहली, रहाणे, धोनी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरूण एरॉन्/ईशांत शर्मा.
इंग्लंड सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. ६ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मायदेशात ५-० असा सपाटून मार दिला. त्यानंतर न्यूझीलँड मध्ये इंग्लंडला न्यूझीलँडला हरविण्यात यश आले नाही. कालच संपलेल्या मायदेशातील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत श्रीलंकेने इंग्लंडला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ व कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मात दिली. इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा फारच वाईट ठरला. ०-५ असा मानहानिकारक पराभव झाला. पण त्याबरोबर अपयशामुळे व नैराश्यामुळे जोनाथन ट्रॉट दौरा अर्धवट सोडून परतला, तर ग्रॅमी स्वॅनने अकाली निवृत्ती घेतली. कुक गेल्या ९ कसोटी सामन्यात बहुतेक डावात अपयशी ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियातील अपयशामुळे केव्हिन पीटरसनला डच्चू देण्यात आला. अँडरसन व ब्रॉडला मायदेशी खेळत असूनही गोलंदाजीत फारसे काही करून दाखविता आलेले नाही. सध्या फक्त इयान बेल व काही प्रमाणात जो रूट सातत्य टिकवून आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविण्याची भारताला सुवर्णसंधी आहे.
२०११ व २०१२ च्या कटू आठवणी अजून ताज्या आहेत. इंग्लंडमधील २०११ च्या मालिकेत भारत सर्व म्हणजे ४ कसोटी सामने हरला होता. ५ एकदिवसीय सामन्यांपैकी भारत ३ सामने हरला होता, एक बरोबरीत सुटला होता व एक पावसामुळे रद्द झाला होता. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. धोनी, अश्विन, गंभीर, जडेजा, कोहली, ईशांत शर्मा वगळता इतर खेळाडू आताच्या संघात नाहीत. त्यानंतर २०१२ मधील भारतातील मालिकेत इंग्लंडने भारताला २-१ अशी मात दिली होती. सध्या भारताच्या फलंदाजीची मदार फक्त पुजारा, कोहली व काही प्रमाणात रहाणे यांच्यावर आहे. बाकीच्यांची अजिबात खात्री नाही. गोलंदाजीत फक्त भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी हेच काहीतरी करून दाखवतील. इतर फारसे प्रभावी पडतील असे वाटत नाही. फिरकी गोलंदाजांचा तर आनंदच आहे.
या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४ मध्ये भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!
💬 प्रतिसाद
(129)
प
प्रचेतस
गुरुवार, 07/17/2014 - 11:57
नवीन
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत खेळण्यासाठी आवताण द्यावे.
इथल्या काही मिपाकरांना(मी नव्हे) त्याच्याशिवाय करमत नाही.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/17/2014 - 11:46
नवीन
भारताची फलंदाजी
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 07/17/2014 - 13:54
नवीन
शिखर धवनला पुढच्या कसोटीत घेतील, असे वाटत नाही.
त्याची ३ डावातील कामगिरी पाहून गंभीरला आनंद झाला असेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/18/2014 - 09:35
नवीन
रहाणे काल मस्त खेळला. त्याला बरेच दिवस कुजवले होते. पण मागील वर्षापासून कसोटीत संधी मिळताच त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली (आतापर्यंत ७ कसोटीत ३ अर्धशतके व २ शतके). धवन पूर्ण अयशस्वी ठरतोय. पुढच्या डावात त्याने धावा केल्या नाहीत तर गंभीर नक्की आत येईल. पुढच्या कसोटीत जडेजा किंवा बिन्नीऐवजी अश्विन नक्की आत येणार. कोहलीला साधारणपणे मालिकेच्या उत्तरार्धात सूर सापडतो. तो बहुतेक तिसर्या कसोटीपासून फॉर्मात येईल. सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 07/18/2014 - 11:14
नवीन
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.
-त्याचा इरफान पठाण होऊ नये, ही सदीच्छा!!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 07/18/2014 - 13:32
नवीन
कूक का क्या होगा?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/18/2014 - 17:16
नवीन
जर कुकची कामगिरी सुधारली नाही किंवा जर इंग्लंडला ही मालिका जिंकण्यात अपयश आले तर कुकची कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊन (कदाचित संघातूनही हकालपट्टी होऊ शकते), इयान बेल कर्णधार होऊ शकतो. कदाचित ही मालिका संपण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 07/19/2014 - 17:52
नवीन
सामना चांगल्या अवस्थेत आहे. तिसर्या दिवशी दोन्ही संघाचे डाव संपून भारत २४ धावांनी मागे आहे. पण दुसर्या डावात आतापर्यंत भारत १ बाद १०७ अशा उत्तम स्थितीत आहे. सामना निर्णायक होण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसअखेर भारताकडे अंदाजे १६० धावांची आघाडी असेल. उद्या ४ थ्या दिवशी भारताने चहापानानंतर १ तास खेळून अंदाजे ३७५ धावांचे आव्हान दिले तर ५ व्या दिवशी इंग्लंडला हिरव्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे.
इंग्लंडतर्फे अॅण्डरसन (आतापर्यंत ३ डावात ९ बळी व २ डावात १०० धावा) व भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (आतापर्यंत २ डावात ११ बळी व ३ डावात १५७ धावा) जबरदस्त कामगिरी करत आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/20/2014 - 16:51
नवीन
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला आजच्या उर्वरीत २ तासात व उद्या ५ व्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या ३१९ धावा करणे अवघड आहे. भारताला सामना जिंकून मालिकेत सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर पुन्हा एकदा चमकला. २ कसोटीत ४ डावात २०० हून अधिक धावा (त्यात ३ अर्धशतके) आणि आतापर्यंत ११ बळी ही जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आहे. मुरली विजय सुद्धा उत्तम खेळतोय. कोहली अजून अयशस्वी आहे (अनुष्काचा पायगुण ?). परंतु मालिकेच्या उत्तरार्धात तो नक्की भरात येईल.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Mon, 07/21/2014 - 16:28
नवीन
भारताचा इंग्लंड्वर अद्भुत, संस्मरणीय विजय.
जबरदस्त झाली कसोटी
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 07/21/2014 - 18:02
नवीन
मस्त जिंकलो. कालच लिहिल्याप्रमाणे आज भारताला चांगलीच संधी होती. अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 07/21/2014 - 18:18
नवीन
आणि मग-
धन्य!!
अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 07/22/2014 - 09:55
नवीन
काल ईशांतने चांगली गोलंदाजी केली हे मान्य आहे. परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे. त्याला कालच्या विजयाचे क्रेडीट आहेच. त्याच्याबरोबरीने भुवनेश्वर कुमारलाही (४४ आणि ५२ धावा आणि पहिल्या डावात ५ बळी) सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता. पहिल्या कसोटीतही भुवनेश्वरला डावलून जेम्स अॅण्डरसनला सामनावीर पुरस्कार दिला होता (भुवनेश्वर ५८ आणि नाबाद ६३ धावा आणि पहिल्या डावात ६ बळी).
>>> >>> अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.
काल भुवनेश्वर कुमार खूप बळी मिळवेल असे वाटत होते. प्रत्यक्षात त्याला एकही बळी मिळाला नाही.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 07/22/2014 - 10:09
नवीन
सहमत..
कालचा विजय त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरो .. आणि याआधीचा "तो" ईशांत परत न येवो!! :-)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 07/22/2014 - 20:38
नवीन
सहमत. *good*
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 07/24/2014 - 07:57
नवीन
त्याची "केस" फारच डोळ्यावर आणी हाताबहेर झाली होती आता "सावरून" जाग्यावर येईल अशी अपेक्षा.
पण काही करा भुवीचा "पठाण" करू नका!!
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 07/25/2014 - 16:05
नवीन
बर्याच लोकांना धक्का बसला आहे म्हणे इशांतच्या खेळण्याचा! त्याने पाँटिंगची काय भंबेरी उडवली होती ती तरी आठवायची!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/25/2014 - 17:21
नवीन
त्याने पॉंटिंगची एकाच डावात भंबेरी उडविली होती आणि ती सुद्धा जानेवारी २००८ मध्ये (म्हणजे तब्बल साडेसहा वर्षांपूर्वी). त्यानंतर किमान २०१३ अखेरीपर्यंत तो फारसा चमकला नाही. काही सामने तर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे आपण हरलो. उदाहरणार्थ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४७ धावा हव्या होत्या व त्यांचे ६ खेळाडू बाद झाले होते. दुसर्या कोणत्याही संघाने इतका हातात आलेला सामना क्वचितच घालविला असता. त्या सामन्यात इशांत शर्माने ४८ वे षटक टाकताना सर्व चेंडू लेगस्टंपवर आखूड टप्प्याचे किंवा फुल्टॉस या प्रकारचे टाकले. त्यात १ नोबॉलही होता ज्यावर फ्रीहिट सुद्धा मिळाली. समोर फॉकनर होता. त्याने त्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून उर्वरीत २ षटकांत फक्त १३ धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण करून शेवटी जवळपास पूर्ण हरलेला सामना जिंकून दाखविला.
इशांतची कामगिरी जानेवारी २००८ नंतर फारशी चांगली नव्हती. अर्थात २०१४ मध्ये तो सुधारल्यासारखा वाटतोय. जानेवारी २०१४ मध्ये द. आफ्रिकेत त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४ बळी व दुसर्या डावात १ बळी अशी चांगली गोलंदाजी केली. नंतर न्यूझीलँडमध्ये दोन्ही कसोटीतल्या एकेका डावात ६-६ बळी मिळवून २ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळविले. आणि सध्याच्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३ व दुसर्या कसोटीत ७ बळी मिळवून "सामनावीर" झाला. एकंदरीत तब्बल ६ वर्षांनी परदेशात त्याला बळी मिळायला लागलेत. त्याचा हाच फॉर्म कायम रहावा हीच सदिच्छा!
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 07/29/2014 - 10:50
नवीन
फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Mon, 07/21/2014 - 18:22
नवीन
लॉर्डस वर जिंकले..
अच्छे दिन !
स्वाती
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 07/22/2014 - 10:02
नवीन
पंचांचे काही निर्णय भारताविरूद्ध गेले नसते तर अजून सहज व लवकर सामना जिंकला नसता. दुसर्या डावात रहाणेच्या आर्म गार्डला लागून उडालेल्या चेंडूवर त्याला चुकीचे बाद दिले गेले. इंग्लंडच्या दुसर्या डावात ४ थ्या दिवशी मोईन अली जडेजाच्या गोलंदाजीवर अगदी अचूक पायचित झाला होता. पायावर चेंडू बसला तेव्हा तो क्रीजच्या आतच होता आणि रिप्लेमध्ये तो चेंडू मधल्या यष्टीवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. तरीसुद्धा धर्मसेनाने त्याला बाद दिला नव्हता. त्याच मोईन अलीने पुढे तब्बल २ तास खेळून १०१ धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या दिशेने न्यायला सुरूवात केली होती.
या सामन्या साठी डी आर एस प्रणाली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. जगात फक्त भारताचा डी आर एस ला विरोध आहे. या विरोधाचे कारण अनाकलनीय आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 07/22/2014 - 11:08
नवीन
कूक- फॉर्म परत येतोय बहुतेक.... (संघातील स्थान राहील, कर्णधारपद जाऊ शकते, पण सध्यातरी इंग्लंडकडे दुसरा कर्णधार दिसत नाहिये.)
धवन-दुसर्या डावातील मोजक्या धावांचा फार उपयोग होईल असे वाटत नाही, गंभीर वाट पाहतोय.
बिन्नी-सध्या फक्त ३ पूर्ण गोलंदाज (भुवनेश्वर, शमी, इशांत), अन् २ 'फलंदाज-गोलंदाज' किंवा 'गोलंदाज-फलंदाज' (जडेजा अन् बिन्नी) आहेत. बहुतेक बिन्नी/जडेजा पैकी एकाला बसवून अश्विनला अंतिम संघात घेतील. (तो बर्यापैकी फलंदाजी सुद्धा करू शकतो.) भुवनेश्वरसुद्धा अडीनडीला उपयोगी पडू शकतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 07/22/2014 - 17:56
नवीन
धवनला अजून एका कसोटीत संधी मिळेल. त्यातही तो अपयशी झाला तर गंभीर नक्की आत येईल.
तिसर्या कसोटीत बिन्नीच्या जागी अश्विन आत यायची शक्यता आहे.
इंग्लंडची तिसर्या कसोटीआधीच एक विकेट पडली आहे. तिसर्या कसोटीसाठी मॅट प्रॉयर च्या जागी जॉस बटलर ला यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे. बेन स्टोक्स च्या जागी ख्रिस जॉर्डन किंवा ख्रिस वोक्स येण्याची देखील शक्यता आहे.
इंग्लंडने खरं तर केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट ला परत बोलवायला पाहिजे. जमल्यास ग्रॅमी स्वानला देखील निवृत्ती रद्द करून परत बोलवावे. भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 07/23/2014 - 07:15
नवीन
त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे).
त्यातच हल्लीच त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता असे मित्राकडुन ऐकले होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/23/2014 - 09:11
नवीन
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे).
लघुशंका हे कारण नसावे कारण अॅण्डरसन, पीटरसन आणि अजून एक खेळाडू या तिघांनी देखील रात्री मैदानात जाऊन खेळपट्टीवर लघुशंका केली होती. त्यातला अॅण्डरसन अजूनही संघात आहे. बहुतेक पानसरे फॉर्मात नसावा. अन्यथा भारताविरूद्ध त्याला नक्की घेतले असते.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 07/23/2014 - 09:18
नवीन
एक शंका: खेळपट्टी आणि पबातला बाऊन्सर. काही फरक करत नाही का आपण? ;)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/23/2014 - 09:23
नवीन
दारूच्या नशेत खेळपट्टीवर केलेली लघुशंका असो वा दारूच्या नशेत वरच्या मजल्यावरून सोडलेली धार असो (एका बाऊन्सरच्या दुर्दैवाने तो नेमका त्याच धारखाली सापडला), दोन्ही कृती सारख्याच किळसवाण्या आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 07/28/2014 - 17:36
नवीन
तिसर्या कसोटीसाठी इंग्लंडने परत पाटा खेळपट्टी बनविली. इंग्लंड बहुतेक ५५० च्या आसपास डाव घोषित करेल असं वाटतंय. बिन्नीच्या जागी अश्विनला न घेता रोहीत शर्माला घेण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अश्विन व रोहीत च्या फलंदाजीत फार फरक नाही, पण गोलंदाजीत खूप फरक आहे.
पंकज सिंगचं दुर्दैव. त्याच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले व एक अत्यंत स्पष्ट असलेला पायचितचा निर्णय पंचांनी नाकारला. डी आर् एस् असती तर पायचित चा निर्णय भारताच्या बाजूने लागला असता. भारताचा डी आर् एस् असलेला विरोध अनाकलनीय आहे. तंत्रज्ञान हाताशी असून वापरायचे नाही या निर्णयामागे काहीच तर्कशुद्ध कारण नाही. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले श्रीनिवासन्, राजीव शुक्ला इ. मंडळी बीसीसीआय वर नागोबा सारखी वेटोळे घालून बसलेली आहेत. बीसीसीआय ची सूत्रे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या हातात असती तर असे अनाकलनीय निर्णय झाले नसते आणि कदाचित भ्रष्टाचारही कमी झाला असता. असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 07/29/2014 - 17:14
नवीन
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट लागलेली दिसतेय (आतापर्यंत ५ बाद २१७). एकटा रहाणे अर्धशतक काढून खिंड लढवतोय. मुरली विजय, पुजारा, कोहली आणि रोहीत शर्मा एक तासापेक्षा अधिक वेळ खेळून आणि प्रत्येक जण किमान ५२ चेंडू खेळून स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या न करता बाद झाले. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑफ किंवा मधल्या यष्टीवर पडून बाहेर जाणारे चेंडू खेळणे त्याला अशक्य होताना दिसतंय. पुढच्या डावात काही केलं नाही तर गंभीर नक्कीच आत येणार.
एकंदरीत परिस्थिती कठीण आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 07/29/2014 - 17:16
नवीन
रहाणे पण गेला.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/30/2014 - 04:33
नवीन
कालच्या विकेटा टाकण्याची शैली पाहता आज फॉलॉअन नक्की.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/30/2014 - 09:15
नवीन
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी इंग्लंड फॉलोऑन न देता अंदाजे ३ तास फलंदाजी करून १६०-१७० धावा करून डाव घोषित करेल व दुसर्या डावात अंदाजे ८ तासाच्या खेळात भारतापुढे ३७५-४०० धावांचे आव्हान ठेवेल.
