Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वारी

आ — आनंदमयी, Sat, 07/05/2014 - 04:43
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
3268 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/05/2014 - 05:44 नवीन
सहज सरळ असे काव्य भक्तिरूप मना भावे खूप वाचताना...
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 07/05/2014 - 06:21 नवीन
छान व मनाला भावनारी कविता. फक्त एक बदल सुचवू इच्छितो: विष्णुरूपी लीन होवून जगावे अंतास उरावे विष्णूरूप ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कवितानागेश Sat, 07/05/2014 - 06:38 नवीन
साधी सोपी गोड कविता. :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 07/06/2014 - 05:34 नवीन
आवडलं!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/06/2014 - 05:36 नवीन
सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 07/06/2014 - 06:40 नवीन
आवडली कविता. एक शंका: देवद्वार वृत्त यालाच म्हणतात का?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 07/06/2014 - 06:50 नवीन
एकदम मनभावन.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 07/06/2014 - 08:26 नवीन
सुंदर. आयुर्हित ह्यांनी सुचवलेला बदल जास्त समर्पक.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा