भटकंती

गुप्त भिमाशंकर नेचर ट्रेल

Primary tabs

शेकरूने यावेळीसुद्धा दगा दिला.
अगदी ५० फुटांपेक्षाही जवळून आवाज येत होता, पण दर्शन मात्र झाले नाही. :(

त्या दिवशी खूप ढगाळ वातावरण होते आणि फोटोग्राफीसाठी जंगलात पुरेसा प्रकाश नव्हता, त्यामुळे फोटो क्वालिटीसाठी आत्ताच माफी मागतो.

Orange Headed Ground Thrush - श्वेतकंठी कस्तुर

Red Whiskered Bulbul - लालगाल्या बुलबुल

भिमाशंकरवरून परतताना

नांदेडीअन

गेल्या महिन्याभरापासून ‘कलादालन’ विभागात हा धागा काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण एरर येत होता.
EntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7734 of /home/misalone/public_html/includes/common.inc).

म्हणून आज ‘भटकंती’ विभागातच टाकल्या फोटो.

कंजूस

कस्तुर आवडला .या ट्रेलला पक्षी ऐकू येतात फार ,दिसतात कमी .खाली झाडीच्या वाटेला दिसतात .७ जूननंतर शेकरू दूर जातात कच्ची फळे संपल्यामुळे .

प्रचेतस

आजच पाहिलंय. दोन वेळा. एकदा झाडाच्या उंच फांदीवर आणि दुसर्‍यांदा अगदी समोर जेमतेम ५ फूटांवर...ते ही अगदी निर्धास्तपणे फळे खात असताना तेही अगदी ७/८ मिनिटे. :)

वेल्लाभट

जायला हवंच आहे भीमाशंकर ला. कधीपासून पेंडिंग आहे.

मदनबाण

सुरेख... फोटो एडिटिंग सुरेख केलं आहे. :) या एडिटिंग विषयी सुद्धा लिहता आलं तर नक्की लिहा. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child

नांदेडीअन

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

@ मदनबाण
पहिल्यांदाच कुणीतरी मला फोटो एडिटिंगबद्दल प्रोत्साहन देतंय.
धन्यवाद. :)

यात पहिल्या, दुसर्‍या आणि शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय.
बाकी सगळ्या फोटोंमध्ये लेव्हल ऍडजस्टमेंट, सॅच्युरेशन आणि शार्पनेसवर काम केलेलं आहे.

मदनबाण

शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा प्रयत्न केलाय.
हो ते लगेच कळलं आणि म्हणुनच एडिटिंगबद्दल सुद्धा लिहावं अशी विनंती केली. :) जालावर एचडीआर फोटोच्या नावावर फोटोंची अशी काही लेव्हल करुन ठेवली असते की ते फोटो पाहु सुद्धा नये असे वाटते. पण तुमच्या एचडीआरच्या फोटोत तो भडकपणा जाणवला नाही. :)
ज्यावेळी एचडीआरवर प्रयोग करत होतो त्यावेळी एचडीआरसाठीच असलेले Photomatix चे नाव बर्‍यापैकी वाचनात आले होते..... तुम्ही कशाचा वापर केला आहेत ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

धन्या

दोन पक्ष्यांचे फोटो वगळता बाकीचे फोटो यथातथाच आहेत.

भिमाशंकर हे ठिकाण मात्र एकदा तरी पावसाळ्यात पाहावे असेच आहे. :)

इरसाल

शेकरु बाबतीत मय बहुतच लकी हय.
एकदा भीमाशंकरला तर एकदा अतिरापल्ली/अथिरापल्ली वॉटरफॉल केरळ इथे मनसोक्त पहायला मिळालाय.