२००१ मध्ये कलकत्त्यात दुसर्या कसोटीत स्टीव्ह वॉ ने भारताला फॉलोऑन दिला होता आणि नंतर भारताने लक्ष्मण-द्रविडच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर ५ व्या दिवशी १ तासानंतर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३००+ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भज्जीच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळून भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इतर सर्व देश फॉलोऑन देणे शक्य असूनही ५ व्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी टाळण्यासाठी फॉलोऑन न देता फलंदाजी करतात.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 07/30/2014 - 09:30
नवीन
२००८ च्या चेन्नई कसोटित भारताने चौथ्या डावात ३८० चं आव्हान आरामात पार केलं होतं. (सेहवागमुळे ते शक्य झाले होते)
त्यामुळे इंग्लंड ४५० पेक्षा कमी आव्हान ठेवील असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/30/2014 - 09:48
नवीन
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती नव्हती. इंग्लंडने अंदाजे ७ तासात भारताला ३७५ धावांचे आव्हान दिले तेव्हा भारताला ५ व्या दिवशी फलंदाजी करणे अवघड जाईल असाच इंग्लंडचा अंदाज होता.
तसेच भारत हे आव्हान न स्वीकारता बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णित ठेवायचा प्रयत्न करेल असाही इंग्लंडचा अंदाज होता. त्याला कारणही तसेच होते कारण भारताने भूतकाळात फक्त ४ वेळा ४ थ्या डावात ५ व्या दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. (१९७६ मध्ये विंडीजमध्ये तिसर्या कसोटीत ४०४ धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. त्यात गावसकर व विश्वनाथचे शतक, मोहिंदरचे अर्धशतक व ब्रिजेश पटेलच्या नाबाद ४९ धावांचा वाटा होता. नंतर १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताने ५ व्या कसोटीत ४७६ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. नंतर १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ४ थ्या कसोटीत ४३९ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ४२९ पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये भारतात मद्रासमध्ये तिसर्या कसोटीत भारताने ३४८ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ३४७ धावा करून इतिहासातला केवळ दुसरा कसोटी सामना बरोबरीत सोडविला होता.)
मात्र इतर प्रसंगी भारताने कच खाऊन ५ व्या दिवशी बचावात्मक खेळ करून सामना न हरण्याची दक्षता घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. १९८६ मध्ये इंग्लंडमधील ३ रा कसोटी सामना, १९९३ मध्ये आफ्रिकेतील ४ था कसोटी सामना, नंतर २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील ३ रा कसोटी सामना, २०११ मध्येच विंडीजविरूद्ध विंडीजमधील ३ रा कसोटी सामना इ.).
त्यामुळेच कदाचित भारत ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करण्याचे धाडस करणार नाही असे गृहीत धरून स्ट्रॉसने डाव घोषित करून आव्हान दिले होते. पण सेहवागच्या ५८ चेंडूत ८५ धावा व सचिनचे नाबाद शतक यामुळे भारताने ३७५ धावांचे आव्हान लीलया पार करून सामना जिंकला. अर्थात त्या सामन्यात खेळपट्टी पाटा होती हे सुद्धा विसरून चालणार नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/30/2014 - 17:17
नवीन
जिंकायला ४४५ करायच्यात. अत्यंत अवघड लक्ष्य आहे. जवळपास १२० षटके ८ तासात खेळायची आहेत. जिंकणे जवळपास अशक्य आहे. सामना वाचविण्याची शक्यता देखील बरीच कमी आहे. चांगले तंत्र असलेल्या रहाणे, पुजारा व कोहलीवरच सगळी मदार आहे. इतरांची खात्री नाही.
अर्थात माझे अंदाज खोटे ठरो हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Wed, 07/30/2014 - 19:22
नवीन
चार जण गेलेदेखील !
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/31/2014 - 05:38
नवीन
पराभवापासून फक्त देवच वाचवू शकतो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/31/2014 - 10:45
नवीन
देव मागील वर्षीच निवृत्त झाल्याने आता पराभवापासून कोणीच वाचवू शकत नाही !
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 07/31/2014 - 11:41
नवीन
कोण देव?
- Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव
गुरुवार, 07/31/2014 - 11:46
नवीन
देवपण नाही वाचवु शकला.
प्रत्येक गोष्ट देवावर नका टाकु. मागची इंग्लंड मधली कसोटी मालिका विसरलात वाटते.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 07/31/2014 - 08:19
नवीन
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट बोलर्सनी बाउंसरवर विकेट काढल्या.. आणि आता ईंग्लिश पार्टटाइम स्पिनर्स स्पिन चांगल्याप्रकारे हाताळणार्या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स काढतायत ते पण ईंग्लिश खेळपट्टीवर.. दोन टोकाचे परफॉरमन्सेस !!
बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. आणि हा सामना तर ऑलमोस्ट हरलाच आहे.. बाकी २ ड्रॉ करण्याचीच अपेक्षा आहे आता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/31/2014 - 10:43
नवीन
>>> बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय)..
हे तितकेसे खरे नाही. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँड मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता. १९७६-७७ मध्ये ऑस्ट्रेलियात २-३ अशी मालिका हरली होती. १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये २-० असा विजय मिळविला होता. १९७६ मध्येच भारताने न्यूझीलँडला न्यूझीलँडमध्ये २-१ असे हरविले होते.
अर्थात ही तुरळक उदाहरणे आहेत. अगदी थोड्या मालिकांमध्ये भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 07/31/2014 - 13:15
नवीन
गेल्या दोन दशकात म्हणायचं होतं मला..
खास करुन अझरुद्दीनच्या संघाने १९९३ ला इंग्लंड्ला ३-० हरवून मायदेशात जिंकायची सवय लावल्यापासून.. त्यापूर्वी मायदेशातपण इतके जिंकत नसत..
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
गुरुवार, 07/31/2014 - 14:05
नवीन
हरलो आपण...
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 07/31/2014 - 14:25
नवीन
हम्म
जेवणापर्यंत सुध्दा दम धरला नाही आपल्या फलंदाजांनी.
धवन, रोहीत शर्मा किंवा जडेजा, शामी, पंकजसिंग यांची गछंती होऊन गंभीर, अश्विन, अरॉन किंवा इश्वर पांडे, इशांत शर्मा आत येतील असे वाटत आहे.
पुढची कसोटी ७-ऑगस्ट मँचेस्टरला होणार आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 08/01/2014 - 07:37
नवीन
पुढच्या सामन्यात धवन आणि रोहीत शर्मा गच्छंती होऊन गंभीर आणि अश्विन आत यावेत अशी इच्छा आहे. धवन नक्की बाहेर जाणार. परंतु रोहीत शर्मा हा धोनीचा 'ब्ल्यू आईड बॉय' असल्याने कितीही वाईट खेळला तरी तो संघात असतोच . त्यामुळे त्याची गच्छंती अवघड वाटतेय. (२०१२ मध्ये श्रीलंकेच्या दौर्यात ५ एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. तरीसुद्धा त्यानंतरच्या ट-२० मध्ये त्याला खेळवलंच. वास्तविक पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ०, ४, ४ अशी कामगिरी केल्यावर त्याला लगेच हाकलायला हवा होता. पण धोनीचा तो लाडका असल्याने त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले. पूर्वी रवी शास्त्री असाच गावसकर व डुंगरपूर यांचा कमालीचा लाडका होता.)
पंकज सिंग दुर्दैवी ठरला. त्याच्या गोलंदाजीवर २ झेल सुटले. परंतु दुर्दैवाने त्यालाही कदाचित बाहेर काढून वरूण एरॉन/ईश्वर पांडे आत येण्याची शक्यता आहे. ५ गोलंदाज नको असेल तर बुद्धीमान साहा हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे.
भारत खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी व अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे हरला हे सत्य आहे. त्याच बरोबरीने पंचांची सदोष कामगिरी देखील इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत ठरली. डी आर एस पद्धत असती तर भारताला बराच फायदा होऊ शकला असता. असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 08/01/2014 - 08:30
नवीन
अजून एक बदल अपेक्षित आहे. शमीच्या जागी दुसरा मध्यमगती गोलंदाज येईल असं वाटतंय.
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 08/01/2014 - 12:01
नवीन
2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का?
