Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थेंब

प — पद्मश्री चित्रे, Sun, 07/20/2014 - 12:30
संथ पाउस पडतो झाडे,कौले भिजवीत जणू स्वप्न उतरते जडावल्या पापणीत.... झाडे चिंब शहारली पक्षी मिटत पंखात शांत दुपार पेंगते थेंब थेंब न्याहळत... ओल्या लाल कौलांवर मंद पावसाचा सूर हिरव्या कंच शेतावर संथ थेंबांचा पदर... ओला वास रानीवनी ढग पाण्यात वाहात भोवताल सारे स्तब्ध थेंब एकटे गातात....

प्रतिक्रिया द्या
2648 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/20/2014 - 13:16 नवीन
शेवटाला...जोरदार सरी नंतरची..शांतता अनुभवाला आली. बाकी ठीक!
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 07/21/2014 - 07:59 नवीन
छान आहे कविता. शेवटच्या दोन ओळी खासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कवितानागेश Mon, 07/21/2014 - 09:19 नवीन
सुंदर शब्दचित्र.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 07/22/2014 - 09:43 नवीन
येस्स! शब्दचित्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
म
मंदार दिलीप जोशी Tue, 07/22/2014 - 09:10 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/22/2014 - 15:01 नवीन
>>ओला वास रानीवनी ढग पाण्यात वाहात भोवताल सारे स्तब्ध थेंब एकटे गातात.... भीमाशंकरला आलेल्या अनुभवाचं चित्रण या चार ओळीत बद्ध झाल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/22/2014 - 15:07 नवीन
अतिशय सुंदर... खुपच आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/22/2014 - 15:55 नवीन
काय सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 07/22/2014 - 19:26 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/25/2014 - 07:37 नवीन
आहा ! क्या बात ! प्रत्येक ओळीला असं एक एक चित्र दिसलं आणि शेवटच्या ओळीला ती सगळी चित्र कन्सॉलिडेट होऊन एक चित्र स्थिर उभं राहिलं डोळ्यासमोर....
  • Log in or register to post comments
P
psajid Fri, 07/25/2014 - 11:56 नवीन
वा खुप छान कविता
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 07/25/2014 - 12:17 नवीन
खरच शब्दचित्र! आवडलं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा