कारलं फ्राय
Primary tabs
कारलं फ्राय
साहित्य...........
कारली ६ (लहान असल्यास उभे दोन भाग करावेत .मोठी असल्यास उभे व आडवे असे चार भाग करावेत)
अर्धा नारळ खवलेला.
५/६ हिरव्या तिखट मिरच्या.
कोथिंबीर
तांदळाची पिठी.
मीठ (चवी अनुसार)
तळण्यासाठी तेल.
कोकम
कढीपत्ता (४/५ पाने)
कृती---
प्रथम कारल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून त्यात थोडे मीठ व कोकम (२/३) टाकावे.
साधारण मऊ झाल्यावर बाहेर काढून त्यातील बिया काढून टाकाव्या
मिक्सरमध्ये खोबरे,मिरच्या,कोथिंबीर,कढीपत्ता मीठ एकत्र वाटून घ्यावे.
आता कारल्याच्या प्रत्येक तुकड्यात हा मसाला भरून दाबून द्यावे.
तांदळाच्या पिठीत हे तुकडे दोनही बाजूने दाबून घ्यावे.
तव्यावर तेल टाकून हे तुकडे दोनही बाजूंनी मंद आचेवर खमंग तळून घ्यावे.(मासे तळतो तसे.)
कुरकुरीत कारली फ्राय तय्यार.
प्रवासात न्यायलाही उपयोगी पडतात. २/३ दिवस टिकतात.







आता फोटो येवु द्या लवकर.......
खवलेला नारळ घालूनही टिकतात का? की मसाला परतून घेतला?
की सुके खोबरे घातलं?
हो कारण मंद आचेवर खरपूस फ्राय होते ना.
हवं असल्यास सुक्या खोबऱ्याचे करू शकता,पण चवीत फरक पडतो
भरलेल्या दहिवड्यां बरोबर कशी लागतील?
पोकळ खेकड्यांबरोबर अमावस्येला खाल्ल्यास अति सुंदर लागतात.
कशी लागतील?
अमावास्येच्या दिवशी पोकळ खेकड्याच्या नांगीने दहीवडा उचलून खेकड्याच्या पाठीच्या टरफलात ठेऊन खाल्ल्यास स्नेहांकित भुतांची भीती वाटत नाही.
*acute* भारी! *lol*
आण्भवाचा उपाय दिसतो !
बाकी आत्मे अन भुते यांची मिपावर रेलचेल आहे बरं !
फोटूsssssssssssssssssssssssss :-/
अतृप्त आत्म्यांनो हे घ्या फोटो.
बाई बाई दमले हे फोटो टाकता
मला काही येईना,दुसऱ्यांकडून करून घेता घेता किती वेळ गेला.
फोटूच्या बाबतीत मी पास
धन्यवाद!
सुसरीसारखे दिसतायत
तुम्ही 'सुसर फ्राय' करुन पाहिलय का?
या वरच्या सुसरीची पाठ मउ असावी. :)
कृपया संपादक मंडळींनी हे फोटो योग्य त्या ठिकाणी टाकावेत.
मला जमले नाही.
फोटो धाग्यात टाकले आहेत.
- संपादक मंडळ
धन्यवाद संपादक मंडळ
भिंगरी बाई
___/\___ हॅट्स ऑफ.
जनतेनं इतका दंगा करुन सुद्धा चिकाटीनं पाकृ पूर्ण केल्याबद्दल कौतुक वाटले.
पदार्थ सुद्धा छान दिसतोय.
चला आता तुम्हाला पण फोटो टाकता आले.
आता, अजून मस्त पा.क्रु. येवू द्यात.
वॉव...मस्स्त्त्त फोटो आणि झक्कास पाककृती...!!! नक्की करुन पाहीन..
हेच म्हणतो...म्.फो.झ.पा.
नक्की करणार
वाह भिंगरी ताय ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }
वरील मसाल्यात थोडी काळी मिरी वाटून टाकली.अजून मस्त चव आली कारल्याला.
भिंगरी, मस्तं रेसेपी. नारळ घालून कधी केली नव्हती. नेहमी मी बेसनच वापरते. हे आता नक्की करुन बघिन.