आणि रोहित शर्मा एकुण किती कसोटी खेळला आहे की ज्यामुळे आपण तो लाडका असल्याचा निष्कर्ष काढला आहे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 08/01/2014 - 17:35
नवीन
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का?
रोहीत शर्माचे सुरवातीपासूनचे सर्व कसोटी डाव बघा (६ नोव्हेंबर २०१३ पासून आजतगायत).
१७७, १११* (दोन्ही भारतात विंडीजविरूद्ध),
१४, ६, ०, २५ (द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध),
७२, १९, ०, ३१* (न्यूझीलँडमध्ये किवींविरूद्ध),
२८, ६ (सध्याच्या मालिकेत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध)
भारतातल्या पाटा खेळपट्टीवर विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीसमोर तो २ डाव खेळला व दोन्ही डावात शतके केली. पण भारताबाहेर पडताक्षणी त्याच्या धावा बंद झाल्या. ७२ हा एकमेव डाव वगळता परदेशातील १० पैकी ९ डावात तो अपयशी आहे.
त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की लागोपाठ अनेक डावात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात असतो.
उदा. १७ फेब्रु २००८ ते ३ जुलै २००९ या अंदाजे साडेसोळा महिन्यांच्या कालावधीत तो एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यात फक्त २ अर्धशतके (५८ आणि ६६)आणि एकदा ४३ व एकदा ३२ धावा केल्या होत्या. उर्वरीत २७ सामन्यात त्याने ० ते २८ च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यात १५ वेळा त्याने एकेरी आकड्यात धावा केल्या आहेत (३१ पैकी १५ सामन्यात एकेरी धावा आणि त्यात ३ वेळा ०). तरीसुद्धा तो संघात टिकला.
२०१० मध्ये त्याने तुलनेने काहीशी कामगिरी सुधारली. नंतर ११ डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१२ या अंदाजे साडेबारा महिन्यात तो एकूण १५ सामने खेळला. त्यात फक्त १ अर्धशतक (६८ धावा) होते. उर्वरीत १४ डाव तो ० ते ३३ या दरम्यान बाद झाला. त्यात १५ पैकी ८ डावात त्याने एकेरी धावा केल्या (त्यात ३ वेळा ०). जुलै २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात खेळविले होते आणि त्याची कामगिरी होती ५, ०, ०, ४, ४. आश्चर्य म्हणजे या मालिकेपाठोपाठ लगेचच शेवटचा ट-२० सामना होता. ५ सामन्यात अपयशी ठरल्यावर निदान ट-२० मध्ये तरी त्याच्याऐवजी दुसर्या फलंदाजाला संधी द्यायला हवी होती. परंतु तो धोनीचा लाडका असल्याने या सामन्यात पण त्यालाच संधी मिळाली. त्याची कामगिरी बघता तो अनेकवेळा लागोपाठ अनेक सामने अपयशी ठरून सुद्धा त्याला वारंवार संधी मिळाल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यामुळेच रहाणेसारखा गुणी खेळाडू अनेक वर्षे संघाबाहेर राहिला होता.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sun, 08/03/2014 - 21:24
नवीन
सचिन आणि युवराजनंतर सर्वात शैलीदार फलंदाज आज रोहित शर्मा आहे. तो भरात असताना त्याचा खेळ ज्यांनी कुणी बघितला आहे ते हे अमान्य करू शकत नाहीत.
मनोरंजन हा जर क्रिकेट बघण्याचा उद्देश आसेल तर रोहित एवढं मनोरंजन करणारा आज आपल्याकडे कुणीच नाही.
पण हे माझं मत झालं. जसं रहाणे हा गुणी खेळाडू असल्याचं आपलं मत आहे तसंच.
आपण आपली मतं स्वतंत्रपणे का मांडत नाही? माझ्या प्रश्नांच्या खालीच आपण आपली मतं मांडल्यामुळे माझा असा गैरसमज झाला की ही माझ्या प्रश्नांना आपली उत्तरे आहेत.
आपल्या सोइसाठी माझे प्रश्न सोपे करुन सांगतो-
1. 2013 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या?
2. 2011 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या
3. रोहित हा आजपर्यंत सगळे मिळून एकूण किती कसोटी सामने खेळला आहे की ज्या आधाराने तो लाडका आहे असे दिसून येते?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »