भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....
महत्वाची सुचना:
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?
लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?
उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?
कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे.
धन्यवाद!!!
💬 प्रतिसाद
(167)
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 13:48
नवीन
ज्योतिष हे शास्त्र नाही. बाकी चालू दया.
प
प्रचेतस
Wed, 06/25/2014 - 14:03
नवीन
आणि शास्त्रात नसलेले हे प्रकार अतिशय भंपक असतात.
त
तुषार काळभोर
Fri, 06/27/2014 - 14:30
नवीन
यू सी, द व्होल कंट्री ऑफ द सिस्टम इज जक्स्टापोजिशन्ड बाय द हीमोग्लोबीन इन द अॅट्मोस्फिअर बिकॉज यू आर अ सोफिस्टिकेटेड र्हिटोरिसिअन इन-टोक्सिकेटेड बाय द एक्झिब्युरन्स ऑफ युअर ओन व्हर्बोसिटी...
प
प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 15:36
नवीन
>>> आमच्या भावना दुखावल्या :D
निमिषराव तुम्ही घाबरु नका , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,ही घ्या उत्तरे
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
>> ह्या प्रश्न्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
>> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
काळी फॉस ६, ३० -------------- हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही
उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?
>>
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने
लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
>>
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
Aethusea-------- Fool”s Parsley
तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?
उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?
>>
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
Argentnum Nitricum ------ नावाचे एक औषध आहे,
साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो.
:D
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 15:56
नवीन
फारच ब्वा नाजूक तुमच्या भावना. अगदी उठल्या बसल्या* दुखावतात.
* हे नेमकं काय आहे सांगायची गरज नसावी. ;)
ब
बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 16:01
नवीन
ळॉळ @ गिर्जाप्रसाद आणि
अश्लील धन्य ;)
प
प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 16:02
नवीन
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ...
थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ... ओम फट स्वाहा

ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 16:08
नवीन
भानामती करणे हे वाईट कर्म आहे. त्याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होऊन ते तुमच्या संचित कर्मात जमा होईल. अणि योग्य वेळ येताच या संचित कर्माचे क्रियमाण कर्मात रुपांतर होऊन त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील. एक लक्षात ठेवा, कर्माचा सिद्धांत कुणालाच सोडत नसतो.
प
प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 16:12
नवीन
कर्माच्या सिध्दांताला .... सिध्दांत कर्मेला आम्ही काली फॉसीफोरम ६ ३० देतो ... शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन ... मग तो बाधत नाही =))
प
प्रचेतस
Wed, 06/25/2014 - 16:18
नवीन
अरे काय हे,
निदान धागाकर्त्याच्या भावनांचा तरी विचार करा. =))
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 16:23
नवीन
खर्या ज्योतिषाचा तोडग्यांवर विश्वास नसतो. त्याच्या दृष्टीने तोडगे हे थोतांड असते. एकदा ग्रहदशेचा फेरा आला की त्या व्यक्तीला तुमच्या शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन दिलेले काली फॉसीफोरम ६ ३० ही वाचवू शकणार नाही.
च्यायला जे तोडग्यांनी, अंगारे-धुपारे, गंडे-तावित वापरुन किंवा कसलीशी पोथी वाचून बदलता येतं ते प्राक्तन कसलं :D
स
सूड
Wed, 06/25/2014 - 16:29
नवीन
>>काली फॉसीफोरम ६ ३०
ही कोणती पट्टी म्हणे गाण्याची? पाचेक महिन्यापूर्वी मी पांढरी सहावर सरगम आणि छोटे छोटे अलंकार वाजवत असे, आताशा सराव मोडलाय. ;)
प
प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 16:30
नवीन
अरे मुढ बालका तुझा अजुन लक्षात आलेले नाही
काली फॉसीफोरम म्हणजे साक्षात आत्मतत्व !
त्याला कसली आलीये ग्रहदशा ? एकदा का ते घेतले की तुम्ही तद्रुपच होवुन जाता ...मग काय मज्जाच मजा ... नैन छिंदन्ति शस्त्राणि नैन दहति पावका: =))
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 16:44
नवीन
क्षमा असावी महाराज.
आमचे ज्ञान महाराष्ट्र शासनाच्या पाठयपुस्तक महामंडळाने छापलेल्या विज्ञानाच्या पुस्तकातील न्युटनच्या नियमांपुरतेच मर्यादीत आहे. नाही म्हणायला अभियांत्रिकीला असताना ओहमच्या नियमाचा अभ्यास केला होता. परंतू काम संगणकाच्या क्षेत्रात करत असल्यामुळे आता तोही विसरलो आहे.
आ
आदूबाळ
Wed, 06/25/2014 - 17:59
नवीन
ओहमचा कसला आलाय नियम? सोsहमच्या नियमाचा अभ्यास करा.
स
सस्नेह
Wed, 06/25/2014 - 18:07
नवीन
ओहम झीरो झाल्याशिवाय सोहम पर्यंत पोचूच शकणार नाही तुम्ही ! बेट !
S
S.प्रशांत
Wed, 06/25/2014 - 18:52
नवीन
ओहमचा नियम वापरला नाही तर "भविष्य" अंधारात जाईल !!!
ध
धन्या
गुरुवार, 06/26/2014 - 06:20
नवीन
ओहम आणि सोहम राहू द्या बाजूला. मला हल्ली "कोहम" हा प्रश्न पडतो.
त्याचे उत्तर कुठल्या कुंडलीत पाहावे, लग्न कुंडली, भाव चलित कुंडली की नवमांश कुंडली?
ह
हाडक्या
Wed, 06/25/2014 - 16:59
नवीन
केला राव गंभीर धाग्याचा काश्मीर.. *lol*
ब
बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 18:01
नवीन
काली फॉसीफोरम म्हणजे कलकत्त्याला कालीघाटात मिळणारे औषध ए का =))
च
चित्रगुप्त
Wed, 06/25/2014 - 22:01
नवीन
चेष्टा नाही राव ही. होमियोपाथी/ बायोकेमिक आणि ज्योतिष-शास्त्राचा संबंध आहे:
.

आ
आयुर्हित
Wed, 06/25/2014 - 22:15
नवीन
पाश्चिमात्य पद्ध्तीप्रमाणे दिलेल्या तारखा आणि राशी यावरुन फक्त सुर्यराशी(सन साइन)विचारात घ्याव्यात, असे वाटते.
ध
धन्या
गुरुवार, 06/26/2014 - 06:27
नवीन
भारतीय वैदिक ज्योतिष हे भारतीय तिथींवरुन पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास समजली जाते.
मात्र इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे दैनिक/साप्ताहिक/मासिक वगैरे भविष्य येते ते त्यामधल्या राशी या व्यक्तीच्या इंग्रजी महिन्याच्या जन्मतारखेवरुन ठरतात.
त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिष आणि पश्चिमात्य ज्योतिष यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.
ध
धन्या
गुरुवार, 06/26/2014 - 06:30
नवीन
इथे ज्योतिष हा शब्द मी फलज्योतिष (astrology) अशा अर्थी वापरला आहे. Astronomy म्हणून नाही.
आ
आयुर्हित
गुरुवार, 06/26/2014 - 07:15
नवीन
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते.
फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय.
व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे.
उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.
आ
आयुर्हित
गुरुवार, 06/26/2014 - 07:15
नवीन
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते.
फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय.
व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे.
उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.
आ
आयुर्हित
गुरुवार, 06/26/2014 - 07:17
नवीन
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते.
फक्त जन्मराशीचा विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय.
व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे.
उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशी आधार मानुनच भविष्य वर्तवितात.
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/26/2014 - 08:38
नवीन
बाकी काही म्हणा तुमच्या बिनबुडाच्या लिखाणाचे आपण फ्यान आहोत.
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 06/26/2014 - 08:43
नवीन
एकंदरित वैदिक ज्योतिष ३० पट जास्त पॉवरफुल आहे (१०पट जास्त घटक गुणिले ३ प्रतिसाद) :-)
ह
हाडक्या
गुरुवार, 06/26/2014 - 11:02
नवीन
हॅ हॅ हॅ .. साहेबांना माहित नाही अशी गोष्ट नाही बघा जगी.. 'शहाणे करून सोडावे जन' अगदी व्रत आहे हो यांचे.
P
Prajakta२१
गुरुवार, 06/26/2014 - 06:58
नवीन
तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास नव्हे तर लग्न रास असते
आणि चंद्र ज्या राशीत असतो ती जन्म रास समजली जाते
साडेसाती किंवा ग्रहदशा ह्या जन्मराशीवरून ठरतात
भारतीय पद्धतीत लग्न रस आणि जन्म रास ह्या दोन्हींचे analysis करून भविष्य सांगतात
ध
धन्या
गुरुवार, 06/26/2014 - 09:19
नवीन
धन्यवाद.
बरेच दिवस वापरात नसल्यामुळे माझे तेलुगू भाषा आणि ज्योतिष या विषयाचे (शास्त्र नव्हे!) ज्ञान विस्मरणात गेले आहे.
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/26/2014 - 07:27
नवीन
=))))
क
कंजूस
Wed, 06/25/2014 - 14:29
नवीन
साध्या लग्नकुंडली वरून आणि सध्याची (गोचरि)ग्रहस्थितीवरून भविष्य सांगता आले पाहिजे .केवळ राजयोग आहे म्हणून काही प्रत्येकाच्या गळ्यात माळ घालायला हत्ती फिरत नसतात .इति वराहमिहिर .चांगली ग्रहस्थिती आल्यावर जातकाच्या परिस्थितीनुसार चांगल्या गोष्टी घडतात .याकरिता जातकाने महत्वाकांक्षा ठेवून पुढे प्रगती करण्याचे कष्ट सतत घ्यायला हवेत .दुसऱ्या पायरीवर असेल तर तो चौथ्यावर नेण्याचे काम ग्रह करतील .त्याने कष्ट करून नवव्या पायरीवर गेल्यास तो अकराव्यावर जाईल .
