जनातलं, मनातलं
प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
Primary tabs
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल.
मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल.
यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार जनसेवेत समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला ही आनंदाची बातमी.
मटाची बातमी इथे
वाचायला मिळेल !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोर कामाला जगतमान्यता...!!!!!
अभिमानास्पद गोष्ट आहे ही......
हार्दिक अभिनंदन......!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
अभिनंदन... आणि विशेष करून एकाच घरातील २ व्यक्तिंनी इतके उत्तुंग कार्य करावे आणि त्याची पावती मिळावी हा पण एक सुवर्ण योग.
यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.
सहमत आणि आग्रह. सर्किट मनावर घ्या.
बिपिन.
आमटे कुटु॑बिया॑चे योगदान एव्हढे मोठे आहे की त्या॑ना नोबेल पारितोषिकच मिळाले पाहिजे! अर्थात मॅगसेसे पुरस्कारही अतिशय मोलाचाच आहे, त्याबद्दल डॉ.प्रकाश व म॑दाता॑ई॑चे अभिन॑दन!
आनंदाची बातमी. आमटे दांपत्याचे अभिनंदन.
आमटे कुटु॑बिया॑चे योगदान एव्हढे मोठे आहे की त्या॑ना नोबेल पारितोषिकच मिळाले पाहिजे! अर्थात मॅगसेसे पुरस्कारही अतिशय मोलाचाच आहे, त्याबद्दल डॉ.प्रकाश व म॑दाता॑ई॑चे अभिन॑दन!
असेच म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अरे व्वा...
छान आहे. त्यांचे अभिनंदन :)
आमटे परिवार चालवत असलेल्या प्रकल्पाची माहिती मिपावर येथे पहावी.
सर्किटराव, आणखी माहिती वाचायला आवडेल. :)
(अवांतर: काय योगायोग आहे. कालच राजू परूळेकरांच्या पुस्तकात प्रकाश आमटेंबद्दल वाचले होते. आणि आज त्यांना पुरस्कार जाहीर झाला.)
तुम्ही "माणसं भेटलेली, न भेटलेली" बद्दल बोलताय का? मी पण एवढ्यातच वाचलं ते पुस्तक.. फार छान आहे.
प्रकाश आमटेंचा यथार्थ गौरव झाला.....
http://sucheltas.blogspot.com
त्याच निष्ठेने, तळमळीने, आधुनिक विचारांची जोड देऊन पुढे चालू ठेवणार्या आणि वाढवणार्या प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन त्या पुरस्काराची उंची अजून वाढली आहे!
चतुरंग
चतुरंगराव ह्यांच्याशी पुर्ण सहमत!
आमटे दांपत्याचे मनापासुन अभिनंदन!
वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणार्या आमटे दंपतीचे सहर्ष अभिनंदन!
हे संकेतस्थळ -
लोक बिरादरी प्रकल्प
सर्किटसाहेबांना आनंदवनाचे प्रायोजितीकरण फारसे आवडले नसल्याचे लक्षात आहे.
आमटे दांपत्याचे अभिनंदन. आपल्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
आमटे कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा.
बाबा आमटेंच्या कार्यपद्धतीपेक्षा प्रकाश-मंदाकिनींची कार्यपद्धती वेगळी आहे, याबद्दल वैषम्य वाटते, असे सांगणारा एक चित्रलेख सर्किट यांनी मागे प्रसिद्ध केला होता. आनंदवनाबद्दल आतडे तुटत असल्यामुळे, आतून-बाहेरून माहिती असल्यामुळे, ते असे साधकबाधक मुद्दे सडेतोडपणे मांडू शकतात. त्यांचे विचार वाचायला जरूर आवडतील.
सर्वप्रथम, डॉ. प्रकाश आणि मंदाताईंचे हार्दिक अभिनंदन. मॅगसेसे आणि देमियन डटन पुरस्कार मिळाल्यावर बाबांच्या कार्याचा परिचय पूर्ण जगाला झाला होता.
आता थोडे धनंजयांनी लिहिलेल्या मुद्द्यावर.
बाबा नर्मदेवर गेल्यानंतर आनंदवनाची जबाबदारी त्यांच्या मोठ्या मुलावर, म्हणजे डॉ. विकासवर सोपवण्यात आली. प्रकाश जिथे होते तिथेच लोकबिरादरीत, म्हणजे सोमनाथ, भामरागड, हेमलकसा ह्या आदिवासी भागातच सेवा व्रत राहिले.
बाबांनी सुरू केलेली तरुणांसाठीची श्रमशिबिरे हेमलकशाला होतात, अजूनही. त्यात माझा थोडासा सहभाग होता. झोकून देऊन काम करणे, तडफ, अतिरेकी बाजारूकरणाला विरोध, प्रसिद्धीला दुय्यम महत्व ही वैशिष्ट्ये असलेली बाबांची कार्यपद्धती, आणि प्रकाश-मंदांची कार्यपद्धती फारशी वेगळी आहे असे वाटत नाही.
जालावर कुणीतरी हेमलकसा/भामरागडची चित्रे टाकलेली आहेत, ती इथे बघता येतील.
- सर्किट
नवराबायकोंनी एकत्र तेही सामाजिक काम करणे सोपे नसावे. डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी ते यशस्वी करून दाखवले, आणि बाबा आमटे यांचा वारसा पुढे चालवला याबद्दल दोघांचेही अभिनंदन.
परितोषक विजेत्या आमटे दांपत्याला माझे लाख प्रणाम!
खरंच, आभाळाइतकी मोठी माणसं ही!
तात्या.
डॉ. प्रकाश आमटे यांनी स्वीकारल्यामुळे उलट त्या मॅगॅसेसे पारितोषिकाचाच सन्मान झाला असे आम्हाला वाटते!!!
खूप अभिमान वाटला...
खूप आनंद झाला...
:)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
जगात अजुनहि अशी माणसे आहेत ही जाणीव सुखद आहे...
अभिनंदन.
हेच म्हणते.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
बाबा आमटेचा वारसा प्रका श आणि मन्दाकिनिने चालवला त्याबद्द ल त्याचे अभिनन्दन तर आहेच पण तो वारसा त्यानि आपल्या मुला परयन्त पोचवला त्याचे जास्त कौतुक आहे कारण त्यन्चि दोन्हि मुले ह्याच कार्यात आहेत अगदि परदेशात शिकक्शण घेवुन सु ध्दा. थोर माणसे आहेत.
एकाच घरातील दोन पिढ्या इतके मोठे काम करतात हे कौतूकास्पदच !
आमटे दंपतीचे हार्दीक अभिनंदन !
-- लिखाळ.
एकाच घरातील दोन पिढ्या इतके मोठे काम करतात हे कौतूकास्पदच !
आमटे दंपतीचे हार्दीक अभिनंदन !
असेच म्हणते.
स्वाती
खरच अभिमानास्पद अस कार्य घडवलेली मोठी माणस आहेत ती.
खुपच छान वाटले ही बातमी वाचुन. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao