Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्न निसर्गाला

व — वैभवकुमारन, Tue, 07/01/2014 - 07:53
१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?. उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास . मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे? पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे. १ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत? वेड्या.... पाण्यासाठीच जन्मलोय मी, फुगवून माझे पोट. मग प्रश्न विचारला मी झाडाच्या तु-याला - तू इतका नाजूक दिसतोस रे पण काजळाची मला कमतरता जाणवते? अरे मुद्दामच लावत नाही मी कारण काजळाने नेहमी डोळे पानावते. मग मी प्रश्न विचारला थेंबाला - एवढ्या जोरात वरून पडतोस मार नाही का बसत काही? मांजरासाराखेच माझे काहीसे - उभा राहतो मी दोन पायी. आळुला १ प्रश्न - का तू जखडून ठेवतोस दवबिंदुला आपल्या या शरीरावरती? अरे मला हि खाज सुटते रे - खाजवतो तो माझ्या कानाभोवती. शेवटी प्रश्न रोपट्याचा दाण्याला - एवढास जीव तुझा,तू पेलावतोस कसे रोपटे? तू प्रश्नच चुकीचा विचारलास - आपलाच भर आपल्याला नसतो रे

प्रतिक्रिया द्या
1281 वाचन

💬 प्रतिसाद (2)
आ
आयुर्हित Tue, 07/01/2014 - 08:05 नवीन
"आपलाच भार आपल्याला नसतो रे!" खरे आहे. खुप चांगले निरिक्षण आहे आपले. लगे रहो!!
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 01:37 नवीन
एकच प्रश्न विचारतो आपला सर्वत्र संचार कसा? काही कुठे तर काही कुठे पण पत्ता लागेना विषयाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा