Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/28/2014 - 06:11
🗣 151 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने. राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.


  उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल)   
४ जुलै  फ्रान्स वि.जर्मनी रात्री ९:३०
४ जुलै  ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०
५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०
५ जुलै नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)
८ जुलै  ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०
९ जुलै  अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै  ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०
         अंतिम सामना  
१३ जुलै    जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany
Argentina
Argentina
1
NEUER
(GK)
1
ROMERO
(GK)
2
GROßKREUTZ
2
GARAY
3
GINTER
3
CAMPAGNARO
4
HÖWEDES
4
ZABALETA
5
HUMMELS
5
GAGO
6
KHEDIRA
6
BIGLIA
7
SCHWEINSTEIGER
7
DI MARIA
8
ÖZIL
8
PEREZ
9
SCHÜRRLE
9
HIGUAIN
10
PODOLSKI
10
MESSI
11
KLOSE
11
M. RODRIGUEZ
12
ZIELER
(GK)
12
ORION
(GK)
13
MÜLLER
13
A. FERNANDEZ
14
DRAXLER
14
MASCHERANO
15
DURM
15
DEMICHELIS
16
LAHM
16
ROJO
17
MERTESACKER
17
F. FERNANDEZ
18
KROOS
18
PALACIO
19
GÖTZE
19
ALVAREZ
20
BOATENG
20
AGUERO
21
MUSTAFI
21
ANDUJAR
(GK)
22
WEIDENFELLER
(GK)
22
LAVEZZI
23
KRAMER
23
BASANTA
Coach                                   Coach
Joachim LOEW (GER)                                            Alejandro SABELLA (ARG)

प्रतिक्रिया द्या
51026 वाचन

💬 प्रतिसाद (151)
श
शिद Tue, 07/01/2014 - 00:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद Tue, 07/01/2014 - 00:34 नवीन
Mesut Özil चा अल्जेरियन गोली व २ डिफेंडरना भेदून १०९ मी. जबरा गोल. आणि अश्या रीतीने जर्मनीचा विजय व अल्जेरियाचे तगडे आव्हान संपुष्टात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद Tue, 07/01/2014 - 00:55 नवीन
Abdelmoumene Djabou ने १२१ मी. गोल करुन अल्जेरियाचा थोडा का होईना पण मान राखला. अल्जेरियाने जर्मनीला तशी कडवी झुंज दिली व शेवटच्या ९० मी. पर्यंत एकही गोल होऊ दिला नाही हे महत्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/01/2014 - 04:55 नवीन
चित्रफिती चांगल्या डकवल्यात. कसं काय आणायच्या आणि कोठून ? म्हणजे पुढच्या सामन्याच्या वेळी काही क्षण आवडलेले वगैरे टाकायला ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद Tue, 07/01/2014 - 11:33 नवीन
हि घ्या http://ftw.usatoday.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कोट्या धीश Tue, 07/01/2014 - 06:41 नवीन
जर्मनीने जरी match जिंकली तरी अल्जेरियाने मने जिंकली काय जबरी खेळत होते लेकाचे, जर्मनी सारख्या तगड्या team सोबत खेळत असल्याचे काहीही tension नव्हते चिली नंतर कुठल्या team ने इतके impress केले असेल तर ते अल्गेरिया.... hats off to their spirit & फ्रांस ला आता पर्यंत तुलनेत कमी ताकदवान संघासोबत खेळावे लागले होते , so कदाचित याचा फटका त्यांना जर्मनी सोबत खेळताना बसू शकतो
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/01/2014 - 08:15 नवीन
fox life( fox traveller) वरची 'this is brazil' मालिका छान वाटते आहे .
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 07/01/2014 - 14:16 नवीन
दरवेळी प्रत्येक विश्वचषक सामन्यात एखादी आफ्रिकन टीम आपला जलवा दाखवते अर्थात पुढच्या स्पर्धेत ते कुठे असतात हे पाहण्यासारखे असते, जो जीता वही सिकंदर १९६२ साली चीन जिंकला पण भारताने मन जिंकले असे ,मानण्यात काय हशील त्यापेक्षा १९७१ कधीही जास्त स्फूर्तिदायक आहे . काल रस्त्यावर लोक धमाल करत होते, एकटा अल्जेरियन चाहता आपला झेंडा खांद्यावर घेऊन ताठ मानेने त्या गर्दीतून वाट काढत जात होता , कोणीही त्याची हुर्या उडवली नाही , माझ्या परिचयाचे अनेक तुर्की हे जर्मनीला पाठिंबा देत होते . हे विशेष धर्मा पेक्ष्या देश मोठा ज्या देशात आपले भवितव्य आहे हा व्यावहारिक दृष्टीकोन तुर्की समाजात रुजावा ही जर्मनीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/01/2014 - 18:11 नवीन
अर्जेंटीना वि. स्वित्झर्लंड सामना सुरु आहे खेळाची अकरा मिनिटे संपत आलीय. अजून दोघंही एकमेकांना आजमावित आहे, असे वाटते. मेस्सीवरच लक्ष केंद्रीत आहे सध्या. आणि अर्जेंटीनाच जिंकेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/01/2014 - 18:18 नवीन
अर्जेंटीनाच जिंकेल पण स्विस सहजासहजी हार मानणार नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/01/2014 - 18:28 नवीन
मेस्सीच्या बुटाला चिकटून चाललेल्या चेंडुची नजाकत खासच पण. सामना सत्तावीसव्या मिनिटाला पोहोचतोय पण अजुनही कोणत्याच संघाला गोल करता आला नाही. स्वित्झर्लंडचा एक चांगला प्रयत्न पण गोलरक्षकामुळे तो प्रयत्न विफल झाला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 07/01/2014 - 18:39 नवीन
मेस्सी छानच खेळतोय. पण स्विस स्ट्रायकर शकिरी जबरदस्तच खेळतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Tue, 07/01/2014 - 20:31 नवीन
मेस्सीच्या सुरेख पासवर मारियाचा गोल. ११८ व्या मिनिटाला कोंडी फोडली.
  • Log in or register to post comments
श
शिद Tue, 07/01/2014 - 21:58 नवीन
मेस्सीने स्विट्झर्लंडच्या मधल्या व बचाव फळीला झुलवत खरचं सुंदर पास केला. त्याबदल्यात तो आजच्या मॅचचा सामनावीर ठरला. Image removed. स्विट्झर्लंडने जबरदस्त कडवी झुंज दिली पण त्यांना शेवट पर्यंत काही गोल करता आला नाही. स्विट्झर्लंडला १२१ मी. ला बरोबरी करण्याची एक संधी मिळाली होती Blerim Dzemaili च्या हेडरच्या प्रयत्नाने पण दुर्दैवाने बॉल पोलवर लागून री-बाऊंड झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शिद Tue, 07/01/2014 - 22:52 नवीन
बेल्जिअम वि. अमेरिका सामन्याचा हाल्फ टाईम झालाय पण हवी तशी मजा येत नाही. थोडाफार रटाळ खेळ चालू आहे दोन्ही बाजूंनी. बघू आता पुढच्या हाल्फमध्ये काय होतं ते.
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश महाजन गुरुवार, 07/03/2014 - 13:55 नवीन
जर्मनी/घाना सामना बघयचा आहे. काहि लिन्क मिळेल का?
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 07/03/2014 - 14:05 नवीन
जर्मनी वि. घाना हायलाईट्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश महाजन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 04:58 नवीन
मंडळी, आजचे दोनही सामने अतिशय रंगतदार होणार आहेत. फ्रान्स वि. जर्मनी या सामन्यात जर्मनी भक्कम वाटत आहेत. जर्मनीची मधली फळी भक्कम आहे, लिलया पास देऊन खोलवर उभे असलेल्या खेळाडूकडे दिलेल्या पासेसचे गोलमधे रुपांतर झाल्याचे आपल्याला दिसते. कर्णधार लेहाम आणि मध्यफळीतील ओझीलवर जर्मनीची खरी भिस्त आहे. जर्मनीच्या संघाचा फॉर्म हा समोरच्या संघाच्या तोडीवर बराच अवलंबून असतो म्हणजे त्यांचा फॉर्म उंचावतो. संघातील उत्कृष्ट आणि समतोल संघ म्हणुन ज्याचा उल्लेख होतोय तो फ्रांस जर्मनीला कदाचित भारी पडू शकेल. मध्यरक्षक,बचावफळी आणि स्ट्रायकर यांचा पूर्ण भरलेला असलेला हा संघ पण जर्मनीविरुद्ध खेळतोय त्यामुळे त्यांचा खेळ तितकाच उंचावला तर ते जिंकू शकतील असे वाटाते. दुस-या ब्राझील वि. कोलंबिया सामन्यातही मजा येणार आहे. यजमान संघावर पूर्णपणे दबाव असणार आहे. संपूर्ण स्पर्धेत नेयमारच्या भरवशावर ब्राझील दिसत आहे. नेयमारनेही अतिशय कौशल्यपूर्ण खेळ केलाय. पण काही सामन्यात त्याला प्रतिस्पर्धी संघाने गुंडाळून टाकलंय, प्रचंड कोंडी केलीय आणि त्या घेरावातून त्याला बाहेर पडता आले नाही. गेल्या सामन्यात तर त्याला गोलही करता आला नाही. डॅनियल अल्वेस, मार्सेलो आणि ऑस्कर, हुल्क,फ्रेड यांनी जर खेळ चांगला केला प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण केलं आणि खोलवर उभ्या असलेल्या नेयमारला उत्तम पासेस मिळाले तर ब्राझील जिंकेल. फुटबॉलचा सुपरस्टार मॅराडोना लेखात एका लेखात म्हणतो की, 'ब्राझीलकडे मिडफील्डमधून पास देणारा उत्तम खेळाडू नाही, ऑस्कर वगळता' या आणि काही उणिवा ब्राझीलच्या आहेत. मॅराडोनाच्या भाषेत म्हणायचं तर, ''विश्वविजेता म्हणुन दिसावेत असे कोणतेही गुण ब्राझीलमधे दिसत नाही'' :( कोणी काही म्हणत असले तरी ब्राझीलच जिंकेल असं माझं मत आहे, आपणही या रंगतदार सामन्यांचे साक्षीदार व्हाल, असे मला वाटते. तर भेटूच फ्रान्स वि. जर्मनीच्या सामन्यावेळी रात्री साडे नऊ वाजता. काय काम असतील ती साडेनऊच्या आत होऊ द्या. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 05:11 नवीन
बाकी फ्रान्स विरुद्ध जर्मनी हा सामना भलताच रंगतदार होईल. आतापर्यंत फ्रान्सच्या गटातले संघ तुलनेने बरेच दुबळे होते आणि बादफेरीतल्या पहिल्या सामन्यातही दुबळ्या संघाबरोबरच लढत झाली त्यामुळे फ्रान्सचा खर्‍या अर्थाने कस अजून लागलाच नाही. त्याउलट जर्मनी पहिल्या मोठ्या विजयानंतर जरा ढेपाळलेले दिसतात अर्थात त्यांनी नंतर जे काय विजय मिळवले ते विलक्षण शिस्तबद्धतेमुळेच. नेमारच्या कोंडीबद्दल सहमत. पण इथेच मेस्सी आणि नेमारमधला फरक अधोरेखीत होतो. मेस्सीने कोंडीतून मार्ग काढत काढतच अफलातून खेळ केलाय आणि गोल करण्याबरोबरच देखणे पासेस देऊन विजयचा मार्ग सुकर केला. बाकी पुढच्या फेर्‍यांत मजा टिकून राहावी म्हणूनच दुसर्‍या सामन्यांत ब्राझील जिंकावा असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 05:40 नवीन

   ब्राझील स्पेशल स्क्वॅड

Image removed.  Image removed.  Image removed.  Image removed.  Image removed.

     नेयमार.                  ऑस्कर             फ्रेड                  मार्सिलो            हुल्क.

  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 07/04/2014 - 09:09 नवीन
लेट देम फॉलो ब्राझिल... लेट देम वरशिप मेस्सी.... यू हॅव बीन माय फेवरीट, क्लोज!! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 09:22 नवीन
अमेरिकन भूमीवर युरोपिअन संघ कधीही विश्वविजेते ठरलेले नाहीत. युरोपच्या भूमीवर मात्र अमेरिकन संघाने विश्वविजेतेपद मिळविले आहे. हा इतिहास अमेरिकन संघांच्या बाजूने आहे. याच भरवश्यावर ब्राझील, अर्जेंटिना, कोलंबिया व कोस्टा रिका असतील. परंतु उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले ८ संघ बघता, ब्राझील, अर्जेंटिना, नेदरलँड्स व जर्मनी हे उपांत्य फेरीत पोहोचतील असं वाटतंय. कोलंबिया व फ्रान्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का देऊ शकतील. तेवढी क्षमता त्यांच्यात आहे. पण बेल्जिअम व कोस्टा रिकाला फारशी संधी नाही. अंतिम फेरीत जर्मनी व नेदरलँड्स यापैकी एकजण नक्की असणार.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 07/04/2014 - 12:21 नवीन
नेदरलँड्स साखळी सामन्यातच गारद होणार असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं. मागच्या स्पर्धेवेळी जशी जर्मनीची तरुण टीम होती तशी नेदरलँड्स ची या वेळची आहे (अर्थात तेवढी तांत्रिकदृष्ट्या चांगली वाटत नसली तरी). पठ्ठ्यानी कठीण सामन्यात विजयश्री या ना त्या मार्गे मिळवलीच (१००% रेकॉर्ड आहे स्पर्धेत). स्वतःच्या तांत्रिक कमतरतांवर अधिक शारीरिक खेळ व 'टोटल फुटबॉल' चे तत्त्व यांनी मात करत आहेत.स्वित्झर्लंड प्रमाणेच बेल्जियम देखील आर्जेन्टिनाला कडवी झुंज देऊ शकतो. जर हा सामनाही १२० मिनिटापर्यंत लांबला तर अर्जेन्तिनाला थकव्यामुळे नेदरलँड्स ला सामोरे जाणे सोपे राहणार नाही. माझ्या मते अंतिम सामना ब्राझील वि. नेदरलँड्स असा अंतिम सामना पण बघायला मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 07/04/2014 - 12:45 नवीन
नेदरलँड्स साखळी सामन्यातच गारद होणार असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं. मागच्या स्पर्धेवेळी जशी जर्मनीची तरुण टीम होती तशी नेदरलँड्स ची या वेळची आहे (अर्थात तेवढी तांत्रिकदृष्ट्या चांगली वाटत नसली तरी). पठ्ठ्यानी कठीण सामन्यात विजयश्री या ना त्या मार्गे मिळवलीच (१००% रेकॉर्ड आहे स्पर्धेत). स्वतःच्या तांत्रिक कमतरतांवर अधिक शारीरिक खेळ व 'टोटल फुटबॉल' चे तत्त्व यांनी मात करत आहेत.स्वित्झर्लंड प्रमाणेच बेल्जियम देखील आर्जेन्टिनाला कडवी झुंज देऊ शकतो. जर हा सामनाही १२० मिनिटापर्यंत लांबला तर अर्जेन्तिनाला थकव्यामुळे नेदरलँड्स ला सामोरे जाणे सोपे राहणार नाही. माझ्या मते अंतिम सामना ब्राझील वि. नेदरलँड्स असा होईल
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 17:39 नवीन
ही बातमी वाचा ! ७ खेळाडूंना ताप ! आज दमट आणि उष्ण हवामानात फिटनेस महत्वाचा आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 18:06 नवीन
फ्रांस चं आक्रमण सुरु झालंय.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 18:17 नवीन
क्रूसच्या फ्री किकवर ह्युमेल्सचा हेडर. आमची जर्मनी आघाडीवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 18:21 नवीन
तुमची जर्मली भारी खेळतेय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 18:39 नवीन
आता फ्रान्सनं पण जोरदार आक्रमण केलं पण जर्मन गोलरक्षक भलताच सतर्क आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 18:43 नवीन
तो फार पुढे येऊन ball पकडू पाहतो धोका होऊ शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 18:19 नवीन
जर्मनीच्या खेलाडू चा उत्तम हेडर जर्मनी 1- फ्रांस 0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शिद Fri, 07/04/2014 - 21:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 18:39 नवीन
बेन्झिमनला चांगला चांस होता घालवला बेट्याने :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 18:54 नवीन
अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 19:40 नवीन
फ्रान्स ला निरोप द्यायची वेळ येत आहे असे वाटते. 78 मिनिटांचा खेळ संपत येतोय. सर्व क्षेत्रात संपन्न सक्षम अशा खेळाडूचा भरणा असलेल्या फ्रान्सला अजुन गोल नोंदवता आलेला नाही. असेच राहिले तर शेवटी काही चमत्कार करतील ते असे काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 19:48 नवीन
आमचा संघ फ्रेंचान्ची डाळ काही शिजू देत नाहिये. बेंझेमा पण निष्प्रभ ठरलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 19:59 नवीन
बेन्झिमा ला शेवटच्या काही क्षणात संधी आली होती पण जमले नाही. जर्मनी 1-0ने विजयी. चांगला सामना झाला. आता ब्राझिलचा सामना पाहण आहे पण झोप येतेय. हजर होतो एक डुलकी मारून. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 20:01 नवीन
मी तर आता झोपतो ब्वा. उद्या सकाळी हापिस आहे. :( तसाही आमचा झेंडा पुढे सरकलाय आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2014 - 19:52 नवीन
शेवटची चार मिनिटे फ्रांससाठी नाही तर 2018 ची वाट पाहावी लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Fri, 07/04/2014 - 19:56 नवीन
शेवटचे ३० सेकंद बाकी असताना बेन्झेमाचा जोरकस प्रयत्न जर्मन गोलरक्षक न्यूमरने विफल केला. जर्मनी उपांत्य फेरीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शिद Fri, 07/04/2014 - 21:23 नवीन
जर्मनी १ वि. फ्रांस ० - मॅच हायलाईट्स
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 07/04/2014 - 22:15 नवीन
सामना चालू होतो न होतो तोच नेमारने दिलेल्या कॉर्नर-किकच्या पास वर कॅप्टन सिल्वाचा ७ व्या मी. बाझिलचा पहीला गोल.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 07/04/2014 - 23:11 नवीन
येथे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ख
खटपट्या Fri, 07/04/2014 - 22:55 नवीन
हाफ टाईम ला ब्राझील १ - कोलंबिया ०
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 07/04/2014 - 23:14 नवीन
हाफ टाईम मध्ये दोन्ही टिमकडून जबरदस्त झटापटीचा सामना झाला. आता बघू पुढच्या हाफ मध्ये काय होतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
शिद Fri, 07/04/2014 - 23:34 नवीन
फ्रि-किक मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेवून लुईजकडून ६९ मी. ब्राझिलचा दुसरा गोल.
  • Log in or register to post comments
श
शिद Sat, 07/05/2014 - 00:01 नवीन
येथे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/05/2014 - 06:56 नवीन
लुईजने ब-याच दुरुन किक मारुन गोल केला. सुप्पर गोल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद Fri, 07/04/2014 - 23:48 नवीन
ब्राझिलचा गोलकिपर सिजरच्या चुकीमुळे त्याला पिवळं कार्ड मिळालं पण त्याचबरोबर कोलंबियाला पेनल्टी किकचे बक्षीस. मिळालेल्या संधीचा फायदा घेत जेम्स रॉड्रिग्जने कोलंबियासाठी ८० व्या मी. पहीला गोल केला. जेम्स रॉड्रिग्जचा ह्या वर्ल्डकप मधील ६ वा गोल. गोल्डन बुटाकडे वाटचाल.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 07/04/2014 - 23:55 नवीन
कोलंबियन गोलकिपरला गोलपोस्ट वरुन किक मारताना अडथळा आणल्यामुळे ब्राझिलचा कॅप्टन सिल्वाला पंचातर्फे पिवळं कार्ड. Image removed. ब्राझिल जर जिंकून सेमी-फायनलला पोहोचली तर सिल्वा केलेल्या चुकीमुळे त्या मॅचला मुकणार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा