Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भोसरीचा जितेंदर सिंग!

ह
हुप्प्या
Sun, 07/13/2014 - 07:53
🗣 94 प्रतिसाद
http://www.loksatta.com/pune-news/atlast-jitendra-singh-arrested-664165/ भोसरी ह्या पुण्याजवळील गावात प्रियदर्शिनी नामक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत आठवीत शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी शाळेत आणि वर्गात मराठी बोलण्याचा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा केला त्यामुळे त्यांना संस्थेच्या प्रमुखाने शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. ह्या संस्थेचा भोसरीचा* संचालक जितेंद्र सिंग ह्याला शेवटी अटक केली गेली. मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या एका उपनगरात मराठी बोलण्याला गुन्हा मानला जाणे म्हणजे नेत्रदीपक प्रगती म्हटली पाहिजे. मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल. *सदर विशेषणाचा अर्थ शक्यतो भोसरी गावचा रहिवासी असा घ्यावा ;-)

प्रतिक्रिया द्या
39292 वाचन

💬 प्रतिसाद (94)
र
रेवती Mon, 07/14/2014 - 03:46 नवीन
लिंक वाचली नाही तरी असे म्हणावेसे वाटते की कोणत्याही माध्यमाच्या शाळेत कोणत्याही चुकीसाठी (गुन्हा वगैरे वेगळे विषय आहेत. ) वळ उठेपर्यंत मारायची (खरेतर मारायचीच) गरज नाही. मारामारी करू नये, अमूक करावे, तमूक करू नये या गोष्टी शाळेतूनच बर्‍या शिकवल्या गेल्या नाहीत तर काय उपयोग? आईवडीलांनीही संस्कार करावेत हा वेगळा (आणि महत्वाचा विषय आहे पण तो आत्ता हा धागा त्याचा नाही) विषय झाला. वळ उठेपर्यंत मारणे हे गंभीर बाब आहे. प्रत्येक शाळेचे नियम असतात आणि ते मोडल्याची शिक्षा ठराविक असायला हवी. मनमानी झाली तर हुकुमशाही म्हणायला हरकत नाही. खूप वर्षांपूर्वी मुलींच्या शाळेत (इंग्रजी माध्यम) हातावर मेंदी रंगवून शाळेत गेल्याबद्दल मुलीला वाईट पद्धतीने शिक्षा झाली होती. इंग्रजी शाळेत नागपंचमी हा सण नाही म्हणे! हरकत नाही. असतील तुमचे नियम पण समज देणे हा भागही असतो. आणि मराठीबहुल भागात शाळा काढलीयेत ना? मग स्थानिक लोक तुमच्या शाळेत येणार ना! कित्येकदा जवळची असते म्हणून त्या भागात रहिवासी मुलांना शाळेत पाठवतात. जवळची हवी, मराठी माध्यमाची हवी, तिथे घरेही स्वस्तात मिळावीत असे सगळे जमेलच असे नाही. त्यातल्यात्यात बरे कॉम्बिनेशन करून महागाईच्या जमान्यात रहायचा प्रयत्न करीत असताना काही चांगले, काही बरे तर काही मनाविरुद्ध निर्णय घेऊन लोक रहातात. त्यामुळे मराठी लोकांनाच फार सोस असतो असे म्हणण्यात अर्थ नाही. तसे नसेलच असेही नाही पण म्हणून मारण्याचा हक्क मिळत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 06:06 नवीन
पुर्वी, म्हणजे मला जबरदस्तीने शाळेत घातले होते, त्या काळांत, त्यावेळी मला इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून शिक्षकांनी मारले होते... आणि आत्ताच्या शाळा मराठीत का बोललात? म्हणून मार देतात.... कालचक्र उलटे फिरले... असो, जय रामदास काका (आधी गुंतू नये.... गुंतल्यावर मग कुंथू नये)
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Mon, 07/14/2014 - 07:33 नवीन
अहो मुवि, दोन्हीत काय फरक आहे ? तेव्हा इंग्रजी बोलता येत नाही म्हणून पडायच्या, मग आतापण इंग्रजी बोलत नाही म्हणूनच पडताय की.. :) You do it Or I do it, Both can not do it. :) - इती आमची इंग्रजी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 11:15 नवीन
घड्याळाचे काटे उलटे फिरले तरी... मुलांना मारणे हा शिक्षकांचा अधिकार, मात्र केंद्रस्थानीच आहे. एकूण काय तर, आपला हा अधिकार सोडायला शिक्षक तयार नाहीत हेच सत्य... जावूदे, आम्हाला मार मिळाल्याने ना आमचे इंग्रजी सुधारले ना आमच्या इतर शालेय ज्ञानांत भर पडली. पण एक माराचा एक फायदा मात्र नक्कीच झाला... आम्ही कोडगे झालो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
स
सुनील Mon, 07/14/2014 - 06:35 नवीन
सदर शाळेचा नियम हा मुलांनी शाळेत असताना एकमेकांशी इंग्रजीतच बोलावे असा आहे, असे दिसते. मुलांनी नियमभंग केला तो इंग्रजीत न बोलल्यामुळे (मराठीत बोलल्यामुळे नव्हे). मुले जर का गुजराती, सिंधी, हिंदी, तमिळ वा संस्कृतात बोलली असती तरी ते नियमबाह्यच ठरले असते. असा नियम करायचा खासगी शाळेला अधिकार आहे काय? बहुधा असावा. जर नियम करायचा अधिकार असेल तर, नियम तोडल्यावर काय शिक्षा देण्याचा शाळेला अधिकार असावा? फौजदारी गुन्ह्याच्या कचाट्यात सापडणार नाही, इतपत. म्हणजेच, मुलांना एखादा पिरियड उभे करणे, थोडा जास्तीचा गृहपाठ देणे इत्यादी चालून जावे. अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. थोडक्यात, गुन्हेगारांना जी काही शिक्षा होईल ती मुलांना मारल्यामुळे होईल. त्याचा मराठीच्या अभिनिवेशाशी काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/14/2014 - 06:50 नवीन
@अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा फौजदारी गुन्हा ठरतो.>>> पूर्ण सहमत. @थोडक्यात, गुन्हेगारांना जी काही शिक्षा होईल ती मुलांना मारल्यामुळे होईल. त्याचा मराठीच्या अभिनिवेशाशी काहीही संबंध नाही. >>> ++++++++++++++११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ह
हुप्प्या Mon, 07/14/2014 - 07:03 नवीन
भारताने भाषावार प्रांतरचना स्वीकारली आहे. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. त्यामुळे प्रियदर्शिनी शाळेत काही मुले सिंधी भाषेत बोलली आणि त्यांना शिक्षा झाली व दुसरीकडे मराठी बोलल्यामुळे शिक्षा झाली ह्यात थोडा फरक आहेच. मराठीला विरोध हा जळात राहून माशाशी वैराचा प्रकार आहे. अर्थात प्रकरण कोर्टात गेले तर जी काही शिक्षा होईल ती अमानुष शिक्षेबद्दलच होईल ह्यात शंकाच नाही. पण ह्यातील मराठी विरोध आहे त्याचा उपयोग ह्याविरुद्ध आवाज उठवण्याकरता झाला आहे. कुठलाही राजकीय पुढारी मराठी विरोधाचे समर्थन करणार नाही. समजा ह्या शाळेने या आधी वर्गात हिंदी बोलल्याबद्दल इतकी कठोर शिक्षा दिलेली नाही मात्र मराठी बोलल्याबद्दल मात्र वळ उठेपर्यंत मारहाण केली अशी माहिती मिळाली तर प्रकरणाला नक्कीच नवे वळण लागेल. शाळा ज्या राज्यात उघडली आहे त्या राज्याच्या राजभाषेबद्दल थोडा जास्त आदर बाळगला पाहिजे इतके तारतम्य ह्या शाळेच्या प्रमुखांना समजायला हवे. भोसरीसारख्या भागात मराठी लोकांची संख्या जास्त असणार आणि मराठी बोलण्याची प्रकरणेही जास्त होत असणार. त्यामुळे मराठी बोलल्याबद्दल कायदा हातात घेऊन मुलांची हाडे नरम करताना ह्या पैलूकडे बघण्याची अक्कल भोसरीच्या संचालकाला आली तरी पुष्कळ झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 07/14/2014 - 07:21 नवीन
समजा ह्या शाळेने या आधी वर्गात हिंदी बोलल्याबद्दल इतकी कठोर शिक्षा दिलेली नाही मात्र मराठी बोलल्याबद्दल मात्र वळ उठेपर्यंत मारहाण केली अशी माहिती मिळाली तर प्रकरणाला नक्कीच नवे वळण लागेल.
अच्छा, तर तुम्हालाही ही महिती नाहीच!! ह्यालाच तर मी फुक्कटचा अभिनिवेश म्हणतोय!!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Tue, 07/15/2014 - 06:46 नवीन
ह्या प्रसंगात मराठी भाषेला काही स्थान नाही असा आपला दावा होता. तो मी खोडून काढत आहे. मराठी ही राज्यभाषा असल्यामुळे ती बोलण्यावरच्या बंधनाविरुद्ध जास्त असंतोष उफाळणार हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जर मराठीचा आकसाने द्वेष होतो आहे असे लक्षात आले तर मराठी भाषेला स्थान नाही हा मुद्दा साफ खोडला जातो. जोवर प्रकरणाची पूर्ण माहिती मिळत नाही तोवर मराठी भाषेचा ह्या प्रकरणात काहीही संबंध नाही अशी क्लीन चिट देणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चौकटराजा Mon, 07/14/2014 - 06:42 नवीन
ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी नव्हे तर आपल्या मातृभाषेत बोलू नये. निदान सर्रास तरी बोलू नये. असा नियम मी ही संस्थाचालक असता तरी केला असता. पण असे केले नाही तर मार देईन हा कोणता न्याय ? माझी मुलगी एका किरिस्ताव वातावरणातील शाळोत्तून शिकली पण तिला अजूनही पुरेसे नीट इंग्रजी बोलता येत नाही.लिहिता ही नाही. म्हण्जे मी तिला त्या माध्यमाला घातल्याचा उद्देशच सफल झालेला नाही. एक संहिता म्हणून तिथे मराठी वा हिंदीत वा कानडीत बोलायला माझा विरोधच असेल.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 07/14/2014 - 07:17 नवीन
मातृभाषा सोडुन इतर कुठल्याही भाषेतुन शिकणार्‍या मुलांना नविन भाषा आणि त्या अनुषंगाणे ज्ञान आणि विद्या मिळवणे थोडे अवघडच जाते. घरीदारी मुले मातृभाषेतच बोलत असतात (बर्‍याचदा). असे असताना जर ती मुले इंग्रजी माध्यामातुन शिक्षण घेत असतील तर केवळ ती भाषा शिकणे अवघड जाते असे नाही तर इतर सगळेच विषय इंग्रजीतुन असल्याने त्या विषयांचा अभ्यसही कमी पडु शकतो. अश्यावेळेस त्या मुलांनी किमान शाळेत तरी इतर कुठल्याही भाषेत न बोलता इंग्रजीत संभाषण करावे असा नियम शाळेने केलेला असल्यास तो योग्यच आहे. आणी हा नियम मोडल्यास कुठलीही अनाठायी नसलेली शिक्षा करणेही योग्यच आहे. वर डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे पालकांनी शाळेत येउन १०० रुपये दंड भरणे ही अतिशय रास्त शिक्षा आहे. त्याबरोबर मुलांनाही लिहिण्याची किंवा तत्सम इतर शिक्षाकरावी. त्यामुळे मुले अपसुक वळणावर येतील. पण वळ उठेस्तोवार मारणे हे काही योग्य वाटत नाही. उपरोक्त प्रकरणात संचालक / व्यवस्थापक जितेंद्र सिंग नसुन जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर लोकांनी अश्याच प्रतिक्रिया दिल्या असत्या का? मारण्याबद्दल नक्की दिल्या असत्या पण त्यामुळे भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या. सध्याही तसे होउ नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/14/2014 - 08:02 नवीन
जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर..... भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या कसं बोललात
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 07/14/2014 - 08:13 नवीन
बराचसा सहमत. जाधवांबद्दल शंका नाही. पण जोशी "मूळचे" कुठले ह्याची ऑफलाइन चौकशी आधी झाली असती!! ;) कारण गुजराती, हिंदी आणि कन्नड भाषकांतदेखिल "जोशी" आढळतात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/14/2014 - 09:18 नवीन
जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर..... भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या
जोशी असते तर दुसर्‍या अस्मिता उफाळुन आल्या असत्या राव =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 09:20 नवीन
हा हा हा, अगदी अगदी =)) पण ही मराठी जोशी असते तरची गोष्ट आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चौकटराजा Mon, 07/14/2014 - 09:30 नवीन
त्यात पुण्याचे की मुंबईचे की नागपूरचे यावर पुलंनी नवीन लेख लिहिला असता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/14/2014 - 09:38 नवीन
त्यात पुण्याचे की मुंबईचे की नागपूरचे यावर पुलंनी नवीन लेख लिहिला असता !
करेक्ट , कारण पुण्याच्या जोश्यांनी मराठी बोलल्याबद्दल मारहाण केलीतर वेगळा अर्थ निघतो अन मुंबईच्यांनी केलीतर वेगळा अन इतर प्रांतीय जोशांनी केली तर त्याहुन वेगळा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ब
बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 08:42 नवीन
पैसे घेतले म्हणून मातृभाषेत बोलायचा अधिकारही हिरावून घेता येतो हे पाहून मजा वाटली. इथे प्रश्न इंग्रजी शाळांचा नाहीये, अगदी शुद्ध तुपातल्या मराठी शाळेने असा नियम केला तरीही ते चूकच आहे. शाळेच्या निर्णयाचे समर्थन करणार्‍यांना (मार देणे नव्हे तर इंग्रजी बोलायची सक्ती करणे यासंदर्भात) माझा प्रश्न आहे. अशी सक्ती केली तर इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याचा काय विदा आहे? विदा नसेल तर उगीच नियम बनवून काय साधते? अपि च- संविधानातल्या तरतुदीस हे विरोधी जात नाही का? माझा त्या विषयाचा अभ्यास नाही, पण जिथे तुम्ही कोर्टासारख्या ठिकाणीही दुभाष्या घेऊन बोलू शकता तिथे शाळेत काय अडचण आहे? पालकांना डोक्याला तकतक नको म्हणून ते त्रास करून घेत नाहीत आणि शाळा माजतात.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 07/14/2014 - 08:58 नवीन
कुठलाशा शंकराचार्‍यांच्या मठात फक्त संकृतातच बोलावे लागते (चार पैकी नक्की कुठले पीठ ते आता आठवत नाही. कदाचित चारही असतील!) तेव्हा खासगी ठिकाणी कुठल्या भाषेत बोलावे, काय पोषाख घालावा इत्यादी नियम संबंधित संस्था नक्कीच करू शकतात.
अशी सक्ती केली तर इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याचा काय विदा आहे? विदा नसेल तर उगीच नियम बनवून काय साधते?
हा निराळा मुद्दा आहे! पण नियम करायचा अधिकार आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 09:07 नवीन
कुठलाशा शंकराचार्‍यांच्या मठात फक्त संकृतातच बोलावे लागते (चार पैकी नक्की कुठले पीठ ते आता आठवत नाही. कदाचित चारही असतील!) तेव्हा खासगी ठिकाणी कुठल्या भाषेत बोलावे, काय पोषाख घालावा इत्यादी नियम संबंधित संस्था नक्कीच करू शकतात
. हा दाखला पुरेसा नाही. मी तिथे जाऊन मराठीत बोललो तर उत्तर मिळणार नाही इतके फारतर म्हणू शकाल. दोन्ही केसेस तुलनीय नाहीत.
पण नियम करायचा अधिकार आहेच!
अशी कुठली कायदेशीर तरतूद असेल तर ठीक, नपेक्षा नाही. असा कायदा जर असेल तर तोही बदलला पाहिजे या मताचा मी आहे, पण तो भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ह
हुप्प्या Tue, 07/15/2014 - 06:49 नवीन
एखाद्या गृहसंकुलात जेव्हा असा नियम केला जातो की निव्वळ शाकाहारी लोकांनाच जागा विकत घेता येईल तेव्हा लोक त्याविरुद्ध बोंब मारतातच ना? त्यामुळे अगदी खाजगी मालमत्तेलाही कायद्याच्या कक्षेतच रहावे लागते. धार्मिक स्थळी जे नियम असतात ते नियम शाळेकरता लागू होतीलच असे नाही. उदा. जाती धर्म वा पंथाविरुद्ध भेद करणे अनेक खाजगी संस्थांकरताही बेकायदा असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 06:23 नवीन
हि जर आपली संस्था अल्पसंख्यांक( जैन) म्हणून रजिस्टर झाली असेल तर चालू शकते पण आपण गुजराती हिंदू असाल तर चालत नाही असा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे. एका मुसलमान माणसाला तेथे जागा घेण्यास अटकाव केल्याबद्दल त्याने केलेल्या याचिकेचा हा निकाल आहे. बहुसंखांक असणे हा आजकाल गुन्हा आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. अल्पसंख्यांक म्हणून कोणत्याही गटाचे किंवा समाजाचे किती लाड चालवून घ्यायचे हा विचार करण्याची वेळ आली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मृत्युन्जय Mon, 07/14/2014 - 11:08 नवीन
पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा काय संबंध? कारण पैसेही पालकच देतात की. प्रश्न पैशाचा नसुन. भाषा सुधारण्याचा आहे. इथे लिखित आणि बोली अश्या दोन्ही प्रकारचा संबंध आहे. इंग्रजी माध्यमातील मुले एकमेकांशी लिखित स्वरुपात संवाद साधत नसतील (तास चालु असताना ज्या चिटठ्यचपाट्या हस्तांतरित होतात त्या वेगळ्या. त्यावर असेही काही नियंत्रण ठेवता येणार नाही.) मुख्य मुद्दा आहे बोली भाषेचा. बोली भाषा सुधारली तर किमान शिक्षक वर्गात काय सांगत आहेत हे तरी नीट कळु लागेल. याचा काही विदा माझ्याकडे तरी नाही. पण संवादाची भाषा सुधारली तर मौखिक संवादाच्या माध्यमातुन दिले गेलेले ज्ञान अधिक चटकन आत्मसात करता येइल असे अनुमान काढणे नक्कीच लॉजिकल आहे. उलट्या बाजुचा म्हणजे मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो असे अनुमान काढणे तार्किकदृष्ट्या अयोग्य ठरेल, मात्र मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याबाबतचा काही विदा असेल तर ते वाचणे नक्कीच जास्त रोचक ठरु शकते. याबाबत एक गोष्ट आठवली की शाळेत इंग्रजीच्या बाई नेहमी सांगायच्या की वर्गातील काही मुलांचे इंग्रजी लेखन आणि भाषा कच्ची आहे कारण ते मराठीत विचार करुन मग इंग्रजीत लिहितात / बोलतात. जर विचारच इंग्रजीत करायला सुरुवात केली तर इंग्रजी सुधारेल. विचाराची प्रक्रिया आणि त्याची भाषा नियंत्रित कशी करायची हे त्यावेळेस अजिबातच कळले नव्हते. आताही निट्से कळत नाही. पण आता असे होउ शकते एवढे मात्र नक्की सांगु शकतो. कारण आता काही विचार प्रकट करण्यासाठी पटकन इंग्रजीचाच आधार घेतला जातो आणि तेच विचार मराठीत लिहिण्यासाठी थोडा वेळ " विचार " करावा लागतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 11:18 नवीन
ओक्के. मुद्दा इतकाच आहे, की मराठीत किंवा इंग्लिशेतर भाषेत बोलणे अज्जीच ब्यान केल्यामुळे इंग्लिशवरच्या प्रभुत्वात लक्षणीय फरक पडतो किंवा कसे. एखादा तास ठेवा फारतर रोज-त्यात फक्त इंग्रजी बोलायचं इ.इ. पण पूर्णवेळ अशी सक्ती करणे अनाकलनीय आणि तितकाच मूर्खपणा आहे. तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते. तदुपरि- मराठीत बोलणे ब्यान केल्यामुळे विचारही इंग्लिशमध्ये करू लागतो का? बहुधा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
च
चित्रगुप्त Mon, 07/14/2014 - 14:07 नवीन
तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते.
आमच्या हापिसातल्या (आंग्ल शाळेतून शिकलेल्या) किरिस्ताव स्टायलिश पोरी धडधडीत चुकीचे इंग्रजी अत्यंत अत्मविश्वासाने सपाट्याने बोलायच्या. तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेतून इंग्रजी शिकलेल्या मला त्यांच्या बोलण्यातल्या चुका कळत, पण त्यांच्यासारखे आत्मविश्वासाने बोलता मात्र येत नसे. अर्धवट ज्ञान असलेले जास्त आत्मविश्वासू असतात, याचेही हे एक उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 14:14 नवीन
हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/15/2014 - 12:21 नवीन
>> संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते. << सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
इ
इरसाल Mon, 07/14/2014 - 10:02 नवीन
मिपाचे बालगंधर्व आजपासुन कुमारगंधर्व म्हणुन ओळखले जातील.
  • Log in or register to post comments
ब
बालगंधर्व Mon, 07/14/2014 - 10:13 नवीन
इर्साल मितरा, माझ नाव का बदलयच अहे तुमहाला. तुमीच मला सानगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
असंका Mon, 07/14/2014 - 12:14 नवीन
शिक्षणात शिस्त; आणि शिस्तभंगासाठी शिक्षा, आवश्यक आहे असे वाटते. आणि कुठल्या प्रकारच्या शिस्तभंगासाठी कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची हा शिक्षकाचा अधिकार मान्य करायला हवा. कारण त्याच्यावर मुलांची जबाबदारीपण आहे. मारहाण हा शिक्षेचा प्रकार आजकाल अमान्य आहे, कारण त्याने फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात असे दिसते. मग शाळांमध्ये आजकाल कुठल्या शिक्षा दिल्या जातात, कुणी प्रकाश टाकेल का? डस्टरने हातावर मारणे, कोंबडा करणे, फळ्याजवळ फळ्याकडे तोंड करून उभे करणे, बाकावर उभे करणे, वर्गाबाहेर उभे करणे, वर्ग संपल्यावर थोडा वेळ बसवून ठेवणे, मैदानाला फेर्‍या मारणे वगैरे यातल्या कुठल्या शिक्षा अजूनही प्रचारात आहेत?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 07/14/2014 - 13:00 नवीन
चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
प्यारे१ Mon, 07/14/2014 - 13:46 नवीन
चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
सौंदाळा Mon, 07/14/2014 - 12:29 नवीन
उलटा हात करुन बोटाच्या पेरांवर लाकडी फुटपट्टीची कड मारायची जोरात. घोडा करताना बसतो तसे बसायचे, हाताच्या बोटांनी कान धरायचे आणि कोपर जमिनीवर ठेवुन दोन गुडघे आणि दोन कोपरं यावर मैदानात चालायचे. गुडघ्यात्/कोपरात असे खडे रुतायचे. आयआयग्ग, आठवुनच झिणझिण्या आल्या. आमच्या वेळी असे असते तर अर्ध्याच्या वर मास्तरडे खडी फोडायलाच गेले असते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 13:08 नवीन
कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी सदर व्यक्तीस तीन दिवसात हिब्रुमध्ये आयत्यावेळी दिलेल्या विषयावर पाच मिनीटे विषयाशी संबंधित बोलण्याची शिक्षा द्यावी. ते न जमल्यास दरवेळी नवी भाषा व मिनीटांमध्ये वाढ. उरलेल्या वेळी एकांतवास! हे आजन्म चालु ठेवावे!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 13:12 नवीन
कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे
इथे अपवाद युद्ध करणार्‍या सैनिकांचा आहे, ही पुरवणी प्रतिसाद बदलता येत नसल्याने इथे जोडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
निनाद मुक्काम … Mon, 07/14/2014 - 14:09 नवीन
एखादी संस्था त्यांचे नियम बनवू शकते हे मान्य व इंग्रजी संभाषणाचे महत्त्व देखील मान्य , आमच्या हॉटेल व्यवस्थापनाच्या कोर्स मध्ये देखील इतर भाषा बोलल्यास दंड होता , गुटे संस्थेत दंड नसला तरी जर्मन भाषा बोलली जाते , मात्र लहान विद्यार्थ्यांना मारणे मान्य नाही. परदेशात दोषी व्यक्ती तुरुंगात खितपत पडते.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 07/14/2014 - 14:20 नवीन
'प्रियदर्शनी' असे भारदस्त संस्कृत नाव असणार्‍या शाळेत इंग्रजेतर भाषा बोलणे हा अपराध, हेच मुळात कोडे वाटले. कदाचित इंदिराबैंच्या काळात त्यांना खुष करून ग्र्यांटादि मिळवण्यासाठी तसले नाव दिले असेल, किंवा राजीव सोन्यादिंच्या काळातही असे केले गेले असेल. दुसरे म्हणजे 'येथे उभे राहून मोबाईलवर बोलू नये' पासून 'कुलकर्णी येथे रहात नाहीत, उगाच बेल वाजवून अपमान करून घेऊ नये' अश्या पाट्या असणार्‍या पुण्याच्या परिसरात असूनही शाळेत पाट्या नाहीत की काय? 'येथे इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणारांना बेदम चोप दिला जाईल' (की 'दिल्या' जाईल ?) अशी पाटी लावायला हवी. ही पाटी इंग्रजीत असावी, की मराठीत की उर्दूत, हाही चर्चेचा विषय होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 12:14 नवीन
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी बोलावे की नाही, तशी सक्ती करणं योग्य/कायदेशीर आहे की नाही हा बहुतेक चर्चेचा मुद्दा नसावाच. मराठी-अमराठीचा राजकीय वाद, त्यातून उभी राहिलेली दरी, भोसरी आणि आसपासच्या एम.आय.डि.सी. भागात झालेली अमराठी (उ.प्र.-बिहारी) लोकांविरोधातली आंदोलनं/राडे ह्यातून असलेला राग ह्या पैलूचा बहुतेक विचारच केला जात नाहीये. वर काही प्रतिसादांत म्हणल्याप्रमाणे, जितेंद्र सिंग ह्या नावाऐवजी ते जितेंद्र जाधव किंवा जोशी असतं तर मराठीचा मुद्दा न येता ती घटना 'विद्यार्थ्याला अमानुष मारहाण' अशी मोजली गेली असती. पण, जितेंद्र सिंग ह्या (अमराठी - बहुतेक उ.प्र./बिहार प्रांतीय असावे असं नावावरुन वाटतं.) व्यक्तीच्या हातात सत्ता असताना तीचा वापर करुन मराठीद्वेषमूलक कृती केलेली नाही असं छातीठोकपणे सांगता येईल काय? ह्यावर, 'ती मारहाण करण्यात द्वेषच होता असं छातीठोकपणे सांगता येईल काय?' असा उलटप्रश्न नक्कीच विचारता येईल. त्याचं उत्तर 'नाही' असं दिलं तरी, गावांत दरोडे पडल्यावर पोलीस जसे पहिल्यांदा पारध्यांच्या पालावर धाडी घालतात, तसंही इथेही संशयास्पद मुद्द्याचा आधार आहेच. तस्मात, ही घटना केवळ शाळेचे नियम पाळले नाहीत म्हणून शिक्षा इतपत नक्कीच मर्यादित रहात नाही. तिला प्रांतिक/राजकीय रंग येतोच येतो. घटना काय घडलेली असते आणि ती बातमी म्हणून बाहेर पडते तेव्हा, सगळेच पैलू खरोखर आणि पारदर्शकपणे सामोरे येत नाहीत हे तर आपल्याला अगदीच ठाऊक झालंय. इतका भाबडेपणा कुणातही उरलेला नाही आता. प्रश्न आहे तो 'रिडिंग बिटवीन द लाईन्स'चा, आणि त्या कोण कशा वाचतो त्यानुसार त्याचा अर्थ लावण्याचा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 06:17 नवीन
१०० टक्के सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आशु जोग Tue, 07/15/2014 - 14:25 नवीन
हुप्प्या यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी काळाबरोबर राहतात
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 07/16/2014 - 06:48 नवीन
मारहाणीच्या अमानुषपणाबद्दल दुमत नाहीच पण त्याचे कारण मराठीद्वेष असण्याबद्दल जितेंदर सिंग हे उत्तर भारतीय नाव याखेरीज काही ठोस मुद्दा कोणी मांडू शकेल का?? त्या संस्थेतील, भोसरीतील इतर घटना ज्यात मराठीद्वेष दिसतो (उदा. अमराठी विद्यार्थ्यांना तशाच उल्लंघनासाठी कमी शिक्षा किंवा शिक्षा न करणे). जितेंदर सिंगची वागणूक इ ज्यायोगे मराठीद्वेषाचा संशय येउ शकतो असा एखादा मुद्दा आहे का?? नसल्यास केवळ उत्तर भारतीय नाव यावरुन असे आरोप करणे यात आपलाच उत्तर भारतीयद्वेष दिसून येईल..
  • Log in or register to post comments
न
निश Wed, 07/16/2014 - 11:02 नवीन
मुळात मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपणच कारण आहोत. त्यामुळेच जितेंद्र सिंग सारखे उपरे लोक इथे येउन आपल्याच भाषेचा अपमान करतात. ही दुरावस्था तेव्हाच जाईल जेव्हा आपण तिचा अभिमान बाळगु व समोरच्याला ही तो करायला लावु.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/16/2014 - 11:14 नवीन
आता शतकाला थोडा हात भार लावू या म्हणतो...
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/16/2014 - 11:18 नवीन
मी पयला शतकवीर!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा