पाककृती

झट्पट दहीवडे

Primary tabs

झटपट दहीवडे
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी.
वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

पैसा

ही पाकृ बहुतेक कमलाबाई ओगल्यांच्या रुचिरामधे आहे. फोटो द्या की!

भिंगरी

अमावास्येला भरलेले खेकडे मिळतात. म्हणजे साधारणपणे अमावास्येच्या दरम्यान मादी अंडी घालते असे म्हणतात म्हणून त्या दरम्यान भरलेले खेकडे मिळतात. कधी अंडी आधी सोडली असतील तर अमावास्येला पोकळ खेकडाच मिळेल.

प्यारे१

पण त्यामुळं बालीची मंदिरं हिरवट का दिसतील?

नरकोंडम बेटावर पण साखर घालावी इतकी गोड आणि उत्कृष्ठ केळी मिळतात. म्हणजे साधारण पणे केळ्यांचा सिझन असेल तर चांगली पिकलेली गोड केळी मिळतात. कधी कधी झाडावरुन अधिच केळी काढलेली असतील तर केळ्यांची साल पण मिळणार नाहीत.

पैजारबुवा,

खेकड्यांचे दहीवडे करण्यासाठी खेकडे तळून घ्या॑वेत का...कि तसेच घ्यावेत..? जागू...ए जागू...

सूड

ओके, मग अंडी भरलेल्या खेकड्यात दहिवडे सोडून त्याचे कालवण कधी करावे?

भिंगरी

ओह शिट !!!!
ते किनई माझा नेम चुकला.
भरलेल्या खेकाड्यावर द्यायची प्रतिक्रिया चुकून दहीवड्यावर गेली.
आणि माझी अवस्था दही खाऊ माही खाहू अशी झाली.

संजय क्षीरसागर

स्वामींनी म्हटलंच आहे :

खेकडे पकडून अवसी । कां तें घाली दहीवडे ।
घेऊ दे प्रतिसाद उसळी । ती येक भंबेरी ॥ ७०॥

इरसाल

कादंबरी फर्फार आवदते. कित्ती कित्ती चान दिसते तिच्या हनु-वटी वरचा तिल कित्ती कित्ती काला दिसतो.

स्पा

हि झतप्त झलि, मल उशिरने होनर्य दहिवयन्चि पक्रु हविये

स्पा

ओके पैजर बुव, अपन खौ सन्च्यल दहिवदे

पैला तर दही विरजनाला लाऊन घ्या .. म्हणजे सात आठ तास सहज त्याच्यातच जातील..

अवांतर(?) - हि पाकृ माहीत नव्हती, नेमकी चव इमॅजिन होत नाहीये, पण सहज जमण्यासारखी असल्याने ट्राय करून बघायला हरकत नाही !

बटर किंचित कमी भिजवून आणि थोडासा कुस्करून त्यात खारी बुंदी पण सोडली तर मस्त चाट तयार होईल असा अंदाज ..

रेवती

माझे कन्फूजन झालेय. डोक्याचे दही झालेय.

स्पंदना

मग तर भारीच. दही हंडी फोडायला सांग कोणाला तरी.

आम्ही नेहमी करतो असे बटरवडे...
पण फ्क्त दहीच बनवतो..आंबटगोड चटणी नाही बनवत.
गोडदही घेउन ते दहीवड्याला जसे दही बनवतात तसे बनव्ते..
बाकी सगळे भिंगरीने सांगीतल्याप्रमाणे करतो.

भाते

सोत्रि, कॉकटेल आवडले. आणखी येऊ द्या.:)

दिपक.कुवेत

ईनोव्हेटिव्ह दहि खेकडे फारच आवडले. फोटो तर फारच ईनो टाईप आलाय. च्यामारी आता हि जळजळ दह्यानी पण थांबायची नाहि.

स्पा

सातवाहन काळातही क्ष त्र प असे आवडीने दहीवडे खायचे
वल्लीची खरच कमाल आहे , काय शोध लावतो

रेवती

ही चेष्टा सुरु आहे ना? मगाशी माझा जामच पोपट झाला.

कवितानागेश

रेवतीताई, असा पोपटाचा जाम होउ नये यासाठी माझ्याकडे खात्रीशीर उपाय आहे.
१००% सुरक्षित व आरोग्यदायी.
व्य.नि. करावा. =))

आयुर्हित

अरेच्चा!
अहो? काय चाल्लय?
हे "१००% सुरक्षित व आरोग्यदायी" चे पेटंट फक्त आमच्याकडेच आहे बरका.
(आमची कोठेही शाखा नाही!!!!)

रेवती

या धाग्यावर ना काही बोलण्यात अर्थच नाहीये.

नाहि तर काय...? सद्ध्या दहीवडे, खेकडे, पोपट, जाम असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि असा वंचित, गुलाम, लाचार, झापडे लावला गेलेला, स्वतंत्र विचार न करु शकणारा समाज सोत्रि, कॉकटेलच्या आहारी गेला तर नवल काय?

प्यारे१

कुठंतरी वाचलंय असं. ;)

>>>>स्वतंत्र विचार न करु शकणारा समाज सोत्रि, कॉकटेलच्या आहारी गेला तर नवल काय?
ह्याला व्यक्तिगत शेरेबाजी, हल्ला मानावे काय?
की 'स्वप्नांची राणी' हा सोत्रींचाच डू आयडी आहे?

खूप लपवण्याचा प्रयत्न केला पण अश्या प्रतिक्रिया येतात की नाइलाजाने सांगावच लागतय....मी ना खर म्हणजे बॅटमॅन चा डू आयडी आहे...*sorry2* *SORRY*

आदूबाळ

म्हणजे "बॅटमॅनच्या स्वप्नांची राणी" असा संधी/समास करायचा काय?

प्यारे१

भयकथा का वाटली? थोडक्यात स्पष्ट करा!

स्पष्टीकरण जाउद्या...यमक काय सॉल्लिड्ड जुळतय ना...!! "भयकथा....भिती वाटतेय आता"

लगे हाथ एक डूआयडिष्टक पाडूनच टाकते....काय म्हणता..? (वॉव..परत जूळलं की यमक)

अजया

पोपटाचा जाम -एक भयकथा.....

मदनबाण

मनमोहक पोटपुजा...
पुरा टेस्टी झट्पट दहीवडे :- ही दह्यातली माझा अगदी विक पॉइंट असलेली पाकृ आहे,दही चांगले घट्ट आणि सफक गोड असेल तर तिखट आणि मिरी पावडर घातलेल्या या दह्याची चव केवळ अप्रतिम लागते. ;)
चला तर आपण या पाकॄचा फोटो शोधुया.

{ बदाम एक्का } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

दिपक.कुवेत

आणि त्यावरचे ईतके मनोरंजक प्रतिसाद शोधुन सापडणार नाहि. सबब संपादकांना विनंती आहे त्यानी हा धागा उडवुन नये. बाकि कुणि नाहि तरि मी मात्र ह्या धाग्याची वाचनखुण साठवतोय. अजुन छप्परफाडु प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

छ्प्पर फाटले तर दही आत नाही का सांडणार? मग नुसतेच पाण्यात भिजलेले बटर खायला काय मजा येणार?

दिपक.कुवेत

घाबरु नका....दहि आत सांडलं तर मँगो मुस मधे घालीन त्याने पॅना कोता मस्त लागेल. अगदि १००% सुरक्षीत आणि आरोग्यदायी.

प्यारे१

तसं नै कै...

काऊनि बतरदहीवदा, मोअकलाया दाहि दिश्या

भिजवले पान्यामदये मि, बतर मोजियले सात
मीथ, मिरी, सखर आनि पनि कलवल दह्यात

असं काहीसं असणार!

पिंगू

च्यायला दहीवडे अगदी झटपट खेकड्यांसोबत मस्ती करुन मराठी पुस्तकांच्या वाचनालयात पोचले पण...

आयुर्हित

मराठी पुस्तकांच्या वाचनालयात कमलाबाई ओगल्यांचे रुचिरा आहे कि राव!
पैसा ताईंना गावलं बघा.

लव उ

काही कळतच नव्हते काय वाचते ते!

प्रीत-मोहर

अग्गागागागा ग. उंबरठ्यातली फुलदाणी तुटली की रे

कवितानागेश

संपूर्ण विश्वात कुठेही गेलात तरी खेकडा= पाठ्*पाय^2 असच होणार. त्यात फरक पडणार नाही.

प्यारे१

पाय म्हणजे नेमकं काय? ;)

स्पंदना

भिरी भिरी भिरी भिरी भिरी भिरी
भिंगरी हो...भिंगरी

दरवेळी ईथे चक्कर मारली की ...... दहीवड्यांचे खेकडे,खेकड्यांचे ड्रेस्डेन,ड्रेस्डेनचा उंबरठा,उंबरठ्याचे कुंथणे,कुंथण्यारे पोपट्,पोपटाचा जाम....चक्कर यायला लागते बघा

संजय क्षीरसागर

पदार्थाचे नांव : झटपट पोकळ खेकडे

साहित्य : १) अवसेच्या रात्री कधी अंडी आधी सोडली असतील तर, पोकळ खेकडा मिळेल.
२) झटपट लाल तिखट
३) (चहात बुडवून खातात ते) काहीही
४) कोथिंबीर-बटर
५) दही-पावडर, मीठ-चटणी, खजुराची- चिंच, गोड-जिरे.

कृती :
अमावस्येमध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
पोकळ खेकडे कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेली दही-पावडर टाकून त्यावर आवडत असल्यास मीठ-चटणी टाकावी.
वरून झटपट लाल तिखट ... चवीनुसार टाकावे.
कोथिंबीर-बटर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये बसल्यास थंडही छान लागते.

सूड

आला होळीचा सण लै भारी, चल नाचूया !! *yahoo*

वा दिपकराव खेकड्याच्या पाठीत भरलेल्या बटरवड्यांच्या आइस्क्रीमचा फोटु कातील आला आहे.

पैजारबुवा,

प्यारे१

खेकड्याच्या पायात पाय अडकल्यानं ब्राझिलचे खेळाडू गोंधळले.

जर्मनी ७- ब्राझिल १

सूड

एकादशीच्या उपासाला चालतात का हे वडे?

सखी

अहो खेकडे आहेत म्हटल्यावर माऊताईनी सांगितले ना ते चालणार नाही पळणारच.
आणि ते काय तुम्हाला साबुदाण्याचे वडे वाटले काय एकादशीला चालायला :)

सूड

>>काय तुम्हाला साबुदाण्याचे वडे वाटले काय एकादशीला चालायला

छे हो!! साबुदाण्याचे वडे आज प्लेटमध्ये ठेवून केव्हाची वाट पाहात होतो की आता चालतील मग चालतील, पण अज्जिबात चालले नाहीत. एकादशी असूनसुद्धा !! त्यामानाने ऑक्टोपस चालत असावा. ;)

अजया

गुंतुनी खेकड्यात सार्‍या ..वडा माझा वेगळा !

अजया

गुंतुनी खेकड्यात सार्‍या ..वडा माझा वेगळा !

संजय क्षीरसागर

किंवा असं ही चालू शकेल :

सोडता धागा वड्याचा... खेकडा माझा मोकळा!

जोशी 'ले'

चला मी पण हात धुऊन घेतो..
त्या तिथे ,तिकडे..वल्लीकडे.. माझिया वाटनीचे खेकडे :-)

पांडवकालीन किंवा सातवाहन काळातले.

बाकी, खेकडे जितके जूने तितके चांगले, असे ऐकून आहे.

संजय क्षीरसागर

बटरवडे जितके थंड, तितके उन्मादक, असा अनुभव आहे!

आधी खेकडे खाऊन

मग, बटरवडे खाल्ले की...

आधीच मर्कट, तशात मद्द्य प्यायला....अशी गत होते का?

खेकड्याच्या धाग्यावरील भिंगरी ह्यांचा प्रतिसाद चुकून स्वतःच्या 'झटपट दहिवड्या'च्या पाककृतीवर पडल्याने एका चांगल्या पाककृतीच्या धाग्याचा खरडफळा झाला. संपादक मंडळाने वेळीच हालचाल्र करून संबंधीत प्रतिसाद योग्य त्या धाग्यावर हलविला असता तर असा दुर्दैवी प्रकार घडला नसता. अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य ती कारवाई करता येईलच. पण अर्थात इच्छा असेल तर.

प्यारे१

१.काका, मिपावर येऊन किती वर्षे झाली हो तुम्हाला?
२. सो स्वीट
३. असाच निरागसपणा जपा.
४. भिंगरी गप्प आणि तुम्हीच भिरभिर ????
५. टी आर पी काका टी आर पी!
६. हे कुठल्या प्रतिसादाचं विडंबन?

थोडा घाईत आहे म्हणून सध्या एवढंच! ;)

संजय क्षीरसागर

डोळे झाकून घ्या!

एका चांगल्या पाककृतीच्या धाग्याचा खरडफळा झाला.

कुठे दहिवडे आणि कुठे हे पोकळ बटरवडे!

संपादक मंडळाने वेळीच हालचाल्र करून संबंधीत प्रतिसाद योग्य त्या धाग्यावर हलविला असता तर असा दुर्दैवी प्रकार घडला नसता.अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य ती कारवाई करता येईलच. पण अर्थात इच्छा असेल तर

च्यायला, श्रद्धांजलीच्या धाग्यावर प्रतिसाद देण्याचा प्रमाद झाला की काय!

भिंगरी

धन्यवाद पेठकरभाऊ ,
अहो पण या चुकीमुळे इथे नवनवीन पदार्थांची रेलचेल झाली.
अर्थात माझं भिरभिरं झालं त्यामुळे

हाडक्या

सग्गळं सग्गळं झालं इथे पण कोणी मोदींचं नाव काढलं नाही.? मिप्पावालो, जनता तुम्हे माफ नही करेगी..!!

पैसा

अब की बार
मोदी सरकार
चाय मसालेदार
साथ दहीबटर!

मराठे

भन्नाट परिक्षण, उगाच नाही देवानंदला खेकडा म्हणत.

सस्नेह

आयोजित केलेल्या अवांतर स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रत्येकी एक खेकडा बक्षिस देण्यात येत आहे.(पेठकरकाका सोडून ! )
अ
ज्याने त्याने आपापल्या आवडीप्रमाणे त्यावर दही/विरजण घालून घ्यावे.

अजया

धमाल धाग्यावर का अवांतराचा बाऊ ?
पौर्णिमेला अवांतराचा खेकडा दही घालुन खाऊ *wink

संजय क्षीरसागर

खेकड्याला विरजण कसं लावायचं, ते विचारा!

ज्यांना लावता येते, त्यांना खेकड्यांना विरजण नक्कीच लावता येईल.