बाकी लग्न कुंडलीला भावचलित आणि नवमांशाप्रमाणे करून दशमातल्या डोक्यावरच्या ग्रहाला अष्टमात सरकवणे म्हणजे चण्याच्या पुडीला चपाट करून त्याचे विमान बनवण्याचा अट्टाहास होय .
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 16:09
नवीन
यंदा कर्तव्य आहे की काय? :)
स
सूड
Wed, 06/25/2014 - 16:12
नवीन
ज्योतिषावर धागा येणार। काहीजण त्याला शास्त्र मानणार॥
नेहमीची वादावादी होणार। राडा घडणार निश्चित॥
-दैवज्ञ ;)
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 16:17
नवीन
शास्त्र मानणे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. काहींच्या मते ज्योतिष हे शास्त्र आहे आणि काहींच्या मते नाही. इथे शास्त्र "मानण्याचा" प्रश्नच येत नाही.
स
सूड
Wed, 06/25/2014 - 16:22
नवीन
गप्रांव मेल्या!! मला शब्द सुचला नाही ओवी लिहीताना. धाग्याचं काश्मीर करा (हवं तर), प्रतिसादाचं नको. ;)
क
कपिलमुनी
Wed, 06/25/2014 - 17:04
नवीन
डिस्क्लेमर टाकले असताना सुद्धा लोक इथे येउन गोंधळ घालतात.. नाही पटत तर धाग्याकडे दुर्लक्ष करावे.
ज्याचा भाव त्याचा देव !
बाकीच्यानी दगड म्हणा किंवा इतर काही.. पण दुसर्यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा
ध
धन्या
Wed, 06/25/2014 - 17:13
नवीन
तो आहेच. मात्र
एकदा धागा टाकल्यावर चर्चा तर होणारच. या संस्थळाचे सदस्य म्हणून तो अधिकार प्रत्येकाला आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास संपादक मंडळ लिखाणास कात्री लावतेच की. जर विरोधी मते असणार्या लोकांनी मते मांडू नयेत अशी ईच्छा असेल तर "बंदिस्त समूह" असणारीही संकेतस्थळे आहेत. तिकडे आपले समूह बनवून "अहो रुपम अहो ध्वनी"चा घोष करावा.
प
प्यारे१
Wed, 06/25/2014 - 17:33
नवीन
हल्ली धन्यामागचा 'माणूस' बदलल्या बदलल्या सारखा वाटतोय. काय भानगड काय?
व
विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 06/28/2014 - 12:40
नवीन
+१०००००००
स
संजय क्षीरसागर
Wed, 06/25/2014 - 17:43
नवीन
मुळात कुंडली हा बेसच निराधार असेल, तर मग ती भावचलित असली काय की लग्न कुंडली, सर्वच भाकीते अंदाजपंचे दाहोदरसे ठरणार. जर धाग्यावर चर्चा अपेक्षित असेल, तर ज्यावर इमारत बांधायची तो पाया भक्कम हवा.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/26/2014 - 07:27
नवीन
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो...!!!
-दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 17:58
नवीन
ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव!!!!
स
सरळमार्गी
गुरुवार, 06/26/2014 - 05:08
नवीन
'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते.
खास ज्योतिषशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (गंभीर , शिस्तबद्ध ,सुनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मायबोली' नाही !), ज्या ठिकाणी फक्त ज्योतिषशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न या संस्थळावर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल.
ही संस्थळे ईंग्रजी भाषेत आहेत पण आपल्याला ती अडचण भासणार नाही.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/26/2014 - 07:25
नवीन
>>>>'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही
असं कै नै हं. मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे, असे वाटते. बाकी, लिहिणा-यांची मर्जी.
-दिलीप बिरुटे
प
पैसा
गुरुवार, 06/26/2014 - 07:27
नवीन
+१
इ
इरसाल
Fri, 06/27/2014 - 10:49
नवीन
+२ पण मी संपादक नाही हं !
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/26/2014 - 07:41
नवीन
>>> ह्यावर अत्यंत विनम्रपणे आक्षेप नोंदवत आहे ... परवाच एका धाग्यावर झालेले एका प्रश्नाचे संपादन अत्यंत एकांगी होते असे वाटले (http://www.misalpav.com/comment/590391#comment-590391)
टीका करण्याचा उद्देश नाहीये ... फक्त आपले विधान मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही हे पुर्ण सत्य नाही इतकेच नोंदवु इच्छितो !
-----------------------------------------------
प्लीज माझा आयडी डीलीट करु नका ...प्लीज प्लीज प्लीज
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »