Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ध्वनी प्रदुषण

फ
फटू
Wed, 06/25/2014 - 20:40
🗣 40 प्रतिसाद
आपला कान काचेचा असता तर केव्हाच फुटला असता. याचे कारण आपण घरात टीव्ही रेडीयो स्पीकर मोठ्या आवाजात लावतो. याचा आपल्याला कायमचा त्रास होऊ शकतो. जर आपल्याला ऐकायचे असेल तर दुसर्‍यांना त्रास होऊ नये एव्हढ्या लहान आवाजात लावावेत. आपण गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असल्यावर वाजवतो तसेच कारण नसताना पुढे सिग्नल लाल असतो आणि आपण हॉर्न वाजवतो. त्याचा लोकांना त्रास होतो. लग्नाची वरात, दिवाळी, मिरवणूकीत आपण फटाके फोडतो, डीजे लावतो. त्याचा आपल्या कानांना त्रास होतो. आपल्या कानाचा पडदा नाजुक असल्यामुळे त्याला ईजा होऊ शकते आणि माणुस कायमचा बहिरा होऊ शकतो.

प्रतिक्रिया द्या
19383 वाचन

💬 प्रतिसाद (40)
क
किसन शिंदे Wed, 06/25/2014 - 21:03 नवीन
कीप ईट अप! उत्तम विषय आहेत तुझ्या डोक्यात, हळूहळू आणखी वेगळ्या विषयावर थोडं जास्त लिहायला सुरूवात कर.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 06/25/2014 - 21:19 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:27 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ख
खटपट्या गुरुवार, 06/26/2014 - 00:44 नवीन
विनाकारण होर्न वाजवल्यास दंड केला पाहिजे. पण असे करण्यासाठी पोलिस कमी पडतील अशी परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/26/2014 - 03:03 नवीन
सद्विचारांचं लहान वय... लहान वयातले सद्विचार... ================== ़़ धन्या,भाच्याला "छोटा रक्षक" हे आय.डी.नेम घ्यायला लाव! फटू कायतरीच वाटतय.
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:29 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस गुरुवार, 06/26/2014 - 03:57 नवीन
मस्त रे फटू
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:30 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु गुरुवार, 06/26/2014 - 05:19 नवीन
भाचा पण कमी नाही. खरच कर्णकर्कश वाजवणार्यांना दंडापेक्षाही जालीम उपाय केला पाहीजे.आणि सगळ्या लग्न्-तोरण्-(वाय झेड) डे मिरवणूकांवर काण्ठाळी ध्वनीभिंती/बोंबाट ढोल पथक असेल तर बंदी पाहीजे.फक्त संचलन असेल, न आवाज करता तर ठीक. आत्मुदांना अनुमोदन.
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 06:16 नवीन
धन्यवाद मंडळी. इतर मिपाकरांच्या माहितीसाठी, हा छोटेखानी लेख माझ्या भाच्याने लिहिला आहे. दहा वर्षांचा असल्यामुळे तो मिपावरील सर्वात लहान लेखक आहे असे म्हणण्यास हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 08:58 नवीन
मिपावर स्वागत रे फटु :) वर्ड ऑफ कॉशन : आयडी बदलुन चांगला आयडी घे रे ... एकदा आयडी चिकटला की तो पाठ सोडत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 09:13 नवीन
असेच म्हणतो. जरा चांगला आयडी घे. तूर्त त्याचे कै वाटणार नै, पण ५-६ वर्षांत वाटेल-बरंच काही वाटेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:42 नवीन
मी छोटा रक्षक हा आयडी घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:37 नवीन
मी छोटा रक्षक हा आयडी घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बाळ सप्रे गुरुवार, 06/26/2014 - 10:46 नवीन
१० वर्षाच्या फटुचे अभिनंदन.. धाग्याचा विषय, शुद्धलेखन वगैरे खासच.. बाकी वाचून आणि वयापरत्वे प्रगल्भता वाढेलच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 06:44 नवीन
वा! सर्वांत लहान लेखक असूनही एकोळी धागा नै काढला हे सर्वांत जास्ती आवडलं. नैतर वय कितीही असलं तरी एकोळी काड्या टाकून पसार होणारे लोक पाहिले की फटूचं कौतुकच वाटतं. :) कीपिटप फटु!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 06/26/2014 - 10:14 नवीन
+१ या वयात तेही मराठीत लिहितोय याचे कौतुक आहे. कीप इट अप! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 10:38 नवीन
त्याच्या शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. या निमिताने मला गमभनकार ओंकार जोशी यांचे आभार मानायचे आहेत. गमभन ही सुविधा त्यांनी ईतकी सुलभ बनवली आहे की अगदी मराठी माध्यमातून शिकणारा दहा वर्षांचा मुलगासुद्धा गमभन वापरुन आंतरजालावर मराठीतून आपले विचार व्यक्त करु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 06/26/2014 - 11:06 नवीन
त्याच्या शिक्षणाचे माध्यम मराठी आहे.
अरे वा! मग तर त्याच्या पालकांचेही कौतुक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 11:19 नवीन
धन्या आणि ऋषिकेश दोघांशीही सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 07:07 नवीन
'सर्वात लहान' लेखकाचे मिपावर स्वागत. चांगले विचार मांडले आहेत. सहमत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/26/2014 - 08:12 नवीन
फटु, मिपावर स्वागत :) छान लिहिले आहेस. ध्वनी प्रदूषणाबाबत एकदम सहमत! अजूनही लिही वेगळया वेगळ्या विषयांवर.
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:46 नवीन
नक्की लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
फ
फटू Sun, 08/17/2014 - 20:48 नवीन
नक्की लिहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 08:46 नवीन
बघा, बघा. (वयाने) लहान मिपाकर (पण) किती प्रगल्भ धागा काढताहेत ! कोण म्हणतो मिपाला (आणि पर्यायाने भारताला) भविष्य नाही ?! काही दिवसापूर्वीच्या कट्ट्यात चमक दिसली होतीच म्हणा ;) नव्या नवयुवक मिपाकराचे स्वागत !
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/26/2014 - 10:13 नवीन
छान रे फटू. अजून लिही या विषयावर. रच्याकने तुझा आयडी जर 'धन्याचा भाचा' असाच ठेवला तर बेटर र्‍हाईल. काय म्हण्तोस? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 10:28 नवीन
त्यापेक्षा स्वतःचे नांवच आयडी म्हणून घेतले तर मामाच्या छायेतून लवकर बाहेर पडेल आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 10:41 नवीन
त्याला काहीतरी मस्त आयडी घेवु दे मग धन्यालाच आयडी बदलालयला लावु "**** चा मामा " असा !! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
क
कवितानागेश गुरुवार, 06/26/2014 - 10:38 नवीन
ज्याम त्रास झालाय या ध्वनीप्रदूषणाचा. जरा वेळ मिळाला की लिहिते ष्टोरी.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 10:43 नवीन
धन्या, फटु तुझाच आयडी होता ना रे? बाकी भाच्याला छान एक्स्पोजर देत आहेस त्याबद्दल कौतुक. :)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 06/26/2014 - 10:45 नवीन
ऐसैच लगा. १० वर्षाच्या मुलाचा बिल्ला क्रमांक ५७५?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 10:52 नवीन
म्हणजे वयाच्या तिसर्‍या चौथ्या वर्षापासून सदस्य असणं अपेक्षित आहे. (कोण रे तो मानसिक वयाबद्दल बोलतोय? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 10:58 नवीन
फटू माझाच वापरात नसलेला आयडी आहे. त्या आयडीचा मी डुआयडी म्हणून कधीच वापर केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 11:00 नवीन
>>>>त्या आयडीचा.... ओके. मग कुठल्या आयडीचा वापर केला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ग
गवि गुरुवार, 06/26/2014 - 11:09 नवीन
"धन्या"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 11:26 नवीन
माझ्या धनाजीराव वाकडे (आताचा धन्या हा आयडी) डुआयडी म्हणून वापरायचा माझा विचार होता. नव्हे तसा वापर मी सुरुही केला होता. मात्र मिपाकरांनी "धनाजीरावांना" "नाना चेंगटांचा" नवा अवतार समजायला सुरुवात केली. याच दरम्यान मी धनाजीराव म्हणूनच पन्नास फक्त, वल्ली आणि इतरांना प्रत्यक्ष भेटलो. मग फटू आयडीचा वापर बंद करुन धनाजीराव वाकडे म्हणूनच लिहू लागलो. यानिमिताने एक गोष्ट माझ्या नव्याने लक्षात आली, मी मिपावर सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सूड गुरुवार, 06/26/2014 - 11:04 नवीन
वयाच्या मानाने बरंच नीट लिहीलंयन्.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/26/2014 - 11:15 नवीन
मिपावर स्वागत! तुला जे काही आवडेल ते लिहीत जा. धन्या, इथल्या बाकी गोंधळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घे रे!
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 06/27/2014 - 16:47 नवीन
लेकरु त्याच्या मामासारखंच व्यासंगिक आहे म्हणा की... काकणभर सरसच आहे म्हणा... येउंदेत. लीमौजेटचा किस्सा वाचण्यास उत्सुक. टीप-एका गाडीमागे वाचलेले वाक्य माझी बाइक उडत नाही, हॉर्न वाजौला तरीही...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 06/27/2014 - 17:15 नवीन
एक नंबर रे फटू! ये बात! काहीतरी गोष्ट्बिष्ट लिही की राव.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा