Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा ५ रुपयात जेवण!

ह
हुप्प्या
Sun, 07/06/2014 - 03:06
🗣 11 प्रतिसाद
कुठलाही पक्ष सत्तेवर बसला की आपोआप माजोरडा बनून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मनोभावे करू लागतो असे वाटू लागले आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील. तूर्तास महागाई, दुष्काळ, अन्नटंचाई ह्या गोष्टी अक्राळविक्राळ रुप धारण करत असताना भाजपाच्या एका मस्तवाल नेत्याने, आशिष शेलारने असे विधान केले की मुंबईत ५ रू. मधे पोट भरता येते आणि ५००० रु. मधेही भरता येते. जॉर्ज ऑरवेलच्या अ‍ॅनिमल फार्म ह्या पुस्तकाची आठवण येते. माणसाची सत्ता झुगारून टाकण्याकरता डुकरे इतर प्राण्यांच्या मदतीने क्रांती करतात आणि मग प्राण्यांची सत्ता येते. मग डुकरे अच्छ्या दिनांचे गाजर लटकवत स्वतः माणसासारखे वागू लागतात. दोन पायावर चालू लागतात. बाकी प्राण्यांवर जुलुम सुरु होतो. वगैरे वगैरे. http://www.dnaindia.com/mumbai/report-after-congress-leaders-now-bjp-s-ashish-shelar-claims-rs-5-can-buy-a-full-meal-in-mumbai-1999828 शेलार साहेबांना योग्य त्या कानपिचक्या मिळतील अशी आशा. पार्श्वभागावर लाथ मिळाली अधिकच आनंद वाटेल. महागाई खाली आणता येत नसेल तर त्या दु:खावर कमीत कमी डागण्या तरी देऊ नयेत अशी लोकांनी अपेक्षा केली तर ती वावगी म्हणता येईल का?

प्रतिक्रिया द्या
7700 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्यारे१ Sun, 07/06/2014 - 10:57 नवीन
दिन... अच्छे है!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 07/07/2014 - 08:32 नवीन
आपण त्याने नेमके काय म्हणले ते वाचले का? त्याचे वाक्य असे होते की ५००० मध्ये मिळते आणि ५ मध्येही मिळते. त्यामध्ये किमान काँग्रेसचा मस्तवालपणा नाही. कृपया विपर्यास करू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
विजुभाऊ Mon, 07/07/2014 - 10:36 नवीन
ओ हुप्प्या काका. अ‍ॅनिमल फार्म परत एकदा वाचा. डुकरे बिचारी नेहमीच "सम आर मोअर इक्वल" या उक्तीचा अनुभव घेत कष्ट सहन करीत असतात.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Mon, 07/07/2014 - 11:31 नवीन
कृपया मुंबईत स्वस्त जेवण मिळते या अफवा(?) वा असली विधाने पुन्हा पुन्हा करू नका. आधीच आमच्या मुंबईत मरणाची गर्दी आणि परप्रांतीयांच्या लोंढ्याचा प्रॉब्लेम आहे, उगाच त्यात आणखी भर.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 07/07/2014 - 13:48 नवीन
च्यामारी आता "चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला" ही म्हणही वापरायची चोरीच म्हणा की! लसं म्हटलं की लागलंच मस्तवाल नावाचं बिरुद मागे! (मस्तवाल) ऋ
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 07/14/2014 - 17:33 नवीन
आपण आता सत्ताभ्रष्ट झालेले असल्यामुळे काय वाट्टेल ते बोला. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार करण्याची सत्ताभ्रष्ट लोकांना पूर्ण मुभा आहे. सत्ताधारी लोकांनी मात्र मोजून मापूनच बोलले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नितिन थत्ते Tue, 07/15/2014 - 10:55 नवीन
ऐला ऋषिकेश सत्तेत होता हे आधी नाय सांगायचं? कायतरी फायदा करून घेता आला असता की. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ऋ
ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 11:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ह
हुप्प्या Wed, 07/30/2014 - 19:58 नवीन
विठोबाच्या भक्तीत रममाण होणारे नामदेव आणि महाराणींच्या भक्तीत तल्लीन होणारे सदर महोदय ह्यात फार फरक नाही बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आशु जोग Tue, 07/15/2014 - 14:25 नवीन
हुप्प्या यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी काळाबरोबर राहतात आणि रोजचा पेपर ते वाचतात
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 07/30/2014 - 20:02 नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/only-rich-people-eat-tomatoes-says-bjp-leader-prabhat-jha-719722/ केवळ श्रीमंत लोक टोमॅटो खातात तेव्हा टोमॅटोचे भाव वाढले तरी फार बिघडत नाही. प्रभात झा, भाजप नेता तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा! ह्या "झा"ला कुणी जबाबदार नेता "झा"डून काढेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा