पाककृती

झटपट चकली(ब्रेडची)

Primary tabs

साहित्यः ब्रेड चुरा ३ वाटी
बेसन पीठ २ चमचे
तंदूळ पिठ २ चमचे
ओवा १ चमचा
धने पुड १/२ चमचा
जिरे पुड १/२ चमचा
आमचुर पावडर १ छोटा चमचा
तिखट १ १/२ चमचा(आवडीप्रमाणे)
तीळ १/४ वाटी
मीठ चवीनुसार
gj
कृती:
प्रथम तीळ भाजून घ्यावेत.
बेसन पीठ आणि तांदूळ पीठ थोडेसे भाजून घ्यावे.
एका भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मळून घेणे.
iukl
दह्याबरोबर खुसखुशीत चकल्या खायला तयार.
टीप:या चकल्या१-२ दिवस टिकतात.शक्यतो हवाबंद डब्यात ठेवाव्यात.
मी ब्राउन ब्रेड वापरलाय त्यामुळे जरा लालसर झाल्यात.पांढरा ब्रेड वापरला तर रंच चांगला येईल.

सस्नेह

ब्रेडचे सर्व पदार्थ आवडतात. हा तर मस्तच आहे. झटपट !

इशा१२३

@ सूड; यशोधरा फोटो का दिसत नाहिये देव जाणे.त्यातहि यशो तूला फक्त भि़जवलेल्या गोळ्याचा फोटो दिसतोय:-( :(

यशोधरा

घरुन दिसले तीनही फोटो. भारी दिसयात चकल्या! :)

आयुर्हित

झटपट आणि सुंदर कल्पना आहे.
चकल्या अगदी खुसखुशीत दिसत आहेत.
तो.पा.सू. सुंदर फोटो आणि पाकॄ!!

ब्रेडचुरा वापरल्यामुळेच खायचा सोडा नको असेल नाही?

इशा१२३

तीळ भरपूर झालेत.पण कुरकुरीत आणि खमंग लागतात. मला जरा जास्त वाटलेच म्हणून इथे प्रमाण कमी करूनल१/४ वाटिच लिहिलय. :-)

भिंगरी

झटपट चकल्या मस्तच लागत असतील.
येऊ का खायला?
हो म्हणा कि आलेच गरगरत @@@@@

Maharani

Mastach ga Isha....ata karun baghatech.. *ok*

भिंगरी

झटपट चकली सारखे झटपट दहीवडेही होतात.
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी.
वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

भिंगरी

माफ करा सर्व मिपाकरांना मी गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गरुन सांगते कि माझ्याकडे क्यामेरा नाही आणि मोबाईलमध्येही नाही. त्यामुळे सद्ध्यातरी माझ्या पाककृतींचे फोटो नाही टाकता येणार.

रेवती

ईशा, पहिल्यांदाच हा पदार्थ बघतीये. फोटू लै भारी आलाय.
भिंगरीजी, फोटू फोटू.

शिद

छान दिसताहेत चकल्या...कुरकुरीत एकदम.

अजया

सोपा पदार्थ असल्याने करुन पाहणे आले *wink*

ब्रेडचा चुरा म्हणजे बाजारात मिळणारे ब्रेड क्रम्ब्स की ताज्या पावाला मिक्सर मध्ये फिरवून केलेला ताजा चुरा?
पाव जास्त तेल शोषून घेत नाही?

इशा१२३

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार. :-)
@ आयुर्हित:खायच्या सोड्याची अजिबात आवश्यकता नाही.चकली खुशखुशीत होतेय.
@ भिंगरी :झटपट दहिवडे माहित आहेत.अजून केले नाहित.आणि चकली खायला याच (येताना दहिवडे आणायच विसरू नका.)
@ प्रभाकर पेठकर:ताज्या पावाचा चूराच वापरलाय.

भिंगरी

हो हो नक्की आणीन,पण गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फिरताना त्याचे काय होईल माहित नाही.

जागु

अरे वा मस्त झटपट रेसिपी आहे.

प्यारे१

छानच!

दिपक.कुवेत

चकल्या आवडल्या. कमी तेलकट होण्यासाठि बेक पर्याय ठरु शकतो का?

इशा१२३

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
@दिपक.कुवेत :चकल्या बेक करून पहायला हरकत नाही.पण खुशखुशीत होतील का अशी शंका आहे.करून बघायला हव.