Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुराणातली वांगी

म
माधुरी विनायक
Mon, 07/07/2014 - 11:13
🗣 18 प्रतिसाद
पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं... असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...

प्रतिक्रिया द्या
6657 वाचन

💬 प्रतिसाद (18)
म
मृत्युन्जय Mon, 07/07/2014 - 11:48 नवीन
१८ विश्वे दारिद्र्य हाही एक चुकीचा वाक्प्रचार आहे. त्याऐवजी ते १८ विसे दारिद्र्य असे पाहिजे. १८ विसे = ३६० दिवस. म्हणजे १२ महिने दारिद्र्य. थोडक्यात अखंड दारिद्र्य.
  • Log in or register to post comments
ए
एसमाळी Mon, 07/07/2014 - 11:48 नवीन
"भजनाला आठ अन् जेवणाला साठ" अर्थ समजेलच की
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 12:15 नवीन
गणपतीच्या आरतीत काही लोकं 'संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, तर काही 'संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, नक्की कोणते बरोबर, ते मला आजही माहित नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 12:19 नवीन
संकटी पावावे हेच बरोबर आहे, नैतर गंपतीबाप्पा संकष्टी सोडून उरलेल्या दिवशी पावतच नाहीत असे होईल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्यारे१ Mon, 07/07/2014 - 12:27 नवीन
+ ११११११ त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Mon, 07/07/2014 - 12:36 नवीन
'चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही' च्या बाबतीत पण हेच घडतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 12:36 नवीन
त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.
अगदी अगदी. याला अजूनेक प्यारलल उदा. मिले सुरमध्ये आहे. जेव्हा 'सुर का दरिया बह के सागर में मिले, बदलां दा रूप लके, बरसने होले होले' हे तमिळच्या अगोदरचे पंजाबीतले गाणे म्हणतात तेव्हा सगळे 'बदलां दारू' च म्हणतात. मीही म्हणायचो, अजूनही म्हणतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 14:11 नवीन
मी, ही आणखी ऐक, 'प्रतिक्रिया चिटकवली' का 'प्रतिक्रिया चिकटवली' ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 11:29 नवीन
चिकटवली हा प्रमाण बोलीतला प्रयोग आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
आ
आनंदी गोपाळ Wed, 07/09/2014 - 12:43 नवीन
चिकट हे विशेषण. डिंक चिकट असतो. चिटकणे हे सहसा (आज्ञार्थी) क्रीयापद म्हणून वापरले जाते. उदा: जरा प्रयत्न करून एकाद्या नोकरीस चिटक रे बाबा. त्यातही हिंदी चिपकना च्या अपभ्रंशावरून आले असावे. चिकट हे रूप मराठी म्हणून जास्त योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 12:57 नवीन
चिटकणे हे हिंदी प्रभावामुळेच आले असेल याबद्दल साशंक आहे-मला ते साधे वर्णविपर्ययाचे उदा. वाटते. बाकी विशेषणाबद्दल इ. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/07/2014 - 12:56 नवीन
मी नै त्यातली अन कडी लावा आतली दरवाजा उघडा आणि न्हाणीला बोळा मी बा‌ई संतीण माझ्या मागे दोन तीन अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज अंधारात केले पण उजेडात आले आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून. जिकडे सु‌ई तिकडे दोरा. धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे माकड म्हणतं माझीच लाल हे वाकप्रचार नेहमी कानावर येत असतात. पण काहीकेल्या अर्थबोध होत नाही. या धाग्या निम्मीत्त जाणकार यावर प्रकाश टाकतील का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 07/07/2014 - 14:18 नवीन
मिसळपाववर याच आशयावर आधी झालेली समांतर चर्चा ह्या धाग्यावर.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/10/2014 - 06:58 नवीन
चारुदत्त आफळ्यांची किर्तनं ऐका बराचं खुलासा होईल. @बॅटमॅन तोबरा आणि संकष्टी का संकटी वर आफळेबुवांचं एक आख्यान आहे. सावरकरचरित्र सांगताना ह्या विषयावर त्यांनी सांगीतल्याचं आठवतय. (आफळे बुवांचा पंखा) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 07:27 नवीन
चारूदत्त आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याची संधी अजून गवसली नाही. पण त्यांचे पिताश्री राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याचा एकदा लहानपणी योग आला होता. एका किर्तनातच त्यांचा पंखा झालो. तेच गुण मुलात उतरले असणार असे दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
संचित Sun, 07/13/2014 - 18:32 नवीन
आफळे गुरूजींचे किर्तन तुनळी वर येथे भेटेल. https://www.youtube.com/watch?v=Ra4Dj_S4BQ0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्यारे१ Sun, 07/13/2014 - 19:17 नवीन
>>> (आफळे बुवांचा पंखा) 'आमच्या' वाईच्या कृष्णाबाई उत्सवाला हमखास असतात. धमाल कीर्तन असतं. त्याबरोबरच जाज्ज्वल्ल्य हिंदूप्रेम नि भरपूर कानपिचक्या सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
माधुरी विनायक गुरुवार, 07/10/2014 - 08:40 नवीन
प्रतिसादांबद्दल आभार आणि हो, शिद, आपण दिलेला दुवा उपयुक्त आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा