विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!
बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!
💬 प्रतिसाद
(73)
ध
धन्या
Tue, 07/15/2014 - 06:44
नवीन
सामाजिक बांधिलकी नसलेल्या, केवळ भक्तीभाव असलेल्या या अरविंदांच्या कवितेला अभय द्या.
- Log in or register to post comments
आ
आशिष दा
Tue, 07/15/2014 - 10:57
नवीन
विंदांची कविता भारीच.
बाकी कोणालातरी उगाच मिरची झोंबण्याचा प्रकार वाटतो :)
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/15/2014 - 15:59
नवीन
@ सूड,
धन्यवाद.
परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :)
कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत.
आनंद आहे. :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/15/2014 - 17:10
नवीन
अर्रे वा...! कवितेवरील चर्चा बरीच पुढे गेली.
चालु द्या. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 07/15/2014 - 17:14
नवीन
बरीच, बरीच. पुढच्या वेळी योग्य सल्ला घेऊन, योग्य कवींच्या कविता पोस्टा न विसरता.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/15/2014 - 17:56
नवीन
कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ?
मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 07/15/2014 - 18:04
नवीन
मला तर एकदम आवडली होती तुम्ही टाकलेली कविता. तसेही विंदा माझे आवडते कवी आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/15/2014 - 18:07
नवीन
छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :)
(पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 07/15/2014 - 19:00
नवीन
म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/15/2014 - 19:05
नवीन
>>> सावळा
कवितेत सावळा 'बसला' असता काय?
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/15/2014 - 18:27
नवीन
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर,
तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :)
पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/15/2014 - 18:32
नवीन
मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 07/16/2014 - 09:56
नवीन
सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/15/2014 - 18:35
नवीन
आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब????
नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा?
-(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/15/2014 - 18:37
नवीन
पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात.
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/15/2014 - 18:40
नवीन
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व.
चर्चा लांबवण्यात हशिल नाही.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/15/2014 - 18:52
नवीन
विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे.
तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Tue, 07/15/2014 - 21:49
नवीन
पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते.
त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना.
फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/15/2014 - 22:20
नवीन
मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!!
'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी?
अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)
- Log in or register to post comments
आ
आशिष दा
Wed, 07/16/2014 - 07:48
नवीन
सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का?
अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 09/13/2014 - 15:33
नवीन
सुंदर कविता मुटे साहेब
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/30/2015 - 09:57
नवीन
हायला, आन् चित्रगुप्तसाहेब उगा अजून कायकाय झाडापाल्याचा रस काढून प्या म्हंतेत ! ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 10/30/2015 - 10:20
नवीन
झाला का बल्ल्या आता?
मार्गदर्शक तत्त्वात नाही बसत ओ जुना धागा वर काढणं. ;)
-प्यारंग जोशी
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2